Tuesday, March 5, 2024

 वृत्त क्र. 203

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार

योजनेसाठी अर्ज करण्यास 15 मार्चपर्यंत मुदतवाढ

नांदेड दि. 5 :- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सन 2023-24 साठी पात्र विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करण्यासाठी  15  मार्च 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.  विद्यार्थ्यांनी आपला अर्ज http://www.syn.mahasamajkalyan.in या संकेतस्थळावर भरुन त्या अर्जाची प्रत (प्रिंट) अर्ज भरल्यानंतर 2 दिवसात आवश्यक कागदपत्रासह प्रवेशित महाविद्यालयातील समान संधी केंद्राकडे जमा करणे बंधनकारक आहे. तसेच प्राप्त झालेले अर्ज एकत्रित फेरतपासणी करुन संबंधित महाविद्यालयाकडे प्राचार्य यांनी सही शिक्क्यासह सात दिवसाच्या आत पर्यत सहाय्यक आयुक्तसमाज कल्याण कार्यालयडॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवनग्यानमाता शाळेसमोरनमस्कार चौक नांदेड येथे सादर करावा, असे आवाहन समाज कल्याण कार्यालयाचे सहायक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी केले आहे.

 सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडुन अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील जे विद्यार्थी शासकीय वसतिगृहात प्रवेशास पात्र असुन प्रवेश मिळालेला नाही, अशा विद्यार्थ्यांना मॅट्रीकोत्तर शिक्षण घेता यावे यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना राबविण्यात येत आहे. यात भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधा विद्यार्थ्यांना स्वत: उपलब्ध करुन घेण्यासाठी आवश्यक रक्कम संबंधीत अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये दिनांक 13 जुन 2018 रोजीच्या शासन निर्णयानुसार थेट वितरीत करण्यात येते.

लाभाचे स्वरूप या योजने अंतर्गत अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये पुढील प्रमाणे रक्कम थेट वितरीत करण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी निकष पुढीलप्रमाणे राहतील. या योजनेचा लाभ घेण्यासाठी नांदेड महानगरपालिका क्षेत्रामध्ये तसेच नांदेड महानगरपालिका हद्दीपासुन 5 कि.मी. परिसरात असलेली महाविद्यालये/शैक्षणिक संस्था याठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अनुज्ञेय रक्कम पुढीलप्रमाणे आहे. भोजन भत्ता 28 हजार रुपयेनिवास भत्ता 15 हजार रुपयेनिर्वाह भत्ता 8 हजार रुपयेप्रति विद्यार्थी एकुण देय रक्कम 51 हजार रुपयेवरील रकमेव्यतिरिक्त वैद्यकीय व अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्यांसाठी प्रति वर्ष 5 हजार रुपये व अन्य शाखेतील विद्यार्थ्यांना प्रतिवर्ष २ हजार रुपये इतकी रक्कम शैक्षणिक साहित्यासाठी ठोक स्वरुपात देण्यात येईल. वरील एकुण देय रक्कमेतून भारत सरकार शिष्यवृत्ती अंतर्गत दिला जाणारा निर्वाह भत्ता कपात करण्यात येईल. 

या योजनेसाठी विद्यार्थी अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील असावा. विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवाशी असावा. शासकीय वस्तीगृहात प्रवेशासाठी पात्र असलेल्या अभ्यासक्रमास  विद्यार्थ्याने प्रवेश घेतलेला असावा. विद्यार्थ्यास इयत्ता दहावीबारावीपदवीपदविकामध्ये किमान 50 टक्के पेक्षा जास्त गुण असणे अनिवार्य आहे. या योजनेमध्ये दिव्यांग (अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील) विद्यार्थ्यांसाठी 3 टक्के आरक्षण असेल व गुणवत्तेची मर्यादा 40 टक्के असेल. विद्यार्थ्यांच्या पालकाचे उत्पन्न 2.50 लाखापेक्षा जास्त नसावे. विद्यार्थ्याने ज्या महाविद्यालयात प्रवेश घेतला आहे तेथील स्थानिक रहिवाशी नसावा. या योजनेचा लाभ घेण्यासाठी नांदेड महानगरपालिका क्षेत्रामध्ये असलेली महाविद्यालये तसेच नांदेड महानगरपालिका हद्दीपासून 5 कि.मी. परिसरात असलेली महाविद्यालये यामध्ये शिक्षण घेत असलेल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी अर्ज करावा. विद्यार्थ्याने ज्या अभ्यासक्रमास प्रवेश घेतला आहे तो अभ्यासक्रम हा 2 वर्षापेक्षा कमी कालावधीचा  नसावा. विद्यार्थ्यांची महाविद्यालयातील उपस्थिती 75 टक्के पेक्षा जास्त असणे बंधनकारक असेल. शासन परिपत्रक 31 ऑक्टोंबर 2023 नुसार विद्यार्थ्यांने नांदेड जिल्ह्यातील सामाजिक न्याय विभागाच्या कोणत्याही शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळालेला नसावा. विद्यार्थ्यांची निवड विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेच्या आधारावर करण्यात येईल. या योजनेसाठी खासबाब सवलत लागू राहणार नाही. 

विद्यार्थ्यांने खोटी माहिती अथवा कागदपत्रे देवून लाभ घेण्याचा प्रयत्न केल्यास किंवा शैक्षणिक अभ्यासक्रम पूर्ण न केल्यास अथवा नोकरी व व्यवसाय करत असल्यास आणि इतर मार्गाने या योजनेचा लाभ घेवून गैरवापर केल्याचे निदर्शनास आल्यास तो कार्यवाहीस पात्र राहील. त्यास दिलेल्या रकमेची 12 टक्के व्याजासह वसुली करण्यात येईल अशी सूचना समाज कल्याण कार्यालयाने दिली आहे. तसेच अपुर्ण भरलेले/आवश्यक कागदपत्र सादर न केलेले अर्ज रद्द समजण्यात येतील व अपात्र,त्रुटी असलेल्या विद्यार्थ्यांना वेगळे कळविण्यात येणार नाही असे समाज कल्याण कार्यालयाने प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

00000

 वृत्त क्र. 202

पंडित दिनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे 7 मार्च रोजी आयोजन

नांदेड दि. 5 : जिल्हयातील बेरोजगार उमेदवारांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी यासाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत  गुरुवार 7 मार्च 2024  रोजी पंडित दिनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी कार्यालयाचा दु.क्र.02462251674 यावर संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त रेणुका तम्मलवार यांनी केले आहे.

 या रोजगार मेळाव्यामध्ये नामांकित कंपण्याकडून मुलाखत घेण्यात येणार आहेत. बेरोजगार उमेदवारांनी www.mahaswayam.gov.in  या संकेतस्थळावर नावनोंदणी करावी. उमेदवारांना आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार रोजगार उपलब्ध करुन घेता येईल. या संधीचा लाभ जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांनी घ्यावा, असेही  जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत कळविले आहे.

0000

Monday, March 4, 2024

 वृत्त क्र. 201


राष्ट्रीय लोक अदालतीच्या माध्यमातून

हजार 455 प्रकरणे सामोपचाराने निकाली

 

·  विविध प्रकरणांत 21 कोटी 26 लाख 36 हजार 723 रुपयांची तडजोड

 

नांदेड दि. 4 :- महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणमुंबई यांचे आदेशान्वये नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा तथा प्रमुख जिल्हा न्यायाधीश सुरेखा कोसमकर यांच्या उपस्थितीत नांदेड जिल्ह्यातील सर्व न्यायालयात मार्च रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख जिल्हा न्यायाधीश सुरेखा कोसमकर यांनी उपस्थित पक्षकारांना लोकअदालतीचे महत्व समजावून आपली प्रकरणे तडजोडीने मिटवून घेण्याचे आवाहन केले. या राष्ट्रीय लोकअदालतमध्ये नांदेड जिल्हयामध्ये एकुण हजार 455 प्रकरणे सामोपचाराने निकाली निघाली असून यात 21 कोटी 26 लाख 36 हजार 723 रुपये इतक्या रकमेबाबत विविध प्रकरणांत तडजोड झाली.

 

तडजोड प्रकरणात दिवाणीफौजदारीधनादेश अनादरीत झालेली प्रकरणेबॅंक प्रकरणेमोटार वाहन अपघात नुकसानभरपाईभूसंपादनग्रामपंचायतीचे घरपट्टी व पाणीपट्टीचे प्रकरणे तसेच कौटुंबिक न्यायालयकामगार न्यायालयसहकार न्यायालय व ग्राहक तक्रार मंच येथील प्रलंबीत प्रकरणांचा व नांदेड वाघाळा महानगर पालिकापंचायत समिती व ग्रामपंचायतींचे वसुली प्रकरणेविविध बॅंकांचे तसेच विद्युत प्रकरणेदूरसंचार विभागाची टेलिफोनमोबाईल यांचे दाखलपूर्व प्रकरणे इत्यादींचा समावेश होता. तसेच पाच दिवस घेण्यात आलेल्या विशेष मोहीमेअतंर्गत 858 प्रकरणे निकाली काढण्यात आले आहे.

 

कौटुंबिक वादाची 26 प्रकरणे आपसात मिटविण्यात आली

तर जोडप्यांनी घेतला एकत्र नांदण्याचा निर्णय

 

विशेष म्हणजे या लोकअदालतीमध्ये नांदेड जिल्ह्यातील पती-पत्नीचे कौटुंबिक वादाची एकूण 26 प्रकरणे आपसात तडजोडीने मिटविण्यात आली. त्यापैकी वैवाहिक दांपत्यांनी आपसातील वाद संपवून पुन्हा एकत्र येवून संसाराची सुरुवात करण्याचा निर्णय घेतला. या लोक अदालतीच्या निमित्ताने स्टेट बॅंक ऑफ इंडियानांदेड विभागीय अधिकारी कालीदास व जगताप यांनी त्यांचे विभागातर्फे नांदेड जिल्हा न्यायालयाच्या ठिकाणी भव्य पेंडालची व्यवस्था करुन मोलाचे सहकार्य केले. ही लोकअदालत यशस्वी होण्यासाठी जिल्हयातील सर्व न्यायाधीशतसेच पॅनलवरील न्यायाधीश व पॅनल सदस्य आणि सर्व सन्माननिय विधिज्ञ यांनी जास्तीत जास्त प्रकरणे निकाली काढण्यासाठी प्रयत्न केले.

 

नांदेड जिल्ह्यातील प्रत्येक तालुका न्यायालयात तसेच कौटुंबिक न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा सरकारी वकिल तसेच जिल्हयातील सर्व सन्माननिय विधिज्ञ आणि भूसंपादन अधिकारीआयुक्त मनपामहसुल विभाग अधिकारी तसेच मुख्य कार्यकारी अधिकारीजिल्हा परिषद नांदेड व प्रबंधकजिल्हा न्यायालय नांदेड व सर्व न्यायालयीन कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या लोकअदालतीमध्ये जास्तीत जास्त प्रकरणे निकाली काढून लोकअदालत यशस्वी करण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा तथा प्रमुख जिल्हा न्यायाधीश सुरेखा कोसमकरजिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव श्रीमती दलजीत कौर मुख्यालयातील व तालुकास्तरावरील सर्व जिल्हा न्यायाधीशदिवाणी न्यायाधीश यांनी विशेष प्रयत्न केले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव श्रीमती दलजीत कौर जज यांनी उपस्थित असलेल्या सर्व पक्षकार तसेच सर्व न्यायाधीशविधीज्ञसर्व न्यायालयीन कर्मचारी वृंद यांनी परीश्रम घेतले तसेच ही लोकअदालत यशस्वी करण्यासाठी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहकार्य केलेल्या सर्वांचे आभार मानले तसेच यापुढेही अशा सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली.

 00000





 वृत्त क्र. 200

तांत्रिक शिक्षणातून सक्षम देश उभारणीचा पाया घाला : मृदसंधारण मंत्री संजय राठोड

 

संगणक आणि प्रयोगशाळेचे उद्घाटनविद्यार्थ्यांशी संवाद

 

नांदेडदि 4 : ग्रामीण भागाच्या विकासासाठी तांत्रिक शिक्षण कायापालट करणारे माध्यम ठरू शकते. जगातील सर्वात मोठे स्टार्टअप केंद्र सध्या महाराष्ट्र आणि पर्यायाने भारत आहे. त्यामुळे ग्रामीण भागात तांत्रिक शिक्षणाच्या उपलब्धतेतून सक्षम देश उभारणीचा पाया घालणे आवश्यक आहे,असे प्रतिपादन राज्याचे मृदसंधारण मंत्री संजय राठोड यांनी आज येथे केले.

 

नांदेड येथील ग्रामीण टेक्नीकल अॅन्ड मॅनेजमेंट कॅम्पस विष्णूपुरी व कंधार येथील तांत्रिक व कृषी महाविद्यालयात भेट दिल्यानंतर नांदेड येथे डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम सभागृहात विद्यार्थ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते.

 

यावेळी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष संजय पवार,प्राचार्य डॉ. विजय पवार,जिल्हा मृद संधारण अधिकारी हनुमंत खटकेसेवानिवृत्त जिल्हाधिकारी एल. शरमनश्रीमती मीनाताई पवार,डॉ. राजेंद्र पवारप्रोफेसर डॉ. पी. बी. उल्लागडी,उपप्राचार्य संजय देऊळगावकर,विभाग प्रमुख प्रा. गुरुदीपसिंघ वाहीडॉ. निलेश आळंदकरडॉ. सुनिल कदमप्रा. देवयानी कापसे तसेच मंत्री महोदयाच्या सुविद्य पत्नी शीतल राठोड उपस्थित होत्या.

 

बांधकाम क्षेत्र,संगणक क्षेत्रदोन्ही विभाग देशाच्या जडणघडणीत महत्व ठेऊन आहे. या दोन्ही क्षेत्रात करियर घडविण्यास अग्रेसर असणारे विद्यार्थी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शिक्षण घेत आहे.मराठवाडा परिसरातील ही एक चांगली संस्था आहे.सिव्हील व संगणक क्षेत्रात भरारी घेऊन आपल्या प्रदेशासाठी देशासाठी काम करणे आवश्यक आहेमोठमोठ्या स्टार्टअप या क्षेत्रात सुरू करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

मृद व जलसंधारण खात्याची माहिती यावेळी दिली. या विभागाच्या गेल्या काही दिवसातील उल्लेखनीय कामामुळे भूगर्भातील पाणी पातळी वाढत आहे. कोणत्याही गावात पाणीटंचाई राहणार नाही अशा पद्धतीची मृदसंधारणाची कामे आपल्या विभागाने हाती घेतली आहेअसेही त्यांनी यावेळी सांगितले.

 

उपस्थित विद्यार्थ्यांना त्यांनी शुभेच्छा दिल्या . संस्थेचे संस्थापक सचिव कै. शिवरामजी पवार साहेबाना अभिवादन केले. त्यांच्या दूरदृष्टीतून नांदेड सारख्या शहरात तांत्रिक शिक्षणाचा वटवृक्ष उभा राहिला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. ओमप्रकाश दरक यांनी केले.

00000







 वृत्त क्र. 199 

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे नांदेड विमानतळावर स्वागत

 

नांदेडवरून चेन्नईला रवाना

 

नांदेड दि. 4 :  श्री. गुरु गोविंदसिंघजी नांदेड विमानतळावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आज दुपारी दोनच्या सुमारास आदीलाबादवरून आगमन झाले. विमानतळावर मान्यवरांनी स्वागत केल्यानंतर लगेच त्यांनी विशेष विमानाने चेन्नईकडे प्रयाण केले.

 

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तेलंगणातील आदीलाबाद येथील एका सार्वजनिक सभेसाठी आज सकाळी नागपूर येथून हेलिकॉप्टरने उपस्थित झाले होते. त्याच हेलिकॉप्टरने ते नांदेड विमानतळावर आले. नांदेडवरून विशेष विमानाने ते चेन्नईकडे रवाना झाले.

 

विमानतळावर राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाणखा. प्रतापराव पाटील चिखलीकरखा. हेमंत पाटीलखा. डॉ. अजित गोपछडेआ. राम पाटील रातोळीकरआ. तुषार राठोड,आ. राजेश पवारआ.श्यामसुंदर शिंदेआ. बालाजी कल्याणकर,नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरिक्षक शशिकांत महावरकरजिल्हाधिकारी अभिजीत राऊतजिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

00000





















Sunday, March 3, 2024

वृत्त क्र. 198

 जिल्हा परिषदेच्या अंदाज पत्रकास मान्यतेची बैठक आता 5 मार्चला

नांदेड दि. 3 :- जिल्हा परिषदेच्या स्वत:च्या उत्पन्नातून घेण्यात येणाऱ्या योजनेचे सन 2023-24 चे सुधारित व सन 2024-25 चे मूळ अंदाज पत्रकास मान्यता देण्याबाबतची बैठक सोमवार 4 मार्च रोजी दुपारी 1.वा. जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित केली होती. परंतु सदर बैठक आता 5 मार्च 2024 रोजी दुपारी 1 वा. यशवंतराव चव्हाण सभागृह, जिल्हा परिषद नांदेड येथे होणार आहे, असे जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांनी कळविले आहे. संबंधितांनी या बदलाची नोंद घ्यावी, असेही त्यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.
000000

वृत्त क्र. 197

 जिल्ह्यात पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचे उद्घाटन

·     हजार 767 लसीकरण केंद्रावर बालकांना डोस 

नांदेड दि. 3 :- संपूर्ण राज्यात राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम मार्च रोजी राबविण्यात येत आहे. या मोहीमेत नांदेड जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील वर्षाखालील बालकांना एकूण लाख 99 हजार 698 पोलिओ डोस पाजण्यात येणार आहे. आज या पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचे उद्घाटन मुदखेड तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रमुगट येथे जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. नीना बोराडे यांच्या हस्ते बालकास पोलिओचा डोस पाजून संपन्न झाले.

 

यावेळी गटविकास अधिकारी श्रीकांत बळदेतालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजेभाऊ बुट्टेसहा. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सत्यनारायण मुरमुरेप्रा.आ.कें. वैद्यकीय अधिकारी डॉ. कासराळीकरजिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी सुभाष खाकरेविस्तार अधिकारी लतीफ पठाणसिकलसेल समन्वयक दिपाली इंगोलेवैद्यकीय अधिकारी डॉ. मोरे व इतर प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी उपस्थित होते.

 

या मोहिमेसाठी जिल्ह्यातील संपूर्ण ग्रामीण व शहरी भाग तसेच महानगरपालिका क्षेत्रातही लस वर्षापर्यतच्या बालकांना देण्यात आली. पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेच्या अनुषंगाने राज्य नोडेल ऑफिसर तथा सह संचालक डॉ. रेखा गायकवाड या नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांनी अनेक बुथला भेट देवून पाहणी केली आहे. या मोहिमेत ग्रामीण भागातून हजार 236 शहरी भागातून 255 तर महानगरपालिका भागात 276 असे एकूण हजार 767 बूथ उपलब्ध करून दिले आहेत. या मोहिमेसाठी जिल्ह्यात एकूण हजार 265 कर्मचारी कार्यरत असून 25 हजार 862 लसीचे व्हायल उपलब्ध करून दिले आहेत अशी माहिती आरोग्य विभागाने प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.

0000












  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर करण्यात आली असून उर्वरित याद्या लवकरच...