Wednesday, April 26, 2017

शेतकऱ्यांना अनुदानावर औजारे उपलब्ध
16 मे पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
 नांदेड दि. 25 :-  खरीप रब्बी हंगाम 2017 मध्ये "उन्नत शेती समृध्द शेतकरी" ही मोहिम राबवली जाणार आहे. यामोहिमेअंतर्गत कृषि यांत्रिकीकरणास मोठ्या प्रमाणात चालना देण्याचे राज्य शासनाने ठरवले आहे. यासाठी शासन अनुदान पण देत आहे. या औजारांचे अनुदान दर शासनाने निश्चित केले आहेत. र्वसंमती दिलेल्या शेतकऱ्यांना औजारे, ट्रॅक्टरची खरेदी खुल्या बाजारातून आपल्या पसंतीप्रमाणे करता येणार आहे. इच्छ शेतकऱ्यांनी ठरवून दिलेल्या अर्जाच्या नमुन्यात आपला अर्ज मंगळवार 16 मे 2017 पर्यंत तालुका कृषि अधिकारी कार्यालयाकडे करावा, असे आवाहन असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
या उपअभियानांतर्गत शेतकऱ्यांना ट्रॅक्टर, पॉवर टिलर, रिपर कम बाईंडर, रिपर, नांगर, कल्टीव्हेटर, सबसॉयलर, रोटावेटर, प्लांटर (खत बिपेरणी यंत्र), पॉवर विडर,  थ्रेसर, ट्रॅक्टर माऊंटेड / ऑपरेटेड स्प्रेअर, मिनी राईस मील मिनी दाल मिल आणि त्यासाठी लागणारे सर्व प्रकारचे पॉलिशर, क्लिनर कम ग्रेडर, ग्रॅडीयंट सेपरेटर, स्पेशिफिक ग्रॅव्हीटी सेपरेटर, भात लावणी यंत्र, भात मळणी यंत्र, पाचरट कुट्टी यंत्र, कडबा कुट्टी यंत्र इ. औजारे अनुदानावर घेता येतील. ट्रॅक्टरसाठी अनुसूचित जाती, जमाती, अल्प, अत्यल्प भुधारक शेतकरी, महिला शेतकरी ांना किंमतीच्या 35 टक्के किंवा 1 लाख ते 1 लाख 25 हजार इतर शेतकऱ्यांना किंमतीच्या 25 टक्के किंवा जास्तीत जास्त 75 हजार ते 1 लाख अनुदान देय आहे. कृषि औजारांसाठी अनुसूचित जाती, जमाती, अल्प, अत्यल्प, भुधारक शेतकरी महिला शेतकरी यांना किंमतीच्या 50 टक्के किंवा शासनाने ठरवून दिलेली उच्चतम अनुदान मर्यादा इतर शेतकऱ्यांना किंमतीच्या 40 टक्के किंवा शासनाने ठरवून दिलेली उच्चतम अनुदान मर्यादेप्रमाणे अनुदान देण्यात येणार आहे. औजारे, यंत्रनिहाय अनुदान मर्यादा तालुका कृषि अधिकारी, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांच्या कार्यालयात उपलब्ध आहे.
र्वसंमती दिलेल्या शेतकऱ्यांना औजारे, ट्रॅक्टरची खरेदी खुल्या बाजारातून आपल्या पसंतीप्रमाणे करता येणार आहे. इच्छूक शेतकऱ्यांनी ठरवून दिलेल्या अर्जाच्या नमुन्यात आपला अर्ज मंगळवार 16 मे 2017 पर्यंत तालुका कृषि अधिकारी कार्यालयाकडे करावयाचा आहे. यातारखे नंतर अर्ज स्विकारले जाणार नाहीत. अर्जाचा नमुना तालुका कृषि अधिकारी कार्यालयाकडे तसेच कृषि विभागाच्या वेबसाईटवर www.krishi.maharashtra.gov.in उपलब्ध आहे. अर्जासोबत 7/12, 8-, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती प्रवर्गातील असल्यास प्राधिकृत अधिकाऱ्यांनी दिलेल्या जात वैधता प्रमाणपत्राची प्रत, आधार कार्ड, फोटो असलेले ओळखपत्र, खरेदी करावयाच्या यंत्र, औजारांचे अधिकृत विक्रेत्यांचे दरपत्रक, कोटेशन जोडावे. लक्षांकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास लॉटरी पध्दतीने लाभार्थ्यांची निवड केली जाईल निवड केलेल्या लाभार्थ्यांना औजारे, यंत्र खरेदीची पूर्वसंमती दिली जाईल. पूर्वसंमती मिळाल्यानंतर एक महिन्यामध्ये औजार खरेदी करणे बंधनकारक आहे. नसता पूर्वसंमती आपोआप रद्द समजली जाईल. खरेदी केलेल्या औजाराचे केंद्र किंवा राज्य शासनाच्या अधिकृत सक्षम तपासणी संस्थेने (बीआयएस किंवा अन्य सक्षम संस्था) तपासणी प्रमाणपत्र, तपासणी अहवाल सादर करणे शेतक-यांना बंधनकारक आहे. औजारांच्या गुणवत्तेची सर्वस्वी जबाबदारी लाभार्थींची राहणार आहे. अर्ज करतांना यापुर्वी लाभार्थ्यांने कोणत्याही शासकीय योजनेतून लाभ घेतलेला नसावा.
खुल्या बाजारातून औजारांची खरेदी करताना शेतकऱ्यांना स्वत:च्या बँक खात्यातून इलेक्ट्रॉनिक पध्दतीने (आर.टी.जी.एस.), धनादेश, धनाकर्ष विक्रेत्यास रक्कम अदा करणे बंधनकारक आहे. शेतकऱ्यांना विक्रेत्याशी रोखीने व्यवहार करता येणार नाही.
प्रत्येक औजारांसाठी शेतकऱ्यांनी विहित नमुन्यात स्वतंत्र अर्ज करणे आवश्यक आहे. तथापि, ज्या औजारांस जास्तीतजास्त अनुदान देय आहे त्या एकाच यंत्र, औजारास अनुदान दिले जाईल. जे शेतकरी केवळ ट्रॅक्टर चलित यंत्र, औजारांकरीता अर्ज करतील त्यांना अर्जासोबत त्यांचेकडे ट्रॅक्टर असल्याबाबतचा पुरावा (आर.सी.बुक) जोडणे आवश्यक आहे. खरेदी केलेल्या औजारांची तपासणी झाल्यानंतर अनुदानाची रक्कम लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा केली जाईल.
भाडेतत्वावर कृषि यांत्रिकीकरण सेवेसाठी कृषि औजारे बँक स्थापन करण्यासाठी पण अनुदान दिले जाणार आहे. शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकऱ्यांचे स्वयंसहाय्यता गट, कृषि विज्ञान केंद्र यांना या योजनेचा लाभ घेता येईल, असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नांदेड यांनी कळविले आहे.

000000

Tuesday, April 25, 2017

शोध वंचिताचा,शुद्धीकरण आणि प्रतिसादद्वारे
नांदेड तहसीलची मतदार यादी अद्ययावतीकरण मोहीम
नांदेड, दि. 25 :- जिल्हाधिकारी कार्यालय व मतदार नोंदणी अधिकारी  यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड तहसीलच्या निवडणूक विभागाने नियमित पुनरिक्षण कार्यक्रमासोबतच  मतदार यादीत नव्याने नावे समाविष्ट करण्यासाठी 'शोध वंचितांचा’, तर मयत स्थलांतर मतदार वगळणी साठी 'शुद्धीकरण' आणि सध्य मतदारांच्या अडचणी सोडविण्यासाठी 'प्रतिसाद' अशी विशेष तिहेरी मोहीम सुरु केली आहे. ही मोहीम मे महिन्याच्या अखेरपर्यंत सुरु राहणार आहे.
यात मतदार यादीत नाव समाविष्ट नसणाऱ्या वंचित घटकांपर्यत पोहोचण्यासाठी कृती आराखडा तयार करण्यात आला असून त्याची सुरूवात कचरा गोळा करणारे शांतीनगर भागातील वंचित घटकांपासून करण्यात आली. बीएलओ सह तहसील कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांची टीम सकाळी आठ वाजता या भागात पोहोचली. याठिकाणी सहा क्रमांकाचे फार्म वाटप करून कर्मचारी सहाय्याने भरून घेण्यात आले. इतर दुरुस्त्या व कार्ड नसणाऱ्यांचीही नोंद करण्यात आली.  या वंचित घटकांपर्यत पोहचण्यासाठी अनूलोम, भरारी ,एड्स जनजागृती सोसायटी या सारख्या स्वयंसेवी संस्थाप्रमाणेच इतर कामगार, मजूर, हमाल यांच्यापर्यंत कामगार कार्यालय, अपंग लाभार्थ्यांपर्यंत समाजकल्याण जि.प मार्फत पोहोचण्याचा प्रयत्न केला जाणार असून त्यांच्या नावनोंदणी साठी विशेष प्रयत्न केले जात आहेत.
मयत मतदार वगळणी साठी महानगरपालिका व पंचायत समिती, तलाठी ,बीएलओ मार्फत माहिती संकलित करून अशा व्यक्तींची वगळणी मतदार यादीतून 31 मे पर्यंत केली जाणार आहे.
नांदेड तालुक्यातील सध्या मतदारांना मतदान कार्ड नसणे नावात फरक, यादीतील भाग बदल आदी बाबतीत कोणत्याही अडचणी सोडविता येणार आहेत. तक्रार किंवा अर्ज किंवा तोंडी माहिती मिळताच त्यांची  लेखी नोंद  प्रतिसाद नोंदवहीत केली जावून,  त्याच दिवशी मतदाराची अडचण सोडविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
या तिहेरी मोहिमेचा जास्तीत जास्त मतदारांनी लाभ घ्यावा व मतदार यादी  अधिक सर्वसमावेशक बनविण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन तहसीलदार किरण अंबेकर व नायब तहसिलदार निवडणूक श्रीमती स्नेहलता स्वामी यांनी केले आहे. 

000000

  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर करण्यात आली असून उर्वरित याद्या लवकरच...