Thursday, December 5, 2019


जन आरोग्य योजना ठरते नवं संजीवनी
नांदेड दि. 5 :- आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना तसेच महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजने विषयी जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व संलग्नीकृत रुग्णालयांची बैठक आज संपन्न झाली.
या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, जिल्हा शल्य चिकित्सक प्रतिनिधी डॉ. साखरे, जिल्हा समन्वयक प्रधानमंत्री जन आरोग्य योजना तसेच महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना डॉ. दिपेशकुमार शर्मा, सर्व संलग्नीकृत रुग्णालय प्रशासन, इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
नांदेड जिल्ह्यात महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना 2 जुलै 2012 पासून सुरु झालेली आहे. तसेच आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना 23 सप्टेंबर 2018 रोजी पासून कार्यान्वित असून या योजनेतर्गत 23 सप्टेंबर 2018 पासून आजपर्यंत 20 हजार 528 शस्त्रक्रिया औषधोपचारांचा लाभ लाभार्थ्यांना भेटलेला आहे.
 नांदेड जिल्ह्यातील 12 रुग्णालये या योजनेअंतर्गत संलग्नीकृत असून या अंतर्गत डायलेसिससाठी 5 हजार 930, कॅन्सरसाठी 4 हजार 323, अपघातग्रस्त रुग्ण 3 हजार 553, हृदयरोगसाठी 2 हजार 639, अश्या विविध 30 प्रकारच्या स्पेशालिटी अंतर्गत रुग्णांनी लाभ घेतलेला असून या औषधोपचार शस्त्रक्रियेसाठी 42 कोटी 99 लाख 72 हजार 942 रुपये विम्याच्या रक्कमेतून अदा करण्यात आली आहे. ही योजना गरीब आर्थिक दृष्ट्या कमकुवत कुटुंबांना उपचारासाठी राबविण्यात येत आहे. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेत 971 आयुष्यमान योजनेतर्गत 1 हजार 300 या वेगवेगळ्या 1 हजार 300 दुर्धर आजारावर औषधोपचार शस्त्रक्रिया केल्या जात आहे. महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेच्या लाभार्थ्याजवळ केसरी, पिवळे, अन्नपूर्णा, अंत्योदय तसेच शेतकरी कुटुंबांसाठी पांढरी शिधापत्रिका आयुष्यमान योजनेच्या लाभार्थ्याकडे -कार्ड असणे आवश्यक आहे.
बदलत्या जीवनशैलीने दिवसागणिक आजाराचे प्रमाण वाढत आहे. परंतु सर्व सामान्य नागरिकांना शस्त्रक्रिया औषधोपचारांवर होणारखर्च आवाक्या बाहेरचा असल्याने केंद्र सरकारची आयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जनआरोग्य योजना तर राज्य सरकारची महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना त्या रुग्णांच्या दृष्टीने नव संजीवनी ठरत आहे.
आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेत लाभार्थ्यांचा समावेश असल्यास संगणक प्रणालीद्वारे कुटुंब सदस्यास -कार्ड मिळण्याची तरतूद आहे. महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेसाठी केसरी, पिवळे, अन्नपूर्णा,अंत्योदय तसेच पांढरी शिधापत्रिकाधारक शेतकरी कुटुंब पात्र आहेत अशी माहिती डॉ दिपेश कुमार शर्मा, जिल्हा समन्वयक महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना नांदेड यांनी दिली आहे.
000000


रब्बी हंगामातील पिकांसाठी
प्रधानमंत्री पिक विमा योजना
भरण्याची 31 डिसेंबर मुदत
नांदेड दि. 5 :- प्रधानमंत्री पिक विमा योजना राज्यात रब्बी हंगाम 2019-20 मध्ये राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रधानमंत्री पिक विमा योजना कर्जदार शेतकऱ्यांना अधिसुचित क्षेत्रातील अधिसुचित पिकासाठी बंधनकारक असून बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे. विमा भरण्याची अंतिम मुदत मंगळवार 31 डिसेंबर 2019 आहे. अधिक माहितीसाठी बँकेशी किंवा जवळच्या तालुका कृषी आधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
या योजनेंर्तगत वास्तव दर्शी विमा हप्ता आकारण्यात येणार असुन, रब्बी हंगामातील पिकासाठी 1.5 टक्के ठेवण्यात आला आहे. या योजनेंतर्गत जोखीम स्तर सर्वे पिकासाठी 70 टक्के निश्चित करण्यात आला आहे. पिक पेरणी पासुन काढणीपर्यंतचा कालावधी नैसर्गिक आग, विज कोसळणे, गारपिट, चक्रीवादळ, पूर, दुष्काळ, पावसातील खंड, किड व रोग इत्यादी बाबीमुळे पिकाच्या उत्पादनात येणारी घट, काढणी पश्चात नुकसान इत्यादी जोखीम यामध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. नांदेड जिल्हयातील गहु (बा), ज्वारी (जि), हरभरा या पिकासाठी ही योजना लागु आहे.
या योजनेंतर्गत विमा संरक्षित रक्कम व विमा हप्ता पुढील प्रमाणे राहील. पिक- गहु बा.- विमा स्वंरक्षित रक्कम हेक्टरी 35 हजार रुपये, शेतकऱ्यांनी भरावयाचा हप्ता 525 रुपये, विमा लागु असलेले तालुके नांदेड (सर्व महसुल मंडळ). अधिसुचना तालुकास्तरीय कंधार, लोहा, हदगांव, हिमायतनगर, किनवट, अर्धापुर, मुदखेड, बिलोली, धर्माबाद, नायगाव, भोकर. ज्वारी- विमा स्वंरक्षित रक्कम हेक्टरी 26 हजार रुपये, शेतकऱ्यांनी भरावयाचा हप्ता 390 रुपये, विमा लागु असलेले तालुके बिलोली , धर्माबाद, मुखेड (सर्व महसुल मंडळ), अधिसुचना तालुकास्तरीय- देगलुर, नायगाव, नांदेड, किनवट, हदगाव. हरभरा- विमा स्वंरक्षित रक्कम हेक्टरी 24 हजार रुपये, शेतकऱ्यांनी भरावयाचा हप्ता 360 रुपये, विमा लागु असलेले तालुके नांदेड, अर्धापुर, बिलोली, धर्माबाद, हदगाव, देगलुर, मुखेड, किनवट (सर्व महसुल मंडळ). अधिसुचना तालुकास्तरीय नायगाव, हिमायतनगर, मुदखेड या तालुक्यांना विमा लागु असेल. ही योजना रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड यांच्यामार्फत राबविण्यात येणार आहे.
000000


कापुस, तूर, मका पिकांसाठी कृषि संदेश
नांदेड दि. 5 :- जिल्हयात  कापुस, तुर, मका, पिकासाठी किड रोग सर्वेक्षण या प्रकल्पाअंतर्गत काम सुरु आहे. पिकावरील किडीपासुन संरक्षणासाठी शेतकऱ्यांसाठी कृषि संदेश देण्यात आला आहे.
कापुस पिकावर गुलाबी बोंडअळीसाठी सायपरमेथ्रीन 10 ईसी @ 7.5 मिली किंवा फेनप्रोपॅथ्रीन 10 ईसी @  मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळुन फवारावे फरदड टाळावी.
तुर पिकावर क्विनलफॉस 25 ईसी @ 30 मिली किंवा क्लोरॅनट्रॉनीप्रोल 18.5 एस सी @ 3 मिली  10 लिटर पाण्यात मिसळुन फवारावे.
मका पिकावर लष्करी अळया गोळा करुन नष्ट कराव्यात मेटारहाय जियम निसोप्ली 50 ग्रॅम नोमुरिया रिलाई 50 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी, असे आवाहन नांदेडचे उपविभागीय कृषि अधिकारी आर. टी. सुखदेव यांनी केले आहे.
000000

 स्पर्धा परीक्षेत यशासाठी
अभ्यासाचे अचूक तंत्र आत्मसात करावे
-         निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. सचिन खल्लाळ
नांदेड दि. 5 :- स्पर्धा परीक्षेत यश मिळवायचे असेल तर विद्यार्थ्यांने अभ्यासाचे अचूक तंत्र आत्मसात करावे तसेच ध्येय निश्चित करुन योग्य पध्दतीने अभ्यास केल्यास स्पर्धा परीक्षेच्या या लढाईत यश हमखास मिळेल असे प्रतिपादन निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.सचिन खल्लाळ यांने केले.
जिल्हा प्रशासनाच्यावतीने आयोजीत उज्ज्वल नांदेड मोहिमेतर्गत दरमाह 5 ता. च्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिरात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्रा. सचिन ढवळे जिल्हा ग्रंथालय अधिकारी आशिष ढोक बलवंत वरपडे उपस्थित होते.
प्रास्ताविक व्याखात्यांचा परिचय जिल्हा ग्रंथालय अधिकारी आशिष ढोक यांनी करुन दिला. या शिबीरामध्ये प्रा.सचिन ढवळे यांनी गणित बुध्दीमता या  विषयावर सखोल असे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आभार आरती कोकुलवार  यांनी मानले. शिबिराचे यशस्वी आयोजनासाठी  प्रताप सुर्यवंशी, बाळू पावडे, कोडिंबा गाडेवाड , रघुविर, खंडेलोटे  यांनी सहाय्य केले.
000000

  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर करण्यात आली असून उर्वरित याद्या लवकरच...