Thursday, December 12, 2024

 वृत्त क्र. 1188 

आजपासून नांदेडमध्ये राज्यस्तरीय युवा महोत्सव

 

नांदेड दि. 12 डिसेंबर : राजस्तरीय युवा महोत्सव सन 2024 25 ची सुरुवात उद्या नांदेड येथे होत आहेत. नांदेड जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाने या महोत्सवासाठी तयारी केली असून दोन दिवसीय कार्यक्रमाचे उद्या उद्घाटन होणार आहे.

 

 क्रीडा व युवक सेवा संचालनालयमहाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयनांदेड व राष्ट्रीय सेवा योजनास्वा.रा.ती.मराठवाडा विद्यापीठनांदेड व नेहरु युवा केंद्रनांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तर युवा महोत्सव सन 2024-25 चे आयोजन 13 ते 14 डिसेंबर,2024 या कालावधीत कुसुम सभागृहव्ही.आय.पी.रोडनांदेड या ठिकाणी आयोजन करण्यात आले आहे.

 

युवा महोत्सव म्हणजे युवकांचा सर्वांगिण विकास करणेसंस्कृती व परंपरा जतन करणेयुवकांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव देणे व राष्ट्रीय एकात्मता वाढिस लागणे यासाठी प्रतिवर्षी राष्ट्रीय युवा महोत्सवाचे युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालय भारत सरकारमार्फत आयोजन करण्यात येते.

 

सन 2024-25 या वर्षातील राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन 12 ते 16 जानेवारी,2025 या कालावधीत दिल्ली येथे करण्यात येणार आहे.

 

या राज्यस्तर युवा महोत्सवमधुन महाराष्ट्र राज्याचा संघ राष्ट्रीय युवा महोत्सवकरीता निवडण्यात येणार आहे. त्याकरीता नांदेड जिल्हयातील जास्तीत-जास्त युवक-युवतींनी व नांदेडकरांनी मोठया संख्येन उपस्थित राहुन या राज्यस्तरीय युवा महोत्सवाचा लाभ घ्यावाअसे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांनी केले आहे.

००००

 वृत्त क्र. 1187 

सामाजिक सौहार्दशांतता राखण्यासाठी

सर्वांनी एकत्रित काम करावे: जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

 

·     शांतता समितीच्या बैठकीत संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन

 

नांदेड दि. 12 डिसेंबर :- जिल्ह्यातील शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी समाजातल्या सर्व सज्जन व शांततवादी शक्तिने एकत्रितपणे काम करावे. कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही यासाठी प्रशासनाची मदत करावीअसे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत व जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी आज येथे केले

 

 परभणीच्या घटनाक्रमा नंतर आज नांदेड येथे शांतता समितीची बैठक झाली. या बैठकीमध्ये हे आवाहन करण्यात आले. बैठकीच्या शेवटी संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिकरीत्या वाचन करण्यात आले.

 

नांदेड जिल्ह्यातील नागरिकांचा मूळ स्वभाव शांततेचा आहे. शहरात शांतता राखण्यासाठी येथील सर्व समाजातील बांधवांनी कायम सहकार्य केले आहे. परभणी येथील घटना निषेध करण्यासारखी आहे. मात्र त्याच्या चुकीच्यावाईट प्रतिक्रिया कुठे उमटू देऊ नका. सामाजिक जबाबदारीतून चांगले ते स्विकारू वाईट ते सोडू असे सांगून जिल्ह्यातील शांतता अबाधित राहील यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करूअसे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले.

 

नांदेड जिल्हास्तरीय शांतता समितीची आढावा बैठक आज जिल्हा नियोजन भवन येथे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमारनांदेडचे अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरवसहायक पोलीस अधिक्षक कृतिकानिवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकरसमिती सदस्य दुष्यंत सोनाळेभन्ते पय्याबोधीजीमहमद वसिम म.कासिमनंदकुमार कुलकर्णी यांच्यासह विविध सदस्यसमाजातील मान्यवर नागरिक आदींची उपस्थिती होती.

 

जिल्ह्यात कोणतीही वाईट घटना घडू नये यासाठी शांतता समितीची बैठक घेण्यात आली. भारतीय संविधानाचा जिल्ह्यात चांगला प्रचार प्रसार केला जाईल. ही लोकचळवळ झाली पाहिजे. यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत.नांदेडमध्ये संविधान भवन उभारण्याचा प्रस्ताव शासनस्तरावर दिला असून लवकरच संविधान भवन नांदेडमध्ये होईल,असे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सांगितले.  

 

समाजातील नागरिक पोलिसांसोबत असेल तर वाईट कृत्य नांदेडमध्ये कुठेही घडणार नाही. नांदेडमधील चांगल्या परिस्थितीबाबत यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांनी माहिती दिली.जिल्ह्यात शांततेबाबत चर्चेतून नियेाजन केले जात आहे. शांतता समितीच्या या बैठकीत दिलेल्या विविध सूचना वरिष्ठांना शासनाला दिल्या जातील. परभणी येथील घटनेनंतर काही बाबींवर आपल्या सर्वांना नियंत्रण ठेवावे लागणार आहे. सार्वजनिक व व्यक्तिगत मालमत्तेची कुठेही हानी होणार नाही याअनुषंगाने प्रत्येक हालचालीवर कॅमेऱ्याद्वारे नियंत्रण ठेवण्यात येत आहे. मोर्चाआंदोलनाबाबत प्रशासनाला माहिती देऊन ती समन्वय ठेवू करावीत. त्यासाठी आवश्यक ते संरक्षण पोलिसांकडून दिले जाईल. बंदमुळे गोरगरीबछोट्या व्यापाऱ्याचे मोठे नुकसान होते त्यामुळे नागरिकांनी बंद पुकारू नये. जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था चांगली राहिल यासाठी पोलीस 24 तास आपल्यासोबत असून सर्व नागरिकांनी सहकार्य करावेअसे आवाहन जिल्हा पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार यांनी केले.

 

नांदेड जिल्ह्यात शांतता राहण्यासाठी सर्वांनी महामानवांनी दिलेल्या शांततेच्या संदेशाच्या मार्गांने प्रयत्न करण्याची ग्वाही यावेळी सर्व उपस्थितांनी दिली.शेवटी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी संविधान प्रास्ताविकेचे वाचन करून सर्वांनी शांतता अबाधित राखण्यासाठी प्रयत्नरत राहण्याचे आवाहन केले. 

00000
















 वृत्त क्र. 1186 

शेतकऱ्यांच्या योजना त्यांच्यापर्यंत

प्राधान्याने पोहचण्यासाठी प्रयत्न करा

-   ॲड निलेश हेलोंडे पाटील

 

नांदेड दि. 12 डिसेंबर :- शेतकरी  जगाचा पोशिंदा आहे आहे. तो जगलाच पाहिजे त्यासाठी प्रत्येक शेतकऱ्यांना सन्मानाची वागणूक दिली पाहिजे. शेतकऱ्यांसाठी विविध कल्याणकारी योजना शासन राबवत आहे. या योजना शेतकऱ्यापर्यंत  पोहचण्यासाठी आपण प्राधान्याने प्रयत्न करा. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला आपलं कुटुंब समजून त्यांच्या पर्यंत जावून आवश्यक मदत करून त्यांना आधार द्याअसे प्रतिपादन कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) ॲड निलेश हेलोंडे पाटील यांनी केले.

 

जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी त्यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत ते बोलत होते. बैठकीस जिल्हाधिकारी अभिजीत राऊतजिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवालनिवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकरउपवनसंरक्षक केशव वाबळेउपजिल्हाधिकारी रोहयो ललितकुमार वऱ्हाडेजिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी डी. आर. कळसाईतकौशल्य विकास विभागाच्या सहायक आयुक्त रेणुका तम्मलवारएमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी डी. एस. इंगळेशिक्षणाधिकारी सविता बिरगेरेशीम विकास अधिकारी पि. बी. नरवाडेपशुसंवर्धन अधिकारी डॉ. प्रविणकुमार घुलेजिल्हा आरोग्य अधिकारी संगिता देशमुख, यांच्यासह जिल्ह्यातील विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

 

शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या पाहिजेत. या आत्महत्येत तरुण शेतकऱ्यांचा समावेश आहे. यासाठी सर्वांनी मिळवून प्रयत्न करण्याची गरज आहे. शेतकऱ्यांचे नैराश्य कमी करून त्यांच्या आत्महत्या आपल्याला रोखता येतात. यासाठी ग्रामीण भागात पोवाडानाटककिर्तनासारख्या अनेक उपक्रम राबविले पाहिजेत. सामाजिक बांधिलकीतून संतगाडगेबाबांनी केलेल्या कार्याची आठवण ॲड निलेश हेलोंडे पाटील यांनी यावेळी करून दिली.  

 

शेतकऱ्यांच्या जनावरांसाठी मराठवाड्यात चारा लागवडीबाबत वाढ होणे आवश्यक आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्यात प्रयत्न करून मोफत चारा वाटपाचा उपक्रम हाती घ्यावा. जैविक नैसर्गिक खते निर्माण करण्याची प्रयोगशाळा सुरू झाल्यास शेतकऱ्यांचा होणारा उत्पादन खर्च कमी होईल. यासाठी शेतीच्या बांधावर जाऊन त्याचे प्रयोजन करावे. सुशिक्षित तरुण शेतकऱ्यांचा यात मोठा सहभाग वाढवावाअशी सूचना त्यांनी केली.पिक विमा उतरवितांना शेतकऱ्यांना मदत लागते. यासाठी पिक विमा कंपनीच्या प्रतिनिधींचे नावसंपर्क क्रमांक प्रत्येक गावात दर्शनी भागात प्रसिद्ध केली पाहिजेतअसे सांगून त्यांनी हदगाव तालुक्यातील एका प्रतिनिधींला संपर्क होतो का याची प्रत्यक्ष तपासणी केली व माहिती घेतली. 

 

शेतमालाचे किमान आधारभूत मूल्य कृषि उत्पन्न बाजार समितीत दर्शनी भागावर दिसणे आवश्यक आहे. यासाठी मोठे फलक करून लावावेत. शेतमाल तारण योजनेचा लाभही शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे. ही योजना चांगली असून यातून शेतकऱ्यांना मोठी मदत होते. जिल्ह्यातील शेतकऱ्यांची संख्या लक्षात घेऊन सोयाबीन केंद्र वाढविण्यासाठी प्रयत्न करावेतअशी सूचना त्यांनी केली. 

 

शेतकऱ्यांच्या विविध योजनांचा आढावा घेऊन ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या मुलांनाही त्या समजल्या पाहिजेत यासाठी विविध माध्यमाचा उपयोग करून त्यांच्या पर्यंत त्या योजना गेल्या पाहिजेत यासाठी प्रयत्न करावेत. ग्रामीण भागातील मुलांना शिक्षणाची सोयस्पर्धा परीक्षा वाचनालय व शाळेत पटांगणाची सुविधा असणे आवश्यक आहे. शाळेच्या मैदानी खेळातून लहान मुलांचा शारीरिक विकास चांगला होतो. क्रीडा कार्यालयाच्या विविध योजनेतून ग्रामीण शेतकऱ्यांच्या मुलांसाठी अनेक उपक्रम राबवावेत.आपल्याला निसर्गावर प्रेम करता आले पाहिजे. निसर्ग समजल्याशिवाय निसर्ग वाचवता येत नाही. लहान वयातच विद्यार्थ्यांमध्‍ये विज्ञानाची गोडी निर्माण करून टेलीस्कोप उपकरणाचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना द्यावेअसेही त्यांनी सांगितले.

 

महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळांतर्गत कंपन्यांच्या सीएसआर निधीतून शेतकऱ्यांसाठी विविध योजना व उपक्रम राबविण्यात येतात. याची माहिती घेऊन शेतकऱ्यांना पुरक यंत्रसामुग्री वाटपासाठी प्रयत्न करून शेतकरी कुटुंबाला मदत करावी. क्याकटसच्या उत्पादनाचा खर्च कमी येतोपाणी कमी लागते यासह विविध फळ प्रक्रियेवर भर देवून कृषि विभागाने कौशल्य विकास विभाग व पशुसंवर्धन विभागाच्या मदतीने तरुणाला रोजगार उपलब्ध होतील यासाठी प्रयत्न करावेत. कौशल्य विकास विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या रोजगार मेळाव्याची त्यांनी माहिती घेतली.

 

बँकांनी खरीप हंगामात कर्ज वाटपातून शेतकऱ्यांना मदत करावी असे सांगून वन्य प्राण्यापासून शेतकऱ्यांचे नुकसान व मोबदला अनुदान वाटपाची माहिती त्यांनी घेतली. जनावरांना धोका होऊ नये म्हणून शेतकरी रात्री थंडीत जनावरांची काळजी घेतो. जंगलात फळांची झाडे लावल्यास वन्यप्राणी गावात येणार नाहीत. त्यासाठी जंगलातील फळझाडांचे अधिक प्रमाण वाढवावे. वनविभागाच्यावतीने विविध योजना राबविल्या जातात त्या शेतकऱ्यांना माहिती करून द्याव्यातअसे निर्देश त्यांनी दिले. 

 

शेतकऱ्यांसाठी दामिनी ॲप

विज पडून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांसह जनावरांचे मोठे नुकसान होते. शेतकऱ्यांनी आपल्या मोबाईलमध्ये दामिनी ॲप वापरावा. या ॲपमुळे 4 तास आगोदरच विज पडणार असल्याची माहिती आपल्याला मिळते. त्यामुळे पशुधनाचे व शेतकऱ्यांचे नुकसान होत नाही. यासाठी शेतकऱ्यांने जागरूक राहिले पाहिजेअसे आवाहन ॲड निलेश हेलोंडे पाटील यांनी केले.

 

कृषि विभागाच्या विविध योजना शेतकऱ्यांपर्यंत ग्रामस्तरावर सविस्तर पुस्तक स्वरुपात पोहचल्या पाहिजेत. यासाठी कृषि विषयक विविध योजनेच्या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन त्यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले. नांदेड जिल्हा रेशीम क्षेत्रात आघाडीवर असून शेतकरी पारंपारिक पिकासोबतच हळदकेळीस्ट्रॉबेरी फळ घेण्याकडे कल वाढवत असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली. विषय सुचीनुसार सादरीकरणाद्वारे जिल्ह्यात शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रम व योजनांची माहिती दिली. शेवटी निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी आभार मानले.    

0000






















Wednesday, December 11, 2024

वृत्त क्र. 1185

सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीसाठी 812 कोटी नुकसान भरपाई मंजूर

डीबीटीद्वारे थेट बँक खात्यात रक्कम जमा होणार

शेतकऱ्यांनी ईकेवायसी प्रक्रिया पूर्ण करावी

नांदेड, दि. 11 डिसेंबर :- माहे सप्टेंबर 2024 मध्ये अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे 33 टक्केच्या वर नुकसान झालेल्या बाधित क्षेत्रासाठी शासनाकडून 812 कोटी रुपये नुकसान भरपाई मंजूर झाली आहे. ही रक्कम जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डीबीटीद्वारे थेट जमा करण्यात येणार आहे. तरी शेतकऱ्यांनी ई-केवायसी प्रक्रीया पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

तालुकानिहाय बाधित शेतकरी संख्या व नुकसान भरपाईची रक्कम कोटी रुपयात आहे.

नांदेड तालुक्यासाठी 34 हजार 641 बाधित शेतकऱ्यांसाठी 29 कोटी 85 लाख रुपये, अर्धापूर तालुक्यासाठी 32 हजार 448 बाधित शेतकऱ्यांसाठी 32 कोटी 97 लाख रुपये, कंधार तालुक्यासाठी 73 हजार 650 बाधित शेतकऱ्यांसाठी 71 कोटी 27 लाख रुपये, लोहा तालुक्यासाठी 80 हजार 840 बाधित शेतकऱ्यांसाठी 84 कोटी 40 लाख रुपये, बिलोली तालुक्यासाठी 36 हजार 99 बाधित शेतकऱ्यांसाठी 46 कोटी 47 लाख रुपये, नायगाव तालुक्यासाठी 56 हजार 172 बाधित शेतकऱ्यांसाठी 56 कोटी 64 लाख रुपये, देगलूर तालुक्यासाठी 61 हजार 123 बाधित शेतकऱ्यांसाठी 50 कोटी 95 लाख रुपये, मुखेड तालुक्यासाठी 79 हजार 603 बाधित शेतकऱ्यांसाठी 55 कोटी 92 लाख रुपये, धर्माबाद तालुक्यासाठी 28 हजार 795 बाधित शेतकऱ्यांसाठी 27 कोटी 26 लाख रुपये, उमरी तालुक्यासाठी 34 हजार 38 बाधित शेतकऱ्यांसाठी 32 कोटी 70 लाख रुपये, भोकर तालुक्यासाठी 43 हजार 59 बाधित शेतकऱ्यांसाठी 52 कोटी 19 लाख रुपये, मुदखेड तालुक्यासाठी 30 हजार 812 बाधित शेतकऱ्यांसाठी 29 कोटी 35 लाख रुपये, हदगाव 74 हजार 228 बाधित शेतकऱ्यांसाठी 82 कोटी 27 लाख रुपये, हिमायतनगर 34 हजार 533 बाधित शेतकऱ्यांसाठी 44 कोटी 61 लाख रुपये,  किनवट तालुक्यासाठी 57 हजार 702 बाधित शेतकऱ्यांसाठी 80 कोटी 42 लाख रुपये, माहूर तालुक्यासाठी 26 हजार 172 बाधित शेतकऱ्यांसाठी 35 कोटी 12 लाख असे एकूण नांदेड जिल्ह्यातील 7 लाख 83 हजार 915 शेतकऱ्यांसाठी 812 कोटी 386 लाख रुपये मंजूर झाले आहेत.

दिनांक 1.1.2024 च्या शासन निर्णयानुसार नोव्हेंबर 2023 मधील अवेळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या व त्यापुढील कालावधीसाठी अवेळी पाऊस व गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेतीपिकाच्या नुकसानीसाठी सुधारित दराने 2 ऐवजी 3 हेक्टरपर्यत मदत अनुज्ञेय करण्यात आली आहे.

00000

वृत्त क्र. 1184

उद्योग भवन येथे सोमवारी निर्यात प्रचालन कार्यशाळेचे आयोजन

                                                                                                                                                                       नांदेड, दि. 11 डिसेंबर :- जिल्हा उद्योग केंद्र, नांदेड मार्फत निर्यात प्रचालन कार्यशाळा सोमवार 16 डिसेंबर 2024 रोजी  उद्योग भवन, पहिला मजला, सहकारी औद्योगिक वसाहत, शिवाजीनगर, नांदेड येथे स. 9 ते दु. 2 वाजेपर्यंत आयोजित केली आहे.

या कार्यशाळेस जिल्हयातील सर्व उद्योजक, औद्योगिक संघटना, शेतकरी कंपन्या, इच्छुक युवक-युवती तसेच सध्या कार्यरत निर्यातक्षम उद्योग घटक यांनी सहभागी व्हावे. तसेच सर्वानी या कार्यशाळेचा प्रचार, प्रसार व्हॉटसअप ग्रुप, सोशल मिडीया, स्थानिक नामांकित वर्तमानपत्रे इ.वर शेअर करावा. नांदेड जिल्हयाच्या विकासासाठी सर्वांनी सक्रीय योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हा निर्यात प्रचालन समितीचे सदस्य सचिव तथा महाव्यवस्थापक अमोल इंगळे यांनी केले आहे.

या कार्यशाळेचा उद्देश हा राज्यामध्ये निर्यात क्षेत्रात प्रोत्साहन देण्यासाठी तसेच रोजगार निर्मितीचे लक्ष्य साध्य करण्यासाठी आणि निर्यात वाढीला प्रत्येक जिल्हयाला उत्तरदायी बनविण्यासाठी राज्याकडून केंद्र शासनाच्या जिल्हा हे निर्यात केंद्र (District as  Export Hub) उपक्रमाला प्रोत्साहन देणे हा आहे. 

उद्योग संचालनालयाच्या संनियंत्रणाखाली जिल्हयामध्ये या कार्यशाळेसाठी सुक्ष्म, लघु, मध्यम उपक्रम घटक निर्यातदार, निर्यातक्षम उद्योजक, नव उद्योजक, औद्योगिक संस्था व संघटना, औद्योगिक समुह, औद्योगिक वसाहती, शेतकरी सहकारी संस्था व  उत्पादक, प्रक्रिया उत्पादक, केंद्र व राज्य शासनाचे तसेच संबंधीत उपक्रमाचे अधिकारी, जिल्हा निर्यात प्रचालन समितीचे सदस्य, निर्यातसंबंधी कामकाज करणारे घटक इ. चा सहभाग असणार आहे. या कार्यशाळेत विदेश व्यापार महानिदेशालय (DGFT), पुणे येथील तज्ञांची टीम निर्यातबाबत सादरीकरण करणार आहेत. 

या कार्यशाळेस जिल्हा निर्यात प्रचालन समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांचे मार्गदर्शन मिळणार असून या समितीचे सर्व सदस्यदेखील सहभागी होणार आहेत. निर्याती संदर्भात अडी-अडचणी, विविध योजनांबाबत प्रश्नोत्तराचा कार्यक्रम असून तज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. 

00000

वृत्त क्र. 1183

कर्जाची एकरकमी परतफेड करणाऱ्यांना लाभार्थ्यांना थकीत व्याजात 50 टक्के सवलत

नांदेड, दि. 11 डिसेंबर :- महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या संपूर्ण थकीत कर्ज रकमेत एकरकमी भरणा करणाऱ्या लाभार्थ्यास थकीत व्याज रक्कमेत 50 टक्के सवलत (ओटीस) देण्याबाबत सुधारित एकरकमी योजना 31 मार्च 2025 पर्यत लागू करण्यात आली आहे. त्यानुसार थकबाकीदार लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेवून कर्जमुक्त व्हावे, असे आवाहन इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक एस.एन. झुंजारे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा कार्यालय डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, ग्यानमाता शाळेसमोर नांदेड- 431605 किंवा दूरध्वनी क्रमांक (02462) 220865 वर संपर्क साधावा, असे महामंडळाच्यावतीने प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.
00000

 वृत्त क्र. 1182 

इतर मागासवर्गीय महामंडळाच्या

विविध कर्ज योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

 

नांदेडदि. 11 डिसेंबर :- महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ यांच्या उपकंपनी जगदज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळसंत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळ व संतसेनाजी महाराज केशशिल्पी महामंडळ या तिन्ही महामंडळामार्फत इतर मागासवर्गीय समाजाच्या सर्वांगीण कल्याणाकरिता बेरोजगारांसाठी, स्वयंम उद्योगासाठी विविध कर्ज योजना राबविण्यात येतात. इतर मागासवर्गीय प्रवर्गातील गरजु व कुशल व्यावसायिक व्यक्तींना कृषी लग्न व पारंपारीक उपक्रम व लघु उद्योग व मध्यम उद्योग उत्पादनव्यापार विक्री सेवाक्षेत्र इत्यादी व्यवसाय करीता या महामंडळाच्या नांदेड जिल्ह्याकरीता सन 2024-25 या आर्थिक वर्षासाठी मुख्यालय स्तरावरून उद्दीष्ट प्राप्त झाले आहे.

 

एक लाखापर्यंतची थेट कर्ज योजना

या योजनेत अर्जदाराचा सिबिल क्रेडिट स्कोअर किमान 500 पेक्षा जास्त असावाअर्जदाराचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न रुपये एक लाखापेक्षा कमी असावेपरतफेडीचा कालावधी 48 समान मासिक हप्त्यांमध्ये राहिलनियमीत परतफेड करणाऱ्या लाभार्थ्यांना या योजनेत व्याज अदा करावे लागणार नाही परंतू थकित झालेल्या हप्त्यांवर द.सा.द.शे. टक्के व्याजदर आकारण्यात येईल.

 

20 टक्के बीज भांडवल कर्ज योजना

या योजनेमध्ये 75 टक्के रक्कम ही बँकेची असून त्यावरील व्याज हे बँकेच्या नियमाप्रमाणे राहील. 20 टक्के रक्कम ही महामंडळाची असून त्यावर द.सा.द.शे. टक्के व्याज आकारण्यात येते व टक्के सहभाग हा लाभार्थ्यांचा आहे. या योजनेची कर्ज मर्यादा रुपये लाखापर्यंत असून परतफेडीचा कालावधी पाच वर्षाचा समान 60 हप्त्याचा आहे.

 

वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना

ही योजना बँकेमार्फत राबविण्यात येत असून कर्ज मर्यादा 10 लाख रुपयापर्यंतची आहे. या योजनेत महामंडळाच्या वेबपोर्टल संगणक प्रणालीवर नावनोंदणी करणे अनिवार्य आहे. या योजनेत कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न मर्यादा 8 लाखापर्यंत आहे. कर्ज परतफेडीचा कालावधी बँकेच्या निकषाप्रमाणे तसेच कर्ज रक्कमेचे हप्ते नियमित भरल्यास व्याजाची रक्कम (12 टक्केच्या मर्यादित) व्याज परतावा रक्कम अनुदान स्वरूपात बँक प्रमाणिकरणानुसार लाभार्थ्याच्या आधारलिंक बँक खात्यात दरमहा महामंडळामार्फत जमा करण्यात येईल. तसेच लाभार्थ्यांने ऑनलाईन पोर्टलवर उद्योग सुरू असल्याचे किमान दोन छायाचित्रे अपलोड करणे अनिवार्य आहे.

 

गट कर्ज व्याज परतावा योजना

सदर योजना बँकेमार्फत राबविण्यात येत असून कर्ज मर्यादा 10 ते 50 लाख रुपयापर्यतची आहे. या योजनेत महामंडळाच्या वेबपोर्टल संगणक प्रणालीवर नाव नोंदणी करणे अनिवार्य आहे. गटातील लाभार्थ्याचे वय 18 ते 45 वर्षे असावे. गटातील लाभार्थ्यांनी यापूर्वी महामंडळाचा किंवा इतर कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेतलेला नसावा. इतर मागास प्रवर्गातील महामंडळाच्या निकषांनुसार विहित केलेल्या वार्षिक उत्पन्न मर्या देतील. उमेदवाराचे बचतगटभागीदार संस्थासहकारी संस्थाकंपनी (कंपनी अधिनियम 2013 अंतर्गत) एलएलपीएफपीओ अशा शासन प्रमाणीकरण प्राप्त संस्थांना बँकेतर्फे स्वयंरोजगार उद्योग उभारणीकरीता जे कर्ज दिले जाईल त्या कर्ज रक्कमेवरील व्याज परतावा हा बँक प्रमाणिकरणानुसार महामंडळाकडून अदा केला जाईल.

 

शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना

ही योजना बँकेमार्फत राबविण्यात येत असून कर्ज रक्कमेवरील व्याज परतावा देशांतर्गत व परदेशी उच्च शिक्षणासाठी कर्ज मर्यादा 10 ते 20 लक्ष रुपयापर्यतची आहे. या योजनेत महामंडळाच्या वेबपोर्टल संगणक प्रणालीवर नाव नोंदणी अनिवार्य आहे. विद्यार्थ्यांचे वय 17 ते 30 वर्षे असावे. अर्जदाराची कुटुंबिक वार्षीक उत्पन्न मर्यादा 8 लक्ष रुपये असावे. विद्यार्थी बारावीत 60 टक्के गुणासह उत्तीर्ण असावा. रक्कमेवरील व्याज परतावा हा बँक प्रमाण‍िकरणानुसार महामंडळाकडून अदा केले जाईल.

 

महिला स्वयं सिद्धी व्याज परतावा योजना  

ही योजना महिला आर्थिक विकास महामंडळाच्या लोकसंचालीत साधन केंद्र (CMRC) मार्फत राबविल्या जात आहे. इतर मागास प्रवर्गातील किमान 50 टक्के महिलांचा समावेश असलेल्या पात्र महिला बचत गटास प्रथम टप्यात लाख रुपया पर्यंत कर्ज बँकेमार्फत उपलद्ध करून घेण्यास मान्यता देण्यात येईल. कर्ज परतफेडीचा कालावधी बँकेच्या निकषाप्रमाणे तसेच कर्ज रक्कमेचे हप्ते नियमित भरल्यास व्याजाची रक्कम (12 टक्केच्या मर्यादित) व्याज परतावा रक्कम अनुदान स्वरूपात बँक प्रमाणिकरणानुसार लाभार्थ्यांच्या आधारलिंक बँक खात्यात दरमहा महामंडळामार्फत जमा करण्यात येईल.

 

या विविध कर्ज योजना बँकेमार्फत असून लाभार्थ्यांनी महामंडळाच्या संकेतस्थळावर www.msobcfdc.org ऑनलाईन अर्ज भरावा. योजनेच्या अधिक माहितीसाठी महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्या. जिल्हा कार्यालय डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनग्यानमाता शाळेसमोर नांदेड-431605 दूरध्वनी क्र. 02462-220865 अथवा www.msobcfdc.org या वेबसाइट संपर्क साधावा. या योजनेचा लाभ इतर मागासवर्गीय समाजातील व्यक्तिने जास्तीत जास्त प्रमाणात घ्यावाअसे आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे.

00000

  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर करण्यात आली असून उर्वरित याद्या लवकरच...