मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा…!
Sunday, May 11, 2025
वृत्त क्रमांक 491
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आगमन
Saturday, May 10, 2025
वृत्त क्रमांक 490
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दौरा
नांदेड, दि. 10 मे :- राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे रविवार 11 मे 2025 रोजी नांदेड जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील.
रविवार 11 मे 2025 रोजी मुंबई
येथून विमानाने सकाळी 9.10 वा. श्री गुरू गोविंद सिंघजी विमानतळ नांदेड
येथे आगमन व मोटारीने प्रयाण. सकाळी 9.45 वा. माजी आमदार
मोहनराव हंबर्डे यांच्या निवासस्थानी इंदिरा निवास काळेश्वर रोड विष्णुपूरी येथे
आगमन व राखीव. मोटारीने सकाळी 11.15 वा. कै. मधुकरराव घाटे सहकारी सुतगिरणी
मुखेड येथे आगमन व राखीव. मोटारीने दुपारी 12 वा. मुखेड
तालुक्यातील चव्हाणवाडी (बाऱ्हाळी) येथे आगमन व कार्यकर्ता मेळाव्यास उपस्थिती.
दुपारी 1.30 ते 2.30 वाजेपर्यंत राखीव. दुपारी 3.15 वा. देगलूर येथे शहीद जवान कै. सचिन यादवराव
वनंजे यांच्या घरी सात्वंनपर भेट. नंतर व्यंकटराव पाटील गोजेगावकर यांच्या
निवासस्थानी देगलूर येथे राखीव. सायं मोटारीने नांदेडकडे प्रयाण. सायं. 5.40 वा. श्री गुरू गोविंद सिंघजी विमानतळ नांदेड येथे आगमन व सायं. 5.45 वा. विमानाने मुंबईकडे प्रयाण करतील.
00000
"जोडलेले रहा, सुरक्षित रहा !
आपत्कालीन परिस्थितीत विश्वासार्ह संप्रेषण सेवा अत्यंत महत्त्वाची असते. मोबाइल अलर्टपासून सॅटेलाइट फोनपर्यंत, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून चला, आपण प्रतिसाद देऊया आणि समुदायांना सतत माहिती देत राहूया!""जुड़े रहें, सुरक्षित रहें! आपातकालीन स्थिति में विश्वसनीय संचार सेवाएं महत्वपूर्ण हैं। मोबाइल अलर्ट से लेकर सैटेलाइट फोन तक, आइए प्रौद्योगिकी का उपयोग करके प्रभावी ढंग से प्रतिक्रिया दें और समुदायों को सूचित रखें! #आपातकालीनसंचार
वृत्त क्रमांक 489
विद्युत पुरवठा सुरळीत राहील याची दक्षता घ्या : जिल्हाधिकारी
जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला महावितरणच्या कामांचा आढावा
मान्सूनपुर्व कामे तात्काळ पूर्ण करण्याचे निर्देश
नांदेड, दि. 10 मे :- सध्या नांदेड जिल्ह्याचा पारा 43 अंशाच्या जवळपास असून हवेत प्रचंड उकाडा वाढला आहे. त्यामुळे ग्राहकांची विजेची मागणी वाढली असून पुरवठा कमी पडत आहे. त्यामुळे वारंवार विज पुरवठा बंद पडण्याच्या घटना वाढल्या आहेत. याबाबत महावितरण विभागाने आवश्यक त्या उपाययोजना करुन विद्युत पुरवठा सुरळीत राहील यांची दक्षता घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिले.
आज जिल्हाधिकारी कार्यालयात महावितरण विभागाच्या कामाचा आढावा जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी घेतला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, अधिक्षक अभियंता सुधाकर जाधव, कार्यकारी अभियंता विनय बहादूर, रुमदेव चव्हाण, मंगेश बोरगावकर तसेच महावितरण विभागाच्या अधिकारी कर्मचारी आदीची उपस्थिती होती.
यावेळी मान्सूमपुर्व कामे प्राधान्याने करा, विजेच्या समस्याबाबत ग्राहकांशी, नागरिकांशी सुसंवाद ठेवा. उपकेंद्राची रोहित्र क्षमता वाढविण्याचे व मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 तसेच इतर योजनेअंतर्गत उपकेंद्र रोहित्र वाढविण्याचे कामे प्राधान्याने पूर्ण करा. यंत्रणा अलर्ट मोडवर ठेवा, ग्राहकांचे मोबाईल क्रमांक अपडेट करुन घ्या. उपकेंद्राची रोहित्र क्षमता वाढविण्याचे कामे 10 दिवसांत पूर्ण होतील यांची काळजी घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
तसेच दुरुस्तीचे कामे करताना महावितरणने ग्राहकांची गैरसोय होणार नाही यासाठी मॅसेज पाठवून पुर्वसूचना द्यावी. यामुळे ग्राहकांच्या तक्रारी वाढणार नाहीत. तसेच दुरुस्तीच्या कामासाठी अद्ययावत यंत्राचा वापर वाढवावा. यासाठी आवश्यक त्या साहित्यांची खरेदी करावी अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
नांदेड जिल्ह्यात 1 हजार 725 गावे व 720 वाडीपाडे असून या गावामध्ये महावितरणद्वारे विद्युतीकरण झालेले आहे. तसेच जिल्ह्यात एकूण 6 लाख 29 हजार 147 विज ग्राहक आहेत. या सर्व ग्राहकांना उन्हाळयाच्या पार्श्वभूमीवर विज पुरवठा करताना विजेच्या मागणीनुसार पुरवठा कमी पडत आहे. त्यानुसार महावितरण विभागाकडून उपकेंद्राची रोहित्र क्षमता वाढविण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे ही समस्या लवकरच सुटण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याची माहिती महावितरणचे अधिक्षक अभियंता सुधाकर जाधव यांनी दिली. तसेच यावेळी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0, नवीन उपकेंद्रे मुख्यमंत्री सौर ऊर्जा वाहिनी योजना प्रणाली सुधारणा, नवीन अतिरिक्त उपकेंद्र रोहित्र मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 प्रणाली सुधारणा , एबीडी योजनेअंतर्गत्तच्या प्रस्तावित कामांची माहिती, नवीन उपकेंद्रे, सुधारित वितरण क्षेत्र योजना, वाहिनी विलगीकरण उपाययोजना, सोलार प्रकल्प यातील प्रगतीपथावर असलेल्या कामांची माहिती सादरीकरणाद्वारे दिली.
00000
9.5.2025
वृत्त क्रमांक 488
मान्सूम पूर्व कामे यंत्रणांनी वेळेच्या आत पूर्ण करावी
जिल्हाधिकारी राहुल कर्डीले
नांदेड दि. 9 मे :- मान्सूम काळात उद्भवणाऱ्या नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी संबंधित यंत्रणांच्या विभाग प्रमुखांनी योग्य ती खबरदारी घेऊन मान्सूम पूर्व कामे वेळेच्या आत पूर्ण करावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी दिले. नांदेड जिल्ह्यात गोदावरी नदी आणि इतर लहान-मोठ्या नद्या लक्षात घेता जवळपास 337 गावांना पुरांचा धोका उद्भवू शकतो. जिल्ह्यात आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली तर त्या-त्या भागातून सुरक्षिततेच्या उपाययोजना योग्य पद्धतीने जिल्हा प्रशासनाला हाताळता याव्यात यादृष्टिने सर्व यंत्रणानी दक्षता घ्यावी, असे त्यांनी स्पष्ट केले.
मान्सून 2025 च्या अनुषंगाने पूर्वतयारी आढावा बैठक जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात आज संपन्न झाली, त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस मनपा आयुक्त महेशकुमार डोईफोडे, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, जिल्हा पुरवठा अधिकारी रुपाली चौगुले,जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी कुऱ्हे यांच्यासह परिवहन, सार्वजनिक बांधकाम, पाटबंधारे, महानगरपालिका, आरोग्य, कृषि, महसूल विभाग, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, मृद व जलसंधारण, विद्युत, पोलीस, अग्निशमन, शिक्षण, पशुसंवर्धन, रेल्वे आदी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
पावसाळयात उद्भवणाऱ्या विविध आपत्तींना तोंड देण्यासाठी आणि सावधगिरीच्या उपाययोजनांचा आढावा घेऊन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले म्हणाले, जिल्ह्यात 337 गावे पूरग्रस्त आहेत. या गावात रंगीत तालीम घ्याव्यात. आपत्कालीन परिस्थितीवर मात करण्यासाठी सर्व यंत्रणाची आवश्यक साहित्यांची खरेदी करावी. 24 तास नियंत्रण कक्षाची स्थापना करुन कक्षातील कर्मचाऱ्यांचे मोबाईल क्रमांक अद्यावत करावेत. आरोग्य विभागाने वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी मुख्यालयी उपस्थित राहतील यांचे नियोजन करावे. आदिवासी व ग्रामीण भागात सर्पदंशासह इतर आजारांवरील उपचार स्थानिक ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्रातच करावेत. रुग्णाला औषध उपचारासाठी इतरत्र जाण्याची गरज भासू नये. आरोग्याच्या सुविधा देण्यासाठी आरोग्य पथकांची नियुक्ती करावी. पावसाळयात उत्पन्न होणाऱ्या साथीच्या रोगराईंना थांबविण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात मुबलकपणे औषधी, रक्तसाठा इतर अनुषंगिक साहित्य उपलब्ध करावीत. ब्लिचिंग पावडरची साठवणुक सुरक्षितपणे ठेवून त्याचा योग्य उपयोग करावा, असेही निर्देश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी आरोग्य विभागाला दिले.
शहरातील नाल्याची स्वच्छता करुन घ्यावी. गावांना धोका होऊ नये यादृष्टीने पाझर तलावाची दुरुस्ती करुन गाळ काढावा. शहरातील धोकादायक इमारतीची पाहणी करुन नोटीस देवून नियमानुसार कारवाई करावी. पुर परिस्थितीत नदी काठच्या लोकांचे स्थलांतर करण्यासाठी पर्यायी व्यवस्था करावी. सुरक्षित स्थळे निश्चित करावीत. तसेच महावितरण, जिल्हा पुरवठा कार्यालय, शिक्षण विभाग, पशुसंवर्धण विभाग, कृषि विभाग यांनाही आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याबाबत सूचना दिल्या.
सर्व प्रमुख यंत्रणांनी या मान्सून कालावधीत नियंत्रण कक्ष 24 तास कार्यरत ठेवावीत. पाटबंधारे विभागाने गोदावरी व इतर नदीच्या पाणी पातळीचा धोका, इशारा पातळीबाबत उपाययोजना करतांना सर्व विभागांशी समन्वय ठेवून धरणनिहाय समन्वय अधिकाऱ्यांची नेमणूक करावी. उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी तालुकास्त्रावर मान्सुन पूर्व तयारीची आढावा बैठक घेवून पूर परिस्थिती प्रतिबंधक कामे मान्सून पूर्वी करावीत. आपत्कालिन नियंत्रण कक्षातील शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांचे मोबाईल संपर्क अद्यावत करावीत. वाहन व्यवस्था सुस्थितीत ठेवावी. विजपातामुळे होणारे मृत्यू कमी करण्यासाठी जनजागृती आणि बचाव कार्याचे रंगीत प्रशिक्षण पूर्ण करावेत. नगरपालिका प्रशासनाने शहरातील नाली साफसफाईचे कामकाज युध्द् पातळीवर करावेत. आपत्ती निवारणाची कामे सक्षमपणे पार पाडावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी दिले. निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापनाबाबत करावयाच्या उपाययोजनांची माहिती दिली.
00000
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर करण्यात आली असून उर्वरित याद्या लवकरच...
-
मुद्रण दिन विशेष मुद्रण कलेमुळे ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या मुद्रण कलेचा जनक जो हानेस गुटेनबर्ग यांच्या जन्मदिवसानिमित्त जगभर...
-
वृत्त क्रमांक 974 प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते “ स्वस्थ नारी , सशक्त परिवार ” राष्ट्रीय अभियानाचा शुभारंभ “ स्वस्थ नारी , ...
-
अनुकंपा तत्वावरील नियुक्तीसाठी 192 धारकांची प्रतिक्षा यादी घोषित आक्षेपाबाबत 30 ऑक्टोंबरची मुदत नांदेड , ( जिमाका ) दि. 22 :- ...

.jpeg)

.jpeg)


.jpeg)
.jpeg)
.jpeg)


.jpeg)

.jpeg)

.jpeg)


.jpeg)



.jpeg)

