Thursday, December 12, 2024

 वृत्त क्र. 1188 

आजपासून नांदेडमध्ये राज्यस्तरीय युवा महोत्सव

 

नांदेड दि. 12 डिसेंबर : राजस्तरीय युवा महोत्सव सन 2024 25 ची सुरुवात उद्या नांदेड येथे होत आहेत. नांदेड जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाने या महोत्सवासाठी तयारी केली असून दोन दिवसीय कार्यक्रमाचे उद्या उद्घाटन होणार आहे.

 

 क्रीडा व युवक सेवा संचालनालयमहाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयनांदेड व राष्ट्रीय सेवा योजनास्वा.रा.ती.मराठवाडा विद्यापीठनांदेड व नेहरु युवा केंद्रनांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तर युवा महोत्सव सन 2024-25 चे आयोजन 13 ते 14 डिसेंबर,2024 या कालावधीत कुसुम सभागृहव्ही.आय.पी.रोडनांदेड या ठिकाणी आयोजन करण्यात आले आहे.

 

युवा महोत्सव म्हणजे युवकांचा सर्वांगिण विकास करणेसंस्कृती व परंपरा जतन करणेयुवकांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव देणे व राष्ट्रीय एकात्मता वाढिस लागणे यासाठी प्रतिवर्षी राष्ट्रीय युवा महोत्सवाचे युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालय भारत सरकारमार्फत आयोजन करण्यात येते.

 

सन 2024-25 या वर्षातील राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन 12 ते 16 जानेवारी,2025 या कालावधीत दिल्ली येथे करण्यात येणार आहे.

 

या राज्यस्तर युवा महोत्सवमधुन महाराष्ट्र राज्याचा संघ राष्ट्रीय युवा महोत्सवकरीता निवडण्यात येणार आहे. त्याकरीता नांदेड जिल्हयातील जास्तीत-जास्त युवक-युवतींनी व नांदेडकरांनी मोठया संख्येन उपस्थित राहुन या राज्यस्तरीय युवा महोत्सवाचा लाभ घ्यावाअसे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांनी केले आहे.

००००

No comments:

Post a Comment

    वृत्त क्र. 68 नांदेड जिल्ह्यातील 67 रेती घाटांची जिल्हाधिकाऱ्यांच्या समक्ष पर्यावरणीय जन सुनावणी  स्थानिक रोजगाराला प्राधान्य देण्याचा स...