Friday, September 26, 2025

 वृत्त क्रमांक 1014

२७ सप्टेंबर रोजी ऑरेंज अलर्ट 

नांदेड दि. २६ सप्टेंबर:- प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी २६ सप्टेंबर २०२५ रोजी दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी २६ सप्टेंबर २०२५ या दिवसासाठी यलो अलर्ट जारी केलेला आहे. तर  २७ सप्टेंबर २०२५ या दिवसासाठी ऑरेंज (Orange) अलर्ट जारी केलेला आहे. 

दि.२६ सप्टेंबर २०२५ या दिवशी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी ताशी ३० ते ४० किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची, विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह मुसळधार स्वरूपाचा व २७ सप्टेंबर २०२५ रोजी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची अधिक शक्यता वर्तविली आहे. या नैसर्गिक आपत्ती संदर्भात सर्व संबंधित यंत्रणा आणि जनतेने खबरदारी घ्यावी. असे आवाहन जिल्हाप्रशासनाने केले आहे.

या गोष्टी करा :

विजेच्या गडगडाटासह पावसाची पूर्वकल्पना असल्यास बाहेर जाणे टाळा. जर मोकळ्या जागेत असाल आणि जवळपास कुठल्याही सुरक्षित इमारतीचा आसरा नसेल तर सखल जागेत जाऊन गुडघ्यात डोके घालून बसा.

आकाशात विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्या. घराच्या बाल्कनी, छत अथवा घराबाहेरील ओट्यावर थांबू नका.

आपण घरात असाल आणि घरातील विद्युत उपकरणे चालू असतील तर त्या वस्तू त्वरित बंद करा.

तारांचे कुंपण, विजेचे खांब व इतर लोखंडी वस्तूंपासून दूर रहा.

पाण्यात उभे असाल तर तात्काळ पाण्यातून बाहेर पडा.

या गोष्टी करु नका: 

आकाशात विजा चमकत असल्यास घरातील लँडलाईन फोनचा वापर करू नका. शॉवरखाली अंघोळ करू नका. घरातील बेसिनचे नळ, पाण्याची पाईपलाइन यांना स्पर्श करू नका तसेच कुठल्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नका.

विजेच्या गडगडाटासह वादळी वारे चालू असताना लोखंडी धातूच्या सहाय्याने उभारलेल्या तंबूमध्ये किंवा शेडमध्ये आसरा घेऊ नका.

उंच झाडाच्या खाली आसरा घेऊ नका.

धातूंच्या उंच मनोऱ्याजवळ उभे टाकू नका.

जर आपण घरात असाल तर उघड्या दारातून अथवा खिडकीतून वीज पडताना पाहू नका. हे बाहेर थांबण्याइतकेच धोकादायक आहे.

 0000

वृत्त क्रमांक 1013

दिव्यांग लाभार्थ्यांनी ‘५ टक्के सेस’ योजनेचा लाभ घ्यावा – जिल्हा समाज कल्याण अधिकारी

नांदेड, दि. 26 सप्टेंबर : नांदेड जिल्ह्यातील ग्रामीण भागातील दिव्यांग लाभार्थ्यांनी जिल्हा परिषदेच्या जि.प. ५ टक्के सेस दिव्यांग व मागासवर्गीय कल्याण निधी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा समाजकल्याण अधिकारी सतेंद्र आऊलवार यांनी केले आहे.

जिल्हा परिषद नांदेड अंतर्गत सन 2025-26 या वर्षात दिव्यांग कल्याण व पुनर्वसन (जि.प. ५ टक्के सेस) तसेच मागासवर्गीय कल्याण निधी योजना राबविल्या जात आहेत. यासाठी लाभार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक असून, यासाठी mhdivyang.com (नांदेड दिव्यांग मित्र व 20 टक्के मागासवर्गीय अनुदान योजना) ही संकेतस्थळ विकसित करण्यात आली आहे.

पंचायत समित्यांअंतर्गत असलेल्या दिव्यांग व मागासवर्गीय लाभार्थ्यांनी ऑनलाईन फॉर्म भरून, सर्व आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून प्रस्ताव 15 ऑक्टोबर 2025 पर्यंत संबंधित कार्यालयास फॉरवर्ड करावेत.

या योजनेअंतर्गत दिव्यांगांना त्यांच्या टक्केवारीनुसार प्राधान्याने (100 टक्के ते 40 टक्के अशा उतरत्या क्रमाने) लाभ देण्यात येणार आहे, अशी माहितीही समाजकल्याण विभागामार्फत देण्यात आली आहे.

00000

 वृत्त क्रमांक 1012

1 ऑक्टोंबर रोजी जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाचे आयोजन

नांदेड दि. 26  सप्टेंबर :- जागतिक ज्येष्ठ नागरिक दिवसाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्गंत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण नांदेड, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ, फेस्कॉम मराठवाडा प्रादेशिक विभाग, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने 1 ऑक्टोबर रोजी सकाळी 10.30 वा. जागतिक ज्येष्ठ नागरीक दिन कार्यक्रम नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे साजरा करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांसाठी कायदे व योजनाविषयक बाबींची माहिती, वृध्दांचे हक्क, जेष्ठ नागरिकांना देण्यात येणाऱ्या सोयी-सुविधा, नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन इत्यादीबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे उदघाटक जिल्हाधिकारी व अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव व प्रमुख उपस्थिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, मनपा आयुक्त, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा अग्रणी बँकेचे मुख्य व्यवस्थापक यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.

या कार्यक्रमास जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे व महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ (फेस्कॉम)चे उपाध्यक्ष अशोक तेरकर यांनी केले आहे.   

00000

 वृत्त क्रमांक 1011 

राज्यमंत्री  मेघना साकोरे-बोर्डीकर यांचा दौरा    

नांदेड दि. 26 सप्टेंबर :- राज्याच्या  सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, पाणीपुरवठा आणि स्वच्छता, ऊर्जा, महिला व बालविकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर 27 सप्टेंबर, 2025 रोजी नांदेड जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील.

शनिवार 27 सप्टेंबर 2025 रोजी सायं.5.30. वा. परभणी येथून नांदेडकडे प्रयाण. रात्री 7.30 वा.नवयुवक दुर्गा मंडळ शिवाजीनगर येथे भेट.  रात्री. 8.15 वा. बियाणी डेव्हलपर्स नवरात्री निमित्त आयोजित कार्यक्रमास उपस्थिती. ठिकाण आशीर्वाद नगर, छत्रपती चौकाजवळ नांदेङ रात्री 9 वा. आशीर्वाद नगर, छत्रपती चौकाजवळ नांदेड येथून परभणी कडे प्रयाण करतील.  

0000

 वृत्त क्रमांक 1010 

श्री गुरूगोबिंदसिंघजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत अंत्योदय दिन साजरा

नांदेड, दि. २६ सप्टेंबर : राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये विद्यार्थ्यांना तांत्रिक ज्ञानासोबत सामाजिक जबाबदारी, अधिकार व कर्तव्यांविषयी मार्गदर्शन मिळावे या उद्देशाने कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभातजी लोढा यांच्या संकल्पनेतून दर महिन्याला सामाजिक प्रबोधनपर कार्यक्रम घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

त्या अनुशंगाने श्री गुरूगोबिंदसिंघजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नांदेड येथे २५ सप्टेंबर २०२५ रोजी पंडित दिनदयाळ उपाध्याय यांची जयंती “अंत्योदय दिन” म्हणून उत्साहात साजरी करण्यात आली.

या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते सामाजिक कार्यकर्ते प्रवीण साले होते. त्यांनी एकात्म मानवदर्शन या संकल्पनेविषयी मार्गदर्शन करताना सांगितले की, शरीर, मन, बुद्धी व आत्मा यांचे संयम, समर्पण आणि कर्तव्यभावना यांसह समष्टी, सृष्टी आणि परमेष्ठी यांचे अखंड अवधान ठेवून चालणारे जीवन म्हणजेच एकात्म मानवदर्शन होय.

संस्थेचे प्राचार्य एस. व्ही. सुर्यवंशी यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली. त्यांनी आपल्या भाषणात समाजाच्या प्रगतीसाठी कार्य करणाऱ्या महापुरुषांची जयंती साजरी करणे ही त्यांच्या कार्याला अभिवादन करण्याची संधी असल्याचे नमूद केले.

जिल्हा उद्योग केंद्राचे निरीक्षक सतीश चव्हाण यांनी उद्योगासंदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी रा.से. योजनेमार्फत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. संस्थेतील कर्मचारी व प्रशिक्षणार्थ्यांनी उत्साहाने रक्तदान केले.

या कार्यक्रमासाठी पत्रकार कृष्णा उमरीकर, हर्षद शहा, प्रेमानंदजी शिंदे, धीरज बिडवे (व्यवस्थापन समिती सदस्य), मनोज जाधव (सामाजिक कार्यकर्ते), सुधीर एकलारे (सामाजिक कार्यकर्ते, देगलूर) तसेच सर्व कर्मचारी व प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डी. ए. पोतदार (रा.से. योजना कार्यक्रमाधिकारी) यांनी केले. आभार व्ही. पी. भोसीकर (गटनिदेशक) यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेतील सर्व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

०००००



Thursday, September 25, 2025


 

 वृत्त क्रमांक 1009 

मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन जाणून घेतल्या व्यथा

 

एकही बाधित शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही

 

शेतकऱ्यांना जास्तीतजास्त मदत देण्यासाठी प्रयत्न करणार

-  मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड

 

हदगावअर्धापूरनांदेडलोहा तालुक्यातील नुकसान झालेल्या पिकांची केली पाहणी 

नांदेड जिल्ह्यात झालेल्या नुकसानीचा घेतला आढावा

 

नांदेडदि. 25 सप्टेंबर :- नांदेड जिल्ह्यात आतापर्यंत तीन वेळा अतिवृष्टीग्रस्त पाऊस होऊन शेतीरस्तेपुल यांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे.  नुकसानीची जास्तीतजास्त मदत शेतकऱ्यांना त्वरीत मिळून देणार असल्याची ग्वाही राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी दिली.

 

नांदेड जिल्ह्यात हदगावअर्धापूरनांदेडलोहा तालुक्यातील  शेतकऱ्यांच्या बांधावर प्रत्यक्ष जाऊन मंत्री संजय राठोड यांनी आज पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या व धीर दिला. एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाहीअसे अश्वस्त केले. यावेळी आमदार बालाजी कल्याणकरआमदार बाबुराव पाटील कोहळीकरआमदार आनंद पाटील बोंढारकरजिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

 

जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील धानोराअर्धापूर तालुक्यातील चिंचबननांदेड तालुक्यातील नांदुसालोहा तालुक्यातील शेवडीभेंडेगाव या गावातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतीची पाहणी श्री. राठोड यांनी केली. शेतकऱ्यांच्या समस्याअडचणी शासन स्तरावर मांडून त्यांना जास्तीत जास्त मदत कशी मिळेल यासाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी लोहा तालुक्यातील खराब झालेल्या पुलविहिरीरस्ते याचीही पाहणी केली.

 

जिल्ह्यात झालेल्या नुकसानीचा घेतला आढावा

जिल्ह्यात ऑगस्टपासून आतापर्यंत तीन वेळा अतिवृष्टी झाली आहे. तसेच गोदावरी नदीत मोठ्याप्रमाणात विसर्ग सुरु असून यामुळे शहरातील सखल भाग पाण्याखाली जाऊन अनेक घरात पाणी शिरले आहे. यामुळे 450 लोकांना सुरक्षीतरित्या निवाऱ्यात हलवले आहे. गोदावरी नदीच्या बॅकवाटरमुळे शेतीचे बरेच नुकसान जिल्ह्यात काही गावांमध्ये झाले आहे. या सर्व बाबींचा आढावा श्री. राठोड यांनी जिल्हा प्रशासनाकडून आज जिल्हा नियोजन भवन येथे आयोजित बैठकीत घेतला.

 

यावेळी आमदार बालाजी कल्याणकरआमदार बाबुराव पाटील कोहळीकरआमदार आनंद पाटील बोंढारकरजिल्हाधिकारी राहुल कर्डिलेमनपा आयुक्त डॉ. महेश डोईफोडेसहायक जिल्हाधिकारी जेनित चद्रा दोन्तुला यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी नुकसानीच्या मदत जाहीर झालेल्या याद्या प्रत्येक गावात प्रसिद्ध करा. खचलेल्या व बुजलेल्या विहिरींचा अहवाल शासनाला पाठवा. शहरात पाणी शिरलेल्या घरांचे पंचनामे तात्काळ करुन पात्र लोकांना आठवडाभरात मदत करा. शेतकऱ्यांचा वीज पुरवठा पुर्वरत करण्यावर प्राधान्याने भर द्या. पुराच्या पाण्याचे कायमस्वरुपी नियोजन करण्यासाठी गाळमुक्त धरणगाळ युक्त शिवार योजनेतील कामे प्राधान्याने करण्यावर भर द्या. दुरूस्त व नादुरूस्त झालेल्या रस्त्याचे प्रस्ताव शासनाला पाठवा. मृत जनावरांच्या मदतीबाबतचा प्रश्न लवकरच मार्गी लावाअसे निर्देश मंत्री संजय राठोड यांनी जिल्हा प्रशासनाला दिले.

 

बैठकीत आमदार बालाजी कल्याणकरआमदार बाबुराव कोहळीकरआमदार आनंदराव बोंढारकर यांनी त्यांच्या मतदारसंघातील विविध समस्या सोडवण्याबाबतच्या मागण्या शासनाकडे मांडल्या. जिल्ह्यात ऑगस्ट ते आतापर्यंत झालेल्या अतिवृष्टीचीनुकसानीचीमदतीची माहिती जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी यावेळी सादरीकरणाद्वारे दिली.

00000




















































 










  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर करण्यात आली असून उर्वरित याद्या लवकरच...