Sunday, April 12, 2020

विशेष लेख :

दि. 12 एप्रिल 2020

देणाऱ्याचे हात हजार..... गरजू गोर गरीब लोकांसाठी
स्वयंसेवी संस्था,  विविध दानशूर यांनी केली भरभरुन मदत
नांदेड जिल्ह्यात  गरजू व्यक्ती / गटांतील  लोकांसाठी स्वयंसेवी संस्था, विविध दानशूर यांनी पुढे येवून मदत  केली आहे. यामध्ये तयार  जेवणधान्याचे किट यांचा समावेश आहे. जिल्ह्यात यामध्ये गरजू व्यक्ती/गटांना करण्यात आलेल्या मदतीचे हात देणाऱ्याचे स्वयंसेवी संस्थेचे / व्यक्तींचे नावपुढीलप्रमाणे आहेत. अर्धापूर तालुका : मारोती मंदीर संस्था (जेवण) अर्धापूर शहर (300), श्री सचखंड गुरुद्वारा नांदेड (जेवण) 3500 अर्धापूर शहर (200), शशिकांत क्षिरसागर (जेवण) अर्धापूर शहर (150), शिवभोजन (जेवण) अर्धापूर शहर (107), एकुण 757. भोकर तालुका : एक हात मदतीचा संवेदनाच्या जागृतीचा संस्था (जेवण) भोकर शहर (110), शिवभोजन (जेवण) भोकर शहर (101), एकुण 211. बिलोली तालुका : तनुबाई सावळे पत्रकार मंडळ (जेवण) बिलोली (350), शिवभोजन (जेवण) बिलोली (105), एकुण 405. देगलूर तालुका : भाजपा पक्षाच्यावतीने अशोक गंदपवार व व्यंकटेश पबीतवार (खिचडी वाटप) वडारगल्लीलमाणीगल्ली देगलूर (450), देगलूर नगराध्यक्ष श्रीमोगलाजी शिरसेटवार (जेवण) देगलूर शहर (104), हनुमान सेवा मंडळ देगलूर तुळशीराम संगमवार (जेवण) देगलूर शहर (400), पालकमंत्री अशोक चव्हाणआमदार रावसाहेब अंतापूरकर (राशन किट) देगलूर शहर (800), गुरुद्वारा (लंगर) वन्नाळी ता. देगलूर (110), तहसिलदार देगलूर (जेवण) कॅम्प (116), शिवभोजन (जेवण) देगलूर शहर (96), एकुण हजार 76. धर्माबाद तालुका : काकानी परिवार धर्माबाद (खिचडी वाटप) नगरपरिषद धर्माबाद (2700), शिवभोजन (जेवण) नगरपरिषद धर्माबाद (100), एकुण हजार 800.  हदगाव तालुका :  भारती एकता ग्रुप हदगाव मुफ्ती अजीज खान व इतर (जेवण) हदगाव (750), हम फाउंडेशन ग्रुप हदगाव शेख शकील रहीमत खान (राशन किट) हदगाव (80), जयेदव भक्त मंडळ बाळासाहेब देशमुख व माधवजी ताबरे (राशन किट) हदगाव (55), तहसिलदार हदगाव (जेवण) कॅम्प (188), शिवभोजन (जेवण) हदगाव शहर (107), एकुण हजार 180. हिमायतनगर तालुका : शिवभोजन (जेवण) हिमायतनगर शहर (95), एकुण 95. कंधार तालुका : संजय शिक्षण संस्था कंधार संजय भोसीकर (राशन किट) कंधार शहर (29), वरद बहुद्देशीय संस्था कुरुळा (खिचडी वाटप) हमुमान चौक कुरुळा (45), स्वाभीमानी बहुद्देशीय संस्था कंधार (खिचडी वाटप) कंधार शहर (80), बसवराज सेवाभावी संस्था (जेवण) कंधार शहर (75), सौ. आशाताई शिंदे (राशन किट) नवरंगपुरा व नवीन वसाहत (35), कै. बालाजीराव पाटील तोरणे सेवाभावी संस्था उमरज कंधार (खिचडी वाटप) कंधार शहर (97), जनाई बहुउद्देशीय सेवाभावी संस्था कंधार (राशन किट) सिद्धार्थनगर प्रियदर्शनी नगर (31), श्रीसंत नामदेव महाराज संस्था उमरज (खिचडी वाटप) पोलीस स्टेशन व तहसिल कार्यालय कंधार (511), पद्मीनी बहुउद्देशीय सेवभावी संस्था कंधार (खिचडी वाटप) कंधार शहर (85), श्रीसंत नामदेव महाराज संस्था बारुळ (खिचडी वाटप) कंधार शहर (325), शिवशंकर काळे (जेवण) पोलीस स्टेशन उस्माननगर (31), कै. नरहरराव गांजरे प्रतिष्ठान ता. कंधार (खिचडी वाटप) कंधार शहर (45), शिवभोजन (जेवण) कंधार शहर (21), एकुण हजार 410. किनवट तालुका : प्रदीप चाडावार (जेवण) शिवाजी मंगल कार्यालय किनवट (38), अशिष सेवाभावी संस्था गोकुंदा (जेवण) किनवट तालुका (40), विजय पेटकुले (जेवण) किनवट तालुका (22), आरएसएस व विश्व हिंदु परिषद किनवट (राशन किट) किनवट शहर व गोकुंदा (152), फय्याज फ्रुट कंपनी किनवट (जेवण) मांडवा रोड किनवट (33), मो. युसुफ मो. हाजी व इतर (राशन किट) गोकुंदा (250), साजीद खान (राशन किट) किनवट शहर व गोकुंदा (500), शिवभोजन (जेवण) किनवट शहर व गोकुंदा (101), एकुण हजार 136. लोहा तालुका : व्यापारी असोसिएशन लोहा (गहू) मो. लोहा (168), बालाघाटी मित्र मंडळ लोहा (तांदुळ) मारतळा (119), गोविंदराव विभूती रायवाडीकर (ज्वारी) पोखरभोसी (27), सार्वजनिक बांधकाम विभाग लोहा (तेलसाबणनिरमापावडर) गोपाळवाडी व सोनखेड (20), सार्वजनिक बांधकाम विभाग लोहा (गहू) पोखरभोसी (27) शिवभोजन (जेवण) लोहा शहर (101), एकुण 462. माहूर तालुका : तिवसकर भोजनालय संजय तिवसकर (जेवण) माहूर शहर (270), पत्रकारसंघ माहूर अनिल वाघमारे (जेवण) माहूर शहर (270), मल्हार शिवरकर (खिचडी) सिंदखेड / चौफुली (61), रेणुकादेवी संस्था माहूर योगेश साबळे (जेवण) माहूर शहर (78), रेणुकादेवी कृषक समिती श्री मोहिते (खिचडी) बाजारओळ (72), दत्तात्रय शिखर संस्थान माहूर भागवत मस्के (खिचडी) दर्गाजवळ (35), देवदेवेश्वरी संस्थान माहूर (केशव नेटके) (जेवण) नई आबादी (25), शिवभोजन (जेवण) माहूर शहर (61), एकुण 872. मुखेड तालुका : मुस्लीम समाज मुखेड इस्माईल बागवान शेख (धान्य किट) मुखेड (200), सुरेश पंडीलवार (धान्य किट) हाळणी (12), हेमंत खंकरे (धान्य किट) मुक्रमाबाद (80), शिवभोजन (जेवण) मुखेड शहर (108), एकुण 400. मुदखेड तालुका : गजानन शिक्षण प्रसारक मंडळ (जेवण) मुदखेड शहर (70), हॅपी क्लब मंडळ मुदखेड (खिचडी वाटप) मुदखेड शहर (125). माता साहिब गुरुद्वारा मुगट (जेवण) रेल्वे स्टेशन परिसर (40), महात्मा फुले सेवभावी संस्था गऊळ ता. कंधार (भाजीपाला) वसंतनगर व भिमनगर परिसर (200), शिवभोजन (जेवण) मुदखेड शहर (100), एकुण 535. नायगाव तालुका : भाजपा माणिकराव लोहगावे (राशन किट) कुंचेली टाकळी बु (15), समाज कल्याण नांदेड (राशन किट) नायगाव (100), शिवभोजन (जेवण) नायगाव शहर (101), एकुण 216. नांदेड तालुका : लॉयन्स क्लब नांदेड (जेवण) एसपी कार्यालय वजिराबाद पोलीस स्टेशन व शहरातील विद्यार्थी (650), फारुख अहेमद (राशन किट) खडकपुरा (100), रोटरी क्लब नंदीग्राम (जेवण) कल्याणनगर तरोडा (200), पुज्य सिंधी पंचायत नवयुवक सिंधी युवामंच (जेवन) नांदेड शहर परिसर (1300), साईबाबा पालकी ग्रुप सिडको नांदेड गणेश जैस्वाल (खिचडी / पोहे) मालटेकटी परिसर नांदेडलोकमान्य मंगल कार्यालयश्रीकृष्ण मंगल कार्यालय नांदेड (400), ओमप्रकाश पोकर्णा मित्र मंडळ (जेवण) नांदेड शहर परिसर (300), लॉयन्स क्लब नांदेड (जेवण) एसपी कार्यालय वजिराबाद पोलीस स्टेशन व शहरातील विद्यार्थी (650), नांदेड युथ मेमोन कमिटी (एवायएमसी) (खिचडी वाटप) नांदेड शहर परिसर (3500), गुरुद्वारा लंगर साहिब (जेवण) सर्व शहर (3500 हजार)श्री स्वामी समर्थ मंदीर व अन्नछत्र सोमेश कॉलनी नांदेड (जेवण) नांदेड शहर परिसर (हजार 300), पुज्य सिंधी पंचायत नवयुवक सिंधी युवा मंच (जेवण) नांदेड शहर परिसर (हजार)नांदेड तहसिलदार (जेवण) कॅम्प (83), शिवभोजन (जेवण) नांदेड शहर परिसर (हजार 2), एकुण 10 हजार 185. उमरी तालुका : व्यापारी महासंघ उमरी (व्हेज पुलाव) उमरी (250), उद्धव मोहनराव मामडे (खिचडी) धानोरा बु (80), दिनंबर महाजन (राशन किट) कारला (21), शिवभोजन (जेवण) उमरी शहर (101), एकुण 452 असून शुक्रवार 10 एप्रिल 2020 पर्यंत नांदेड जिल्हा प्रशासनाकडे या मदतीची नोंद केली आहे. याव्यतिरिक्त काही वेगवेगळ्या स्वरुपात मदत केली असल्याची माहिती नोडल अधिकारी तथा अपर जिल्हाधिकारी खुशालसिह परदेशी यांनी दिली आहे. 
मीरा ढास 
प्र. जिल्हा माहिती अधिकारी नांदेड
*******

Saturday, April 11, 2020

कोरोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी
माजी सैनिकांनी मोहिमेत सहभागी व्हावे
नांदेड दि. 11 :- कोरोना विषाणू (कोव्हिड-19) चा प्रादूर्भाव रोखण्यासाठी शासन मोहिमेत सैन्य सेवेचा प्रदिर्घ अनुभव असलेले विविध पदावर सेवा केलेल्या व निवृत्त झालेल्या सर्व माजी सैनिकांना आवाहन करण्यात येते की,  या मोहिमेत स्वइच्छेने सहभाग नोंदवावा,  असे आवाहन  जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी  नांदेड यांनी केले आहे.  
कोरोना विषाणू (कोव्हिड-19) चा प्रादूर्भाव रोखण्याच्या शासनाच्या मोहिमेत सहभागी होणेसाठी मा .मुख्यमंत्री महोदयांनी माजी सैनिकांना सहभाग घेण्यासाठी आवाहन केलेले  आहे.   त्या अनुषंगाने सैनिक कल्याण विभाग पुणे यांनी  निर्देशित केल्याप्रमाणे जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय नांदेड हे जिल्हयातील इच्छूक माजी सैनिकांची यादी तयार करत आहे.   
सैन्य सेवेचा प्रदिर्घ अनुभव असलेले विविध पदावर सेवा करून निवृत्त झालेल्या सर्व माजी सैनिकांना आवाहन करण्यात येते की,  या मोहिमेत स्वेच्छेने सहभाग नोंदवावा.  प्रामुख्याने जे माजी सैनिक आर्मी मेडीकल कोर मधून निवृत्त झाले आहेत ज्यांना नर्सींग व पॅरामेडीकल सेवेचा तसेच रुग्णवाहिका चालविण्याचे अनुभव आहे त्यांनी  आपली सहमती द्यावी,  तसेच इतर  माजी  सैनिकांनीसुद्वा व्यवस्थापन व अनुशासनसाठी सेवा देणेसाठीचे पुढे येवून नाव नोंदविण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी नांदेड यांनी केले आहे.  माजी सैनिक हे 60 वर्षे खालील असोवेत व मेडीकल फिटनेस SHAPE1 असावे,   करिता जिल्हयातील सर्व माजी सैनिक संघटना व इच्छूक माजी सैनिकांनी मोबाईल क्रमांक 9403069447 (व्हॉटस ॲप) व मोबाईल क्रमांक  8379060837 वर यादी  ज्यामध्ये माजी सैनिकांचे पद, नाव, सध्या राहण्याचे ठिकाण, मोबाईल क्रमांक इत्यादी पाठवावे व दुरध्वनीद्वारे नावे नोंदवावी, असेही आवाहन  जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी  नांदेड यांनी केले आहे.  

00000

विशेष लेख :-

लॉकडाऊनच्या काळात प्रशासनातील संवेदनशील अधिकाऱ्यांनी तिला मिळवून दिला निवारा...*उदयपूर ऐवजी नांदेडला पोहचली होती महिला..

नांदेड जिल्हा प्रशासनातील संवेदनशील अधिकारी व कर्मचारी यांच्या समयसूचकते मुळे एका परप्रांतीय मतिमंद असलेल्या महिलेला मिळाला हक्काचा निवारा. नुसता निवाराच नव्हे तर लॉकडाउन नंतर तिला तिचे हक्काचे घर मिळणार आहे. असे प्रयत्न जिल्हा प्रशासन करीत आहे,
कोरोना साथ रोगाच्या नियंत्रणासाठी जागोजागी पोलिसांनी चेक पोस्ट लावले आहेत. नांदेड जिल्ह्यातील सर्वच महत्त्वाचे रस्ते पोलिसांच्या व जिल्हा प्रशासनाच्या नजरेखाली आहेत. तणाव, सततची धाव पळ चालू असलेल्या या लॉकडाऊनच्या धामधुमीत नांदेड हैदराबाद रस्त्यावरील कुंटूर ते नायगाव या मार्गावर एक महिला अनवाणी फिरत असल्याचे कुंटूर पोलीस स्थानकाचे पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक शेख यांच्या लक्षात आले. त्यांनी तात्काळ त्या महिलेला ताब्यात घेतले व ही बाब वरिष्ठ स्तरावर कळवण्यासाठी नांदेड येथे पोलीस नियंत्रण कक्ष तसेच जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक श्री प्रशांत देशपांडे यांना कळवले. देशपांडे यांनी त्यांच्या व्यस्ततेत देखील कसलाही विलंब न करता ही बाब जिल्हा प्रशासनाच्या लक्षात आणून दिली. जिल्ह्यातील तसेच परप्रांतीय कोणीही व्यक्ती लॉकडाऊनच्या काळात उपाशी व निवाऱ्या व्यतिरिक्त रहाता कामा नये असे तळमळीने काम करणारे जिल्हाधिकारी डॉ. विपीन व त्यांच्या टीम करीत आहे.त्याचा प्रत्यय येथेही या महिलेच्या निवारा आणि खाण्याची सोय केल्याने आला.
अतिरिक्त जिल्हाधिकारी खुशालसिंग परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, उप जिल्हाधिकारी प्रशांत शेळके, प्रशासन अधिकारी राजेंद्र चव्हाण, मीडिया सेलचे डॉ.दीपक शिंदे यांनी तातडीने लक्ष घातले.या नंतर हसीलदार नांदे यांच्याशी संपर्क केला आणि नायगाव न. पा चे मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे यांना या महिलेची काळजी घेण्याच्यासंदर्भात सुचना दिल्या.
राजस्थान मधील उदयपूर येथील सबरुन निसाबेगम असे या 55 वर्षीय महिलेचे नाव असून नायगाव येथील कॅम्प मध्ये व नंतर आता समाज कल्याणच्या वसतिगृहात तिला निवारा व भोजन याची सोय करण्यात आली आहे. नायगाव चे पत्रकार चाऊस व वसतिगृहाचे चव्हाण हे तिच्या भोजन व इतर सुविधाची काळजी घेत आहेत. ही महिला चुकून नांदेड येथे आलेली आहे. उदयपूर येथील ही महिला अजमेर येथे दर्शन घेण्यासाठी गेली होती तेथे चुकून ती नांदेडला येणाऱ्या रेल्वेत बसली आणि सरळ नांदेड येथे आली. नांदेड येथून नायगाव पर्यंत कशी पोहचली हे तिला सांगता येत नाही परंतु तिच्याकडे असलेल्या कागदपत्रांच्या व ओळख पत्राच्या आधारावर तिची ओळख पटवण्यात प्रशासनाला यश आले. अधिकाऱ्यां कडून या महिलेच्या नातेवाईकाकडे संपर्क केला जात असून लॉकडाऊन कालावधी संपल्यानंतर तिला तिच्या नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात येणार आहे.
जिल्ह्यामध्ये असलेल्या इतर जिल्ह्यातील मजूर, कामगार तसेच नागरिक यांना निवारा, निवास व अन्न यांची सोय करण्याचा जिल्हा प्रशासन कसोसीने प्रयत्न करत आहे. माहिती मिळताच त्या ठिकाणी पोहचण्याचा प्रयत्न केला जात आहे. या साठी दानशूर व्यक्ती व सामाजिक संस्था यांची मदत घेतली जात आहे.
लॉकडाऊन च्या काळात या महिलेला निवारा तर मिळाला आहे परंतु नंतर तिला तिचं घर पाहायला मिळणार आहे. हे घडले ते केवळ सतर्क प्रशासन व माणुसकी मुळेच.
.......
**डॉ दीपक शिंदे
संचालक
माध्यम संकुल तथा सदस्य
मीडिया कक्ष,
जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड
लॉकडाऊन च्या काळात प्रशासनातील संवेदनशील अधिकाऱ्यांनी तिला मिळवून दिला  निवारा...
उदयपूर ऐवजी नांदेडला पोहचली होती महिला.. 
 
डॉ दीपक शिंदे 
संचालक 
माध्यम संकुल तथा सदस्य
मीडिया कक्ष, 
जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड

आरोग्‍य विभागाच्‍या चार टिम व थर्मलगनद्वारे
तीन दिवसांच्या कालावधीत 3 हजार 755 भाविकांची तपासणी
नांदेड दि. 11 :- दिनांक 5 एप्रिल 2020 ते 7 एप्रिल 2020 या तीन दिवसांच्या कालावधीत गुरुद्वारा लांगर साहिब नागिना घाट रोड येथील गुरूद्वारा मधील 3 हजार 755 भाविकांची नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका आरोग्य विभागाच्या 4 टिमद्वारे थर्मल गनद्वारे तपासणी करण्यात आली. तपासलेल्या सर्व भाविकांचे टेंपरेचर साधारण होते त्यांना कसलेही प्रकारचा ताप सर्दी खोकला नव्हता. या भाविकांचे लंगर साहेब येथील हा मोठ्या इमारतीमध्ये वास्तव्य आहे. त्यांना रूममध्ये क्वारन्टाईन मध्ये राहण्याच्या सूचना देण्यात आले आहेत असे वैद्यकीय अधिकारी नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका नांदेड यांनी कळविले आहे.
00000

कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी कापूस विक्रीसाठी
लिंकवर नोंद करून कापूस विक्री करावी 
नांदेड,दि.11 :- नांदेड जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना कापूस विक्री करण्यासाठी या लॉकडाऊनच्या काळामध्ये अडचणी येत होत्या. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे याबाबतीत विचारणा केली होती. कापूस उत्पादक शेतकऱ्यांना या लॉकडाऊनच्या काळात त्यांच्याकडील उपलब्ध कापूस विक्री करण्यासाठी एक लिंक तयार करुन देण्यात आली असून या लिंकचा वापर करुन कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्याकडील उपलब्ध कापसाची नोंद या लिंकवर करावी. जेणेकरून कापूस संकलन केंद्रावर त्यांचा कापूस विक्रीसाठी स्विकारण्यात येईल.
सदर लिंकची माहिती तलाठी कृषी सहाय्यक या क्षेत्रीय कर्मचाऱ्यांमार्फत त्या त्या गावातील शेतकऱ्यांना सरपंचांना पोलीस पाटील यांना व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना देण्याबाबत क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना आदेशित केले असून या लिंकवर नोंदणी केल्यानंतर कापूस उत्पादक शेतकऱ्यांना आपला कापूस विक्री करण्यासाठी सोयीचे होईल.  
कंधार व लोहा तालुक्यातील शेतकऱ्यांना कापूस विक्रीसाठी नांदेड आणि नायगाव या कापूस संकलन केंद्रावर कापूस विक्री करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. जिल्ह्यातील इतर तालुक्यातही अशा पद्धतीने https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSeEQfYAAhXbiMJMiQj6CuT2vL0uDw6Xeq1eUc228fwJ4kuw0A/viewform लिंक उपलब्ध करून देण्यात आली असून या लिंकचा वापर करून शेतकऱ्यांनी आपली नोंदणी या लिंकवर करायची आहे.
00000

उपजिल्‍हा रुग्‍णालय, ग्रामीण रुग्‍णालयात
ताप तपासणी केंद्र कार्यान्वित
नांदेड दि. 11 :-  नांदेड जिल्‍हा रुग्‍णालयाच्‍या अधिनस्‍त सर्व उपजिल्‍हा रुग्‍णालय, ग्रामीण रुग्‍णालय येथे जिल्‍ह्यात 17 ताप तपासणी केंद्र कार्यान्वित करण्‍यात आलेले आहेत.
      जिल्‍हा रुग्‍णालय नांदेड,उपजिल्‍हा रुग्‍णालय, मुखेड, उपजिल्‍हा रुग्‍णालय, देगलूर, उपजिल्‍हा रुग्‍णालय, हदगाव, उपजिल्‍हा रुग्‍णालय, गोकुंदा तर ग्रामीण रुग्‍णालय भोकर, धर्माबाद, बिलोली, हिमायत नगर, कंधार, मांडवी, लोहा, माहूर, बारड,मुदखेड, नायगाव, उमरी जिल्‍ह्यात 17 ठिकाणी ताप तपासणी केंद्र कार्यान्वित करण्‍यात आली असल्‍याचे जिल्‍हा शल्‍य चिकित्‍सक कार्यालय सामान्‍य रुग्‍णालय नांदेड यांनी कळविले आहे. 
000000

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ #शेतकरीकर्जमुक्ती #कर्जमुक्तीयोजना२०२६ #महाराष्ट्रशासन #शेतकरी Maharashtra DGIPR ...