Monday, August 15, 2022
भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त
जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या हस्ते ध्वजारोहण
नांदेड (जिमाका), दि. 15 :- भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील मुख्य शासकीय समारंभात जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या हस्ते आज ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी माजी मुख्यमंत्री तथा विधानसभा सदस्य अशोक चव्हाण, खासदार प्रताप पाटील चिखलीकर, विधान परिषद सदस्य अमर राजूरकर, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार मोहनराव हंबर्डे, महापौर जयश्री पावडे, माजी राज्यमंत्री डी. पी. सावंत, माजी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, प्रणिता देवरे-चिखलीकर, किशोर स्वामी, प्रवीण साले, स्वातंत्र्य सैनिकांचे वारस आदी उपस्थित होते.
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त स्वातंत्र्याच्या वर्धापन दिनाचे हे ध्वजारोहण असल्याने या समारंभास विशेष पोलीस महानिरीक्षक निसार तांबोळी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, महापालिका आयुक्त डॉ. सुनिल लहाने, जिल्हा पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांच्यासह सर्व विभाग प्रमुख व कर्मचारी यांची उपस्थिती होती.
शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांना पुरस्काराचे वितरण
मुख्य ध्वजारोहणानंतर जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या हस्ते पूर्व उच्च प्राथमिक, पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा आठवी 2020, पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा पाचवी 2021, पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा आठवी 2021 मधील शहरी व ग्रामीण विभागातील गुणवंत विद्यार्थ्यांस जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आले.
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा पाचवी सन 2020 मध्ये ग्रामीण विभागात जि.प.प्रा.शा. मणिराम थडचा अनिरुद्ध राऊत, संस्कृती पेटकुले तर सीबीएसई विभागात किड्स किंग्डम पब्लिक स्कूलचा प्रद्युम्न तापडिया, ज्ञानमाता विद्याविहारची मधुरा बोडके, नागार्जुना पब्लिक स्कूलचा संकल्प तापडिया, निनाद दगडे, श्रेयस कृष्णापूरकर, निहार देशपांडे.
पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा आठवी सन 2020 ग्रामीण विभागात जिज्ञासा विद्यालयचा क्षितिज नरवाडे तर शहरी विभागात केंब्रीज माध्य. विद्यालयाची शिवलिला भिमराव तसेच सीबीएसई विभागात नागार्जूना पब्लिक स्कूलची ऋतिका हाके, हर्षवर्धन सुकलकर, निखिल गिरी, सुमित करखेडे, ज्ञानमाता विद्या विहारची विशाखा कट्टे, स्वरा चालिकवार, प्रथमेश चकरवार, ऑक्सफोर्ड इंटर नॅशनल स्कूलचा क्रिष्णा पाटील, श्रेया बवलगावे, आदित घोडके, ऑक्सफोर्ड द ग्लोबल स्कूलचा श्रेयस लोहारे.
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा पाचवी सन 2021 साठी ग्रामीण विभागात ब्लू बेल्स प्रायमरी इंग्लिश स्कूल नायगावची स्नेहा जमदाडे तर सीबीएसई विभागात ऑक्सफोर्ड इंटर नॅशनल स्कूलची प्राची जाधव, सोहम मंत्रे, नागार्जूना पब्लिक स्कूलचा मयुरेश वागशेट्टे, विघ्नेश राजे, ज्ञानज्योती पोतदार लर्न्स स्कूल बेंदी किनवटचा समर्थ मोरे.
पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा आठवी 2021 ग्रामीण विभागात श्री शिवाजी विद्यालय बारूळ कंधारचा केदार चिद्रावार तर शहरी विभागात गुजराथी हायस्कूलचा सोहम विभुते, केंब्रीज माध्य विद्यालयाचा शरयू पवार तर सीबीएसई विभागात नागार्जूना पब्लिक स्कूलचा पियुष बल्लोरे, अर्चित कोटलवार, सुमित पाटील, किड्स किंग्डम पब्लिक स्कूलचा श्रावण तम्मेवार, सार्थक दुरुगकर, ज्ञानमाता विद्याविहारचा अनिश माचेवार, ऋत्विक पबितवार, अर्थव भुरे, केंद्रीय विद्यालय रेल्वे कॅम्पसची वैष्णवी मुदखेडे, ऑक्सफोर्ड द ग्लोबल स्कूल पयुणीचा कृष्णा पिसलवार, ऑक्सफोर्ड इंटरनॅशनल स्कूलचा ज्ञेय बन्नाळीकर या गुणवंत विद्यार्थ्यांचा या पुरस्कार वितरणात समावेश आहे.
00000
Sunday, August 14, 2022
राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर
मुंबई, दि. 14: राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांचे खातेवाटप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे.
त्यानुसार मुख्यमंत्र्यांकडे सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, सार्वजनिक बांधकाम(सार्वजनिक प्रकल्प), परिवहन, पणन, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, मृद व जलसंधारण, पर्यावरण व वातावरणीय बदल, अल्पसंख्याक व औकाफ तसेच इतर कोणत्याही मंत्र्यांना वाटप न केलेले विभाग आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह, वित्त व नियोजन, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, गृहनिर्माण, ऊर्जा, राजशिष्टाचार ही खाती असतील.
राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांनी मंजुरी दिल्यानंतर हे खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे.
इतर 18 मंत्र्यांची खाती पुढीलप्रमाणे आहेत:
सर्वश्री राधाकृष्ण विखे-पाटील - महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास
सुधीर मुनगंटीवार-वने, सांस्कृतिक कार्य, व मत्स्य व्यवसाय
चंद्रकांत पाटील- उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य
डॉ. विजयकुमार गावित- आदिवासी विकास
गिरीष महाजन- ग्राम विकास आणि पंचायती राज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण
गुलाबराव पाटील- पाणीपुरवठा व स्वच्छता
दादा भुसे- बंदरे व खनिकर्म
संजय राठोड- अन्न व औषध प्रशासन
सुरेश खाडे-कामगार
संदीपान भुमरे- रोजगार हमी योजना व फलोत्पादन
उदय सामंत-उद्योग,
प्रा.तानाजी सावंत- सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण
रवींद्र चव्हाण -सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण
अब्दुल सत्तार-कृषी
दीपक केसरकर-शालेय शिक्षण व मराठी भाषा
अतुल सावे- सहकार, इतर मागास व बहुजन कल्याण
शंभूराज देसाई- राज्य उत्पादन शुल्क
मंगलप्रभात लोढा- पर्यटन, कौशल्य विकास व उद्योजकता, महिला व बालविकास
००००००
स्वातंत्र्य दिन मुख्य समारंभात जिल्हाधिकारी
डॉ. विपीन इटनकर यांच्या हस्ते ध्वजवंदन
नांदेड (जिमाका) दि. 14 :- भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन दिनोत्सवानिमित्त सोमवार 15 ऑगस्ट 2022 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात सकाळी 9.05 वा. राष्ट्रध्वज वंदनाचा मुख्य शासकीय समारंभ होणार आहे. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या हस्ते ध्वजवंदन होणार आहे.
सर्व निमंत्रितांनी राष्ट्रीय पोषाखात समारंभ सुरु होण्यापूर्वी
होण्यापुर्वी 20 मिनिटे अगोदर आसनस्थ व्हावे. सुरक्षिततेच्या दृष्टीने सोबत
कोणतेही बँग किंवा तत्सम वस्तू आणू नयेत. या मुख्य शासकीय कार्यक्रमास उपस्थित
राहण्याच्या दृष्टीने इतर सर्व कार्यालय, संस्था, आदींनी त्यांचे ध्वजवंदनाचे
समारंभ सकाळी 8.35 वाजेपूर्वी किंवा 9.35 वाजेनंतर आयोजित करावेत, असेही आवाहन
जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
00000
फाळणीतील वेदना अधोरेखित
करणाऱ्या चित्र प्रदर्शनाचा शुभारंभ
· 15 ऑगस्टपर्यंत प्रदर्शन सर्वांसाठी खुले
नांदेड (जिमाका) दि. 14 :- देशाच्या फाळणीमुळे लाखो लोकांनी झेललेले दु:ख, यातना या न विसरता येणाऱ्या आहेत. अनेकांनी यात बलिदान दिले. त्या ज्ञात-अज्ञात सर्व व्यक्तींच्या स्मृती प्रित्यर्थ आज 14 ऑगस्ट रोजी विभाजन विभीषिका स्मृती दिवस पाळण्यात आला. फाळणीतील महत्वपूर्ण घटनांचे छायाचित्र व त्यासंदर्भातील माहिती नव्या पिढीपर्यंत पोहचावी या उद्देशाने खास तयार करण्यात आलेल्या चित्र प्रदर्शनाचा शुभारंभ आज करण्यात आला.
जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, स्वातंत्र्य सैनिकांच्या वारसपत्नी व मान्यवरांच्या हस्ते या प्रदर्शनीचे प्रातिनिधीक उद्घाटन जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील डॉ. शंकरराव चव्हाण नियोजन भवनाच्या सभागृहात करण्यात आले. यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने, निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी, उपजिल्हाधिकारी दिपाली मोतियाळे, उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, उपजिल्हाधिकारी संतोषी देवकुळे, उपविभागीय अधिकारी विकास माने, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय तुबाकले आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी यावेळी स्वातंत्र्य सैनिकांच्या वारस पत्नी सुमन त्रिंबकराव कुलकर्णी, सिंधुबाई गगनराव देशमूख, कस्तुराबाई श्रीकिशन पारीख, यमुनाबाई मारोती कुरुडे, सुंदराबाई मारोतराव देशमुख, प्रभावती दत्तात्रय टेळकीकर, साधनाबाई रामराव पांडे, कुमुदिनी राहेगावकर, प्रेमलाबाई रामराव अंबुलगेकर यांना शाल श्रीफळ देवून गौरव केला. हे प्रदर्शन दोन दिवस खुले राहणार असून नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
0000
नांदेड जिल्ह्यात राष्ट्रीय लोकअदालत संपन्न
· 5 हजार 455 प्रकरणे सामोपचाराने निकाली
·8 कोटी 82 लाख 19 हजार 691 रक्कमेतील विविध प्रकरणात तडजोड
नांदेड (जिमाका) दि. 14 :- महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या निर्देशानुसार नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा न्यायाधीश श्रीकांत आणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व न्यायालयात शनिवार 13 ऑगस्ट 2022 रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. नांदेड जिल्ह्यात एकुण 5 हजार 455 प्रकरणे सामोपचाराने निकाली निघाली असून 8 कोटी 82 लाख 19 हजार 691 एवढ्या रक्कमेबाबत विविध प्रकरणात तडजोड झाली.
या राष्ट्रीय लोकअदालतमध्ये इंदिराबाई वय 100 वर्ष यांचे तीन पिढींपासून वाटणी संबंधी प्रलंबीत असलेल्या दाव्यात आपसी सामोपचाराने समझोता होवून सदर प्रकरणाचा निराकरण करण्यात आला. हा दावा श्रीमती के.पी. जैन, मुख्य न्यायदंडाधिकारी नांदेड यांच्या पॅनलवर ठेवण्यात आला होता. त्यात त्यांनी संबंधीतांचा समझोता घडवून आणून प्रकरण निकाली काढले.
विविध प्रकरणात दिवाणी, फौजदारी, एन.आय. अॅक्ट., बॅंक प्रकरणे, मोटार वाहन अपघात, भूसंपादन व इतर तसेच कौटुंबिक न्यायालय, कामगार न्यायालय, ग्राहक तक्रार मंच यांच्या प्रकरणांचा व महसूल विभागाचे प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत प्रकरणे व रमाई आवास योजना अंतर्गत प्रकरणे, विविध बँकांचे प्रकरणे, एम.एस.ई.बी. विद्युत प्रकरणे, बी.एस.एन.एल. यांचे दाखलपूर्व प्रकरणांचा समावेश होता. लोकअदालत यशस्वी करण्यासाठी व जास्तीत जास्त प्रकरणे निकाली काढण्यासाठी प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा अध्यक्ष श्रीकांत ल. आणेकर तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव श्रीमती डी.एम. जज यांनी विशेष प्रयत्न केले.
ही लोकअदालत यशस्वी होण्यासाठी जिल्हयातील सर्व न्यायाधीश, तसेच पॅनलवरील न्यायाधीश व वकील सदस्य, तसेच पॅनल सदस्य व सर्व विधिज्ञ यांनी जास्तीत जास्त प्रकरणे निकाली काढण्यासाठी प्रयत्न केले. प्रत्येक तालुक्यासह कौटुंबिक न्यायालय, कामगार न्यायालय, सहकार न्यायालय येथे सुध्दा त्या-त्या न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. तसेच पाच दिवस घेण्यात आलेल्या विशेष मोहीमेअतंर्गत 1 हजार 819 प्रकरणे निकाली काढण्यात आले आहे. नांदेड अभिवक्ता संघाचे अध्यक्ष, जिल्हा सरकारी वकिल तसेच जिल्हयातील सर्व विधिज्ञ आणि विविध विमा कंपनी, विविध बॅंकांचे अधिकारी, भूसंपादन अधिकारी, महसुल विभाग अधिकारी, तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड व न्यायालयीन व्यवस्थापक, प्रबंधक व कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
प्रमुख जिल्हा न्यायाधीश श्रीकांत आणेकर यांनी लोकअदालत यशस्वी झाल्या बद्दल सर्वांचे आभार व्यक्त केले. ही लोक अदालत यशस्वी करण्यासाठी नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव श्रीमती डी. एम. जज, तसेच सर्व न्यायाधीश, विधीज्ञ, सर्व न्यायालयीन कर्मचारी वृंद यांनी परीश्रम घेतले. विशेष म्हणजे सदर लोकअदालतमध्ये सहभागी पक्षकार, विधीज्ञ, न्यायाधीश, न्यायालयीन कर्मचारी इत्यादीसाठी गुरुद्वारा लंगर साहिब नांदेड येथील बाबा बलविंदर सिंहजी यांच्याकडून लंगरची व्यवस्था करण्यात आली होती. श्रीमती डी. एम. जज यांनी लंगर साहिब गुरुद्वारा व राष्ट्रीय लोकअदालत यशस्वी करण्यासाठी ज्यांनीही प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहकार्य केले त्या सर्वांचे आभार मानले. यापुढेही असेच सहकार्य सर्वांकडून मिळेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
00000
मंत्री संजय राठोड यांचा दौरा
नांदेड (जिमाका) दि. 13 :- महाराष्ट्र राज्याचे मंत्री संजय राठोड हे 15 व 16 ऑगस्ट रोजी नांदेड जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहिल.
सोमवार 15 ऑगस्ट 2022 रोजी यवतमाळ जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील पहूर येथून सांय. 7.30 वा. बोथतांडा ता. किनवट येथे आगमन व मुक्काम (राखीव). मंगळवार 16 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 7.30 वा. बोथतांडा येथून शासकीय वाहनाने यवतमाळकडे प्रयाण करतील.
00000
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर करण्यात आली असून उर्वरित याद्या लवकरच...
-
मुद्रण दिन विशेष मुद्रण कलेमुळे ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या मुद्रण कलेचा जनक जो हानेस गुटेनबर्ग यांच्या जन्मदिवसानिमित्त जगभर...
-
वृत्त क्रमांक 974 प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते “ स्वस्थ नारी , सशक्त परिवार ” राष्ट्रीय अभियानाचा शुभारंभ “ स्वस्थ नारी , ...
-
अनुकंपा तत्वावरील नियुक्तीसाठी 192 धारकांची प्रतिक्षा यादी घोषित आक्षेपाबाबत 30 ऑक्टोंबरची मुदत नांदेड , ( जिमाका ) दि. 22 :- ...