Tuesday, July 17, 2018

मतदार यादी शुध्‍दीकरण कामास वेग,
लोहा तालुक्‍यात 19 रोजी चावडी वाचन

      भारत निवडणूक आयेागाने निर्धारीत केलेल्‍या कार्यक्रमांतर्गत लोहा तालुक्‍यात मतदार यादीचे शुध्‍दीकरण व पुनरिक्षण कार्यक्रम कामास वेग आला असून मतदार यादी शुध्‍दीकरणाचे काम प्रभावीपणे होण्‍यासाठी लोहा तालुक्‍यात दिनांक 19 जुलै रोजी गावपातळीवर चावडी वाचनाचा अभिनव उपक्रम राबविण्‍यात येत आहे. अशी माहिती लोहयाचे तहसिलदार डॉ. आशिषकुमार बिरादार यांनी प्रसिध्‍दी पत्रकाव्‍दारे दिली आहे.
        भारत निवडणूक आयोगाने निर्धारीत केलेल्‍या कार्यक्रमान्‍वये मतदार यादीचे शुध्‍दीकरण व पुनरिक्षणाचे काम जिल्‍हाधिकारी अरुण डोंगरे, अपर जिल्‍हाधिकारी संतोष पाटील, उपजिल्‍हाधिकारी निवडणूक दिलीप कच्‍छवे यांचे मार्गदर्शनाखाली तसेच कंधारचे उपविभागीय अधिकारी प्रभोदय मुळे यांच्‍या नियोजनात करण्‍यात येत आहे. लोहा तालुक्‍यातील नियुक्‍त 211 बिएलओ यांनी मतदारांच्‍या घरोघरी भेटी देवून दुबार, मयत, कायमस्‍वरुपी स्‍थलांतरीत मतदारांची माहिती गोळा करण्‍यात आलेली आहे. सदरील काम अधिक प्रभावीपणे होण्‍यासाठी लोहा तालुक्‍यात दिनांक 19 जुलै रोजी सकाळी 9 वाजता  गावपातळीवर चावडी वाचनाचा अभिनव उपक्रम तहसिलदार डॉ. आशिषकुमार बिरादार यांनी राबविला आहे. सदर चावडी वाचनाच्‍यावेळी संबंधीत गावचे ग्रामसेवक, तलाठी यांनी उपस्थित रहावे, असे निर्देश देण्‍यात आलेले आहेत.
      दरम्‍यान, मतदार यादीत एकापेक्षा जास्‍त ठिकाणी नाव आढळून आल्‍यास लोकप्रतिनिधीत्‍व अधिनियम 1950 व 1951 अन्‍वये संबंधीत मतदारावर फौजदारी गुन्‍हा दाखल होवून 6 महिण्‍याच्‍या कारावासाची तरतूद आहे. त्‍याअनुषंगाने मतदार यादीमध्‍ये एकसारखी नावे असलेली/एकसारखे फोटो असलेली अशा एकूण 6701 दुबार नावे असलेल्‍या मतदारांना भारत निवडणूक आयोगाकडून नोटीसा बजावण्‍यात आलेल्‍या आहेत. त्‍यांची सुनावणी 28 जून व 11 जुलै 2018  रेाजी घेण्‍यात आली तसेच, पुढील सुनावणी 20 जुलै रोजी तहसिल कार्यालय लोहा येथे घेण्‍यात येणार आहे.
      लोहा तालुक्‍यातील सुजान मतदारांनी त्‍यांचे नाव मतदार यादीत एकाच ठिकाणी असल्‍याची खात्री करावी. दुबार, मयत, कायमस्‍वरुपी स्‍थलांतरीत मतदारांची नावे वगळण्‍यासाठी बिएलओ यांना सहकार्य करुन, मतदार यादीचे शुध्‍दीकरण व पुनरिक्षण कार्यक्रम यशस्‍वी करावा, असे आवाहन तहसिलदार डॉ. आशिषकुमार बिरादार यांनी केले आहे.
      सदर कार्यक्रम यशस्‍वी करण्‍यासाठी निवडणूक विभागाचे नायब तहसिलदार एस.एम देवराये, अव्‍वल कारकून पी.पी. बडवणे, प्रशांत आपशेटे, लिपीक एन.एम.सोनकांबळे, सुर्यकांत पांचाळ, विजय मुंडे आदि परिश्रम घेत आहेत.

जिल्ह्यात गत 24 तासात
सरासरी 18.30 मि. मी. पाऊस

नांदेड, दि. 17 :- जिल्ह्यात मंगळवार 17 जुलै 2018 रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या गत 24 तासात सरासरी 18.30 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून दिवसभरात एकूण 292.76 मिलीमीटर पाऊस झाला आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 399.80 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 42.06 टक्के एवढा पाऊस झाला आहे.
जिल्ह्यात 17 जुलै 2018 रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये तालुकानिहाय पुढील प्रमाणे कंसात एकूण पाऊस : नांदेड- 58.13 (471.69), मुदखेड- 17.00 (551.01), अर्धापूर- 15.67 (392.68), भोकर- 11.75 (543.25), उमरी- 28.00 (435.98), कंधार- 19.17 (390.83), लोहा- 23.67 (412.32), किनवट- 9.57 (389.55), माहूर- 11.00 (530.50), हदगाव- 18.00 (532.88), हिमायतनगर- 18.00 (515.02), देगलूर- 6.00 (148.33), बिलोली- 12.40 (258.80), धर्माबाद- 13.00 (298.98), नायगाव- 20.40 (316.60), मुखेड- 11.00 (208.40). आज अखेर पावसाची सरासरी 399.80 (चालू वर्षाचा एकूण पाऊस 6396.82) मिलीमीटर आहे.  
00000

Monday, July 16, 2018

Cancer Shibir Mukhed photo




जिल्हाधिकारी डोंगरे यांचे हस्ते
शेतकऱ्यांना पिक कर्जाचे वाटप
नांदेड, दि. 16 :-  बिलोली तालुक्यातील चेकपोस्ट कार्ला फाटा व सैनिकी विद्यालय सगरोळी येथे जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी नुकतीच भेट देऊन वृक्षारोपण केले. तसेच कासराळी जिल्हा मध्यवर्ती बँकेमार्फत मंजूर पिक कर्जाचे वाटप जिल्हाधिकारी श्री. डोंगरे यांचे हस्ते करण्यात आले. शेतकरी गंगाराम बुद्धेवाड, विठ्ठल मादसवाड, शेख रसुल शे. अहमद, विठ्ठल जंगम, शेख जलाल शे. अहमद या शेतकऱ्यांना पिक कर्जाचे वाटप करण्यात आले.
यावेळी उपविभागीय अधिकारी व्यंकट कोळी, परि. उपजिल्हाधिकारी तथा तहसिलदार श्रीकांत गायकवाड, डॉ. नायब तहसिलदार ओमप्रकाश गोंड, संजय नागमवाड, आर. जी. चौव्हाण, यु. एस. निलावाड, कासराळी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे व्यवस्थापक, मंडळ अधिकारी, तलाठी, शेतकरी आदींची उपस्थिती होती.
000000


देगलूर येथील 34 तंबाखू विक्रेत्यांवर कार्यवाही2017       /
नांदेड, दि. 16 :- राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कक्ष जिल्हा रुग्णालय नांदेड यांना प्राप्त माहितीनुसार जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एच. आर. गुंटूरकर व अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हास्तरीय तंबाखू नियंत्रण पथकाने देगलूर येथे 13 जुलै रोजी अचानक धाडी टाकण्यात आल्या.
या परिसरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाची मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्याचे तसेच कोटपा 2003 कायद्याचे उल्लंघन होत असल्याचे दिसून आले. कायद्यातील तरतुदीनुसार पथकामार्फत 34 तंबाखू विक्रेते यांच्याकडून 20 हजार 700 रुपये इतका दंड आकारण्यात आला. या पथकात जिल्हा सल्लागार डॉ. साईप्रसाद शिंदे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी डॉ. अर्चना तिवारी, जिल्हा कार्यक्रम समन्वयक डॉ. प्रदीप बोरसे तथा सामाजिक कार्यकर्ता बालाजी गायकवाड व स्थानिक पोलीस उप निरीक्षक श्रीमती मनीषा पवार, पोकॉ शिंदे, चाटे आदी होते.
या अनुषंगाने नांदेड जिल्ह्याअंतर्गत कोणत्याही ठिकाणी कोटपा कायद्याचे उल्लंघन करणारे तसेच शैक्षणिक अथवा शासकीय कार्यालय परिसरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाची विक्री होत असल्यास जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्ष, जिल्हा रुग्णालय, नांदेड येथे तक्रार नोंदवून नांदेड जिल्हा तंबाखूमुक्त करण्याच्या अभियानास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. गुंटूरकर यांनी केले आहे.
0000


जिल्ह्यात गत 24 तासात
सरासरी 7.88 मि.मी.पाऊस
नांदेड, दि. 16 :- जिल्ह्यात सोमवार 16 जुलै 2018 रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या गत 24 तासात सरासरी 7.88 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून दिवसभरात एकूण 126.01 मिलीमीटर पाऊस झाला आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 381.50 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 40.09 टक्के एवढा पाऊस झाला आहे.
जिल्ह्यात 16 जुलै 2018 रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये तालुकानिहाय पुढील प्रमाणे कंसात एकूण पाऊस : नांदेड- 2.63 (413.56), मुदखेड- 2.00 (534.01), अर्धापूर- 2.67 (377.01), भोकर- 3.75 (531.50), उमरी- 17.00 (407.98), कंधार- 3.33 (371.66), लोहा- 7.00 (388.65), किनवट- 22.00 (379.98), माहूर- 33.50 (519.50), हदगाव- 9.57 (514.88), हिमायतनगर- 8.67 (497.02), देगलूर- 0.33 (142.33), बिलोली- 1.00 (246.40), धर्माबाद- 8.33 (285.98), नायगाव- 3.80 (296.20), मुखेड- 0.43 (197.40). आज अखेर पावसाची सरासरी 381.50 (चालू वर्षाचा एकूण पाऊस 6104.06) मिलीमीटर आहे.  
00000


जिल्ह्यात गत 24 तासात
सरासरी 7.88 मि.मी.पाऊस
नांदेड, दि. 16 :- जिल्ह्यात सोमवार 16 जुलै 2018 रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या गत 24 तासात सरासरी 7.88 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून दिवसभरात एकूण 126.01 मिलीमीटर पाऊस झाला आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 381.50 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 40.09 टक्के एवढा पाऊस झाला आहे.
जिल्ह्यात 16 जुलै 2018 रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये तालुकानिहाय पुढील प्रमाणे कंसात एकूण पाऊस : नांदेड- 2.63 (413.56), मुदखेड- 2.00 (534.01), अर्धापूर- 2.67 (377.01), भोकर- 3.75 (531.50), उमरी- 17.00 (407.98), कंधार- 3.33 (371.66), लोहा- 7.00 (388.65), किनवट- 22.00 (379.98), माहूर- 33.50 (519.50), हदगाव- 9.57 (514.88), हिमायतनगर- 8.67 (497.02), देगलूर- 0.33 (142.33), बिलोली- 1.00 (246.40), धर्माबाद- 8.33 (285.98), नायगाव- 3.80 (296.20), मुखेड- 0.43 (197.40). आज अखेर पावसाची सरासरी 381.50 (चालू वर्षाचा एकूण पाऊस 6104.06) मिलीमीटर आहे.  
00000

मृद व जलसंवर्धन रील्स स्पर्धेला ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ #जलसंधारणदिन #वॉकेथॉन२०२६ #वॉकफॉरवॉटर #रीलस्पर्धा #WalkForWater #WaterConservationDay...