Tuesday, April 28, 2026

वृत्त क्रमांक 

जिल्ह्यातील नागरिकांनी जास्तीत जास्त स्व-गणना करावी : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले 

नांदेड दि. 28 एप्रिल :- भारताची जनगणना-2027 ही पहिली डिजिटल जनगणना लवकरच सुरू होणार आहे. जिल्ह्यातील सर्व नगारिकांनी येत्या 1 ते 15 मे पर्यंत स्व-गणना करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे. जिल्ह्यातील प्राचार्य, गटशिक्षणाधिकारी, एनएसएस व एनसीसीचे समुपदेशक यांची बैठक जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हा नियोजन भवन येथे संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते. 

स्व-गणनेची माहिती se.census.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर 1 ते 15 मे 2026 पर्यंत भरता येईल. नोंदणी केलेली संपूर्ण माहिती ही गोपनीय राहणार असून स्व-गणनेत नांदेड जिल्हा प्रथम येईल, अशा पद्धतीने सर्वांनी स्व-गणनेचे नियोजन करुन जास्तीत जास्त स्वगणना करावी, असेही आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.

0000




 

 

No comments:

Post a Comment

वृत्त क्रमांक   महाडीबीटी पोर्टलवर प्रलंबित शिष्यवृत्ती अर्जाबाबत समाज कल्याणच्या सूचना   शैक्षणिक वर्ष  2026-27  पासून महाडीबीटी व्हर्जन  2...