नांदेड जिल्हा प्रशासनाने मतदान केंद्रावर कशा प्रकारे मतदान प्रक्रिया पार पडते याबद्दल तयार केलेली चित्रफित.
चला जाणून घेऊया मतदान प्रक्रिया
वृत्त क्र. 387
लोकसभेच्या 50 टक्के मतदान केंद्रांवर वेब कास्टिंग यंत्रणा ;
केंद्रांवरील प्रत्येक हालचालीवर लक्ष
6 नियंत्रण कक्षातून जिल्हाधिकारी मतदारापासून आयोगापर्यंत संपर्कात
नांदेड, 25 एप्रिल- जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीसाठी 3 हजार 41 मतदान केंद्रे आहेत. त्यातील संवेदनशील केंद्रांसह 50 टक्के मतदान केंद्रांवर वेबकास्टिंग यंत्रणा बसविली आहे. 50 टक्के मतदान केंद्रांवरील मतदानादिवशीची प्रत्येक हालचाल जिल्हाधिकारी व सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना कार्यालयात बसून पाहता येणार आहेत.
नांदेड लोकसभा मतदारसंघात 6 विधानसभा मतदारसंघ येतात. नांदेड लोकसभा मतदारसंघात 2 हजार 62 मतदान केंद्र आहेत. नांदेड लोकसभा मतदारसंघातील 1 हजार 359 मतदान केंद्रावर वेबकॉस्टिंगची सुविधा केली आहे. याव्दारे या मतदान केंद्रावरील हालचाली जिल्हाधिकारी कार्यालयात बसून पाहता येणार आहेत. हिंगोली मतदार संघातील किनवट तालुक्यातील 164 तर हदगाव तालुक्यातील 169 मतदान केंद्रांचाही यामध्ये समावेश आहे.
वेबकॉस्टिंगसाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन कॅबिनेट हॉल येथे सनियंत्रण कक्ष तयार करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अभिजीत राऊत व जिल्हा विज्ञान व सूचना अधिकारी प्रफुल्ल करर्णेवार यांच्या मार्गदर्शनात हा कक्ष तयार करण्यात आला आहे. जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर आडे हे कक्षाचे प्रमुख असून सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी निखिल बासटवार यांच्यासह शिवानंद स्वामी, मिरज धामणगावे, शाहेद हुसेन, विठ्ठल लाड आदी परिश्रम घेत आहेत. विधानसभा मतदारसंघनीय वेबकॉस्टिंग चालू असलेल्या मतदान केंद्रांवर काही अनुसूचित प्रकार निदर्शनात आल्यास वरिष्ठ अधिकाऱ्यांना निदर्शनास आणून देण्यात येणार आहे.
6 नियंत्रण कक्षातून निगराणी
लोकसभा सार्वत्रिक निवडणुका दुसऱ्या टप्प्यामध्ये मतदानाच्या दिवशी 6 नियंत्रण कक्ष कार्यान्वित राहणार आहे. यामध्ये निवडणूक निर्णय अधिकारी कक्ष, माध्यम कक्ष, ईव्हीएम व जीपीएस नियंत्रण कक्ष, वेब कास्टिंग, एनकोर कक्ष, कम्युनिकेशन कक्ष. यामधील निवडणूक निर्णय अधिकारी कक्ष व माध्यम कक्ष मतदानाच्या दिवशी व मतदानाच्या आदल्या दिवशी वृत्तवाहिन्यावर प्रसारित होणाऱ्या बातम्यांची निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना माहिती देणे व वृत्तपत्रांना आकडेवारी देण्याचे काम करणार.
ईव्हीएम व जीपीएस नियंत्रण कक्षाद्वारे ईव्हीएम वाहतुकीवर नियंत्रण ठेवल्या जाते. ईव्हीएम घेऊन जाणारी वाहने कुठे आहेत. त्यांचे लोकेशन काय आहे ,यावर या कक्षामार्फत नियंत्रण ठेवल्या जाते. वेब कास्टिंग कक्षाद्वारे प्रत्येक विधानसभा निहाय 50 टक्के केंद्रावर वेब कास्टिंग करण्यात येते. याद्वारे जिल्हाधिकारी कार्यालयातून सर्व संबंधित केंद्रांवर सुरू असलेल्या हालचालीवर नियंत्रण ठेवल्या जाते.
एन्कोर कक्षामार्फत निवडणूक आयोगाला दर दोन तासांनी मतदानाची टक्केवारी दिली जाते. विहित नमुन्यातील ही टक्केवारी आयोगाला वेळेत सादर करण्याची जबाबदारी या समितीकडे आहे. कम्युनिकेशन कक्षामार्फत इतर सर्व कक्षाशी समन्वय ठेवण्यात येईल व जिल्हाधिकाऱ्यांना वेळोवेळी सर्व ठिकाणीची माहिती दिल्या जाईल.
00000
वृत्त क्र. 386
मतदानासाठी 12 ओळखीचे पुरावे ग्राह्य ;
12 पैकी कोणतेही एक ओळखपत्र दाखवून करा मतदान ;
मतदार यादीत नाव असणे आवश्यक
नांदेड, दि. 25 : लोकसभेच्या उद्याच्या मतदानासाठी तुमचे मतदार यादीत नाव असणे आवश्यक आहे. मतदार यादीत नाव असेल व तुमच्याकडे निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या बारा ओळखपत्रांपैकी कोणतेही एक ओळखपत्र असेल तर तुम्हाला उद्या मतदान करता येणार आहे.
येत्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये 26 एप्रिल रोजी मतदान करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने ईपीक म्हणजेच मतदार फोटो ओळखपत्र आणि इतर 12 ओळखीचे पुरावे ग्राह्य धरले आहेत.यापैकी कोणताही एक ओळखीचा पुरावा मतदार केंद्रावरील अधिकाऱ्यांना दाखविल्यानंतर मतदारांना मतदान करता येणार आहे.
भारत निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 करीता छायाचित्रासह मतदार ओळखपत्र म्हणजेच ईपीक देण्यात आले आहे. ते मतदार मतदानकेंद्रावर त्यांची ओळख पटविण्यासाठी छायाचित्रासह मतदार ओळखपत्र सादर करतील. परंतु मतदारांकडे छायाचित्रासह मतदार ओळखपत्र नसल्यास अशा मतदारांना त्यांची ओळख पटविण्यासाठी मतदार ओळखपत्राच्या व्यतिरिक्त इतर 12 पुराव्यापैकी कोणताही एक पुरावा ग्राह्य धरण्यात येणार आहेत.
हे आहेत 12 पुरावे
मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी स्वत:ची ओळख पटविण्यासाठी पुराव्यांमध्ये आधारकार्ड, मनरेगा जॉब कार्ड, बँक किंवा पोस्ट ऑफिसने जारी केलेले छायाचित्र असलेले पासबुक, कामगार मंत्रालयाच्या योजनेंतर्गत जारी केलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, वाहन चालक परवाना, पॅन कार्ड, रजिस्टार जनरल ऑफ इंडिया यांच्याद्वारा नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर अंतर्गत निर्गमित स्मार्ट कार्ड, भारतीय पासपोर्ट, छायाचित्रासह पेन्शन दस्तऐवज, केंद्र, राज्य सरकार, सार्वजनिक उपक्रम, पब्लिक लिमिटेड कंपनी यांनी कर्मचाऱ्यांना जारी केलेले सेवा ओळखपत्र, खासदार, आमदारांना जारी करण्यात आलेले अधिकृत ओळखपत्र, भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सशक्तीकरण मंत्रालयाने जारी केलेले विशेष विकलांगता प्रमाणपत्र असे 12 कागदपत्रे पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहेत.
मतदारांना छायाचित्रासह मतदार ओळखपत्र देण्यात आलेले आहेत, ते मतदान केंद्रावर त्यांची ओळख पटविण्यासाठी छायाचित्रासह मतदार ओळखपत्र सादर करतील.
ईपीक सादर करणे शक्य नसल्यास इतर 12 प्रकारच्या ओळखपत्रापैकी कोणतेही एक ओळखपत्राचा उपयोग करून मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.
00000
वृत्त
क्र. 385
मतदान
साहित्यांसह पोलिंग पार्ट्या मतदान केंद्राकडे रवाना
· 10
हजार कर्मचारी 2062 केंद्रावर प्रक्रिया पार पाडणार
· मतदारांनी
मतदानासाठी बाहेर पडावे जिल्हाधिकारी यांचे आवाहन
नांदेड
दि. 25 :- 16- नांदेड लोकसभा मतदार संघासाठी उद्या 26 एप्रिल रोजी मतदान होत आहे. मतदान
प्रक्रीया पूर्ण करण्यासाठी एकूण 10 हजार 637 अधिकारी कर्मचा-यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतदानासाठी प्रशासनाची पूर्ण तयारी झाली असून जास्तीत जास्त
मतदान होईल यासाठी मतदारांनी बाहेर पडून मतदान करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा
जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अभिजीत राऊत यांनी केले. आज शासकीय तंत्रनिकेतन येथे
87 -नांदेड दक्षिण व 86 -नांदेड उत्तर मतदार संघासाठी नियुक्त अधिकारी व कर्मचारी
यांना प्रशासनातर्फे मतदान साहित्य हस्तांतरीत करुन दुपारपर्यत मतदान केंद्राकडे
रवाना करण्यात आले.
आज
सकाळी 7.30 वाजता पासून शासकीय तंत्रनिकेतन येथे राष्ट्रीय कर्तव्यासाठी सज्ज असलेले
झोनल अधिकारी, मतदानासाठी नियुक्त अधिकारी कर्मचारी यांची मतदान साहित्य हस्तगत
करण्याची लगबग सुरु होती. मतदानासाठी नियुक्त अधिकारी व कर्मचारी यांनी आपले आदेश,
मतदान केंद्राबाबत माहिती, ओळखपत्र हस्तगत करणे, मतदान केंद्राचा मार्ग, आपल्या गटातील
अधिकारी कर्मचारी कोण आहेत याबाबतची सर्व माहिती जाणून घेण्यासाठी लगबग दिसून आली.
यावेळी कार्यरत कर्मचा-यामध्ये वेगळा उत्साह व जबाबदारीची जाणीव दिसून आली. याठिकाणी
सर्व कर्मचारी शिस्तीमध्ये प्रत्येक साहित्य घेताना दिसून आले. मतदान साहित्य
हस्तगत करुन दुपारच्या सुमारास पोलिंग पार्ट्यां मतदान केंद्राकडे रवाना झाल्या.
11 ला भोजनानंतर सर्व पोलिंग पार्ट्यां आपआपल्या
बूथवर रवाना झाल्या. आज दुपारनंतर पोलिंग पार्ट्या व सुरक्षा बघणारे पोलीस सर्वजण
दुपारनंतर संध्याकाळपर्यत आप-आपल्या केंद्रावर पोहचणार आहेत. आज रात्री केंद्रामध्येच
त्यांचा मुक्काम असून सकाळी 7 वा. नागरिकांना
मतदान करण्यासाठी केंद्र सज्ज होणार आहे. मतदानाची वेळ सकाळी 7 ते सांयकाळी 6 पर्यत
आहे. उद्या रात्री पूर्ण मतदान झाल्यानंतर सर्व पोलिंग पार्ट्या पोलिंग युनिट परत
करण्यासाठी केंद्रात येणार आहे.
शासकीय
तंत्रनिकेतन येथील मैदानावर मतदान केंद्राचे रुट प्लॉन बोर्ड, मतदान साहित्य वाहतुकीसाठीच्या बसच्या रांगा, मोठ मोठे मंडप, साहित्य वितरणाचे टेबल असे भव्य
नियोजन प्रशासनातर्फे केले होते. तसेच स्ट्रॉग
रुममधून इव्हीएम मशीन बाहेर काढण्यासाठी आयोगाच्या सूचनेप्रमाणे कडक सुरक्षा व्यवस्था
ठेवण्यात आली होती. उमेदवारांच्या प्रतिनिधीच्या उपस्थितीत वरिष्ठ अधिका-यांनी
स्ट्रॅाग रुममधून इव्हिएम मशिन बाहेर काढून पोलिंग पार्ट्यांना हस्तांतरीत करण्यात आल्या.
नांदेड
86- उत्तर व 87- दक्षिण मतदार संघासोबतच आज 85- भोकर, 89-नायगाव, 90-देगलूर, 91- मुखेड
या मतदार संघासाठी सहा.निवडणूक निर्णय अधिकारी यांनी पोलिंग पाटर्यांना मतदार साहित्यांसह
त्या—त्या बुथकडे रवाना केल्या आहेत.
नांदेड
लोकसभेचे मतदान एकूण 2 हजार 62 मतदान केंद्रावर होत आहे. यासाठी 10 हजार 637 प्रशिक्षित
कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. यावेळी
निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी साहित्य वितरण केंद्राला
भेट देवून कर्मचा-यांशी संवाद साधला. तत्पुर्वी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी
नांदेड लोकसभा मतदार संघासाठी 75 टक्के मतदानाचे
उद्दिष्ट प्रशासनाने घेतले असून हे उदिष्टपूर्ती करण्यासाठी मतदारांनी मोठया
प्रमाणात बाहेर पडून मतदान करावे असे आवाहन केले. 10 हजारावर कर्मचारी व 75 दिवसापासून
दिवसरात्र कर्मचा-यांची मेहनत लोकशाहीचा उत्सव साजरा करण्यासाठी लागली आहे. प्रत्येक
मतदान केंद्रावर सर्व सोयी करण्यात आल्या आहेत. त्यामुळे मोठया संख्येने नागरिकांनी
बाहेर पडण्याचे आवाहन त्यांनी केले.
00000
वृत्त क्र. 384
देगलूर तहसील कार्यालयासमोरील वाहतूक वळण रस्यात बदल
नांदेड दि. 24 एप्रिल- लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने 25 एप्रिल 2024 रोजी तहसिल कार्यालय देगलूर येथून मतपेटी वाटप होणार आहेत. यावेळी तहसिल कार्यालयासमोरील रस्यावरील वाहतुकीमुळे अडथळा निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी या मार्गावरुन जाणा-या सर्व प्रकारच्या वाहनांच्या वाहतुकीस प्रतिबंध करण्यात आले आहे. सदर वाहनांना पर्यायी मार्गाचा वापर करावा, अशी अधिसूचना जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी निर्गमीत केली आहे.
मोटार वाहन कायदा 1988 चे कलम 115 मधील तरतुदीनुसार जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी संबधीत विभागाने पुढील उपाययेाजना करुन 25 एप्रिल 2024 रोजी सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत तसेच 26 एप्रिल 2024 रोजी दुपारी 16 ते 24 वाजेपर्यंत वर नमुद केलेल्या पर्यायी मार्गाने सर्व प्रकारची वाहने वळविण्यास मान्यता देण्यात आली आहे.
तहसिल कार्यालय देगलूर समोरील रस्ता हा प्रतिबंध केला आहे. यासाठी पर्यायी मार्ग (जाणे-येणे करिता) छत्रपती शिवाजी महाराज पुतळा-डॉ.भुमे हॉस्पीटल-बापुनगर-भक्ता्पुर रोड-शहिद भगतसिंग चौक असा राहील. तर देगलूर ते उदगीर रस्ता प्रतिबंध केला असून या रस्यासाठी पर्यायी मार्ग शहिद भगतसिंग चौक-भक्तापुर रोड- बापुनगर-डॉ.भुमे हॉस्पीटल-छत्रपती शिवाजी महाराज पुतळा राहील.
उपविभागीय पोलीस अधिकारी देगलूर यांनी कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने आवश्यक ती उपाययोजना करावी. ही अधिसुचना सहा.निवडणुक निर्णय अधिकारी देगलूर यांचे कार्यालयामार्फत स्थानिक वर्तमानपत्रात प्रसिद्ध करावी. सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी देगलूर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत रस्ता वाहतूक प्रतिबंध व पर्यायी रस्यासाठी आवश्यक असलेले बोर्ड, चिन्ह लावणे इत्यादी बाबतची कार्यवाही करावी, असेही अधिसूचनेत स्पष्ट केले आहे.
००००
वृत्त क्र. 383
मतदान जागृतीचा बॅटन घेऊन नवमतदार धावले !
२६ एप्रिलला मतदान केंद्रावर पोहचा; तरुणांचे आवाहन
नांदेड दि. २४ : आम्ही आपण मतदान करावे या प्रचारासाठी धावतोय. तुम्ही फक्त मतदान केंद्रापर्यंत चालत या, असे आवाहन जिल्ह्यातील तरुणांनी नांदेड जिल्ह्यातील नागरिकांना केले आहे. पोलीस परेड ग्राउंडवर मतदान जागृतीचा बॅटन घेऊन नव मतदारांनी रिले स्पर्धेत भाग घेतला.
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने नांदेड जिल्हा स्वीप कक्षाने मतदान तरुण युवा मतदारांमध्ये मतदानाचे महत्त्व वाढावे, मतदानाविषयी त्यांना अधिक माहिती व्हावी, त्यांनी मतदान करण्याचे कर्तव्य निर्भीडपणे पार पडावा, यासाठी नांदेड जिल्ह्यातील सोळा तालुक्यात रिले स्पर्धा व गोळा फेक स्पर्धा तरुण नव मतदार युवकांची स्पर्धा घेण्यात आली. त्यांच्या हातात मतदान जनजागृतीचे बॅटन घेऊन हे सर्व तरुण मतदार 3000 एवढ्या मोठ्या संख्येने जमलेल्या प्रेक्षकांना मतदारांना आम्ही जिंकण्यासाठी धावतोय... मतदान जनजागृतीसाठी धावतोय... तुम्ही पण या देशाची लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान केंद्राकडे धाव घ्यावी अशा प्रकारचा संदेश या सर्व धावपटूंनी यावेळी दिला.
आकर्षक अशा रंगातील त्यावर मतदानाचे समर्पक असे स्लोगन लिहून बॅटनला सजवण्यात आले होते. या सर्व धावपटूंचं उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात कौतुक केले या स्पर्धेला निवडणूक निरीक्षक डॉ.जांगिड यांनी सुरुवात केली. आकर्षक अशा मतदार जागृतीचे संदेश लिहिलेल्या बॅटनचे कौतुक केले. तर दुसऱ्या रिले स्पर्धेला जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सुरुवात करून दिली. तर महिला रिले स्पर्धेची सुरुवात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा स्वीप जिल्हा नोडल अधिकारी मिनल करनवाल यांनी करून दिली. याप्रसंगी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका आयुक्त डॉ. महेश कुमार डोईफोडे उपस्थित होते. या स्पर्धेत मुलांमध्ये प्रथम क्रमांक हदगाव तालुक्यातील संघाने पटकावला, तर द्वितीय क्रमांक बिलोली या तालुक्यातील संघाने पटकावला. तर तृतीय क्रमांक कंधार या तालुक्यातील संघाने पटकावला.
महिला रिलेमध्ये कंधार या तालुक्यातील संघाने प्रथम क्रमांक तर किनवट या तालुक्यातील संघांनी द्वितीय क्रमांक तर देगलूर या तालुक्यातील संघाने तृतीय क्रमांक पटकावला. यावेळी गोळाफेक स्पर्धा घेण्यात आली.या स्पर्धेचें सुद्धा आगळे वेगळे वैशिष्ट्य म्हणजे गोळ्यावर ते VOTE असा संदेश पेंट केला होता. त्यामुळे दोन्हीही स्पर्धा या आगळ्यावेगळ्या जागृतीने ओळखल्या गेल्या. या स्पर्धेचे पंच म्हणून प्रलोभ कुलकर्णी, सुशील कुरडे, खोकले बाबुराव कुलूपवाड, मोहम्मद खालिक, वैभव दमकुंडवार, गोविंद पांचाळ, ज्ञानेश्वर सोनसळे, शक्ती घोडगे, शिवकांता देशमुख, यांच्यासह अनेक पंचांनी काम पाहिले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जिल्हा स्विप टीमचे रवी ढगे, डॉ राजेश पावडे, सारिका आचमे, अशा घुगे, सुनील मुत्तेपवार, बालासाहेब कचवे सुनील आलूरकर, दीपक भांगे, संतोष किसवे पाटील यांनी परिश्रम घेतले.
००००
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर करण्यात आली असून उर्वरित याद्या लवकरच...