Monday, February 2, 2026

वृत्त क्र. 159

दहावी-बारावी परीक्षेसंदर्भात हेल्पलाईन

नांदेड दि. 2 फेब्रुवारी :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्यावतीने फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये घेण्यात येणा-या माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेसंदर्भात येणा-या अडचणी सोडविण्यासाठी विभागीय मंडळ स्तरावर इयत्ता 10 वी साठी 02382-251633 व इ. 12 वीसाठी 02382-251733 या हेल्पलाईन सुरु करण्यात आलेली आहेत. सदर हेल्पलाईनसाठी नियुक्त केलेले अधिकारी/कर्मचारी यांची नावे व भ्रमणध्वनी क्रमांक पुढीलप्रमाणे आहेत.

चवरे ए.पी. (वरिष्ठ अधिक्षक तथा (प्र.) सहाय्यक सचिव ) मो.नं. 9421765683.

उच्च माध्यमिक इ. 12 वी साठी 

कारसेकर जे.एस. (सहाय्यक अधिक्षक तथा (प्र.) व.अ.) - मो.नं. 9822823780. पवार एन.पी (पर्यवेक्षक लिपीक) - मो.नं. 9834464177. राठोड ए.सी. (वरिष्ठ लिपीक)- मो.नं. 9545242726.

माध्यमिक इ.10 वी साठी 

केंद्रे एम.व्ही. (सहाय्यक अधिक्षक तथा (प्र.) व.अ.)- मो.नं. 9421258116. वैद्य एन.एल. (पर्यवेक्षक लिपीक)- मो.नं. 7972563817. सुर्यवंशी ए.एल. (कनिष्ठ लिपीक )- मो.नं. 7620166354 हे नंबर दिले आहेत. 

विद्यार्थी, पालक व शाळा प्रमुखांनी आपल्या अडीअडचणी विषयी वरील तसेच पुढील समुपदेशकांशी दुरध्वनी व भ्रमणध्वनी क्रमांकावर सकाळी 8 ते सायं. 8 यावेळेत संपर्क साधावा.

माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा फेब्रु-मार्च 2026 भयमुक्त, तणावमुक्त परीक्षेसंदर्भात विद्यार्थ्यांना व इतर घटकांना त्यांच्या अडीअडचणी सोडवता याव्यात यासाठी विद्यार्थी-पालक यांचेसाठी समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली असून आवश्यकतेनुसार पुढीलप्रमाणे समुपदेशकांशी संपर्क करता येईल, असे आवाहन विभागीय सचिव लातूर विभागीय मंडळ लातूर यांनी केले आहे.

नांदेड जिल्हा समुपदेशकाचे नाव व भ्रमणध्वनी : 

बी. एम. कच्छवे 9371261500,

बी.एम.कारखेडे 9860912898,

पी.जी. सोळंके 9860286857,

बी. एच. पाटील  9767722071,

टी.एम. मुंगरे  8421293272.

****

वृत्त क्र. 158

राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त पदयात्रेचे आयोजन  

नांदेड दि. 2 फेब्रुवारी :- मेरा युवा भारत सर्व युवक  नागरिकांना राष्ट्रीय मतदार दिन पदयात्रा मंगळवार ३  फेब्रुवारी २०२६ रोजी श्री गुरु गोबिंदसिंघजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नांदेड येथे आयोजित करण्यात आली आहे. या पदयात्रामध्ये सक्रियपणे सहभागी होण्याचे आवाहन माय भारत केंद्र नांदेड, जिल्हा युवा अधिकारी श्रीमती चंदा रावलकर यांनी केले आहे. 

मेरा युवा  भारत, युवा कार्यक्रम व  क्रीडा मंत्रालय, भारत सरकार द्वारा राज्यस्तरावरील राजधानी आणि जिल्हयांमध्ये ‘राष्ट्रीय मतदार दिन आयोजित करत आहे. या कार्यक्रमाचा उद्देश ‘माझा भारत माझा मतदान’ या मथळ्यासह लोकशाही प्रक्रियेत युवकांचा सहभाग जास्तीत जास्त वाढवण्याचा आहे. हा कार्यक्रम एक देशव्यापी युवा एकत्रीकरण उपक्रम आहे. ज्याचा उद्देश पहिल्यांदाच मतदारांवर लक्ष केंद्रित करून माहितीपूर्ण नैतिक आणि सहभागी निवडणूक सहभागाला प्रोत्साहन देणे आहे. 

शारीरिक तंदुरुस्ती आणि सामुदायिक सहभागासह मतदार जागरूकता एकत्रित करून हा उपक्रम राष्ट्रीय मतदार दिनाचे रूपांतर युवकांच्या नेतृत्वाखालील एक चैतन्यशील जनचळवळीत करण्याचा प्रयत्न करतो. या कार्यक्रमाचे एक प्रमुख उद्दिष्ट म्हणजे युवक नागरिकांना मतदानाचे महत्त्व समजावून सांगणे, मतदार नोंदणीला प्रोत्साहन देणे आणि निवडणूक तपशीलांमध्ये सुधारणा करणे आणि तळागाळात लोकशाही मूल्ये बळकट करणे.  या कार्यक्रमात माय भारत स्वयंसेवक आणि पहिल्यांदा मतदारांचा सक्रिय सहभाग दिसून येईल. पदयात्रा, पहिल्यांदा मतदारांचा सत्कार, मतदार जागरूकता संवाद, प्रतिज्ञा समारंभ आणि सार्वजनिक संपर्क यांचा समावेश आहे. अशा लोकशाही उपक्रमांमध्ये युवकांचा सहभाग हा राष्ट्र उभारणीचा एक महत्त्वाचा घटक आहे. निवडणूक प्रक्रियेत जागरूकता, जबाबदारी आणि मालकीची भावना देऊन युवक नागरिकांना सक्षम करणे लोकशाहीचा पाया मजबूत करते. या उपक्रमाद्वारे, तरुणांना लोकशाही मूल्ये आणि जबाबदार नागरिकत्वाचे राजदूत म्हणून उदयास येण्यास प्रोत्साहित केले जाते.

0000

 वृत्त क्र. 157

पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा

नांदेड दि. 2 फेब्रुवारी :- जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नांदेड व शासकीय औद्योगीक प्रशिक्षण संस्था हदगाव यांच्या संयुक्त विद्यमाने गुरूवार 5 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 10 वा. पासून शासकीय औद्योगीक प्रशिक्षण संस्था हदगाव येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. 

या रोजगार मेळाव्यामध्ये महाराष्ट्रातील नामांकित उद्योजक (कंपनी), शाळा व महाविद्यालय तसेच इतर आस्थापनांच्यावतीने 301 पेक्षा अधिक पदांसाठी खाजगी आस्थापनामध्ये रोजगार व नोकरीच्या संधीसाठी मुलाखती घेण्यात येणार असून जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांनी गुरूवार 5 फेब्रुवारी 2026 सकाळी 10 वा. पासून शासकीय औद्योगीक प्रशिक्षण संस्था हदगाव येथे उपस्थित राहून या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नांदेड यांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी संपर्कासाठी मा. सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, आनंदनगर रोड, बाबानगर नांदेड ईमेल आयडी nandedrojgar01@gmail.com दुरध्वनी  क्रमांक02462-251674 वर संपर्क साधावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता सहायक आयुक्त डॉ. रा. म. कोल्हे यांनी केले आहे.

00000

वृत्त क्र. 156

पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत नांदेड येथे तीन दिवसीय प्रदर्शन व विक्री कार्यक्रम

नांदेड दि. 2 फेब्रुवारी :- एमएसएमई विकास कार्यालय छत्रपती संभाजीनगर व खादी ग्रामोद्योग मंडळ नांदेड यांच्यावतीने प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेअंतर्गत प्रदर्शनी व विक्री कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ही प्रदर्शनी 4 ते 6 फेब्रुवारी 2026 दरम्यान लोकमान्य मंगल कार्यालय अण्णाभाऊ साठे चौक, सम्राट नगर नांदेड येथे होणार असून दररोज सकाळी 11 ते सायं. 7 या वेळेत सर्वांसाठी खुली राहणार.

या प्रदर्शनीत पारंपरिक कारागीर व शिल्पकारांनी आपल्या वस्तु आणि कौशल्याचे प्रदर्शन व थेट विक्री करण्याची संधी मिळणार आहे. यामध्ये सुतार, अस्त्रनिर्माते, लोहार, सुवर्णकार, कुंभार, मूर्तिकार, मोची, चटई, झाडू बनवणारे पारंपरिक बाहुली व खेळणी निर्माते, मालाकार या सर्वांना सुवर्ण संधी मिळाली आहे.

या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते 4 फेब्रुवारीला सायं. 4 वा. होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून महानगरपालिका आयुक्त, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, Lead District Manager, महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र, कौशल्य विकास विभाग नांदेड उपस्थित राहणार आहेत. 

सर्व नागरिकांनी या प्रदर्शनीला भेट देऊन PM Vishwakarma बंधु आणि बहिणींच्या उद्योगांना प्रोत्साहन द्यावे. अधिक माहिती व स्टॉल बुकिंगसाठी दूरध्वनी क्रमांक ८६००८४२६०१, ९५९९६३२१८६, ८२९८६३२१४५ वर संपर्क साधावा, असे आवाहन  जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी नांदेड यांनी  केले आहे.

00000

 वृत्त क्र. 155

संस्थांना पायाभूत सोयी-सुविधा पुरविण्यासाठी अनुदान योजना 

इच्छुक पात्र संस्थांना आवश्यक कागदपत्रांसह अर्ज करण्याचे आवाहन   

नांदेड दि. 2 फेब्रुवारी :- राज्‍यातील धर्मादाय आयुक्‍तांकडे नोंदणीकृत असलेल्‍या व संस्‍थेमध्‍ये 51 टक्‍केपेक्षा जास्‍त बौध्‍द समाजातील विश्वस्त / सदस्‍यांची संख्‍या असलेल्‍या बौध्द समाजातील सांस्कृतीक, शैक्षणिक व सामाजिक कार्य राबविणाऱ्या संस्‍थांना पायाभूत सोयी-सुविधा पुरविण्‍यासाठी रूपये 10.00 लाखापर्यंत अनुदान योजना सन 2025-26 मध्‍ये कार्यान्‍वित करण्‍यात आली आहे. या योजनेंतर्गत पात्र संस्‍थांची शासनास अनुदानासाठी शिफारस करण्‍यासाठी नांदेड जिल्‍हयातील संस्‍थांना शास‍कीय अनुदान घेण्‍याची इच्‍छा आहे अशा संस्‍थांकडून अल्‍पसंख्‍याक विकास विभाग महाराष्‍ट्र शासनाने अर्ज मागविले आहेत. 

पात्र संस्‍थांनी शासन निर्णय क्रमांक अविवि-2024/प्र.क्र.75//का-6 दि. 7 ऑक्‍टोबर 2024 च्‍या तरतूदीनुसार इच्‍छुक संस्‍थांनी विहित नमुन्‍यातील परिपूर्ण अर्ज आवश्‍यक कागदपत्रे जोडून जिल्‍हा नियोजन समिती, जिल्‍हाधिकारी कार्यालय नांदेड येथे एक संचिका  दि.20 फेब्रुवारी 2026 पर्यंत सादर करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा अल्पसंख्याक विकास विभाग नांदेड यांनी केले आहे.

सदरहू योजना सन 2025-26 या वर्षासाठी राबविण्‍यात येणार आहे. या योजनेमध्‍ये जिल्‍ह्यातील पात्र संस्‍थांना पायाभूत सुविधांसाठी रू.10.00 लक्ष इतक्‍या मर्यादेपर्यंत अनुदान देण्‍यास मान्‍यता आहे. सदर योजनेची अंमलबजावणी करतेवेळी शासन निर्णय 7 ऑक्‍टोबर 2024 मधील सर्व अटींची पुर्तता करणाऱ्या संस्‍थांना प्राधान्‍य देण्‍यात येईल. विहित मुदतीनंतर प्राप्‍त झालेले प्रस्‍ताव ग्राहय धरले जाणार नाहीत. महाराष्‍ट्र शासन अल्‍पसंख्‍याक विकास विभाग शासन निर्णय दि. 7 ऑक्‍टोबर 2024 मध्‍ये अर्जाचा नमुना, आवश्‍यक कागदपत्रांची यादी http://mdd.maharashtra.gov.in या संकेतस्‍थळावर उपलब्‍ध आहे.

00000

Sunday, February 1, 2026

वृत्त क्र. 154

राष्ट्रीय शालेय नेटबॉल स्पर्धेत तिन्ही वयोगटात महाराष्ट्रच्या संघाने सुवर्ण पदक प्राप्त केले अजित दादांना समर्पित 

नांदेड दि. १ फेबू :- मा. आयुक्त, क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे मान्यतेने जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नांदेड, महाराष्ट्र नेटबॉल असोसिएशन व नांदेड जिल्हा नेटबॉल असोसिएशन यांचे संयुक्त विद्यमाने सन 2025-26 या वर्षातील राष्ट्रीयस्तर शालेय नेटबॉल (14 वर्षे मुले-मुली व 17 वर्षे मुली) क्रीडा स्पर्धेचे आयोजन दि. 27 जानेवारी,2026 ते 01 फेब्रुवारी,2026 या कालावधीत श्री गुरुग्रंथ साहिब भवन मैदान गुरुद्वारा परीसर, नांदेड येथे संपन्न झाले.

​या स्पर्धेचे बक्षीस वितरण कार्यक्रम प्रसंगी मोन्टीसिंग जहागीरदार हे होते तर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणुन मा.श्री.जयकुमार टेंभरे (जिल्हा क्रीडा अधिकारी,नांदेड तथा निरिक्षक, एस.जी.एफ.आय), मा.श्री. सतिश इंगळे, अध्यक्ष, महाराष्ट्र नेटबॉल संघटना, श्री. विजय काकडे, तालुका क्रीडा अधिकारी, प्रवीण कुपटीकर, सचिव, नांदेड जिल्हा नेटबॉल असोसिएशन श्रीमती प्रिती (क्षेत्र अधिकारी, एस.जी.एफ.आय.), पत्रकार संधुजी आदी मान्यवर उपस्थित होते.

समारोप कार्यक्रम प्रसंगी सर्वप्रथम मा. कै. अजीत पवार, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांचे दु:खद निधन झाले असल्याकारणाने महाराष्ट्र राज्याच्या संघाचे सर्वच पदक समर्पीत करुन भावपूर्ण श्रृध्दांजली वाहण्यात आली.

त्यानंतर या राष्ट्रीय नेटबॉल स्पर्धेत संपुर्ण भारतातून 14 वर्षे मुले- 14 वर्षे-मुली व 17 वर्षे मुली असे एकुण 62 मुलां-मुलींच्या संघानी सहभाग घेतला असून यामध्ये महाराष्ट्र राज्याच्या संघाचे वर्चस्व राहीले आहे. स्पर्धेचा अंतिम निकाल पुढीलप्रमाणे आहे.

14 वर्षे मुले-  प्रथम- महाराष्ट्र,  द्वितीय-  मध्यप्रदेश तर तृतीय- विदयाभारती, 14 वर्षे मुली-  प्रथम- महाराष्ट्र,  द्वितीय-  कर्नाटका तर तृतीय- हरियाणा, 17 वर्षे मुली-  प्रथम- महाराष्ट्र,  द्वितीय-  राजस्थान तर तृतीय- गुजरात

सदर महाराष्ट्र राज्याच्या संघाची मा.श्री. महादेव कसगावडे, उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा, लातूर विभाग,लातूर व  मा. श्री.जयकुमार टेंभरे (जिल्हा क्रीडा अधिकारी,नांदेड) यांच्या मार्गदर्शनाखाली तयारी करण्यात आली होती याकरीता क्रीडा मार्गदर्शक 14 वर्षे मुले व मुलीसंघाकरीता समिर सिखीलकर व प्रवीण कुपटीकर तर संघव्यवस्थापक म्हणुन श्री.संजय चव्हाण व रुकसाना मुलानी हे आहेत. तर 17 वर्षे मुली संघाकरीता क्रीडा मार्गदर्शक म्हणुन श्री. निखील पोटदुखे हे तर संघ व्यवस्थापक म्हणुन श्री. महेशकुमार काळदाते यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्याच्या संघात 14 वर्षे मुले- कार्तिक वाघ, निखिल राजपूत, यश पावडे, राज वाघ, साहिल मुलानी, साई गजभारे, अनमोल जाधव, विरोचन शिंदे, अनिरुध्द लंगोटे, आयुष येरणे, धनुष झावरे तर 14 वर्षे मुलीच्या संघात – भावना गावडे, सृष्टी गायकवाड, वेदिका तनपुरे, मोहिनी पडोळे, नंदिनी जगदेवे अनुष्का गायकवाड, गीता कांबळे, ऋतुजा वाघ, समृध्दी पवार, दुव्रा दापले, रोशनी बनसोडे, रक्षिता बकवाड, तसेच 17 वर्षे मुलीच्या संघात अक्षता कोकणे, विशालाक्षी राठी, नेत्रा कांसरा, अनुष्का चामलाटे, पुर्वश्री वाघ, सई इजाते, कविता नाईक, कुशी हलमारे, अश्विनी तांबारे, जिज्ञासा चौहाण, आघाव जान्हवी, ईशा पाटील या खेळाडूंचा समावेश होता.

पंच प्रमुख म्हणुन सतिश इंगळे, अध्यक्ष, महाराष्ट्र नेटबॉल संघटना हे होते तर पंच म्हणुन लक्ष्मण दातीर, श्री.आकाश सरदार, श्री. विलास पराते, स्नेहदीप कोकाटे, हर्षवर्धन मगरे, शुभम मांजी, अभिषेक मुकाती, हैदारअली सय्यद, सचिन दांडगे, निलेश चौधरी, रोमदेव बाळपांडे, नरेश कळंबे, स्तुती पाटोळे, साक्षी पाटील, सुमेध गायकवाड, गणराज हेप्पट, अभिजीत देशमुख, ऋतुराज यादव, यश गायकवाड, प्रथमेश देरंगे आदीनी काम पाहीले. सदर स्पर्धा यशस्वी करणेसाठी मा. जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांचे मार्गदर्शनाखाली तालुका क्रीडा अधिकारी श्री. विजय काकडे, राज्य क्रीडा मार्गदर्शक श्री. चंद्रप्रकाश होनवडजकर, श्रीमती शिवकांता देशमुख, क्रीडा अधिकारी श्री. राहुल श्रीरामवार, विपुल दापके, जिल्हा संघटक गाईड श्रीमती रुपाली मुधोळकर, जिल्हा संघटना सचिव, श्री. प्रवीण कुपटीकर, रवी बकवाड, कनिष्ठ लिपीक दत्तकुमार धुतडे, कु. रोहीणी घंटेवाड, वैभव दोमकोंडवार, हनमंत नरवाडे, कृष्णा परिवाले, मोहन पवार, शेख इकरम, विद्यानंद भालेराव, चंद्रकांत गव्हाणे, यश कांबळे व नेटबॉल असोसिएशनचे पदाधिकारी व खेळाडू आदिनी सहकार्य केले असल्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांनी कळविले आहे.

0000



Saturday, January 31, 2026

📍लोकभवन, मुंबई 


#शपथविधी सोहळ्याचे #थेटप्रसारण ...

#LIVE


खालील लिंक्सद्वारे थेट प्रसारण पाहा..


YouTube - https://youtu.be/TNN09Gj0NA8


X (Twitter) – https://x.com/i/broadcasts/1ypKdqkBRenGW 


Facebook – https://www.facebook.com/share/v/16LxkvWA6z/


शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना! पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ पात्र शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आधार प्रमाणीकरण पूर्...