Monday, March 13, 2023

वृत्त क्रमांक 120

 महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा

पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

नांदेड (जिमाका) दि. 13 :- महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा पुरस्कार सन 2022-23 या वर्षासाठी वैयक्तीक व संस्थेसाठी असे एकूण दोन पुरस्कार देण्यात येणार आहे. या दोन पुरस्कारांसाठी इच्छूक व्यक्ती व संस्थांनी विहित नमुन्यातील प्रस्ताव बुधवार 15 मार्च 2023 पर्यंत सहाय्यक आयुक्त समाज कल्याणनांदेड यांच्याकडे विहित नमुन्यात परिपूर्ण प्रस्ताव चारित्र्य प्रमाणपत्रासह सादर करावेतअसे आवाहन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नांदेड यांनी केले आहे.

 

महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा पुरस्काराची नियमावली 8 मार्च 2019 रोजीच्या  शासन निर्णयात देण्यात आली आहे. यानुसार वीरशैव-लिंगायत समाजासाठी सामाजिककलात्मकसमाज संघटनात्मकअध्यात्मिक प्रबोधनसाहित्यिक क्षेत्रात काम करत असलेले व्यक्तीसंस्थेच्या कामाची दाद/दखल घेऊन त्यातून इतरांना प्रेरणा मिळावी यासाठी हा पुरस्कार दिला जातो. समाजातील समाजसेवककलावंतसमाज संघटनात्मक कार्यकर्तेआध्यात्मिक प्रबोधनकारसाहित्यिकांनी पुढे यावेत या उद्देशाने हा पुरस्कार व्यक्ती व सामाजिक संस्थेसाठी प्रत्येकी एक याप्रमाणे एकुण दोन पुरस्कार देण्यात येणार आहेत. नियमावली बाबत 8 मार्च 2019 रोजीचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध असून त्याचा संकेतांक क्रमांक 201903082039003522 असा आहेअसेही सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नांदेड यांनी प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.

000000 

वृत्त क्रमांक 119

 किनवट तालुक्यातील त्या नैराश्यग्रस्त शेतकऱ्यांमध्ये 

जिल्हाधिकारी यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन जागविला आत्मविश्वास

 

नांदेड (जिमाका) दि. 13 :- किनवट तालुक्यातील आदिवासी बहुल भागात असंख्यजणांची उपजिविका उपलब्ध असलेली शेती व पशुधनावर अवलंबून आहे. यात आदिवासीसह बंजारा व त्यातल्या त्यात मथुरा लभान सारख्या अत्यल्प संख्या असलेलाही समाज आहे. ग्रामीण भागातील  महिलांच्या आरोग्याचे प्रश्न अधिक गंभीर व याचबरोबर शेतकऱ्यांचाही नैराश्याचा कल अधिक असल्याने जिल्हाधिकारी अभिजीत राउत यांनी थेट गावांना भेटी देऊन शेतकरी, समाज प्रमुखांशी चर्चा सुरु केल्या आहेत. त्यांनी नुकतीच करंजी गावाला भेट दिली. येथील महंत भागचंद मशन महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेऊन तिथेच त्यांचा इतर वरिष्ठ धर्मगुरू समक्ष ग्राम बैठक घेतली. दुपारी सुरू झालेल्या या ग्रामबैठकीला गावकऱ्यांनी झाडून हजेरी दिली.

 

"शेतीची उकल सोपी व्हावी यासाठी महाराष्ट्र शासनाने अनेक नानाविविध योजना हाती घेतल्या आहेत. शेतीपूरक उद्योगावर भर दिला आहे. नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पात विशेष तरतुदी करण्यात आल्या आहेत. आता केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान योजनेसमवेत महाराष्ट्र शासनाने आणखी 6 हजार रुपयाची भर घातली आहे. वर्षाला 12 हजार रुपये ही सरळ मदत मिळणार असून आम्ही तुमच्य खंबीरपाठीशी आहोत.  याचबरोबर या परिसरात महिलांच्या आरोग्याच्यादृष्टीने विशेष लक्ष ही प्रशासनातर्फे दिले जात आहे. कली उमलतांना या नाविन्यपूर्ण मोहिमेंचाही आपण शुभारंभ केला असून मथुरा लभान समाज व इतर समाजातील व्यक्तीने अधिक सकारात्मक लोकसहभाग शासनाच्या या  योजनेत घ्यावा."

- जिल्हाधिकारी अभिजित राऊत

******

Saturday, March 11, 2023

वृत्त क्रमांक 118

 शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयात

ब्रेस्ट क्लिनिक-ओपीडीचे उद्घाटन

 

नांदेड (जिमाका) दि. 11 :- राज्याचे वैद्यकिय शिक्षण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या संकल्पनेतून राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण विभागातर्फे विविध व्याधींचे प्रतिबंधात्मक उपाय व उपचार याबाबत जनजागृती अभियानांतर्गत जागतिक महिला दिनानिमित्त स्तनकर्करोग जनजागृती व उपचार अभियान राबविण्यात येत आहे. त्याअनुषंगाने शासकीय आयुर्वेदिक रुग्णालय नांदेड येथे शल्यतंत्र विभागाअंतर्गत ब्रेस्ट क्लिनिक-ओपीडीचे उद्घाटन महाविद्यालयाचे अधिष्ठात डॉ. वाय. आर. पाटील यांच्या हस्ते आज करण्यात आले. यावेळी रुग्णालयाच्या निवासी वैद्यकिय अधिकारी डॉ. मंजुषा पाटील, महाविद्यालय व रुग्णालयातील अध्यापक पदवी व पदव्युत्तर विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

या ओपीडीचा स्तनकर्करोग जनजागृती व उपचारासाठी निश्चित मोठा लाभ होईल असा सिवश्वास अधिष्ठाता डॉ. वाय. आर. पाटील यांनी व्यक्त केला. या ओपीडीचा लाभ जास्तीत जास्त रुग्णांनी देऊन महिलांमध्ये स्तनकर्करोगाबद्दल जनजागृती निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करावेत व विविध ठिकाणी शिबरे आयोजित करून स्तनकर्करोगाविषयी माहिती देण्याचे आवाहन त्यांनी केले. या अभियानासाठी डॉ. गंगाधर इंगळे यांच्याकडे समन्वयक म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार डॉ. राजेंद्र सोनेकर यांनी केले.

000000

वृत्त क्रमांक 117

अन्न व औषध प्रशासन मंत्री

संजय राठोड यांचा दौरा

 

नांदेड (जिमाका) दि. 11 :- राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड हे नांदेड जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहिल.

 

रविवार 12 मार्च 2023 रोजी यवतमाळ येथून वाहनाने सकाळी 11 वा. किनवट तालुक्यातील बोथ (तांडा) येथे आगमन व राखीव. दुपारी 2 वा. बोथ (तांडा) येथून शासकीय विश्रामगृह दिग्रस जि. यवतमाळकडे प्रयाण करतील.

00000  

 स्त्री समानतेच्या दृष्टीने मानसिकता बदलणे आवश्यक

-  डॉ. गोरक्ष गर्जे

 

नांदेड (जिमाका) दि. 11 :- समाजात रूढ झालेल्या अनिष्ट गोष्टीस्त्री प्रतिष्ठा कमी करणाऱ्या बाबी संपवून विशेषतः स्त्री समानतेच्या दृष्टीने मानसिकता बदलणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन शासकीय तंत्रनिकेतनचे  प्राचार्य डॉ. गोरक्ष गर्जे यांनी केले. शासकीय तंत्रनिकेतन नांदेड येथे दरवर्षीप्रमाणे जागतिक महिला दिवस नुकताच आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात ते बोलत होते.   

 

महिलांसह मुलींचापण सन्मान केला पाहिजे. त्यांचीप्रती प्रतिष्ठा जपणेआदर बाळगणे यासाठी अशा विविध  कार्यक्रमात सर्वांचा सहभाग असणे आवश्यक आहे. निर्णय घेतांना महिलांच्या मताला महत्त्व दिले पाहिजे. महिलांचे नेतृत्व मान्य केले पाहिजे. इतकेच नाही तर विद्यार्थ्यांना महिला सशक्तीकरणाची माहिती दिली पाहिजेअसे सांगून प्राचार्य श्री. गर्जे यांनी नोकरीत असणाऱ्या स्त्रियांच्या कार्याचा आपण गौरव करतो तसे गृहणी म्हणून काम करणाऱ्या स्त्रीयांच्या कामाचा आदर केला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

 

प्रास्ताविकात महिला तक्रार निवारण समितीचे अध्यक्ष  डॉ. अनघा अरविंद जोशी यांनी  स्त्रीवर स्वरचित केलेली कविता सादर केली. संस्थेत कार्यरत असणाऱ्या अधिकारी-कर्मचारी महिलांचा यावेळी गौरव करण्यात आला.  विविध नामांकित संस्थांमध्ये  नोकरीसाठी निवड झालेल्या तृतीय  वर्षातील विद्यार्थीनींचे  यावेळी स्वागत करण्यात आले.  

 

कु. पल्लवी रेखावार या विद्यार्थींनीने एक स्त्री महिमा सांगणारे गीत सादर केले. कु. कस्तुरे गौरी व कु. अवंतिका गरड या दोघींनी महिला दिनाबाबत आपले मनोगत व्यक्त केले. माहिती तंत्रज्ञान तृतीय वर्षाच्या विद्यार्थीनीने एक छोटे पथनाट्य सादर केले. सुत्रसंचालन कु. शिवाताई जटाळकर या विद्यार्थीनीने केले तर आभार डॉ. जोशी यांनी मानले. यावेळी उपप्राचार्य पी. डी. पोफळेरजिस्टर  श्रीमती ए. व्ही. कदमविभाग प्रमुख एस. पी. कुलकर्णी, एस. एम. कंधारे,.बी. व्ही. यादवएस. एम. डुमणेयु. बी. उश्केवार,  ए. एन. यादवएस. आर. मुधोळकरडॉ. डी. जी. कोल्हटकरडॉ. एस. एस. चौधरीश्रीमती ए. ए. सायरश्रीमती खेडकरश्रीमती दुटाळश्रीमती गलांडेश्रीमती जाधवश्रीमती वाघमारे यांच्यासह  विद्यार्थ्यांची उपस्थित होती.

000000



Friday, March 10, 2023

 ग्रामीण महिलांच्या स्वयंरोजगारासाठी

विद्यापीठ व जिल्हा प्रशासन समन्वयातून व्यापक चळवळ निर्माण करू

-  जिल्हाधिकारी अभिजीत राऊत


▪️कृषी व महिला उद्योजकता नाविन्यता परिषद संपन्न 

 

नांदेड (जिमाका) दि. 10 :- नांदेड जिल्ह्यातील प्रत्येक तालुका हा कृषि उत्पादनाच्या दृष्टीने वैविध्यपूर्ण आहे. शेती उत्पादनातील विविधता व उत्पादने लक्षात घेता शेतीपूरक उद्योग व विशेषत: महिलाबचगटांना यात मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी आहेत. शासनाच्या विविध योजनेंतर्गत महिला बचतगटांनी बाजारपेठेच्या तोलामोलाची उत्पादने तयार केली असून त्यांना आता ब्राँडिग, पॅकेजिंग, वितरणप्रणाली याबाबत मार्गदशनाची गरज आहे. यासाठी इन्क्युबेशन सेंटरमधील तज्ज्ञ,  कृषि विभाग, जिल्हा कौशल्य विकास व रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि इतर विभागाने यावर अधिक भर द्यावा, असे निर्देश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले.

 

जागतिक महिला दिनानिमित्त इन्क्युबेशन सेंटर, स्वामी रामानंद तिर्थ मराठवाडा विद्यापीठ, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालय व जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी व महिला उद्योजकता नाविन्यता परिषदेचे आयोजन आज स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथे करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

 

यावेळी कुलगुरू डॉ. उद्धव भोसले, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे, उद्योजकता केंद्राच्या सहाय्यक आयुक्त रेणुका तम्मलवार, जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालकल्याण) रेखा काळम, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अश्विनी जगताप, माविमचे जिल्हा समन्वयक चंदनसिंह राठोड, संसाधन व्यक्ती (सेबी) चे ऋषिकेश कोंडेकर, लक्ष्मीकांत माळोदकर, समाजशास्त्र संकुलाचे प्रमुख प्रमोद लोणारकर, गजानन पातेवार, अशोक सुर्यवंशी आदींची उपस्थिती होती.


महिलांनी आत्मविश्वासाने उद्योग व्यवसायाकडे वळावे

- कुलगुरू डॉ. उद्धव भोसले


ग्रामीण भागातील जास्तीत जास्त महिलांनी आत्मविश्वासाने उद्योग व्यवसायाकडे वळले पाहिजे. विद्यापीठ त्यांना सर्वोतोपरी मदत करण्यासाठी तत्पर असून सर्व विभागाच्या सहाय्याने एक चांगले कार्य यातून निर्माण होईल, असा विश्वास कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांनी व्यक्त केला. जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे यांनी कृषी क्षेत्रातील संधीबाबत माहिती दिली.

 

सहाय्यक आयुक्त रेणुका तम्मलवार यांनी महिला सक्षमीकरणाविषयी आपले मत मांडून महिलांना पुढील वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या. महिलांना येणाऱ्या अडचणी दूर करून त्यांना आवश्यक बळ दिले पाहिजे, असे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अश्विनी जगताप यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते ऋषिकेश कोंडेकर यांनी उत्पादनाची प्रसिद्धी व विक्री कौशल्याविषयी तर लक्ष्मीकांत माळवदकर यांनी उद्योग विषयातील पायऱ्या या विषयावर माहिती दिली. त्यांनतर महिलांसाठी मनोरंजनात्मक कार्यक्रम घेवून बक्षीस वितरीत करण्यात आले व महिलांनी स्वत:चा व्यवसाय कसा करावा याबाबतची माहिती देण्यात आली.  

000000




Thursday, March 9, 2023

 जिल्हा रुग्णालयात जागतिक महिला दिन साजरा

नांदेड (जिमाका) दि. 8 :-  आज स्त्री ही केवळ डॉक्टरइंजिनीअर या क्षेत्रापूर्तीच मर्यादित  नसून देशाची प्रथम नागरिक राष्ट्रपती या पदावर महिलांनी आपले कतृत्व  सिद्ध करून दाखविलेले आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्री ही पुरुषाच्या बरोबरीने काम करू लागलेली असून देशाच्या प्रगतीसाठी तिचे  खूप मोठे योगदान असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी सांगितले. आज जिल्हा रुग्णालयात जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

प्रत्येक  पुरुषांच्या प्रगती मागे एका स्त्रीचा हात असतो असे अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक  डॉ. संतोष  सिरसीकर यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन करताना सांगितले. नोडल अधिकारी डॉ. हनुमंत पाटील यांनी देशातील स्त्रियांच्या प्रगतीमागे सावित्रीबाई फुले यांचे खूप मोठे योगदान असून  त्यांनी  स्त्रियांसाठी शैक्षेणिक क्षेत्रामध्ये केलेली कामगिरी ही उल्लेखनिय आहे. त्यांच्यामुळेच आज भारत देशातील स्त्री ही साक्षर झाली व  पुरुषांच्या बरोबरीने काम करू लागली. या कार्यक्रमास डॉ. एन अन्सारीडॉ. रोशनारा तडवीडॉ. अर्चना बजाजप्राचार्य द्वारकादास मेडमेट्रन सुरेखा जाधव व वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती विद्या बापटे यांनी केली.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. उमेश मुंडेसुवर्णकार सदाशिव यांनी परिश्रम घेतले.  बालाजी गायकवाड यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले व आभार प्रदर्शन आर. एम. ओ. डॉ. एच के साखरे यांनी केले.

 0000



  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर करण्यात आली असून उर्वरित याद्या लवकरच...