Thursday, December 5, 2019


अनधिकृत स्कूल बसमधून शालेय  
विद्यार्थ्यांची वाहतूक करण्यास मनाई
नांदेड दि. 5 :- शालेय विद्यार्थ्यांची वाहतुक करण्यास मा. उच्च न्यायालय मुंबई यांनी जनहित याचिका क्र.97/2016 मध्ये 25 नोव्हेंबर 2019 रोजी अनधिकृत स्कूल बसबाबत आदेश पारित केले आहेत. त्यानुसार शालेय विद्यार्थ्यांची वाहतुक अनधिकृत ऑटोरिक्षा, स्कूल व्हॅन बसेस मधून करण्यास मनाई करण्यात आली आहे.   
या आदेशानुसार विहीत परवान्याशिवाय विद्यार्थी वाहतुक करणाऱ्या सर्व वाहनांविरुध्द वाहतूक पोलीस परिवहन विभागाकडून कडक कारवाई करण्यात येणार आहे. त्यानुषंगाने 25 नोव्हेंबर 2019  ते 10 डिसेंबर 2019 या कालावधीत या प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून अनधिकृत स्कूल बस, व्हॅन, ऑटोरिक्षा इतर वाहनांवर कारवाई करण्यासाठी विशेष तपासणी मोहिम राबविण्यात येत आहे. यामध्ये दोषी आढळणाऱ्या अनधिकृत शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, याची सर्वांनी नोंद घ्यावी.
यासोबतच मा. उच्च न्यायालयाने ऑटोरिक्षामधून विद्यार्थ्यांची वाहतूक करणे धोकादायक असल्याने पालक त्यांच्या पाल्यांना ऑटोरिक्षामधून प्रवास करण्यास मनाई करतील अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. त्याबरोबर समाजसेवक तसेच सेवाभावी व्यक्ती यांनी राज्य शासनास सुरक्षा विषयक तरतूदी असलेल्या बसेस, वाहने माफक दरात विद्यार्थ्यी वाहतूक करण्यास सहकार्य करावे अशीही अपेक्षा व्यक्त केली आहे. तसेच शाळांना एनजीओ समाजसेवी व्यक्ती यांच्याकडून याबाबतीत सहकार्य घेण्यास कळविले आहे. जिल्हयातील सर्व स्कूल बस, व्हॅन ऑटोरिक्षा बस चालक, मालक तसेच सर्व शाळा पालक वर्गांनी याची नोंद घ्यावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.  
000000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...