Tuesday, January 16, 2024

 वृत्त क्र. 49 

शासनाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार 2023 साठी

प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन 

नांदेड, (जिमाका) दि. 16 :- माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा, उत्कृष्ट छायाचित्रकार, समाजमाध्यम आणि स्वच्छता अभियानाबाबत केलेल्या जनजागृतीपर लेखनासाठी पुरस्कार स्पर्धा जाहीर करण्यात येत आहे. या स्पर्धेसाठी दिनांक 1 जानेवारी, 2023 ते 31 डिसेंबर, 2023 पर्यंतच्या कालावधीत प्रसिद्ध झालेल्या लेखन/छायाचित्रे/वृत्तकथा यांच्या प्रवेशिका मागविण्यात येत आहेत. प्रवेशिका पाठविण्याचा अंतिम दिनांक 31 जानेवारी, 2024 असा आहे.

राज्यातील विविध भागातील स्पर्धकांनी संबंधित जिल्हा माहिती कार्यालयाकडून तर मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील इच्छुकांनी, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, तळमजला, हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई-32, येथून विहित नमुन्यातील अर्ज प्राप्त करुन घ्यावयाचे आहेत. अर्जाचे नमुने dgipr.maharashtra.gov.in    www.maharshtra.gov.in तसेच https://mahasamvad.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

 

पुरस्कारांची माहिती

अ.क्र

पुरस्काराचे नाव

पारितोषिक

1.

अटलबिहारी वाजपेयी राष्ट्रीय पत्रकारिता पुरस्कार (राष्ट्रस्तरीय)

1,00,000/- (रुपये एक लाख रोख) (मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक)

2.

बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार (मराठी) (राज्यस्तर)

51 हजार रुपये

(मानचिन्ह  प्रशस्तीपत्र)

3.

अनंत गोपाळ शेवडे पुरस्कार (इंग्रजी) (राज्यस्तर)

 

51 हजार रुपये

(मानचिन्ह  प्रशस्तीपत्र)

4.

बाबूराव विष्णू पराडकर पुरस्कार (हिंदी) (राज्यस्तर)

51 हजार रुपये

(मानचिन्ह  प्रशस्तीपत्र)

5.

मौलाना अबुल कलाम आझाद पुरस्कार(उर्दू) (राज्यस्तर)

51 हजार रुपये

(मानचिन्ह  प्रशस्तीपत्र)

6.

यशवंतराव चव्हाण पुरस्कार

शासकीय गट (मराठी) (माहिती व जनसंपर्क) (राज्यस्तर)

51 हजार रुपये

(मानचिन्ह  प्रशस्तीपत्र)

7.

पु.ल.देशपांडे उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा पुरस्कार(राज्यस्तर)

51 हजार रुपये

(मानचिन्ह  प्रशस्तीपत्र)

8.

तोलाराम कुकरेजा उत्कृष्ट वृत्तपत्र छायाचित्रकार पुरस्कार (राज्यस्तर)

51 हजार रुपये

(मानचिन्ह  प्रशस्तीपत्र)

9.

केकी मूस उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार शासकीय गट (माहिती व जनसंपर्क) (राज्यस्तर)

51 हजार रुपये

(मानचिन्ह  प्रशस्तीपत्र)

10.

समाजमाध्यम पुरस्कार (राज्यस्तर)

51 हजार रुपये (मानचिन्ह  प्रशस्तीपत्र)

11.

स्वच्छ महाराष्ट्र जनजागृती पुरस्कार (राज्यस्तर)

51 हजार रुपये (मानचिन्ह  प्रशस्तीपत्र)

12.

पत्रकार सुधाकर डोअीफोडे अग्रलेखन पुरस्कार (राज्यस्तर)

51 हजार रुपये (मानचिन्ह  प्रशस्तीपत्र)

विभागीय पुरस्कार

13.

दादासाहेब पोतनीस पुरस्कार, (नाशिक विभाग)

 

51 हजार रुपये

(मानचिन्ह  प्रशस्तीपत्र,

या व्यतिरिक्त रुपये 10 हजार दै.गावकरीने पुरस्कृत केले आहेत.)

14.

अनंतराव भालेराव पुरस्कार, (छत्रपती संभाजीनगर आणि लातूर विभाग)

51 हजार रुपये (मानचिन्ह  प्रशस्तीपत्र)

15.

आचार्य अत्रे पुरस्कार, (मुंबई विभाग)

51 हजार रुपये (मानचिन्ह  प्रशस्तीपत्र)

16.

नानासाहेब परूळेकर पुरस्कार, (पुणे विभाग)

51 हजार रुपये (मानचिन्ह  प्रशस्तीपत्र)

17.

शि.म.परांजपे पुरस्कार, (कोकण विभाग)

51 हजार रुपये (मानचिन्ह  प्रशस्तीपत्र)

18.

ग.गो.जाधव पुरस्कार, (कोल्हापूर विभाग)

51 हजार रुपये (मानचिन्ह  प्रशस्तीपत्र)

19.

लोकनायक बापूजी अणे पुरस्कार, (अमरावती विभाग)

51 हजार रुपये (मानचिन्ह  प्रशस्तीपत्र)

20.

ग.त्र्यं.माडखोलकर पुरस्कार, (नागपूर विभाग)

51 हजार रुपये (मानचिन्ह  प्रशस्तीपत्र)

0000

वृत्त क्र. 48

सण-उत्सवात ध्वनी वापराची अधिसूचना निर्गमीत 

नांदेड (जिमाका) दि. 16 :- ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियम 2000 च्या नियम 5 (3) नुसार ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक आदीच्या वापराबाबत श्रोते गृहे, सभागृहे, सामुहिक सभागृहे आणि मेजवाणी कक्ष यासारख्या बंद जागा खेरीज इतर ठिकाणी जिल्ह्याच्या निकडीनुसार सन 2024 साठी पुढील सण, उत्सव काळात 15 दिवस निश्चित करण्यात आले आहेत. या 15 दिवसांत ध्वनीची विहित मर्यादा राखून सकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत सुट जाहिर करण्याची अधिसूचना जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी निर्गमीत केली आहे.  

या अधिसूचनेत म्हटले आहे की, मा. उच्च न्यायालयाने याचिका क्र. 173 / 2010 दि. 16 ऑगस्ट 2016 रोजी दिलेला आदेश / निकालपत्रामध्ये दिलेल्या सूचनांचे पालन करणे बंधनकारक आहे. यामध्ये माळेगाव यात्रा, शिवजयंती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, महाराष्ट्र दिन 1 मे, 2 दिवस गणपती उत्सव (पहिला दिवस व अनंत चर्तुदर्शी), नवरात्री उत्सव (पहिला दिवस व अष्टमी व नवमी) दिवाळी (लक्ष्मीपूजन), ईद-ए-मिलाद, ख्रिसमस, 31 डिसेंबर, उर्वरित 2 दिवस ध्वनी प्राधिकरण तथा जिल्हा पोलीस अधीक्षक नांदेड यांच्या शिफारशी नुसार जिल्ह्यातील महत्वाच्या कार्यक्रमासाठी गरजेनुसार जिल्हाधिकारी यांच्या परवानगीने दिले जाईल. 

या सण उत्सवासाठी ध्वनीवर्धक व ध्वनिक्षेपक वापरण्याबाबतची सूट जिल्ह्यातील शांतता क्षेत्रासाठी लागू नसून त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संबंधित महानगरपालिका आयुक्त, स्थानिक स्वराज्य संस्था व ध्वनी प्रदूषण नियंत्रण प्राधिकरण यांची राहील. ध्वनी प्रदूषण नियंत्रण प्राधिकरण यांनी ध्वनी प्रदूषण नियम 2000 अंतर्गत प्राप्त तक्रारीवर मा. उच्च न्यायालयाने दि. 16 ऑगस्ट  2016 रोजी दिलेल्या आदेशात विहित पद्धतीने कार्यवाही करुन केलेल्या कार्यवाहीचा अहवाल सदर सण उत्सव समाप्तीनंतर लगेच नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावा. ही अधिसूचना नांदेड जिल्ह्यात लागू करण्यात आली आहे.

0000

 

 वृत्त क्र. 47 

नांदेड जिल्हा अपघातमुक्त करण्याचा संकल्प करु या

- अपर पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार 

नांदेड, (जिमाका) दि. 16 :- वाढत्या अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी जिल्हयात यावर्षी हेल्मेटयुक्त व अपघातमुक्त गाव अभियान राबविण्यात येणार आहे. याअनुषंगाने आपण सर्वजण यावर्षी नांदेड जिल्हा अपघातमुक्त करण्याचा संकल्प करु या, असे आवाहन अपर पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी केले. 

यावर्षी रस्ता सुरक्षा अभियान-2024 हे 15 जानेवारी ते 14 फेब्रुवारी 2024 या कालावधीत परिवहन विभागामार्फत राबविण्यात येणार आहे. या अभियानाचे उद्घाटन 15 जानेवारी रोजी प्रादेशिक परिवहन कार्यालयात संपन्न झाले, त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेश कामत, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव श्रीमती दलजित कौर जज, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकीत्सक संजय पेरके, जिल्हा कोषागार अधिकारी श्रीमती ज्योती बगाटे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत, सहा.प्रादेशिक परिवहक अधिकारी संदीप निमसे, वाहतूक निरिक्षक पोलीस निरिक्षक मारकड, गुटे, ग्रामीण पोलीस स्टेशन नांदेडचे पोलीस निरीक्षक एैलाने, सहा.पोलीस निरीक्षक जगताप, शिक्षणाधिकारी (प्रा) चे रोहिदास बस्वदे, शिक्षणाधिकारी (मा) प्रतिनिधी के.व्ही.पाठक, नांदेड वाघाळा महानगरपालिकाचे शहर अभियंता दिलीप आरसुडे, अभियंता अरुण शिंदे हे उपस्थित होते. 

प्रास्ताविकात प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेश कामत यांनी देशातील, राज्यातील व जिल्हयातील अपघाताची व अपघातामुळे होणारे परिणामाची माहिती दिली. नांदेड जिल्हयामध्ये यावर्षी हेल्मेटयुक्त अपघातमुक्त गाव अभियान राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. हे अभियान जिल्हयात पूर्ण महिनाभर राबविण्यात येणार असून यामध्ये विविध उपक्रम व तपासणी मोहिम राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी एनएसएस, एनसीसी व औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या विदयार्थ्यानी सहभाग नोंदविला. 

या कार्यक्रमाच्या वेळी फकीरा बहुउद्येशिय सेवा भावी संस्थेचे पथकांनी जनजागृतीचा कार्यक्रम केला आहे. या कार्यक्रमाच्या वेळी कार्यालयातील मोटार वाहन निरिक्षक, सहा.मोटार वाहन निरिक्षक व लिपीक कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालक मोटार वाहन निरिक्षक श्रीमती रेणुका राठोड यांनी केलेले आहे.

0000





  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर करण्यात आली असून उर्वरित याद्या लवकरच...