Thursday, December 5, 2019


कृषि विभागाच्यावतीने जागतिक मृदा दिन साजरा
नांदेड दि. 5 :- कृषि विभागाच्यावतीने जागतिक मृदा दिन आज साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आमदार मोहनराव हंबर्डे, तर प्रमुख पाहुणे जिल्हा परिषद सदस्या श्रीमती पुनमताई पवार हे होते.
प्रमुख मार्गदर्शक कृषि विज्ञान केंद्र पोखर्णीचे प्राचार्य डॉ. एस. डी. मोरे, शास्त्रज्ञ डॉ. देविकांत देशमुख, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी रविशंकर चलवदे, उपविभागीय कृषि अधिकारी आर. टी. सुखदेव, नांदेड तालुका कृषि अधिकारी विनायक सरदेशपांडे, मुदखेड तालुका कृषि अधिकारी श्री शर्मा, अर्धापूर तालुका कृषि अधिकारी श्री. शिंगाडे, कृषि अधिकारी श्री सानप, कृषि पर्यवेक्ष एम. जी. चामे हे उपस्थित होते.
यावेळी आमदार मोहनराव हंबर्डे, जि.प. सदस्या  श्रीमती पुनमताई पवार तसेच जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी चलवदे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. मान्यवरांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात शेतकऱ्यांना जमीन आरोग्य पत्रिकाचे वितरण करण्यात आले. तसेच सेंद्रीय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. कृषि शास्त्रज्ञ एस.डी.मोरे देविकांत देशमुख यांनी मातीचे आरोग्य विश्लेषणबाबत मार्गदर्शन करुन शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यानंतर प्रगतशिल शेतकरी भगवान इंगोले, संजय घोगरे यांनी मनोगत व्यक्त केले.
प्रास्ताविक जिल्हा मृद सर्वेक्षण मृद चाचणी अधिकारी श्रीमती गुंजकर ए. एस. यांनी तर सुत्रसंचालन वसंत जारीकोटे यांनी केले. शेवटी आभार कृषि पर्यवेक्षक एम. जी. चामे एम.जी.  यांनी मानले.
000000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...