Monday, April 19, 2021

 

अल्पसंख्यांक विकास व औकाफ,

मंत्री नवाब मलिक यांचा दौरा  

 

नांदेड, दि. (जिमाका) 19 :- राज्याचे अल्पसंख्यांक विकास व औकाफ, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मंत्री तथा परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री नवाब मलिक हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

मंगळवार 20 एप्रिल 2021 रोजी दु. 4.15 वाजता विमानाने नांदेडकडे प्रयाण. सायं 5.45 वाजता नांदेड विमानतळ येथे आगमन व मोटारीने शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण. सायं 5.55 वाजता शासकीय  विश्रामगृह नांदेड येथे आगमन व राखीव.

0000

 

मौजे ब्रम्हपुरी गोदावरी नदीच्या पात्र परिसरात कलम 144

 

मौजे ब्रम्हपुरी गोदावरी नदीच्या

पात्र परिसरात कलम 144

नांदेड, दि. (जिमाका) 19 :- मौजे ब्रम्हपुरी येथील गोदावरी नदी पात्र परिसरात शांतता व सुव्यवस्था अबाधीत रहावी यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 प्रमाणे नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नदी पात्रातील परिसर प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून 20 एप्रिल 2021  पासून घोषित करण्यात आले आहे. त्याबाबत जिल्हादंडाधिकारी कार्यालयाने आदेश निर्गमीत केले आहेत.

फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 नुसार प्राप्त अधिकाराचा वापर करुन चतु:सिमा पुर्वेस वाजेगाव कोल्हापुरी बंधारा, पश्चिमेस नांदेड ते देगलूरकडे जाणाऱ्या रोडवरील जुना पूल, दक्षिणेस गोदावरीचे नदीचे पात्र आणि उत्तरेस चिल्ला / दर्गाची संरक्षण भिंत यामधील जागा 20 एप्रिल 2021  रोजी सकाळी 6 वाजेपासून ते 19 मे 2021 रोजीच्या मध्यरात्री पर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 प्रमाणे प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून जिल्हादंडाधिकारी यांनी घोषित केले आहे.

हा आदेश शासकीय कर्तव्यावरील अधिकारी व कर्मचारी, एक खिडकी पथकातील अधिकाऱ्यांनी परवानगी दिलेल्या भाविकांना तसेच ज्यांना जिल्हाधिकारी नांदेड व पोलीस अधीक्षक नांदेड यांनी परवानगी दिली अशा व्यक्तींना लागू राहणार नाही.

00000

 

 

  ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणेला अधिक सक्षम करण्यावर भर

-पालकमंत्री अशोक चव्हाण  

नवीन जम्बो कोविड केअर सेंटरला आज पासून प्रारंभ

ऑक्सीजनसह इतर यंत्रणेची पालकमंत्र्यांनी भेट देवून केली पाहणी


                                                                               नांदेड, दि. (जिमाका) 19 :-

जिल्ह्यातील कोविड बाधितांना जिल्हा प्रशासनाच्यावतीने जेवढ्या शक्य होतील त्या सर्व सेवा सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी आम्ही प्रयत्नांची शर्थ करीत आहोत. सोळा तालुक्यासह आपल्या जिल्ह्याचा विस्तार मोठया प्रमाणात असला तरी प्रत्येक तालुका पातळीवरील आणि ग्रामीण भागात जिल्ह्यातील बाधितांना आरोग्याच्या सुविधा सुलभ मिळाव्यात यासाठी आरोग्य विभागाला तत्पर राहण्याला सांगितले असून आजच्या घडीला ऑक्सीजनच्या बाबतीत कोणतीही कमतरता नसल्याचे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केले.

 

नांदेड महानगरातील आणि जिल्ह्यातील वाढती कोरोना बाधिताची संख्या लक्षात घेवून भक्ती लॉन्स येथे आज पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी प्रत्यक्ष भेट देवून जम्बो कोविड सेंटरचे उदघाटन व पाहणी केली. यावेळी त्यांच्यासमवेत विधान परिषद सदस्य अमर राजूरकर, महानगरपालिकेच्या महापौर श्रीमती मोहिनी येवनकर, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने, डॉ. शंकरराव चव्हाण महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. दिलीप म्हैसेकर, मनपा आरोग्य अधिकारी डॉ. बिसेन आदी उपस्थित होते.

 


नांदेड जिल्ह्यातील विशेषत: ग्रामीण भागातील बाधितांची वाढती संख्या हा चिंतेचा विषय आहे. संभाव्य परिस्थिती लक्षात घेवून ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणेवर आम्ही अधिक लक्ष केंद्रीत केले आहे.  प्रत्येक तालुका पातळीवरील कोविड केअर सेंटरसह मालेगाव, अर्धापूर सारख्या गावातील ट्रामा केअर सेंटर येथे कोविड बाधितांसाठी उपचार केंद्र सुरु करीत आम्ही  ग्रामीण आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम आणि परिपूर्ण करु असा विश्वास जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला. जिल्ह्यातील रेमडेसीवीर इंजेक्शनची मागणी मोठया प्रमाणात असून याचा तुटवडा आहे हे नाकारता येत नाही. राज्यात सर्वत्रच याचा तुटवडा असून शासनातर्फे वितरक आणि उत्पादक यांच्याशी समन्वय साधला जात आहे. जिथे आवश्यकता वाटते आहे त्याठिकाणी कायदेशिर कार्यवाही करुन मार्ग काढीत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.  

 

कोरोनाबाधित रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना वेळेवर जी काही माहिती असेल ती मिळणे आवश्यक असून यासंदर्भात प्रत्येक कोविड केअर सेंटर, डेडीकेटेड कोविड हेल्थ सेटर, डेडीकेटेड कोविड हॉस्पिटल येथे माहिती केंद्र सुरु करण्याच्या सूचना पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केल्या. या नवीन कोविड केंद्रातील ऑक्सीजन यंत्रणा आणि इतर साहित्य चांगल्या स्थितीत सुरु आहे की नाही यांची खातरजमा त्यांनी स्वत: करुन घेतली. या दोनशे खाटांच्या भव्य कोविड हेल्थ सेंटर येथे सर्व बेड ऑक्सीजन यंत्रणेसह असून आवश्यक तो सर्व स्टाफ ही महानगरपालिकेतर्फे उपलब्ध करुन दिला आहे. सद्यस्थितीत 112 जणांचा स्टाफ असून तो चार शिफ्टमध्ये कार्यरत राहणार आहे. तसेच चोवीस डॉक्टराचे पथक या जम्बो सेंटरमधील रुग्णांच्या उपचाराचे व्यवस्थापन करेल.  रुग्णांच्या नातेवाईकांना रुग्णांशी व्हिडीओ कॉलद्वारे संपर्क साधता यावा यादृष्टीने व्यवस्था करण्यात आली आहे.

0000

Sunday, April 18, 2021

                                  सोमवार दि. 19 एप्रिलपासून किराणा,भाजीपाला-फळविक्रेते

सर्व प्रकारची खाद्य दुकाने सकाळी 8 ते दुपारी 1 पर्यंत सुरु

 

नांदेड (जिमाका) दि. 18 :-  कोरोना विषाणूचा प्रादुर्भावा रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून नांदेड जिल्ह्यात दिनांक 14 एप्रिल, 2021 रोजी अत्यावश्यक सेवेबाबत प्रतिबंधात्मक उपाययोजना जाहीर केल्या होत्या. सदर अत्यावश्यक सेवेत असणाऱ्या ठिकाणी नागरिकांची मोठ्या प्रमाणात होणारी गर्दी लक्षात घेवून याबाबत गांभिर्याने निर्णय घेणे अत्यावश्यक झाले. जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेवून आता सोमवार दिनांक 19 एप्रिल 2021 पासून प्रतिबंधात्मक उपाययोजनेतंर्गत किराणा सामान दुकाने, भाजीपाला दुकाने, भाजीबाजार, फळविक्रेते, बेकरी, मिठाई, खाद्य दुकाने आणि सर्व प्रकारची खाद्य दुकाने या आस्थापना सकाळी 8 ते दुपारी 1 या वेळेतच सुरु राहतील. यानंतरच्या वेळेत केवळ घरपोच सेवा (होम डिलेव्हरी) साठी मुभा असेल, असे जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी प्रतिबंधात्मक आदेशात सांगितले आहे. सदर आदेशाचे उल्लंघन केल्यास आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व साथरोग नियंत्रण अधिनियम 1897 तसेच भारतीय दंड संहिता 1860 च्या कलम 188 प्रमाणे दंडनीय कारवाईस पात्र राहील.

00000

 1 हजार 156 कोरोना बाधित बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी 

नांदेड जिल्ह्यात 1 हजार 287 व्यक्ती कोरोना बाधित

 27 जणांचा मागील तीन दिवसांत मृत्यू

 परिस्थितीचे गांभिर्य लक्षात घेता नागरिकांनी घराबाहेर पडू नये

नांदेड (जिमाका) दि. 18 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 5 हजार 665 अहवालापैकी 1 हजार 287 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 729 तर अँटिजेन तपासणीद्वारे 558 अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 67 हजार 887 एवढी झाली असून यातील 52 हजार 541 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 13  हजार 828 रुग्ण उपचार घेत असून 197 बाधितांची प्रकृती आज रोजी अतिगंभीर आहे. परिस्थितीचे गांभिर्य लक्षात घेता नागरिकांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

 

दिनांक 16 ते 18 एप्रिल या तीन दिवसांच्या कालावधीत 27 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. नांदेड जिल्ह्यातील कोरोना बाधित मृत रुग्णांची एकूण संख्या 1 हजार 257 एवढी झाली आहे.   दिनांक 16 एप्रिल रोजी किनवट कोविड रुग्णालय  येथे राजगड तांडा येथील 70 वर्षाची महिला, लोटस कोविड रुग्णालय येथे भगिरथ नगर नांदेड येथील 337 वर्षाचा पुरुष, नांदेड येथील 78 वर्षाचा पुरुष, भगवती कोविड रुग्णालय येथे शिवाजी नगर नांदेड येथील 74 वर्षाची महिला, दिनांक 17 एप्रिल रोजी गोदावरी कोविड रुग्णालय येथे श्रीवर्धन कॉलनी नांदेड येथील 77 वर्षाची महिला, आशा कोविड रुग्णालय येथे नांदेड येथील 62 वर्षाचा पुरुष, व्हिजन कोविड रुग्णालय येथे लोकमित्रनगर नांदेड 70 वर्षाचा पुरुष, देगलूर कोविड रुग्णालय येथे टाकळी            ता. देगलूर येथील 83 वर्षाचा पुरुष, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे बोरी ता. कंधार येथील 40 वर्षाची महिला, सरसम हिमायतनगर येथील 29 वर्षाचा पुरुष, मनाठा ता. नायगाव येथील 70 वर्षाचा पुरुष, तरोडा बु. नांदेड येथील 65 वर्षाचा पुरुष, जयनगर नांदेड येथील 35 वर्षाचा पुरुष, भोकर येथील 54 वर्षाचा पुरुष, शासकीय वैद्यिकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे बिलोली येथील 55 वर्षाची महिला, नायगाव येथील 62 वर्षाची महिला, भोकर येथील 23 वर्षाचा पुरुष, कंधार येथील 54 वर्षाची महिला, लोहा येथील 50 वर्षाचा पुरुष, बडापुरा नांदेड येथील 48 वर्षाचा पुरुष, नायगाव येथील 65 वर्षाचा पुरुष, 55 वर्षाची महिला, बेंदी ता. नायगाव येथील 64 वर्षाची महिला, विष्णुनगर नांदेड येथील 62 वर्षाचा पुरुष, दिनांक 18 एप्रिल रोजी जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे फुले नगर अर्धापूर येथील 56 वर्षाची महिला, बडापुरा नांदेड येथील 60 वर्षाचा पुरुष, मारवली ता. नायगाव येथील 54 वर्षाची महिला यांचा समावेश आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 77.39 टक्के आहे.

 

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्रात 203, नांदेड ग्रामीण 26अर्धापूर 3बिलोली 74देगलूर 52धर्माबाद 32, हदगाव 54, हिमायतनगर 24, कंधार 88, किनवट 5, लोहा 6, मुखेड 10, मुदखेड 5, नायगाव 96, उमरी 41, परभणी 1, हिंगोली 6, यवतमाळ 1, भोकर 2, अर्धापूर 3 असे  एकूण 729 बाधित आढळले.

 

आजच्या बाधितांमध्ये ॲन्टिजेन तपासणीद्वारे मनपा क्षेत्रात 177, नांदेड ग्रामीण 12, अर्धापूर 23, भोकर 12, बिलोली 32, देगलूर 22, धर्माबाद 10, हदगाव 15, हिमायतनगर 3,  कंधार 9, किनवट 63, लोहा 13, माहूर 10,मुदाखेड 16, मुखेड 75, नायगाव 9, उमरी 49, परभणी 2, लातूर 1, यवतमाळ 1, हिंगोली 3, बुलढाणा 1  व्यक्ती असे एकूण अँन्टिजेन तपासणीद्वारे 558 बाधित आढळले.

 

आज 1 हजार 156 कोरोनाबाधित रुग्णांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी 20मनपाअंतर्गत एनआरआय भवन व गृहविलगीकरण 606माहूर तालुक्याअंतर्गत

 15, किनवट कोविड रुग्णालय 29, नायगाव तालुक्यातंर्गत 10, खाजगी रुग्णालय 123, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 38, मुखेड कोविड रुग्णालय 172,  कंधार तालुक्याअंतर्गत 3, बारड कोविड केअर सेंटर 9, अर्धापूर तालुक्यातंर्गत 23,शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय 22, हदगाव कोविड रुग्णालय 23, उमरी तालुक्यातंर्गत 9, लोहा तालुक्यातंर्गत 40, मांडवी कोविड केअर सेंटर 14 यांचा समावेश आहे.

 

जिल्ह्यात 13 हजार 828 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे 200, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 111, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड (नवी इमारत) 221, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड 153, किनवट कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 123, मुखेड कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 242, देगलूर कोविड रुग्णालय 52, जैनब हॉस्पिटल कोविड केअर सेंटर 88बिलोली कोविड केअर सेंटर 218हिमायतनगर कोविड केअर सेंटर 19उमरी कोविड केअर सेंटर 62, माहूर कोविड केअर सेंटर 66, भोकर कोविड केअर सेंटर 31, हदगाव कोविड रुग्णालय 44, हदगाव कोविड केअर सेंटर 35, लोहा कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 135, कंधार कोविड केअर सेंटर 32धर्माबाद कोविड केअर सेंटर 133मुदखेड कोविड केअर सेंटर 153बारड कोविड केअर सेंटर 15, मांडवी कोविड केअर सेंटर 8, अर्धापूर कोविड केअर सेंटर 24, एनआरआय कोविड केअर सेंटर 99, पंजाब भवन कोविड केअर सेंटर 175, नांदेड मनपाअंतर्गत गृहविलगीकरण 5 हजार 493 , नांदेड जिल्ह्यातील तालुक्याअंतर्गत गृह विलगीकरण 4 हजार 73, खाजगी रुग्णालय 1 हजार 753, हैद्राबाद येथे संदर्भित 1 असे एकूण 13 हजार 828 रुग्ण उपचार घेत आहेत.

 

आज रोजी सांयकाळी 5 वाजेपर्यंत उपलब्ध असलेल्या खाटांची संख्या पुढील प्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे 20, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 12, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड येथे 17 खाटा उपलब्ध आहेत.

 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 4 लाख 13 हजार 299

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 3 लाख 37 हजार 456

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 67 हजार 887

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 52 हजार 541

एकुण मृत्यू संख्या-1 हजार 557

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 77.39 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-40

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-36

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-389

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-13 हजार 828

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-197.

00000


Saturday, April 17, 2021

1 हजार 305 कोरोना बाधित बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी नांदेड जिल्ह्यात 1 हजार 450 व्यक्ती कोरोना बाधित 28 जणांचा मागील तीन दिवसांत मृत्यू कोरोनाबाबत जनजागृतीसाठी जागरुक नागरिकांना योगदान देण्याचे आवाहन

                         1 हजार 305 कोरोना बाधित बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी 

नांदेड जिल्ह्यात 1 हजार 450 व्यक्ती कोरोना बाधित

 28 जणांचा मागील तीन दिवसांत मृत्यू

कोरोनाबाबत जनजागृतीसाठी जागरुक नागरिकांना योगदान देण्याचे आवाहन

 

नांदेड (जिमाका) दि. 17 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 4 हजार 677 अहवालापैकी 1 हजार 450 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 676 तर अँटिजेन तपासणीद्वारे 774 अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 66 हजार  600 एवढी झाली असून यातील 51 हजार 385 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 13  हजार  724 रुग्ण उपचार घेत असून 211 बाधितांची प्रकृती आज रोजी अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी             डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

 

दिनांक 15 ते 17 एप्रिल या तीन दिवसांच्या कालावधीत 28 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. नांदेड जिल्ह्यातील कोरोना बाधित मृत रुग्णांची एकूण संख्या 1 हजार 230 एवढी झाली आहे.   दिनांक 15 एप्रिल रोजी  किनवट कोविड रुग्णालय येथे गोकुंदा येथील 75 वर्षाचा पुरुष, देगलूर कोविड रुग्णालय येथे देगलूर तालुक्यातील टाकळी येथील 72 वर्षाचा पुरुष, आझाद कॉलनी देगलूर येथील 55 वर्षाचा पुरुष, अपेक्षा हॉस्पिटल येथे हडको नांदेड येथील 57 वर्षाची महिला, 16 एप्रिल रोजी आशा हॉस्पिटल नांदेड येथे 80 वर्षाची महिला, व्हिजन कोविड रुग्णालय येथे तुळजा भवानी नगर येथील 70 वर्षाचा पुरुष,  देगलूर कोविड रुग्णालय येथे देगलूर तालुक्यातील आरळी येथील 58 वर्षाची महिला, देगलूर तालुक्यातील नरंगल येथील 80 वर्षाची महिला, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड येथे काबरा नगर नांदेड येथील 75 वर्षाचा पुरुष, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे भोकर येथील 64 वर्षाची महिला, लोहा येथील 57 वर्षाचा पुरुष, घुंगराळा येथील 65 वर्षाचा पुरुष, शिवाजीनगर नांदेड येथील 63 वर्षाचा पुरुष, वजीराबाद नांदेड येथील 73 वर्षाचा पुरुष, सिडको नांदेड येथील 70 वर्षाची महिला, सिडको येथील 80 वर्षाचा पुरुष, मुखेड येथील 70 वर्षाचा पुरुष, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे बारुळ कंधार येथील 70 वर्षाची महिला, हदगाव तालुक्यातील लिंगापूर येथील 65 वर्षाचा पुरुष, बजरंग नांदेड येथील 55 वर्षाची महिला, राहूल नगर नांदेड येथील 62 वर्षाची महिला, सिडको येथील 40 वर्षाची महिला, हिमायतनगर येथील 70 वर्षाचा पुरुष, उमरी येथील 70 वर्षाचा पुरुष, 17 एप्रिल रोजी जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे विष्णुनगर नांदेड येथील 42 वर्षाची महिला, फरांदे नगर नांदेड येथील  52 वर्षाचा पुरुष, हदगाव येथील 60 वर्षाची महिला अशा एकूण 28 जणांचा  समावेश आहेउपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 77.15 टक्के आहे.

 

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्रात  248, नांदेड ग्रामीण 17, अर्धापूर 23,  देगलूर 52,  हदगाव 30हिमायतनगर 22कंधार 4किनवट 24लोहा 41,  मुखेड 37मुदखेड 6नायगाव 85उमरी 55परभणी 1हिंगोली 3यवतमाळ 4, भोकर 22, चंद्रपूर 1, बिलोली 1 असे  एकूण 676 बाधित आढळले.

 

आजच्या बाधितांमध्ये ॲन्टिजेन तपासणीद्वारे मनपा क्षेत्रात 157, नांदेड ग्रामीण 46, अर्धापूर 35भोकर 21बिलोली 31देगलूर 47धर्माबाद 2हदगाव 57कंधार 39किनवट 69लोहा 31माहूर 17मुखेड 33नायगाव 58उमरी 49, परभणी 3यवतमाळ 2मुदखेड 61, लातूर 1, हिंगोली 2, आदिलाबाद 2 व्यक्ती असे एकूण अँन्टिजेन तपासणीद्वारे 774 बाधित आढळले.

 

आज 1 हजार 305 कोरोनाबाधित रुग्णांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी 10, मनपाअंतर्गत एनआरआय भवन व गृहविलगीकरण 741, कंधार तालुक्याअंतर्गत

7किनवट कोविड रुग्णालय 28हिमायतनगर तालुक्यातंर्गत 20माहूर तालुक्यातंर्गत 8जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 18मुखेड कोविड रुग्णालय 100नायगाव तालुक्यातंर्गत 16अर्धापूर तालुक्यातंर्गत 21बिलोली तालुक्यातंर्गत 33खाजगी रुग्णालय 108शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय 9हदगाव कोविड रुग्णालय 28धर्माबाद तालुक्यातंर्गत 31उमरी तालुक्यातंर्गत 26लोहा तालुक्यातंर्गत 53, देगलूर कोविड रुग्णालय 5, मांडवी कोविड केअर सेटर 12, भोकर 1 यांचा समावेश आहे. 

 

जिल्ह्यात 13 हजार 724 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे 224, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 120, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड (नवी इमारत) 226, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड 153, किनवट कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 117, मुखेड कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 218, देगलूर कोविड रुग्णालय 52, जैनब हॉस्पिटल कोविड केअर सेंटर 88, बिलोली कोविड केअर सेंटर 198, हिमायतनगर कोविड केअर सेंटर 19, नायगाव कोविड केअर सेंटर 67, उमरी कोविड केअर सेंटर 55, माहूर कोविड केअर सेंटर 63, भोकर कोविड केअर सेंटर 31, हदगाव कोविड रुग्णालय 25, हदगाव कोविड केअर सेंटर 106, लोहा कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 134, कंधार कोविड केअर सेंटर 21, धर्माबाद कोविड केअर सेंटर 133, मुदखेड कोविड केअर सेंटर 153, बारड कोविड केअर सेंटर 32, मांडवी कोविड केअर सेंटर 6, एनआरआय कोविड केअर सेंटर 87, पंजाब भवन कोविड केअर सेंटर 175, नांदेड मनपाअंतर्गत गृहविलगीकरण 5 हजार 508, नांदेड जिल्ह्यातील तालुक्याअंतर्गत गृह विलगीकरण 4 हजार 58, खाजगी रुग्णालय 1 हजार 630, अर्धापूर कोविड केअर सेटर 24, हैद्राबाद येथे संदर्भित 1 असे एकूण 13 हजार 724 रुग्ण उपचार घेत आहेत.

 

आज रोजी सांयकाळी 5 वाजेपर्यंत उपलब्ध असलेल्या खाटांची संख्या पुढील प्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे 15, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 8, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड येथे 12 खाटा उपलब्ध आहेत.

 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 4 लाख 76 हजार 4

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 3 लाख 33 हजार 210

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 66 हजार 600

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 51 हजार 385

एकुण मृत्यू संख्या-1 हजार 230

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 77.15 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-39

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-99

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-373

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-13 हजार 724

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-211.

00000

  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर करण्यात आली असून उर्वरित याद्या लवकरच...