Saturday, December 8, 2018


वाहन भाडेतत्वावर घेण्यासाठी
नगर रचना कार्यालयाचे आवाहन 
 नांदेड, दि. 8 :- सहायक संचालक नगर रचना नांदेड कार्यालयात भाडे तत्वावर Swift Dizire / Ford Aspire / Indiog0 / Sedan Cars या सारख्या वाहनाची आवश्यकता आहे. त्यासाठी वाहन मालकाकडून इंधनविरहित दरपत्रक मागविण्यात येत आहे. दरपत्रके सिलबंद पाकीटात 17 डिसेंबर 2018 रोजी सायं. 5 वाजेपर्यंत सहायक संचालक नगर रचना कार्यालय नांदेड येथे पाठविण्यात यावे, असे आवाहन सहायक संचालक नगर रचना नांदेड यांनी केले आहे.
दरनिविदेच्या अटी व शर्ती सहायक संचालक नगर रचना कार्यालय, घोडजकर इमारत, दुसरा मजला, गांधीनगर हिंगोली नाका, नांदेड यांच्या सूचना फलकावर पाहण्यास मिळतील, असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.
000000


लोहा नगरपरिषदेच्या
मतदानासाठी मतदारांना सुट्टी
 नांदेड, दि. 8 :-  लोहा नगरपरिषदेच्या निवडणूकीत मतदारांना मतदान करण्यासाठी रविवार 9 डिसेंबर 2018 रोजी सुट्टी अथवा दोन तासांची सवलत देण्याबाबत उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाच्या परिपत्रकान्वये सूचना देण्यात आल्या आहेत.  
या शासन परित्रकात म्हटले आहे की, निवडणूक मतदान क्षेत्रात मतदार असलेले कामगार, अधिकारी, कर्मचारी, यांना मग ते कामानिमित्त निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरी त्यांना निवडणूकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात यावी. ही सुट्टी उद्योग, ऊर्जा व कामगार विभागांतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने इत्यादींना लागू राहिल. अपवादात्मक परिस्थितीत पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल तर मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टी ऐवजी दोन ते तीन तासाची सवलत देण्यात यावी. मात्र त्याबाबत त्यांनी संबंधीत महानगरपालिका आयुक्त अथवा जिल्हाधिकारी यांची पूर्व परवानगी घेणे आवश्यक राहील. कोणत्याही परिस्थिती मतदारांना मतदानासाठी किमान दोन ते तीन तासांची सवलत मिळेल याची दक्षता संबंधित आस्थापना मालकांनी घेणे आवश्यक राहील. शासन परिपत्रकान्वये सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने इत्यादींच्या मालकांनी / व्यवस्थापनांनी सुचनांचे योग्य ते अनुपालन होईल याची काटेकोरपणे खबरदारी घ्यावी. असे जिल्हाधिकारी नांदेड यांनी कळविले आहे.
000000


राज्यस्तरीय शालेय बेसबॉल स्पर्धेचा
उद्घाटन कार्यक्रम नांदेड येथे संपन्न
खेळाडुनी खेळातील कौशल्य दाखवावे
-         जिल्हाधिकारी डोंगरे  
 नांदेड, दि. 8 :- खेळाडूनी त्यांच्या खेळातील कौशल्य दाखवावे, निवड समिती सदस्यांनी निपक्षपणे काम करावे, असे जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी सांगितले.  
  क्रीडा व युवक सेवा संचालनालय, जिल्हा क्रीडा परिषद नांदेड व जिल्हा क्रीडा कार्यालयाच्यावतीने महाराष्ट्र बेसबॉल असोसिएशन व नांदेड जिल्हा बेसबॉल असोसिएशन नांदेड यांच्यावतीने राज्यस्तर शालेय बेसबॉल 14 वर्षे मुला-मुलींसाठी क्रीडा स्पर्धेचे आयोजन 7 ते 10 डिसेंबर या कालावधीत पोलिस कवायत मैदान वजिराबाद नांदेड येथे संपन्न होत आहे. या स्पर्धेचे उद्घाटन जिल्हाधिकारी श्री. डोंगरे यांचे हस्ते  करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी कलीमओद्यीन, जिल्हा क्रीडा अधिकारी, परभणी डॉ. दिपक सोनटक्के, डॉ. संजय पतंगे, उपाध्यक्ष नांदेड जिल्हा बेसबॉल असोसिएशन, डॉ. बळीराम लाड, निवड समिती सदस्य गोकुळ तांदळे, पवन जांगीड, श्रीमती रेश्मा पणेकर आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
प्रास्ताविक जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश्वर मारावार यांनी या स्पर्धेसाठी राज्यातून 8 विभागातून 256 खेळाडू, निवड चाचणीसाठी 80 मुले-मुली, 16 क्रीडा मार्गदर्शक व संघ व्यवस्थापक व 20 स्वयंसेवक व निवड समिती सदस्य असे एकुण 388 उपस्थित राहणार आहेत. तसेच या स्पर्धेमधून निवड झालेले खेळाडू 7 ते 11 जानेवारी 2019 दरम्यान उज्जैन मध्यप्रदेश येथे संपन्न होणाऱ्या राष्ट्रीय शालेय बेसबॉल स्पर्धेसाठी राज्याचे प्रतिनिधीत्व करतील असे सांगितले.
यावेळी सुवर्ण पदक प्राप्त सृष्ठी गौतम कांबळे यांच्यामार्फत खेळाडू, पंच, सामनाधिकारी यांना शपथ देण्यात आली.
00000


राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष
हाजी अरफात शेख यांचा दौरा
नांदेड, दि. 8 :- महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष (मंत्री दर्जा) हाजी अरफात शेख हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
सोमवार 10 डिसेंबर 2018 रोजी सकाळी 8.45 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आगमन. सकाळी 10 वा. जैन समाजाच्या प्रतिनिधींची भेट. सकाळी 10.30 वा. बौद्ध समाजाच्या प्रतिनिधींची भेट. सकाळी 11 वा. शीख समाजाच्या प्रतिनिधींची भेट. सकाळी 11.30 वा. ख्रिश्चन समाजाच्या प्रतिनिधींची भेट. दुपारी 12 वा. मुस्लिम समाजाच्या प्रतिनिधींची भेट. दुपारी 2.30 वा. पंधरा कलमी कार्यक्रम आणि केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचा आढावाबाबत जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी, मनपा आयुक्त, शिक्षणाधिकारी (प्राथमिक, माध्यमिक व निरंतर), सेवायोजन अधिकारी व इतर सर्व संबंधीत अधिकारी यांचे सोबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक. सायं. 4 वा. पत्रकार परिषद. रात्री 7.30 वा. नांदेड येथून वाशीमकडे प्रयाण करतील.
00000


लोहा नगरपरिषदेच्या
मतदानासाठी मतदारांना सुट्टी
 नांदेड, दि. 8 :-  लोहा नगरपरिषदेच्या निवडणूकीत मतदारांना मतदान करण्यासाठी रविवार 9 डिसेंबर 2018 रोजी सुट्टी अथवा दोन तासांची सवलत देण्याबाबत उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाच्या परिपत्रकान्वये सूचना देण्यात आल्या आहेत.  
या शासन परित्रकात म्हटले आहे की, निवडणूक मतदान क्षेत्रात मतदार असलेले कामगार, अधिकारी, कर्मचारी, यांना मग ते कामानिमित्त निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरी त्यांना निवडणूकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात यावी. ही सुट्टी उद्योग, ऊर्जा व कामगार विभागांतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने इत्यादींना लागू राहिल. अपवादात्मक परिस्थितीत पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल तर मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टी ऐवजी दोन ते तीन तासाची सवलत देण्यात यावी. मात्र त्याबाबत त्यांनी संबंधीत महानगरपालिका आयुक्त अथवा जिल्हाधिकारी यांची पूर्व परवानगी घेणे आवश्यक राहील. कोणत्याही परिस्थिती मतदारांना मतदानासाठी किमान दोन ते तीन तासांची सवलत मिळेल याची दक्षता संबंधित आस्थापना मालकांनी घेणे आवश्यक राहील. शासन परिपत्रकान्वये सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने इत्यादींच्या मालकांनी / व्यवस्थापनांनी सुचनांचे योग्य ते अनुपालन होईल याची काटेकोरपणे खबरदारी घ्यावी. असे जिल्हाधिकारी नांदेड यांनी कळविले आहे.
000000


नांदेड ग्रंथोत्सवाची सुरुवात ग्रंथ दिंडीने उत्साहात  

नांदेड, दि. 8 :- महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संचालनालय नांदेड जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयच्यावतीने येथील डॉ. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह शेजारी आयोजित "नांदेड ग्रंथोत्सव 2018" हा दिनांक 8 व 9 डिसेंबर,  2018 दोन दिवस आयोजित करण्यात आला आहे. याची सकाळी ग्रंथदिंडीने सुरुवात करण्यात आली. ही ग्रंथदिंडी महात्मा फुले पुतळा आयटीआयपासून कुसूम सभागृह मार्गे जिल्हा ग्रंथालय कार्यालयाच्या आवारात पोहचली. ग्रंथदिंडीची सुरुवात जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या हस्ते पुजनाने झाली.
यावेळी सहाय्यक ग्रंथालय संचालक सुनिल हुसे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी आशिष ढोक, डॉ. जगदीश कुलकर्णी, डॉ. हंबर्डे, प्रताप सुर्यवंशी, संजय कर्वे, संजय पाटील, निर्मलकुमार सुर्यवंशी, माजी आमदार गंगाधरराव पटणे, संजय पोतदार व जिल्ह्यातील वाचनालयाचे सर्व कर्मचारी आणि ग्रंथप्रेमींची यावेळी उपस्थिती होती.
नांदेड ग्रंथोत्सव -2018 या ग्रंथदिंडीमध्ये मधुबन महाराज हायस्कूल (धनेगाव), शारदा भवन हायस्कूल (नांदेड), विमलेश्वर वारकरी शिक्षण संस्था (मरळक), वारकरी सांप्रदाय भजणी मंडळ (हाळदा), बंजारा महिला नृत्य (वर्ताळा तांडा ता. मुखेड), तसेच शाहीर जाधव व त्यांचा चमू (सुजलेगाव ता. नायगाव) इत्यादींनी सहभाग घेतला होता. वाजत-गाजत निघालेल्या दिंडीत अनेक साहित्यिक, ग्रंथप्रमी आणि ग्रंथ चळवळीतले मान्यवर सहभागी झाले होते. या दिंडीमुळे साहित्यमय वातावरण तयार झाले होते.
00000


लोकराज्य प्रदर्शनाच्या दालनास
जिल्हाधिकारी डोंगरे यांची भेट

नांदेड, दि. 8 :- नांदेड ग्रंथोत्सवानिमित्त जिल्हा ग्रंथालयाच्यावतीने आयोजित ग्रंथ प्रदर्शनामध्ये नांदेड येथील जिल्हा माहिती कार्यालयातर्फे  लोकराज्य मासिकाच्या अंकाचे प्रदर्शन व विक्रीचे दालन भरविण्यात आले असून या दालनास जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी भेट दिली.
जिल्हाधिकारी डोंगरे यांनी भेटी दरम्यान लोकराज्य च्या विविध संग्राह्य विशेषांकाची पाहणी करुन लोकराज्य मासिकाच्या दर्जेदार व संग्राह्य माहितीपूर्ण स्वरुपाचा गौरव केला. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी अनिल आलुरकर यांनी लोकराज्यच्या डिसेंबरच्या महामानव विनम्र अभिवादन या विशेषांकाची प्रत देवून स्वागत केले. या अंकात जिल्हा माहिती अधिकारी अनिल आलुरकर यांनी लिहिलेल्या शहापूर ता. देगलूर या शंभर शेततळ्यांच्या गावाची यशोगाथा प्रसिध्द झाली असून याबद्दल जिल्हाधिकारी यांनी लेख वाचून कौतूक केले. जिल्हाधिकारी डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली शहापूर येथे शंभर शेततळे तयार करण्यात आली असल्याने कृषी विभागाच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतूक होत आहे.
लोकराज्य दालनास यावेळी साहित्य अकादमी पुरस्कार विजेते साहित्यिक श्रीकांत देशमुख, ग्रंथालय संघाचे अध्यक्ष गंगाधर पटने, ग्रंथालय विभागाचे सहाय्यक संचालक सुनिल हुसे, निर्मल प्रकाशनचे निर्मलकुमार सुर्यवंशी व इतर मान्यवरांनी भेट दिली.
या दालनात गत चार वर्षातील अंकाचे प्रदर्शन मांडण्यात आले असून लोकराज्य ची वर्गणी भरण्याची सोय करण्यात आली आहे. जिल्हा माहिती कार्यालयाचे विवेक डावरे, काशिनाथ आरेवार, महंमद युसूफ आणि बालनरसय्या अंगली हे लोकराज्य विषयी भेट देणाऱ्यांना माहिती सांगत आहेत.
000000



  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर करण्यात आली असून उर्वरित याद्या लवकरच...