Saturday, December 8, 2018


लोकराज्य प्रदर्शनाच्या दालनास
जिल्हाधिकारी डोंगरे यांची भेट

नांदेड, दि. 8 :- नांदेड ग्रंथोत्सवानिमित्त जिल्हा ग्रंथालयाच्यावतीने आयोजित ग्रंथ प्रदर्शनामध्ये नांदेड येथील जिल्हा माहिती कार्यालयातर्फे  लोकराज्य मासिकाच्या अंकाचे प्रदर्शन व विक्रीचे दालन भरविण्यात आले असून या दालनास जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी भेट दिली.
जिल्हाधिकारी डोंगरे यांनी भेटी दरम्यान लोकराज्य च्या विविध संग्राह्य विशेषांकाची पाहणी करुन लोकराज्य मासिकाच्या दर्जेदार व संग्राह्य माहितीपूर्ण स्वरुपाचा गौरव केला. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी अनिल आलुरकर यांनी लोकराज्यच्या डिसेंबरच्या महामानव विनम्र अभिवादन या विशेषांकाची प्रत देवून स्वागत केले. या अंकात जिल्हा माहिती अधिकारी अनिल आलुरकर यांनी लिहिलेल्या शहापूर ता. देगलूर या शंभर शेततळ्यांच्या गावाची यशोगाथा प्रसिध्द झाली असून याबद्दल जिल्हाधिकारी यांनी लेख वाचून कौतूक केले. जिल्हाधिकारी डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली शहापूर येथे शंभर शेततळे तयार करण्यात आली असल्याने कृषी विभागाच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतूक होत आहे.
लोकराज्य दालनास यावेळी साहित्य अकादमी पुरस्कार विजेते साहित्यिक श्रीकांत देशमुख, ग्रंथालय संघाचे अध्यक्ष गंगाधर पटने, ग्रंथालय विभागाचे सहाय्यक संचालक सुनिल हुसे, निर्मल प्रकाशनचे निर्मलकुमार सुर्यवंशी व इतर मान्यवरांनी भेट दिली.
या दालनात गत चार वर्षातील अंकाचे प्रदर्शन मांडण्यात आले असून लोकराज्य ची वर्गणी भरण्याची सोय करण्यात आली आहे. जिल्हा माहिती कार्यालयाचे विवेक डावरे, काशिनाथ आरेवार, महंमद युसूफ आणि बालनरसय्या अंगली हे लोकराज्य विषयी भेट देणाऱ्यांना माहिती सांगत आहेत.
000000



No comments:

Post a Comment

  वृत्त क्र. 1133 नांदेड जिल्ह्यातील 9 विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीत  भाजपचे 5, शिवसेनेचे 3 तर राष्ट्रवादी काँग्रेसचा 1 उमेदवार विजयी  नां...