Thursday, December 5, 2019


रब्बी हंगामातील पिकांसाठी
प्रधानमंत्री पिक विमा योजना
भरण्याची 31 डिसेंबर मुदत
नांदेड दि. 5 :- प्रधानमंत्री पिक विमा योजना राज्यात रब्बी हंगाम 2019-20 मध्ये राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रधानमंत्री पिक विमा योजना कर्जदार शेतकऱ्यांना अधिसुचित क्षेत्रातील अधिसुचित पिकासाठी बंधनकारक असून बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे. विमा भरण्याची अंतिम मुदत मंगळवार 31 डिसेंबर 2019 आहे. अधिक माहितीसाठी बँकेशी किंवा जवळच्या तालुका कृषी आधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
या योजनेंर्तगत वास्तव दर्शी विमा हप्ता आकारण्यात येणार असुन, रब्बी हंगामातील पिकासाठी 1.5 टक्के ठेवण्यात आला आहे. या योजनेंतर्गत जोखीम स्तर सर्वे पिकासाठी 70 टक्के निश्चित करण्यात आला आहे. पिक पेरणी पासुन काढणीपर्यंतचा कालावधी नैसर्गिक आग, विज कोसळणे, गारपिट, चक्रीवादळ, पूर, दुष्काळ, पावसातील खंड, किड व रोग इत्यादी बाबीमुळे पिकाच्या उत्पादनात येणारी घट, काढणी पश्चात नुकसान इत्यादी जोखीम यामध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. नांदेड जिल्हयातील गहु (बा), ज्वारी (जि), हरभरा या पिकासाठी ही योजना लागु आहे.
या योजनेंतर्गत विमा संरक्षित रक्कम व विमा हप्ता पुढील प्रमाणे राहील. पिक- गहु बा.- विमा स्वंरक्षित रक्कम हेक्टरी 35 हजार रुपये, शेतकऱ्यांनी भरावयाचा हप्ता 525 रुपये, विमा लागु असलेले तालुके नांदेड (सर्व महसुल मंडळ). अधिसुचना तालुकास्तरीय कंधार, लोहा, हदगांव, हिमायतनगर, किनवट, अर्धापुर, मुदखेड, बिलोली, धर्माबाद, नायगाव, भोकर. ज्वारी- विमा स्वंरक्षित रक्कम हेक्टरी 26 हजार रुपये, शेतकऱ्यांनी भरावयाचा हप्ता 390 रुपये, विमा लागु असलेले तालुके बिलोली , धर्माबाद, मुखेड (सर्व महसुल मंडळ), अधिसुचना तालुकास्तरीय- देगलुर, नायगाव, नांदेड, किनवट, हदगाव. हरभरा- विमा स्वंरक्षित रक्कम हेक्टरी 24 हजार रुपये, शेतकऱ्यांनी भरावयाचा हप्ता 360 रुपये, विमा लागु असलेले तालुके नांदेड, अर्धापुर, बिलोली, धर्माबाद, हदगाव, देगलुर, मुखेड, किनवट (सर्व महसुल मंडळ). अधिसुचना तालुकास्तरीय नायगाव, हिमायतनगर, मुदखेड या तालुक्यांना विमा लागु असेल. ही योजना रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड यांच्यामार्फत राबविण्यात येणार आहे.
000000

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...