Sunday, November 15, 2020

 

प्रतिबंधीत क्षेत्राबाहेरील धार्मिक स्थळे

आणि प्रार्थना स्थळे खुली करतांना ही आहे नियमावली  

जिल्हदंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांचे आदेश

नांदेड (जिमाका) दि. 15 :- नांदेड जिल्‍ह्यातील प्रतिबंधीत क्षेत्राबाहेरील धार्मिक स्थळे आणि प्रार्थना स्थळे सोमवार 16 नोव्हेंबर 2020 पासून खुली करण्यासाठी परिशिष्ट- 1 मध्ये नमुद मानक कार्यप्रणाली व मार्गदर्शक तत्वांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या अटीस अधीन राहून जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी परवानगी दिली आहे. 

प्रतिबंधीत क्षेत्राबाहेरील धार्मिक आणि प्रार्थना स्थळांच्या वेळेबाबत संबंधीत विश्वस्त, मंडळ, अधिकारी यांनी निर्णय घ्यावयाचा आहे. मास्क परिधान करणे, शारिरिक आंतराचे पालन करणे, थर्मल स्क्रिनिंग करणे आणि वारंवार हात धुणे किंवा सॅनिटायझरचा वापर करणे बंधनकारक राहील, असेही आदेशात स्पष्ट केले आहे.  

परिशिष्ट

धार्मिक स्थळे, प्रार्थना स्थळे याठिकाणी होणारा कोव्हीड -19 विषाणू संसर्ग रोखण्यासाठीच्या

मानक कार्यप्रणाली / मार्गदर्शक सूचना

पार्श्वभमि

धार्मिक स्थळे, प्रार्थना स्थळांच्या ठिकाणी मोठया संख्येने लोक एकत्र येत असतात. अशा ठिकाणी / ठिकाणांच्या आवारात कोव्हीड- 19 विषाणू संसर्ग रोखण्यासाठी योग्य सामाजिक अंतर, इतर प्रतिबंधात्मक उपाययोजना यांचे काटेकोरपणे पालन करणे महत्वाचे आहे. 

व्याप्ती

या आदेशाद्वारे धार्मिक स्थळे, प्रार्थना स्थळांच्‍या ठिकाणी सामान्‍यपणे कोव्हीड -19 विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याचे अनुषंगाने अवलंबावयाच्या इतर उपायांसह आवश्‍यक उपाययोजना सुचविण्‍यात येत आहेत. कंन्टेनमेंट झोनच्या आतील धार्मिक स्थळे, प्रार्थना स्थळे ही नागरिकांसाठी बंद राहतील. फक्त कंन्टेनमेंट झोनच्या बाहेरील धार्मिक स्थळे, प्रार्थना स्थळे सुरू करणेस परवानगी असेल. 

सामान्य प्रतिबंधात्मक उपाययोजना

65 वर्षावरील जेष्ठ नागरिक, इतर आजाराने ग्रस्त व्यक्ती, गरोदर महिला आणि 10 वर्षाखालील लहान मुले यांनी घरीच राहावे. धार्मिक / प्रार्थना स्थळांचे व्यवस्थापन करणाऱ्या संस्था यांनी याबाबत नागरिकांना सूचना द्याव्यात. कोव्हीड -19 विषाणू संसर्गाचा सामान्य प्रतिबंधात्मक उपाययोजनां बरोबरच साध्या सार्वजनिक आरोग्य उपायांचेही पालन करणे आवश्यक आहे. या सर्व उपायांचे पालन सर्व धार्मिक स्थळे / प्रार्थना स्थळे या ठिकाणी सर्व कामगार, सेवेकरी, अभ्यागत, भाविक यांचेकडून पूर्णवेळ पालन करणे बंधनकारक आहे.

 

यामध्ये पुढील प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा समावेश असेल.

 

i)                   या सर्व सार्वजनिक ठिकाणी शक्यतोवर वैयक्तिक कमीत कमी 6 फूट शारिरिक अंतर राखणे आवश्यक असेल.

ii)                चेहरापट्टी / मास्क यांचा वापर करणे बंधनकारक असेल.

iii)              हात अस्वच्छ नसले तरी साबणाने वारंवार हात धुणे ( किमान 40 ते 60 सेंकदापर्यत) बंधनकारक असेल. त्याचबरोबर सर्व ठिकाणी अल्कोहोल युक्त हॅण्ड सॅनिटायझरचा वापर (किमान 20 सेंकदापर्यत) करावा.

iv)               श्वसनसंबंधित शिष्टाचाराचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक असेल. यामध्ये शिंकताना किंवा खोकताना टिश्यू पेपर किंवा हातरूमाल किंवा हाताच्या कोपराने नाक तोंड पूर्णपणे झाकले जाईल याची दक्षता घेणे तसेच वापरलेला टिश्यू पेपरची योग्य त्या पध्दतीने विल्हेवाट लावणे आवश्यक आहे. 

v)                 या ठिकाणी येणाऱ्या सर्व नागरिक,कामगार,भाविक, सेवेकरी यांनी स्वत:च्या आरोग्याचे निरिक्षण करणे तसेच आजारी असलेस स्थानिक प्रशासन, जिल्हा प्रशासनास कळविणे आवश्यक आहे.

vi)               सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास पूर्णपणे प्रतिबंध असेल. तसेच याचे उल्लघंन केलेस स्थानिक प्रशासनाकडून दंडात्मक कारवाई केली जाईल.

vii)            धार्मिक स्थळे, प्रार्थना स्थळे या ठिकाणी येणाऱ्या सर्वानी आरोग्य सेतू ॲपचा वापर करावा.

 

सर्व धार्मिक स्थळे / प्रार्थना स्थळाच्या ठिकाणी पुढील प्रमाणे उपाययोजना करतील

i)                   सर्व धार्मिक स्थळे, प्रार्थना स्थळांच्या ठिकाणी प्रवेशद्वारावर हात स्वच्छतेसाठी सॅनिटायझर डिस्पेंसर तसेच थर्मल स्क्रिनिंगची सोय करणे बंधनकारक असेल.

ii)                धार्मिक, प्रार्थना स्थंळाच्या ठिकाणी फक्त लक्षणे नसलेल्या व्यक्तींनाच प्रवेश असेल.

iii)              सर्व व्यक्तींना चेहरा पट्टी, मास्कचा वापर केला असेल तरच याठिकाणी प्रवेश करण्याची परवानगी द्यावी. (No Mask - No Entry)

iv)               सर्व धार्मिक,प्रार्थना स्थळांच्या ठिकाणी कोव्हीड -19 विषाणू संसर्ग रोखण्यासाठीच्या प्रतिबंधात्मक उपायोजना पोस्टर्स च्या माध्यामातून दर्शनी भागात लावण्यात याव्यात. तसेच या ठिकाणी कोव्हीड -19 विषाणू संसर्ग रोखण्याबाबतच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना ऑडीओ व्हिडीओच्या माध्यमातून जनजागृतीसाठी वारंवार ऐकवल्या, प्रसारित केल्या जाव्यात.

v)                 धार्मिक, प्रार्थना स्थळांच्या ठिकाणी प्रवेश देणेबाबत अभ्यागत, भाविकांबाबत निश्चित धोरण ठरवावे. त्याठिकाणी निश्चित केलेल्या वेळेमध्ये किती लोकांना प्रवेश दिला जावा. याबाबतचा निर्णय धार्मिक, प्रार्थना स्थळांचा आकार, वायुविजन इत्यादी बाबी विचारात घेवून त्यास्थळांचे नियमन करणारे विश्वस्त, मंडळ, अधिकारी यांनी स्थानिक प्रशासनाशी चर्चा करून करावे.

vi)               पादत्राणे स्वत:च्या गाडीतच ठेवणेबाबत भाविकांना प्रवृत्त करावे. गरज असेल तर भाविकांनी वैयक्तिक, कुटुंबांची पादत्राणे एकत्र नेमून दिलेल्या ठिकाणी ठेवावीत.

vii)            वाहन पार्किगच्या ठिकाणी तसेच परिसराबाहेर सामाजिक अंतराच्या निकषाचे पालन करून गर्दीचे योग्य व्यवस्थापन करणेत यावे.

viii)          धार्मिक, प्रार्थना स्थळांच्या परिसरातील तसेच आवारा बाहेरील सर्व दुकाने, स्टॉल, कॅफेटेरिया या ठिकाणी पूर्णवेळे सामाजिक अंतराचे पालन करणे बंधनकारक असेल.

ix)               धार्मिक, प्रार्थना स्थंळाच्या परिसरामध्ये भाविकांच्या रांगांचे योग्य व्यवस्थापन करणे आणि योग्य सामाजिक अंतराचे पालन करणेसाठी योग्य मार्किग करावे.

x)                 भाविक, अभ्यागतासांठी धार्मिक / प्रार्थना स्थळांच्या परिसरामध्ये प्रवेश बाहेर जाणाऱ्या मार्गाची वेगळयाने व्यवस्था करणे.

xi)               धार्मिक, प्रार्थना स्थळांच्या परिसरातील भाविकांच्या, अभ्यागातांच्या प्रवेशासाठीच्या रांगामध्ये किमान 6 फुटाचे शारिरिक अंतर राखले जाईल याची दक्षता घेणे. यासाठी धार्मिक, प्रार्थना स्थळांचे व्यवस्थापन करणारी संस्था जबाबदार असेल.

xii)            धार्मिक, प्रार्थना स्थळांच्या ठिकाणी येणाऱ्या सर्व नागरिकांनी प्रवेश करण्याअगोदर हात पाय साबण पाण्याने धुवावेत.

xiii)          धार्मिक, प्रार्थना स्थळांच्या ठिकाणी अभ्यागत, भाविकांना बसण्याची व्यवस्था करत असताना योग्य सामाजिक अंतर राखावे. वातानुकुल यंत्र, वायुविजनसाठी CPWD च्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करणेत यावे.  वातानुकुलित यंत्रणांचे तापमान 240 C ते 300 C पर्यत राखले जाईल तसेच सापेक्ष आर्द्रता 40-70 टक्के पर्यत असेल. शक्यतोवर पुरेसी ताजी हवा, क्रॉस व्हेन्टीलेशन याची पुरेसी व्यवस्था करावी.

xiv)           पुतळे, मुर्ती, पवित्र ग्रंथ यांना स्पर्श करण्यास परवानगी असणार नाही.

xv)             धार्मिक, प्रार्थना स्थळांच्या ठिकाणी मोठया प्रमाणात गर्दी करणेस परवानगी असणार नाही.

xvi)           रोगाचा प्रादुर्भाव रोखण्‍याचे दृष्‍टीने एकत्रितपणे गायले जाणारे भजन आरत्‍या शक्‍यतो टाळाव्‍यात त्‍याऐवजी त्या ठिकाणी रेकॉर्डींग केलेले भक्ति संगीत, गाणी यांचा वापर करावा.  

xvii)        एकमेकांना अभिवादन करताना शारिरिक संपर्क टाळणेत यावा.

xviii)      धार्मिक प्रार्थनेसाठी एकत्रित येवून एकच चटई, अंथरूणचा वापर करणेस परवानगी नाही. भाविकांनी त्यांची स्वतंत्र चटई किंवा अंथरूण आणावा जो कि प्रार्थनेनंतर ते परत घेवून जातील.

xix)           धार्मिक, प्रार्थना स्थळांच्या आत मध्ये प्रसाद वितरण किंवा पवित्र पाणी शिंपडणे इत्यादी सारख्या शारिरिक अर्पणांना परवानगी असणार नाही.

xx)             धार्मिक, प्रार्थना स्थळांच्या ठिकाणी असलेले कम्युनिटी किचन, लंगर, अन्नदान, अन्नछत्र इत्यादी ठिकाणी अन्न तयार करताना वितरण करताना योग्य शारिरिक अंतर राखावे.

xxi)           धार्मिक, प्रार्थना स्थळांच्या ठिकाणी प्रभावी स्वच्छता निर्जतुकीकरण करावे. विशेषत: शौचालय, हात-पाय धुण्याचे ठिकाण इत्यादी ठिकाणी स्वच्छतेबाबत विशेष लक्ष दिले जावे.

xxii)        धार्मिक, प्रार्थना स्थळांच्या व्यवस्थापकाव्दारे या परिसरामध्ये वारंवार साफसफाई निर्जतुकीकरण केले जावे.

xxiii)      धार्मिक, प्रार्थना स्थळांच्या परिसरातील इमारतीतील जमिन, फरशी इतर आवारात वारंवार स्वच्छता केली जावी.

xxiv)       अभ्यागत, भाविक, सेवेकरी, कर्मचारी यांनी वापरलेले मास्क, चेहरा पट्टी, हातमोजे यांची योग्य विल्हेवाट लावण्‍याची व्‍यवस्‍था असावी.

xxv)         धार्मिक, प्रार्थना स्थळांच्या ठिकाणी काम करणारे कर्मचारी, सेवेकरी यांना कोव्हीड -19 सुरक्षा प्रोटोकॉल गरजेचा आहे. त्‍याचबरोबर कामावर रूजु होण्‍यापुर्वी व आठवडयातून एकदा कोव्हीड -19 चाचणी करणे आवश्यक असेल.

xxvi)       भोजनालय व शौचालयाच्या ठिकाणी जमावाचे नियंत्रण करणे आवश्यक असेल.

xxvii)    प्रत्येक धार्मिक, प्रार्थना स्थळांच्या ठिकाणी येणाऱ्या व्यक्तींची संख्या, जागा आणि सामाजिक अंतराचा प्रोटोकॉल पाळला जाईल याबाबत संबंधीत पोलिस अधिक्षक, जिल्हाधिकारी यांना हमीपत्र देणे बंधनकारक असेल.

xxviii)  आवारात बाधित किंवा संशयित रुग्ण आढळल्यास त्याबाबत खालीलपमाणे कार्यवाही करावी.

 

अ)   आजारी व्यक्तीला इतरापासून दूर असे स्वंतत्र खोलीत किंवा जागेत ठेवावे.

ब)    डॉक्टरांनी तपासणी करेपर्यंत त्या व्यक्तीने मास्क, चेहरापट्टी वापर करणे बंधनकारक असेल.

क)   तात्काळ जवळच्या वैद्यकीय सुविधा (हॉस्पिटल, क्लिनिक) केंद्रात कळवावे. तसेच स्थानिक, जिल्हा मदत केंद्रास कळवावे.

ड)    नियुक्त केलेल्या सार्वजनिक आरोग्य प्राधिकरणाव्दारे (जिल्हा आरआरटी, उपचार करणारे तज्ञ) या रुग्णाबाबत जोखीम मूल्याकंन केले जाईल. त्यानुसार रुग्ण, त्याचे संपर्क आणि निर्जतुकीकरण याबाबत पुढील कार्यवाही केली जाईल.

) सदर रुग्ण कोव्हीड -19 विषाणू बाधित (पॉझिटिव्ह) आलेस सर्व परिसर निर्जतुकीकरण करण्या यावा. 

यापुर्वी कोविड-19 व्‍यवस्‍थापनासाठी विहित केलेले शारिरिक अंतराचे व संसर्ग न पसरण्याबाबत वेळोवेळी देण्यात आलेल्या निर्देशांचे पालन करणे बंधनकारक राहिल. या आदेशाची अंमलबजावणी करणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांनी नियमांची अंमलबजावणी काटेकोरपणे, नियमाला धरुन व मानवी दृष्‍टीकोनातून करावी. आदेशाचे पालन न करणारी कोणतीही व्‍यक्‍ती, संस्‍था अथवा समुह हे साथरोग प्रतिबंधक कायदा 1897 व आपत्‍ती व्‍यवस्‍थापन अधिनियम 2005 आणि भारतीय दंड संहिता 188 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्‍यात येईल व कारवाई करण्‍यात येईल. या आदेशाची अंमलबजावणी करीत असताना सद्हेतुन केलेल्‍या कृत्‍यासाठी कुठल्याही अधिकारी व कर्मचाऱ्यांविरुद्ध कुठल्‍याही प्रकारची कायदेशीर कारवाई अथवा खटला दाखल करता येणार नाही, असेही आदेशात म्हटले आहे.  

00000

Saturday, November 14, 2020

 

 34  बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी

29 कोरोना बाधितांची भर  तर एकाचा मृत्यू   

नांदेड (जिमाका) दि. 14 :- शनिवार 14 नोव्हेंबर 2020 रोजी सायं. 5 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात 34 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर 29 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 4 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 25 बाधित आले. 

आजच्या एकुण 1 हजार 233 अहवालापैकी  1 हजार 183 अहवाल निगेटिव्ह आले.  जिल्ह्यात एकुण  बाधितांची संख्या आता  19 हजार 624 एवढी झाली असून यातील  18  हजार 660 बाधिताना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 249 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 15 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे. 

आज रोजी प्राप्त अहवालानुसार एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.  शनिवार 14 नोव्हेंबर 2020 रोजी मुखेड तालुक्यातील येवती येथील 23 वर्षाच्या एका पुरुषाचा जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बाधित मृत रुग्णांची एकूण संख्या 539 झाली आहे. 

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 4, खाजगी रुग्णालय 5, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 9, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 14, मुदखेड तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 2 असे एकूण 34 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे.  उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 97.32 टक्के आहे. 

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्रात 4 बाधित आढळले. तर अँटिजेन तपासणीद्वारे  नांदेड मनपा क्षेत्र 15, देगलूर तालुक्यात 2, किनवट 1, उमरी 1, नांदेड ग्रामीण 2, हदगाव 2, नायगाव 1, मुखेड 1 एकुण 25 बाधित आढळले. 

जिल्ह्यात 249 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 32, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल  नांदेड येथे 25, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल  नांदेड (नवी इमारत) येथे 14, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 86, मुखेड कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण 8, किनवट कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण 8, देगलूर कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण 12, हदगाव कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण 6, लोहा कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण 1, बिलोली कोविड केअर सेंटर व गृह विलगीकरण 1, भोकर कोविड केअर सेंटर व गृह विलगीकरण 14, अर्धापूर तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 8, धर्माबाद तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 4, कंधार तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 3, खाजगी रुग्णालय 23, औरंगाबाद येथे संदर्भित 2, अकोला येथे संदर्भित 1, हैदराबाद येथे संदर्भित 1 आहेत.  

शनिवार 14 नोव्हेंबर 2020 रोजी 5.30 वा. सद्यस्थित रुग्णालयात उपलब्ध खाटांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे 165, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे 81 एवढी आहे. 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती

एकुण घेतलेले स्वॅब- 1 लाख 27 हजार 264

निगेटिव्ह स्वॅब- 1 लाख 4 हजार 167

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 19 हजार 624

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 18 हजार 660

एकूण मृत्यू संख्या- 539

उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 97.32 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-निरंक

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 21

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या- 356

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 249

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले- 15. 

फटाक्यांच्या धुरामुळे कोविड बाधित  रुग्णांना व श्वसनाचा त्रास असणाऱ्या व्यक्तींना त्रास अधिक वाढवू शकतो. त्यामुळे ही दिवाळी फटाके विरहित दिवाळी म्हणून साजरी करावी. आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे. 

00000

Friday, November 13, 2020

 औरंगाबाद पदवीधर मतदारसंघ निवडणूक 2020

छाननीअंती एकूण 53 उमेदवारांपैकी 45 अर्ज वैध

तर 8 अर्ज अवैध

औरंगाबाद ,दि.13 (विमाका):- औरंगाबाद पदवीधर मतदारसंघ निवडणूक -2020 च्या अनुषंगाने  शुक्रवार, दि.13 नोव्हेंबर 2020 रोजी मतदारसंघातील एकूण 53 प्राप्त नामनिर्देशनपत्राच्या छाननी अंती 45 अर्ज वैध ठरले असून 8 अर्ज अवैध ठरविण्यात आले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त औरंगाबाद यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये दिली आहे.  

वैध ठरलेल्या उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे आहेत. 1) बोराळकर शिरीष (पक्ष : भारतीय जनता पाटी) औरंगाबाद 2) सतीश भानुदासराव चव्हाण (पक्ष: नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी) औरंगाबाद 3) अब्दुल रऊफ (पक्ष : समाजवादी पार्टी) औरंगाबाद 4) अंकुशराव शिवाजीराव पाटील (पक्ष : राष्ट्रीय मराठा पार्टी) लातूर 5) कुणाल गौतम खरात (पक्ष : ऑल इंडिया मजलिस ए इस्तेहादुल मुस्लमीन (AIMIM) औरंगाबाद 6) ढवळे सचिन राजाराम (पक्ष : प्रहार जनशक्ती पक्ष) औरंगाबाद 7) प्रा.नागोराव काशीनाथ पांचाळ (पक्ष : वंचित बहुजन आघाडी) परभणी 8) डॉ.रोहित शिवराम बोरकर (पक्ष : आम आदमी पार्टी) पुणे 9) शे.सलीम शे.इब्राहिम (पक्ष : वंचित समाज इन्साफ पार्टी) परभणी 10) सचिन अशोक निकम (पक्ष : रिपब्लिकन सेना) औरंगाबाद 11) अशोक विठ्ठल सोनवणे (पक्ष : अपक्ष ) औरंगाबाद 12) ॲड./प्रा. अश्विनकुमार पुरभाजी क्षीरसागर पाटील, कोळीकर उर्फ ' के.सागर ' (पक्ष : अपक्ष ) नांदेड 13) अक्षय नवनाथराव खेडकर (पक्ष : अपक्ष) औरंगाबाद 14) आशिष आशोक देशमुख (पक्ष : अपक्ष) बीड 15) ईश्वर आनंदराव मुंडे (पक्ष : अपक्ष) बीड 16) उत्तम बाबुराव बनसोडे (पक्ष : अपक्ष) नांदेड 17) अंभोरे शंकर भगवान (पक्ष : अपक्ष) औरंगाबाद 18) काजी तसलीम निजामोद्दीन (पक्ष : अपक्ष) उस्मानाबाद 19) कृष्णा दादाराव डोईफोडे (पक्ष : अपक्ष) औरंगाबाद 20) ॲड.गणेश नवनाथ करांडे (पक्ष : अपक्ष) बीड 21) घाडगे राणी रवींद्र (पक्ष : अपक्ष) बीड 22) जयसिंगराव गायकवाड पाटील (पक्ष : अपक्ष), औरंगाबाद 23) दिलीप हरिभाऊ घुगे (पक्ष : अपक्ष), हिंगोली 24) पोकळे रमेश शिवदास (पक्ष : अपक्ष) बीड 25) प्रवीणकुमार विष्णु पोटभरे (पक्ष : अपक्ष) बीड 26) भारत आसाराम फुलारे (पक्ष : अपक्ष) औरंगाबाद 27) ॲड. (डॉ.) यशवंत रामभाऊ कसबे (पक्ष : अपक्ष) परभणी 28) रमेश साहेबराव कदम (पक्ष : अपक्ष) नांदेड 29) राम गंगाराम आत्राम (पक्ष : अपक्ष) लातूर 30) वसंत संभाजी भालेराव (पक्ष : अपक्ष) औरंगाबाद 31) विजेंद्र राधाकृष्ण सुरासे (पक्ष : अपक्ष) जालना 32) विलास बन्सीधर तांगडे (पक्ष : अपक्ष) जालना 33) डॉ.विलास गोवर्धन जगदाळे (पक्ष : अपक्ष) औरंगाबाद 34) विवेकानंद शशीकांत उजळंबकर (पक्ष : अपक्ष) लातूर 35) विशाल उध्दव नांदरकर (पक्ष : अपक्ष) औरंगाबाद 36) ॲड.शरद बहिणाजी कांबळे (पक्ष : अपक्ष) बीड 37) ॲड.शहादेव जानू भंडारे (पक्ष : अपक्ष) बीड 38) ॲड.शिरिष मिलिंद कांबळे (पक्ष : अपक्ष) बीड 39) शेख गुलाम रसूल कठ्ठु (पक्ष : अपक्ष) औरंगाबाद 40) शेख हाज्जू हुसेन पटेल (पक्ष : अपक्ष) औरंगाबाद 41) समदानी चॉदसाब शेख (पक्ष : अपक्ष) नांदेड 42) सिध्देश्वर आत्माराम मुंडे (पक्ष : अपक्ष) बीड 43) संजय तायडे (पक्ष : अपक्ष) औरंगाबाद 44) संजय शहाजी गंभीरे (पक्ष : अपक्ष) बीड 45) संदीप बाबुराव कराळे (पक्ष : अपक्ष) नांदेड.

अवैध ठरलेल्या उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे आहेत. 1) अतुल राजेंद्र कांबळे 2) छाया सोनवणे 3) सुनील महाकुंडे 4) प्रविण घुगे 5) प्रदिप चव्हाण 6) विजयश्री बारगळ 7) बळीराम केंद्रे 8) शेख फेरोजमीया खालेद.

****


 

14 ते 21 नोव्हेंबर कालावधीत

महिला व बालविकास विभागातर्फे दत्तक सप्ताह 

नांदेड, (जिमाका) दि. 13 :-  जिल्हा महिला व बाल विकास कार्यालयांतर्गत जिल्हा बाल संरक्षण कक्षातर्फे 14 ते 21 नोव्हेंबर या कालावधीत दत्तक सप्ताह राबविण्यात येत आहे. नांदेड जिल्ह्यात उन्नतीशिल महिला मंडळ संचलित लोहा तालुक्यातील सावित्रीबाई फुले शिशुगृह लोहा व नरसाबाई महिला मंडळ संचलित शिशुगृह गितानगर आनंदनगर नांदेड या दोन विशेष दत्तक संस्थांना शासकीय मान्यता प्राप्त आहे. या शिशुगृहात शुन्य ते 6 वर्षे वयोगटातील बालक असतात. तसेच परित्याग केलेले सोडून दिलेले किंवा सापडलेले बालकांना शिशुगृहात प्रवेश दिला जातो. त्यानंतर पुढील 60 दिवसात संबंधित पालकांनी संपर्क साधला नाही तर ते मुल दत्तक देण्यासाठी कायद्याने मान्यता प्राप्त होते. इच्छूक पालकांना अपेक्षेनुसार बालकाची दत्तक प्रक्रिया केंद्रीय दत्तक ग्रहण संसाधन प्राधिकरण (CARA) www.cara.nic.in या संकेतस्थळावर कायदानुसार ऑनलाईन नोंदणी करण्यात येते. 

नांदेड जिल्ह्यात परित्याग केलेले सोडून दिलेले किंवा सापडलेला अशा बालकांना जिल्हा महिला व बाल विकास कार्यालया अंतर्गत जिल्हा बाल संरक्षण कक्ष शास्त्रीनगर भाग्यनगर जवळ नांदेड येथे 02462-261242 या नंबरवर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे सदस्य सचिव तथा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्रीमती आर. पी. काळम यांनी केले आहे.

000000

 

जिल्हा निर्यात प्रचालन परिषदेची समिती गठीत

उद्योजकांना नोंदणी करण्याचे आवाहन   

नांदेड, (जिमाका) दि. 13 :- नांदेड जिल्ह्यातील निर्यातवाढीसाठी विविध केंद्र व जिल्हा कार्यालये, औद्योगिक संघटना, निर्यात परिषदा, निर्यात सल्लागार इ. यांच्याशी सातत्याने पाठपुरावा, समन्वय व अडीअडचणी दूर करण्याच्यादृष्टिने जिल्हा निर्यात प्रचालन परिषदेस सहाय्य करण्यासाठी शासन निर्णयामधील मुद्दा क्र. 5 नुसार नांदेड जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा निर्यात प्रचालन परिषदेची समिती गठीत करण्यात आली आहे. नांदेड जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय निर्यात करण्यास तयार असलेल्या व निर्यात करत असलेल्या उद्योजकांनी जिल्हा उद्योग केंद्र नांदेड येथे प्रत्यक्ष अथवा didic.nanded@maharashtra.gov.in या ईमेलवर नोंदणी करावी असे आवाहन महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र नांदेड यांनी केले आहे. 

राज्यातील लघू व मध्यम उद्योगांना आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये सहाय्य करण्यासाठी तसेच राज्यातील संभाव्य निर्यात क्षमता असलेल्या विविध क्षेत्रामधून निर्यातवृद्धी होण्यासाठी निर्यातदारांमध्ये जागरुकता आणून त्यांना स्पर्धात्मक बनविण्यासाठी तसेच राज्यातील निर्यातीला चालना देण्याचे दृष्टिने तसेच उद्योगांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी राज्यात महाराष्ट्र निर्यात प्रचालन परिषदची स्थापन करण्यात आली आहे, असेही  महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र नांदेड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

000000

 

कोविड-19 च्या सुरक्षा निर्देशासह

 कौमी एकता सप्ताह होईल साजरा 

नांदेड, (जिमाका) दि. 13 :- दरवर्षीप्रमाणे 19 ते 25 नोव्हेंबर हा सप्ताह कौमी एकता सप्ताह म्हणून साजरा केला जातो. नांदेड जिल्ह्यात कोविड-19 च्या प्रादुर्भाव असल्यामुळे कोविड-19 च्या सुरक्षेच्या उपाय योजनाच्या अनुषंगाने केंद्र व राज्य शासनाने निर्गमित केलेल्या सुचनांचे काटेकोरपणे पालन करुन कौमी एकता सप्ताह साजरा करण्याबाबत जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी निर्देश दिले आहेत. याबाबत दिनांक 14 नोव्हेंबर 2017 रोजीचे शासन परिपत्रक www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याचा संकेतांक 20161111168419814 असा आहे.

00000

 

 37  बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी

28 कोरोना बाधितांची भर  तर तिघांचा मृत्यू  

नांदेड (जिमाका) दि. 13 :- शुक्रवार 13 नोव्हेंबर 2020 रोजी सायं. 5 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात 37 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर 28 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 9 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 19 बाधित आले. 

आजच्या एकुण 1 हजार 514 अहवालापैकी  1 हजार 469 अहवाल निगेटिव्ह आले.  जिल्ह्यात एकुण  बाधितांची संख्या आता  19 हजार 595 एवढी झाली असून यातील  18  हजार 626 बाधिताना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 255 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 16 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे. 

आज रोजी प्राप्त अहवालानुसार तीन रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.  गुरुवार 12 नोव्हेंबर 2020 रोजी नवीन मोंढा नांदेड येथील 51 वर्षाच्या पुरुषाचा, लोहा तालुक्यातील गुंडेवाडी येथील 61 वर्षाच्या एका महिलेचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे तर शुक्रवार 13 नोव्हेंबर 2020 रोजी हदगाव तालुक्यातील वायफना येथील 70 वर्षाच्या एका महिलेचा खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बाधित मृत रुग्णांची एकूण संख्या 538 झाली आहे. 

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 2, खाजगी रुग्णालय 7, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 10, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 15, किनवट कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण 3 असे एकूण 37 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे.  उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 97.33 टक्के आहे. 

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 7, नांदेड ग्रामीण 2 असे एकुण 9 बाधित आढळले.  

तर अँटिजेन तपासणीद्वारे  नांदेड मनपा क्षेत्र 7, अर्धापूर तालुक्यात 1, मुखेड 2, बिलोली 2, नांदेड ग्रामीण 1, भोकर 2, हदगाव 2, यवतमाळ 2 एकुण 19 बाधित आढळले. 

जिल्ह्यात 255 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 33, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल  नांदेड येथे 26, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल  नांदेड (नवी इमारत) येथे 26, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 77, मुखेड कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण 6, किनवट कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण 8, देगलूर कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण 11, हदगाव कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण 5, बिलोली कोविड केअर सेंटर व गृह विलगीकरण 1, भोकर कोविड केअर सेंटर व गृह विलगीकरण 13, अर्धापूर तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 8, 

धर्माबाद तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 4, कंधार तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 3, खाजगी रुग्णालय 31, औरंगाबाद येथे संदर्भित 2, अकोला येथे संदर्भित 1 आहेत.  

शुक्रवार 13 नोव्हेंबर 2020 रोजी 5.30 वा. सद्यस्थित रुग्णालयात उपलब्ध खाटांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे 166, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे 79 एवढी आहे. 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती

एकुण घेतलेले स्वॅब- 1 लाख 26 हजार 548

निगेटिव्ह स्वॅब- 1 लाख 3 हजार 501

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 19 हजार 595

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 18 हजार 626

एकूण मृत्यू संख्या- 538

उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 97.33 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-4

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 13

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या- 354

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 255

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले- 16. 

फटाक्यांच्या धुरामुळे कोविड बाधित  रुग्णांना व श्वसनाचा त्रास असणाऱ्या व्यक्तींना त्रास अधिक वाढवू शकतो. त्यामुळे ही दिवाळी फटाके विरहित दिवाळी म्हणून साजरी करावी. आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे. 

00000

  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर करण्यात आली असून उर्वरित याद्या लवकरच...