Sunday, July 5, 2020

वृत्त क्र. 609


कोरोनातून 11 व्यक्ती झाले बरे
आज 5 व्यक्ती बाधित तर दोन दिवसात दोन मृत्यू
नांदेड (जिमाका) दि. 5 :- कोरोना आजारातून आज 11 बाधित व्यक्ती बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. यात देगलूर कोविड केअर सेंटर येथील 1 बाधित व्यक्ती, पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथील 9 तसेच सोलापूर येथे संदर्भित झालेला 5 वर्षाचा एक बालक यांचा समावेश आहे. तर शनिवार, रविवार या दोन दिवसात दोन बाधितांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण  321 व्यक्ती कोरोनातून बरे झाले आहेत. 
शनिवार 4 जुलै रोजी बिलोली येथील कोरोना बाधित 65 वर्षाच्या एका महिलेचा डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नांदेड येथे उपचार सुरु असतांना मृत्यू झाला. रविवार 5 जुलै रोजी देगलूर येथील 57 वर्षाच्या पुरुषाचा एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असतांना मृत्यू झाला आहे. या बाधितांना उच्च रक्तदाब, श्वसनाचा त्रास आदी आजार होते. आतापर्यंत जिल्ह्यात कोरोनामुळे बाधित मृत्यू व्यक्तीची संख्या 20 एवढी झाली आहे.  
रविवार 5 जुलै रोजी प्राप्त झालेल्या 59 अहवालापैकी 52 निगेटिव्ह अहवाल प्राप्त झाले. तसेच 5 बाधित व्यक्ती पॉझिटिव्ह आढल्यामुळे जिल्ह्यातील एकुण बाधित व्यक्तींची संख्या 428 एवढी झाली आहे. यात उमर कॉलनी येथील 32 वर्षाचा 1 पुरुष, हबिबिया कॉलनी येथील 24 वर्षाची 1 महिला, नांदेड तालुक्यातील हस्सापूर येथील 59 वर्षाचा 1 पुरुष, बिलोली इदगाह रोड येथील 65 वर्षाचा 1 पुरुष, हिंगोली जिल्ह्यातील मंगळवारपेठ येथील 45 वर्षाची 1 महिला यांचा समावेश आहे.  
आतापर्यंत 428 बाधितांपैकी 321 बाधितांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. उर्वरीत 87 बाधितांवर औषधोपचार चालू आहेत. यातील 9 बाधितांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे. यात 5 महिला व 4 पुरुष बाधिताचा समावेश आहे.
नांदेड जिल्ह्यात 87  बाधित व्यक्तींमध्ये डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 34 बाधित, पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथे 33 बाधित तर मुखेड कोविड केअर सेंटर येथे 2,  हदगाव कोविड केअर सेंटर येथे 1 बाधित तसेच जिल्हा रुग्णालय येथे 4, बिलोली कोविड केअर सेंटर येथे 2 बाधित व्यक्ती उपचार घेत आहे. तर 11 बाधित औरंगाबाद येथे संदर्भित झाले आहेत. रविवार 5 जूलै रोजी 190 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्यांचा अहवाल उद्या सायंकाळी पर्यंत प्राप्त होईल.
जिल्ह्याची कोरोना विषयी संक्षीप्त माहिती पुढील प्रमाणे आहे.
सर्वेक्षण- 1 लाख 47 हजार 241,
घेतलेले स्वॅब- 6 हजार 962,
निगेटिव्ह स्वॅब- 5 हजार 901,
आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या- 5,
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 428,
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या- 02,
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- निरंक,
मृत्यू संख्या- 20,
रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 321,
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 87,
स्वॅब तपासणी चालू व्यक्तींची 190 एवढी संख्या आहे.
कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.
00000

Saturday, July 4, 2020


मुक्रमाबाद येथील लेंडी प्रधान प्रकल्पांतर्गत
संबंधीत घराचा मावेजा मुखेड तहसील कार्यालयात होणार वाटप
नांदेड (जिमाका) दि. 4 :- भुसंपादन प्रस्‍ताव लेंडी प्रधान प्रकल्‍प (जुने गावठाण)  वार्ड क्र. 1 बुडीत क्षेत्रासाठी मुखेड तालुक्यातील मौजे मुक्रमाबाद येथील संपादनातील घराचा अंतिम मावेजा संबंधीत घर मालकांना 6 ते 10 जुलै 2020 या कालवधीत मुखेड तह‍सील कार्यालय येथे वाटप करण्‍यात येणार आहे. 
काही प्रशासकिय कारणामुळे सदर मावेजा वाटपाचे ठिकाण मुक्रमाबाद शासकिय विश्रामगृह हे बदलण्‍यात आाले आहे. वार्ड क्र. 1 मधील संपादनातील घरमालकांना संपादीत घराचा मावेजा आता मुखेड तह‍सील कार्यालय येथे 6 ते 10 जुलै 2020 कालावधीत वाटप करण्‍यात येत आहे. नोटीशीत नमुद दिनांकास आवश्‍यक ते कागदपत्रे घेवून मावेजा उचल करण्‍यासाठी संबंधीतांनी मुखेड तहसील कार्यालय येथे उपस्थित रहावे. तसेच मावेजा वाटप ठिकाण बदलाची नोंद घ्‍यावी, असे आवाहन उपजिल्हाधिकारी (भुसंपादन) लसिका, नांदेड यांनी केले आहे.      
0000




वृत्त क्र. 608   
कोरोनातून 4 व्यक्ती झाले बरे
आज नवीन 9 व्यक्ती बाधित
नांदेड (जिमाका) दि. 4 :- कोरोना आजारातून आज पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथील 4 बाधित व्यक्ती बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण 310 व्यक्तीं कोरोनातून बरे झाले आहेत. 
शनिवार 4 जुलै रोजी प्राप्त अहवालात 68 अहवाल निगेटीव्ह प्राप्त झाले तर 9 नवीन बाधित व्यक्ती आढळले. जिल्ह्यात एकूण बाधित व्यक्तीची संख्या 423 एवढी झाली आहे. नवीन बाधितांमध्ये गणेशनगर येथील 63 वर्षाची 1 महिला, देगलूर येथील 57 वर्षाचा 1 पुरुष, आंबेडकरनगर येथील 50 वर्षाचा 1 पुरुष, अशोकनगर येथील 54 वर्षाचा 1 पुरुष, विष्णुपुरी नांदेड येथील 31 वर्षाची 1 महिला, बिलोली येथील 71 वर्षाची 1 महिला, 33 वर्षाचा 1 पुरुष, मुखेड तालुक्यातील दापका येथील 32 वर्षाचा 1 पुरुष, लातूर जिल्हा अहमदपूर तालुक्यातील अंधोरी येथील 49 वर्षाचा एका पुरुषांचा यात समावेश आहे. सद्यस्थितीत या सर्व बाधित व्यक्तींवर उपचार सुरु आहेत.  
आतापर्यंत 423 बाधितांपैकी 310 बाधितांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. उर्वरीत 95 बाधितांवर औषधोपचार चालू आहेत. यातील 11 बाधितांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे. यात 5 महिला व 6 पुरुष बाधिताचा समावेश आहे.
नांदेड जिल्ह्यात 95  बाधित व्यक्तींमध्ये डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 31 बाधित, पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथे 43 बाधित तर मुखेड कोविड केअर सेंटर येथे 2,  देगलूर कोविड केअर सेंटर येथे 1, हदगाव कोविड केअर सेंटर येथे 1 बाधित तसेच जिल्हा रुग्णालय येथे 3, बिलोली कोविड केअर सेंटर येथे 2, नांदेड येथील एका खाजगी रुग्णालयात 1 बाधित व्यक्ती उपचार घेत आहे. तर 10 बाधित औरंगाबाद आणि 1 बाधित व्यक्ती सोलापूर येथे संदर्भित झाले आहेत. शनिवार 4 जूलै रोजी 116  व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्यांचा अहवाल उद्या सायंकाळी पर्यंत प्राप्त होईल.
जिल्ह्याची कोरोना विषयी संक्षीप्त माहिती पुढील प्रमाणे आहे.
सर्वेक्षण- 1 लाख 45 हजार 128,
घेतलेले स्वॅब- 6 हजार 829,
निगेटिव्ह स्वॅब- 5 हजार 849,
आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या- 9,
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 423,
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या- 16,
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- निरंक,
मृत्यू संख्या- 18,
रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 310,
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 95,
स्वॅब तपासणी चालू व्यक्तींची 116 एवढी संख्या आहे.
कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.
00000



अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर आता
चार जल बोटींद्वारे जिल्हा प्रशासनाची करडी नजर
नांदेड (जिमाका) दि. 4 :-जिल्ह्यातील आपत्कालीन परिस्थिती व नदीतील अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर करडी नजर ठेवण्याच्या उद्देशाने जिल्हा प्रशासनाने चार नवीन बोटींची इतर अत्यावश्यक साधनांसह खरेदी केली आहे. या बोटींचे आज तांत्रिक समितीद्वारे तपासणी करुन या बोटींना जिल्हा प्रशासनाच्या ताफ्यात सहभागी करून घेतले. जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी या बोटींची पाहणी केली.
यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, मनपा आयुक्त डॉ. सुनील लहाने, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण, तहसिलदार नांदेड सारंग चव्हाण, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी किशोर कुऱ्हे, अग्निशमन अधिकारी रईस पाशा आदी उपस्थित होते.
या चार बोटींपैकी दोन बोटी या नांदेड शहरासाठी तर एक बोट हदगाव तहसिल व एक बोट नायगाव तहसिलकडे सुपूर्द केली जाणार आहे. याचबरोबर या बोटीसमवेतच प्रत्येक तालुक्याला लाईफ जॅकेट, लाईफ बॉय, सॉ कटर, रेस्क्यू रोप, मेगा फोन, फर्स्ट एड किट, फोल्डेबल स्ट्रेचर, टूल कीट इत्यादी शोध व बचाव साहीत्य दिले जाणर आहे. प्रत्येक तहसिल कार्यालयातील दोन कर्मचारी याप्रमाणे बोट चालविण्याचे प्रशिक्षण मास्टर ट्रेनर द्वारा दिले जाणार आहे.
00000

Friday, July 3, 2020


वृत्त क्र. 606   
कोरोनातून 8 व्यक्ती झाले बरे
आज नवीन 16 व्यक्ती बाधित
एका महिलेचा उपचारा दरम्यान मृत्यू
नांदेड (जिमाका) दि. 3 :- कोरोना आजारातून आज पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथील 7 बाधित आणि डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथील 1 बाधित असे एकूण 8 बाधित व्यक्ती बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण 306 व्यक्तीं कोरोनातून बरे झाले आहेत. 
नांदेड चौफाळा येथील 52 वर्षाच्या महिलेचा गुरुवार 2 जुलै रोजी सायंकाळी डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय रुग्णालय येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. या बाधित महिलेला उच्च रक्तदाब, श्वासनास त्रास आणि मधुमेह इत्यादी आजार होते. त्यामुळे आतापर्यंत जिल्ह्यात कोरानामुळे बाधित मृत्त व्यक्तींची संख्या 18 एवढी झाली आहे. शुक्रवार 3 जुलै रोजी प्राप्त झालेल्या एकुण 106 अहवालापैकी 71 अहवाल निगेटीव्ह प्राप्त झाले तर 16 नवीन बाधित व्यक्ती आढळले. जिल्ह्यात एकूण बाधित व्यक्तीची संख्या 414 एवढी झाली आहे.
नवीन बाधितांमध्ये गवळीपुरा येथील 20 वर्षाची 1 महिला, नवीन कौठा येथील 42 वर्षाचा 1 पुरुष, विष्णुपुरी येथील 31 वर्षाचा 1 पुरुष, देगलूर नाका रहेमतनगर येथील 50 वर्षाचा 1 पुरुष, चक्रधरनगर येथील 65 वर्षाची 1 महिला, विकासनगर येथील 35 वर्षाचा 1 पुरुष, श्रीनगर येथील 38 वर्षाची 1 महिला व 10 व 17 वर्षाचे 2 पुरुष, आंबेडकर येथील 35 व 38 वर्षाचे 2 पुरुष, बळीरामपूर येथील 21 वर्षाचा 1 पुरुष, कंधार तालुक्यातील उस्माननगर येथील 27 वर्षाचा 1 पुरुष, कंधार येथील 23 व 45 वर्षाच्या 2 महिला आणि 17 वर्षाचा एका पुरुषांचा यात समावेश आहे. सद्यस्थितीत या सर्व बाधित व्यक्तींवर उपचार सुरु आहेत.  
आतापर्यंत 414 बाधितांपैकी 306 बाधितांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. उर्वरीत 90 बाधितांवर औषधोपचार चालू आहेत. यातील 10 बाधितांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे. यात 4 महिला व 6 पुरुष बाधिताचा समावेश आहे.
नांदेड जिल्ह्यात 90  बाधित व्यक्तींमध्ये डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 29 बाधित, पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथे 46 बाधित तर मुखेड कोविड केअर सेंटर येथे 1,  देगलूर कोविड केअर सेंटर येथे 1, हदगाव कोविड केअर सेंटर येथे 1 बाधित तसेच जिल्हा रुग्णालय येथे 2 बाधित उपचार घेत आहे. तर 9 बाधित औरंगाबाद आणि 1 बाधित व्यक्ती सोलापूर येथे संदर्भित झाले आहेत. शुक्रवार 3 जूलै रोजी 93  व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्यांचा अहवाल उद्या सायंकाळी पर्यंत प्राप्त होईल.
जिल्ह्याची कोरोना विषयी संक्षीप्त माहिती पुढील प्रमाणे आहे.
सर्वेक्षण- 1 लाख 47 हजार 49,
घेतलेले स्वॅब- 6 हजार 716,
निगेटिव्ह स्वॅब- 5 हजार 781,
आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या- 16,
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 414,
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या- 14,
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 5,
मृत्यू संख्या- 18,
रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 306,
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 90,
स्वॅब तपासणी चालू व्यक्तींची 93 एवढी संख्या आहे.
कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.
00000


वृत्त क्र. 605   
कृषि संजीवनी सप्ताहअंतर्गत
कंधार तालुक्यात शेतकऱ्यांना मार्गदर्शन
नांदेड (जिमाका) दि. 3 :- कृषि संजीवनी सप्ताह अंतर्गत कंधार तालुक्यात पानभोसी, बहादरपुरा, शिरढोण, आलेगाव, हाळदा, चिंचोली, येलूर, अंबुलगा, उस्माननगर, लाठखू , फुलवळ,  पानशेवडी, बारुळ या गावासह एकूण 35 गावात हा कार्यक्रम बुधवार 1 जुलै रोजी संपन्न झाला. या गावात सरपंच, प्रगतशील शेतकरी, कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ यांच्या उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांच्या बैठका  घेऊन विविध विषयावर त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. त्याचबरोबर फळबाग लागवडीच्या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
कंधार पंचायत समिती कृषी विभाग व पंचायत समितीच्या संयुक्त विद्यमाने कृषी दिन वसंतराव नाईक सभागृहामध्ये साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी पंचायत समितीच्या सभापती लक्ष्मीबाई व्यंकटराव पाटील घोरबांड, पंचायत समिती सदस्य उत्तम चव्हाण, शिवा भाऊ नरंगले, गटविकास अधिकारी यु डी रहाटीकर, तालुका कृषी अधिकारी रमेश देशमुख, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक विनोद पुनवर, कृषी अधिकारी एस. एम. मुंडे, विस्तार अधिकारी एस. एस. बेलदार, डी. ए. भगत यांच्यासह शेतकरी दत्ता धर्मेकर गोविंदराव मोरे, माजी पंचायत समिती सदस्य माधवराव गीते, कृषी निविष्ठा विक्रेते पंडित देवकांबळे, भगवान डफडे शिवराज मंगनाळे चाटे, अरुण कांगणे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
प्रास्ताविकात तालुका कृषी अधिकारी रमेश देशमुख यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांची व कृषी संजीवनी सप्ताहअंतर्गत हाती घेण्यात आलेल्या संपूर्ण कार्यक्रमाची माहिती दिली. पंचायत समिती सदस्य शिवाभाऊ नरंगले, उत्तम चव्हाण यांनी वसंतराव नाईक साहेबांच्या योगदानाबद्दल व इतर विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी पंचायत समिती प्रांगणात वृक्ष लागवड करण्यात आली.
कृषी संजीवनी सप्ताह अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र सगरोळी येथील प्रा. व्यंकट शिंदे यांनी विविध गावांना भेटी देत शेतकऱ्यांना पीक  उत्पन्नावाढीच्या तंत्रज्ञानाची माहिती दिली. तालुक्यातील विविध गावात मंडळ कृषी अधिकारी पवन सिंह बैनाडे, विकास नारळीकर, आर. एम. भुरे, कृषी पर्यवेक्षक आत्माराम धुळगुंडे, बालाजी डफडे, संभाजी डावळे, दत्ता रामरूपे यांच्यासह कृषी सहाय्यक सोपान उबाळे, परमेश्वर मोरे, शिवाजी सूर्यवंशी, गोविंद तोटावाड, माधव गुट्टे, कल्पना जाधव, भूषण पेटकर, कुंभारे गजानन सूर्यवंशी, संतोष वाघमारे, जी. एम. कळणे यांच्यासह तालुक्यातील क्षेत्रीय कर्मचाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गाव बैठका घेऊन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कृषी विभागाच्या सर्व योजनांची माहिती देण्यात आली.
शेतकऱ्यांना मार्गदर्शन करुन पुढील पिकाचे नियोजन करण्यात आले. रुंद सरी वरंबा पद्धतीने लागवड एकात्मिक कीड, रोग व्यवस्थापन एकात्मिक खत व्यवस्थापन लिंबोळी अर्क तयार करणे. सोयाबीन उगवण यासह पिक विमा राज्य व केंद्र सरकारच्या विविध योजना ठिबक सिंचन कृषी यांत्रिकीकरण फळबाग लागवड, शेतकरी वैयक्तिक अपघात विमा योजना याबद्दल माहिती व मार्गदर्शन करण्यात आले. गावागावात माहिती पत्रके शेतकरी मासिके देण्यात आली. नवीन वर्गणीदार करून घेण्यासाठी माहिती दिली. कंधार मंडळ कृषी अधिकारी अंतर्गत प्रचार वाहन व त्यावर  ध्वनिक्षेपक लावून त्याद्वारे सात दिवस गावोगावी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम आठवडाभर चालणार असून संपूर्ण तालुक्यातील संपूर्ण गावात मोठ्या प्रमाणावर जनजागृती करून कार्यक्रम हाती घेण्यात येत आहे. या कार्यक्रमासाठी कृषी विज्ञान केंद्र सगरोळी, पोखर्णी तसेच  कापूस संशोधन केंद्र नांदेड येथील शास्त्रज्ञ यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
00000


वृत्त क्र. 604   
प्रधानमंत्री पिक विमा हप्ता भरण्याची मुदत 31 जुलै
नांदेड (जिमाका) दि. 3 :- जिल्ह्यात खरीप हंगाम सन 2020-21 साठी खरीप ज्वारी, मुग, उडीद, तुर, सोयाबीन व कापूस या पिकांसाठी प्रधानमंत्री पिक विमा योजना लागू करण्यात आली आहे. कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना बँकेत पिक विमा भरण्याची अंतिम मुदत शुक्रवार 31 जुलै 2020 दिली आहे. शेतकऱ्यांनी अधिक माहितीसाठी तालुका कृषि अधिकारी किंवा जवळच्या बँकेशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
प्रधानमंत्री पिक विमा योजना राज्यात खरीप हंगाम 2020-21 मध्ये राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रधानमंत्री पिक विमा योजना कर्जदार, बिगर कर्जदार शेतकऱ्यांना अधिसुचीत क्षेत्रातील पिकांसाठी बंधनकारक होती. यावेळेस शेतकऱ्यांना ऐच्छिक केली आहे. या योजनेंतर्गत वास्तवदर्शी विमा हप्ता आकारण्यात येणार आहे. खरीप हंगामातील पिकांसाठी 2 टक्के व कापसासाठी 5 टक्के ठेवण्यात आला आहे. या योजनेंतर्गत जोखीम स्तर सर्व पिकांसाठी 70 टक्के निश्चित करण्यात आला आहे. पिक पेरणीपासून काढणीपर्यंतचा कालावधी नैसर्गीक आपत्ती आग, विज कोसळणे, गारपीट, चक्रीवादळ, पूर, दुष्काळ, पावसातील खंड, किड व रोग इत्यादी बाबीमुळे पिकांच्या उत्पादनात येणारी घट काढणीपश्चात नुकसान इत्यादी जोखीम यामध्ये समाविष्ट करण्यात आले आहे.
या योजनेंतर्गत विमा संरक्षीत रक्कम व विमा हप्ता पुढीलप्रमाणे राहील. ज्वारी, सोयाबीन, मूग, उडीद, तूर, कापूस पिकासाठी जोखीम स्तर 70 टक्के आहे. ज्वारी पिकासाठी विमा संरक्षण प्रति हे. (उंबरठा उत्पन्न पातळीपर्यंत) : विमा संरक्षित रक्कम 25 हजार रुपये, विमा हप्ता दर 24 टक्के, विमा हप्ता रक्कम 6 हजार रुपये. शेतकरी हिस्सा प्रति हे. : विमा हप्ता दर 2 टक्के, विमा हप्ता रक्कम 500 रुपये. केंद्राचा हिस्सा प्रति हे. : विमा हप्ता 11 टक्के, विमा हप्ता अनुदान रक्कम 2 हजार 750, राज्य हिस्सा प्रति हेक्टर : विमा हप्ता दर 11 टक्के, विमा हप्ता अनुदान रक्कम 2 हजार 750 रुपये.
सोयाबीन पिकासाठी विमा संरक्षण प्रति हे. (उंबरठा उत्पन्न पातळीपर्यंत) : विमा संरक्षित रक्कम 45 हजार रुपये, विमा हप्ता दर 30 टक्के, विमा हप्ता रक्कम 13 हजार 500 रुपये. शेतकरी हिस्सा प्रति हे. : विमा हप्ता दर 2 टक्के, विमा हप्ता रक्कम 900 रुपये. केंद्राचा हिस्सा प्रति हे. : विमा हप्ता 14 टक्के, विमा हप्ता अनुदान रक्कम 6 हजार 300, राज्य हिस्सा प्रति हेक्टर : विमा हप्ता दर 14 टक्के, विमा हप्ता अनुदान रक्कम 6 हजार 300 रुपये.
मूग पिकासाठी विमा संरक्षण प्रति हे. (उंबरठा उत्पन्न पातळीपर्यंत) : विमा संरक्षित रक्कम 20 हजार रुपये, विमा हप्ता दर 24 टक्के, विमा हप्ता रक्कम 4 हजार 800 रुपये. शेतकरी हिस्सा प्रति हे. : विमा हप्ता दर 2 टक्के, विमा हप्ता रक्कम 400 रुपये. केंद्राचा हिस्सा प्रति हे. : विमा हप्ता 11 टक्के, विमा हप्ता अनुदान रक्कम 2 हजार 200, राज्य हिस्सा प्रति हेक्टर : विमा हप्ता दर 11 टक्के, विमा हप्ता अनुदान रक्कम 2 हजार 200 रुपये.
उडीद पिकासाठी विमा संरक्षण प्रति हे. (उंबरठा उत्पन्न पातळीपर्यंत) : विमा संरक्षित रक्कम 20 हजार रुपये, विमा हप्ता दर 26 टक्के, विमा हप्ता रक्कम 5 हजार 200 रुपये. शेतकरी हिस्सा प्रति हे. : विमा हप्ता दर 2 टक्के, विमा हप्ता रक्कम 400 रुपये. केंद्राचा हिस्सा प्रति हे. : विमा हप्ता 12 टक्के, विमा हप्ता अनुदान रक्कम 2 हजार 400, राज्य हिस्सा प्रति हेक्टर : विमा हप्ता दर 12 टक्के, विमा हप्ता अनुदान रक्कम 2 हजार 400 रुपये.
तूर पिकासाठी विमा संरक्षण प्रति हे. (उंबरठा उत्पन्न पातळीपर्यंत) : विमा संरक्षित रक्कम 35 हजार रुपये, विमा हप्ता दर 27 टक्के, विमा हप्ता रक्कम 9 हजार 450 रुपये. शेतकरी हिस्सा प्रति हे. : विमा हप्ता दर 2 टक्के, विमा हप्ता रक्कम 700 रुपये. केंद्राचा हिस्सा प्रति हे. : विमा हप्ता 12.5 टक्के, विमा हप्ता अनुदान रक्कम 4 हजार 375, राज्य हिस्सा प्रति हेक्टर : विमा हप्ता दर 12.5 टक्के, विमा हप्ता अनुदान रक्कम 4 हजार 375 रुपये.
कापूस पिकासाठी विमा संरक्षण प्रति हे. (उंबरठा उत्पन्न पातळीपर्यंत) : विमा संरक्षित रक्कम 45 हजार रुपये, विमा हप्ता दर 19 टक्के, विमा हप्ता रक्कम 8 हजार 550 रुपये. शेतकरी हिस्सा प्रति हे. : विमा हप्ता दर 5 टक्के, विमा हप्ता रक्कम 2 हजार 250 रुपये. केंद्राचा हिस्सा प्रति हे. : विमा हप्ता 7 टक्के, विमा हप्ता अनुदान रक्कम 3 हजार 150, राज्य हिस्सा प्रति हेक्टर : विमा हप्ता दर 7 टक्के, विमा हप्ता अनुदान रक्कम 3 हजार 150 एवढी रक्कम आहे, असेही जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नांदेड यांनी प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.
00000

मृद व जलसंवर्धन रील्स स्पर्धेला ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ #जलसंधारणदिन #वॉकेथॉन२०२६ #वॉकफॉरवॉटर #रीलस्पर्धा #WalkForWater #WaterConservationDay...