Friday, June 24, 2022

 भ्रष्ट कामकाजाबाबत पुराव्यासह

निवेदने सादर करण्याचे आवाहन

 

नांदेड (जिमाका) दि. 24 :-भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्यावतीने नांदेड जिल्ह्यातील सरकारी किंवा निमसरकारी कार्यालयातील भ्रष्ट कामकाजाचे निवारण करण्यासाठी मंगळवार 28 जुन 2022 रोजी सकाळी 10.30 वा. जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात लेखी निवेदने / तक्रारी सादर करता येतील.

 

इच्छुक नागरिकांनी आपली निवेदने अध्यक्ष, जिल्हास्तरीय भ्रष्टाचार निर्मूलन समिती समोर लेखी स्वरूपात सादर करावीत. तसेच आपल्याकडे काही सबळ पुरावे असल्यास त्याच्या  दोन प्रती सोबत असणे आवश्यक आहे. या बैठकीला शासनाचे सर्व विभाग प्रमुख उपस्थित राहणार असल्यामुळे  आपल्या निवेदनाची तातडीने दखल घेण्यात येईल व नियमानुसार भ्रष्टाचार करणाऱ्यास अथवा भ्रष्टाचारास वाव देणाऱ्या जबाबदार अधिकारी व कर्मचारी यांच्या विरूद्ध कार्यवाही करण्यात येईलअसे निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी यांनी सांगितले आहे.

000000

 राष्ट्रीय परवाना प्राधिकारचे शुल्क व संयुक्त शुल्क आता ऑनलाईन  

नांदेड (जिमाका) दि. 24 :- नांदेड जिल्ह्यातील सर्व चालकमालक व वाहतूक संघटना यांनी राष्ट्रीय परवाना प्राधिकाराचे शुल्क व संयुक्त शुल्क www.parivahan.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन भरावे, असे आवाहन नांदेड प्रादेशिक परिवहन कार्यालयाने आहे.

 

अर्जदाराला प्राधिकारपत्रासाठी 1 हजार रुपये शुल्क भरल्यानंतर ते स्वयंचित पद्धतीने मान्य झाल्यानंतर अर्जदारांनी 16 हजार 500 रुपये संयुक्त शुल्क भरण्यासाठी दुरध्वनी संदेश पाठविल्यानंतर ते ऑनलाईन भरता येणार आहेत. यानंतर अर्जदारांना प्राधिकारपत्राची संगणकावर प्रत काढुन सर्व नोंदणी प्राधिकरणांनी ई-स्वाक्षरी केलेले प्राधिकारपत्र ग्राह्य धरण्यात येईल, याची सर्वानी नोंद घ्यावी असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत यांनी केले आहे.

000000

Thursday, June 23, 2022

 नांदेड जिल्ह्यात अकरा व्यक्ती कोरोना बाधित   

नांदेड (जिमाका) दि. 23 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या  257 अहवालापैकी आरटीपीसीआर तपासणीद्वारे 8 व ॲटीजन तपासणीद्वारे 3 अहवाल असे एकूण 11 कोरोना बाधित आले आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 1 लाख 2 हजार 842 एवढी झाली असून यातील 1 लाख 129 रुग्णांना उपचारा नंतर बरे झाल्याने रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. आजच्या घडीला 21 रुग्ण उपचार घेत आहेत.

 

जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत सहभाग घ्यावा. याचबरोबर मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 692 एवढी आहे. नांदेड जिल्ह्यातील तालुक्यातर्गत गृहविलगीकरणातील एका रुग्णाला उपचारानंतर बरे झाल्याने सुट्टी देण्यात आली. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 5कंधार 1, किनवट 1, यवतमाळ 1 व ॲटीजन तपासणीद्वारे नांदेड मनपा 2, धर्माबाद 1 असे एकुण 11 कोरोना बाधित आढळले आहेत. नांदेड जिल्ह्यातील तालुक्याअंतर्गत गृह विलगीकरण 6, नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरणात 15 असे एकुण 21 व्यक्ती उपचार घेत आहेत.

 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

 

एकुण घेतलेले स्वॅब- 9 लाख 6 हजार 890

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 7 लाख 86 हजार 834

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 1 लाख 2 हजार 842

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 1 लाख 129

एकुण मृत्यू संख्या-2 हजार 692

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.37 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-8

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-1

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-21

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-निरंक.


कोविड विषाणू विरुद्धची लस सुरक्षित असून कोरोनाची लाट पुनः येण्यापासून प्रतिबंध करण्यासाठी कोविड-19 लसीकरण दिर्घकाळ आणि प्रभावी उपाय आहे. मिशन कवच कुंडल अंतर्गत 18 वर्षावरील सर्व व्यक्तींनी कोविड लसीकरण करून घ्यावे आणि इतरांनाही लस घेण्यासाठी प्रोत्साहित करावे. ज्या नागरिकांनी कोविडच्या पहिल्या लसीचा डोस घेतला आहे त्यांनी ठराविक कालावधी नंतर दुसऱ्या लसीचा डोस आवश्य घ्यावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

0000

 गटई लाभार्थ्यांना लोखंडी पत्र्याचे स्टॅाल वाटप

योजनेत 8 जुलै पर्यत अर्ज करण्याचे आवाहन

नांदेड (जिमाका) दि. 23:- शासन निर्णय 13 फेब्रुवारी 2008 अन्वये अनुसूचित जातीतील अनु. क्र. 11 या प्रवर्गातील गटई लाभार्थ्यांना लोखंडी पत्र्याचे स्टॉल (100 टक्के) अनुदानावर वाटप योजनेअंतर्गत नांदेड जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांनी (यापुर्वी लाभ देण्यात आलेले लाभार्थी वगळुन) आपले अर्ज सहाय्यक आयुक्तसमाज कल्याणडॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनग्यानमाता शाळे समोरनांदेड या कार्यालयात 8 जुलै 2022 पर्यंत अर्ज स्वत: स्वसाक्षाकींत करुन सादर करावेअसे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त तेजस माळवदकर यांनी केले आहे.

अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे पुढील प्रमाणे आहेत. अर्जदाराचा स्वत:चा प्राधिकृत अधिकाऱ्याने दिलेला जातीचा दाखला. चालु आर्थिक वर्षातील उत्पन्नाचा दाखला (तहसिलदाराने निर्गमित केलेला). अर्जदाराचे अथवा कुटूबांचे रेशनकार्ड (सांक्षाकित प्रत). गटई कामाचे प्रमाणपत्र / अस्वच्छ व्यवसाय प्रमाणपत्र (ग्रामसेवक / तहसिलदार / मुख्याधिकारीनगर परिषद क्षेत्र) यांनी निर्गमित केलेले प्रमाणपत्र. जागा नाहरकत प्रमाणपत्र (ग्रामसेवक / तहसिलदार / मुख्याधिकारीनगर परिषद क्षेत्र) यांनी निर्गमित केलेले प्रमाणपत्र. आधार कार्डमतदान कार्ड, वयाचा दाखला, (टी.सी),जागेचा दाखला (नमुना नं. 8), करारनामा (100 च्या बॉडवर).

00000

 जिल्ह्यात गत 24 तासात सरासरी 6.8 मि.मी. पाऊस 

नांदेड (जिमाका) दि. 22:- जिल्ह्यात गुरुवार 23 जून  रोजी सकाळी  10 वा. संपलेल्या गत 24 तासात सरासरी 6.8 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून जिल्ह्यात एकुण 94.3 मिलीमीटर पाऊस झाला आहे. 


जिल्ह्यात गुरुवार 23 जून रोजी सकाळी 10 वा. संपलेल्या गत 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये तालुकानिहाय पुढील प्रमाणे, कंसात एकूण पाऊस : नांदेड- 17.2 (100.5), बिलोली-00 (58.1), मुखेड- 5.7 (110.7), कंधार-12.8 (120.5), लोहा-6.7 (76.2), हदगाव-6.2 (80.7), भोकर- 2 (71.9), देगलूर-4.5 (132.5), किनवट- 2.1 (102.1), मुदखेड- 26 (156.7), हिमायतनगर-9 (105.3), माहूर- 0.5 (89.5), धर्माबाद- 00 (50.3), उमरी- 6.4 (107.1), अर्धापूर- 13.9 (78.4), नायगाव- 0.4 (51.8) मिलीमीटर आहे.

0000

Wednesday, June 22, 2022

 भारतीय स्टेट बँक आरसेटी येथे जागतिक योगा दिवस संपन्न 

 

नांदेड (जिमाका) दि. 20 :- भारतीय स्टेट बँक ग्रामीण स्वयं रोजगार प्रशिक्षण संस्था (आरसेटी) तथागतनगर नांदेड येथे 21 जून  रोजी जागतिक योगा दिवस साजरा करण्यात आला.

 

आरसेटीमध्ये आयोजित महिला टेलर प्रशिक्षणाच्या 30 प्रशिक्षणार्थी आणि वुशु संघटना नांदेडचे मुख्य प्रशिक्षक प्रमोद वाघमारेकौशल्य समन्वयक पंचायत समिती चे अतिष गायकवाडसंचालक आरसेटी राम भलावीविश्वास हट्टेकरसहाय्यक रुणीत अभिजित पाथरीकरसहाय्यक आरसेटी अर्धापुरकर यांची उपस्थिती होती.

 

योगा हा प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये उत्तम आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी आहे. त्यासाठी जन जागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. योगाचे महत्व आणि जास्तीत जास्त लोकांनी योगाभ्यास कडे वळावे या उद्देशाने अनेक प्रोत्साहनपर संदेश या रॅली मध्ये प्रशिक्षणार्थ्यांच्या माध्यमातून देण्यात आले. मान्यवरांनी मानवी जीवनामध्ये योगाचे महत्व विशद करून योगामध्ये समाविष्ट कृतींचे विश्लेषण करून त्याचे फायदे प्रशिक्षणार्थ्यांना सांगितले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आरसेटी कर्मचारी मारोती कांबळे यांनी परिश्रम घेतले.

0000

 नांदेड जिल्ह्यात तीन व्यक्ती कोरोना बाधित   

नांदेड (जिमाका) दि. 22 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या  293 अहवालापैकी आरटीपीसीआर तपासणीद्वारे 3 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 1 लाख 2 हजार 831 एवढी झाली असून यातील 1 लाख 128 रुग्णांना उपचारा नंतर बरे झाल्याने रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. आजच्या घडीला 11 रुग्ण उपचार घेत आहेत.

 

जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत सहभाग घ्यावा. याचबरोबर मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 692 एवढी आहे. नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरणातील एका रुग्णाला उपचारानंतर बरे झाल्याने सुट्टी देण्यात आली. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 2यवतमाळ 1 असे एकुण 3 कोरोना बाधित आढळले आहेत. नांदेड जिल्ह्यातील तालुक्याअंतर्गत गृह विलगीकरण 4, नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरणात 7 असे एकुण 11 व्यक्ती उपचार घेत आहेत.

 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

 

एकुण घेतलेले स्वॅब- 9 लाख 6 हजार 633

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 7 लाख 86 हजार 497

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 1 लाख 2 हजार 831

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 1 लाख 128

एकुण मृत्यू संख्या-2 हजार 692

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.37 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-निरंक

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-निरंक

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-11

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-निरंक.

 

 कोविड विषाणू विरुद्धची लस सुरक्षित असून कोरोनाची लाट पुनः येण्यापासून प्रतिबंध करण्यासाठी कोविड-19 लसीकरण दिर्घकाळ आणि प्रभावी उपाय आहे. मिशन कवच कुंडल अंतर्गत 18 वर्षावरील सर्व व्यक्तींनी कोविड लसीकरण करून घ्यावे आणि इतरांनाही लस घेण्यासाठी प्रोत्साहित करावे. ज्या नागरिकांनी कोविडच्या पहिल्या लसीचा डोस घेतला आहे त्यांनी ठराविक कालावधी नंतर दुसऱ्या लसीचा डोस आवश्य घ्यावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

0000

  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर करण्यात आली असून उर्वरित याद्या लवकरच...