Sunday, December 5, 2021

 मृदा चाचणीतून शेतीत होतोय सकारात्मक बदल

-         रविशंकर चलवदे  

 

·         जागतिक मृदा दिन साजरा 

नांदेड (जिमाका) दि. 5 :- शेतकऱ्यांनी रासायनिक खते व औषधे यांचा वापर कमी करून सेंद्रिय खतांचा कार्यक्षम वापर करावा. मृदा चाचणीतून शेतीमध्ये  सकारात्मक बदल होत असल्याचे प्रतिपादन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी रविशंकर चलवदे यांनी केले. 

दिनांक 5 डिसेंबर रोजी जागतिक मृदा दिनाचे औचित्य साधून जिल्हा मृद  सर्वेक्षण व मृद चाचणी अधिकारी नांदेड यांच्यावतीने आत्मा कार्यालय नांदेड येथे मृदा दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नांदेड पंचायत समिती सभापतीचे प्रतिनिधी बबनराव वाघमारे तर प्रमुख मार्गदर्शक जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे, कृषी विज्ञान केंद्र पोखरणी येथील शास्त्रज्ञ राजीव इंगोले यांची उपस्थिती होती. 

मृदेचे मानवाच्या जीवनातील अनन्य साधारण महत्त्व विशद करून सर्वांनी मृदा परीक्षण अहवालाप्रमाणे पिकांना खताच्या मात्रा द्याव्यात, असे श्री. चलवदे यांनी सांगितले. शेतकऱ्यांना शेतीतील मृदा नमुना कसा घ्यावा व प्रयोग शाळेमध्ये कसा पाठवायचा याविषयी शास्त्रज्ञ राजीव इंगोले यांनी माहिती दिली. शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीतील बिजामृत, जीवामृत, दशपर्णी अर्क, निंबोळी अर्क, इत्यादी घटकांचा वापर वाढवावा असे मत बबनराव वाघमारे यांनी व्यक्त केले. शेतकऱ्यांनी नियमितपणे आपल्या मातीची तपासणी करावी असे आवाहन त्यांनी केले. तर प्रगतशील शेतकरी विश्वनाथ होळगे यांनी झीरो बजेट शेती विषयी माहिती दिली. 

यावेळी मान्यवरांच्या हस्ते भालकी, वडगाव, एमशेटवाडी, इलेचपुर, फत्तेपूर, धानोरा आदी गावातील  उपस्थित शेतकरी यांना जामीन आरोग्य पत्रिकीचे वाटप करण्यात आले. प्रास्ताविकात देगलूरचे उपविभागीय कृषी अधिकारी एम. के.  सोनटक्के यांनी जमिनीची होणारी धूप थांबण्याचे उपाय सांगून जमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढले पाहिजे असे सांगितले. सूत्रसंचालन कृषी सहायक वसंत जारीकोटे  यांनी केले तर शेवटी नांदेडचे तालुका कृषी अधिकारी यांनी आभार मानले.  

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा मृद सर्वेक्षण व मृद चाचणी अधिकारी प्रकाश पल्लेवाड, कृषी पर्यवेक्षक शिवाजी शिंदे, कृषी सहायक दत्तात्रय चिंतावर, गजानन पडलवार, जावेद शेख, मोहन बेरजे, श्रीमती सोनवणे आदींनी परिश्रम घेतले. 

00000




 नांदेड जिल्ह्यात 3 व्यक्ती कोरोना बाधित

तर 3 कोरोना बाधित झाले बरे 

नांदेड (जिमाका) दि. 5 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 1 हजार 88 अहवालापैकी 3 अहवाल कोरोना बाधित आले आहे. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 2 तर अँटिजेन तपासणीद्वारे 1 अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 90 हजार 499 एवढी झाली असून यातील 87 हजार 823 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 22 रुग्ण उपचार घेत असून 2 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. 

आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 654 एवढी आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड ग्रामीण 1, हिंगोली 1 तर अँटिजेन तपासणीद्वारे किनवट 1 असे एकुण 3 बाधित आढळले. आज जिल्ह्यातील 3 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 1 व खाजगी रुग्णालयातील 2 व्यक्तीला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. 

आज 22 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 2, नांदेड मनपा अंतर्गंत गृह विलगीकरण 19, खाजगी रुग्णालयात 1 व्यक्ती उपचार घेत आहेत. 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 7 लाख 79 हजार 310

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 6 लाख 75 हजार 329

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 90 हजार 499

एकुण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 87 हजार 823

एकुण मृत्यू संख्या-2 हजार 654

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.4 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-निरंक

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-5

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-22

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-2. 

कोविड विषाणू विरुद्धची लस सुरक्षित असून कोरोनाची लाट पुनः येण्यापासून प्रतिबंध करण्यासाठी कोविड-19 लसीकरण दिर्घकाळ आणि प्रभावी उपाय आहे. मिशन कवच कुंडल अंतर्गत 18 वर्षावरील सर्व व्यक्तींनी कोविड लसीकरण करून घ्यावे आणि इतरांनाही लस घेण्यासाठी प्रोत्साहित करावे. ज्या नागरिकांनी कोविडच्या पहिल्या लसीचा डोस घेतला आहे त्यांनी ठराविक कालावधी नंतर दुसऱ्या लसीचा डोस आवश्य घ्यावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

00000

Saturday, December 4, 2021

 नांदेड ते जालना समृद्धी महामार्गाच्या भूसंपादन प्रक्रियेस प्रारंभ

 ·         2024 पर्यंत हे काम पूर्ण करू -    उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार 

नांदेड (जिमाका) दि. 4 :- मराठवाड्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या नांदेड जिल्ह्याला मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाशी जोडणाऱ्या विस्तारीत नांदेड ते जालना या महामार्गाच्या भूसंपादनच्या प्रक्रियेला आज प्रत्यक्ष प्रारंभ करून मराठवाड्याच्या नव्या इतिहासाचा कृतीशील अध्याय प्रारंभ झाला. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी महत्प्रयासाने या महामार्गासह हैद्राबाद पर्यंतच्या महामार्गाची घोषणा नुकतीच केली होती. अवघ्या दीड वर्षाच्या कालावधीत याला पूर्ण स्वरुप देत नांदेड ते जालना पर्यंतच्या या महामार्गाच्या भूसंपादन प्रकियेचा प्रशासकीय व महसूल पातळीवरील गतीबाबत पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी समाधान व्यक्त करुन यासाठी राबणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. 

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्यावतीने विकसीत केल्या जाणाऱ्या या महामार्गाच्या व्याप्तीबद्दल महसूल विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांना गतीशील काम करता यावे व यातील तांत्रिक बाजू समजून घेता याव्यात यासाठी आज खास बैठक आयोजित करण्यात आली होती. डॉ. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन भवन येथे महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांनी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट‍्र समृद्धी महामार्गाबाबत सचित्र सादरीकरण करून जालना-परभणी आणि नांदेड जिल्ह्यातील सर्व संबंधित महसूल अधिकाऱ्यांना या कामाचे आव्हान वेळेत पूर्ण करण्याकरीता प्रोत्साहित केले. 

महामार्ग हे ग्रामीण भागाला, ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना, शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या शेतमालाला प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष समृद्धी देणारे आहे. या महामार्गाच्या माध्यमातून आता नांदेड मुंबई-पुणे-नाशीक भागाशी अधिक सुरक्षीत व जलदगतीने जोडले जाणार असून मराठवाड्याच्यादृष्टिने याचे वेगळे वैशिष्ट्य असल्याचे राधेश्याम मोपलवार यांनी सांगितले. येत्या 7 महिन्यात या महामार्गासाठी लागणाऱ्या सर्व भूसंपादनाची प्रक्रिया आम्ही पूर्ण करू. साधारणत: मार्चमध्ये याच्या निविदा प्रक्रिया पूर्ण करून सन 2024 पर्यंत हे काम पूर्ण करू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. 

179 किमी लांबीच्या या महामार्गासाठी जवळपास 2 हजार 200 हेक्टर जमीन अधिगृहित करण्याची आवश्यकता आहे. जालना-परभणी-नांदेड या जिल्ह्यांना खऱ्या अर्थाने समृद्धीची द्वारे खुली करणाऱ्या या प्रकल्पाला 14 हजार 500 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, परभणीचे अतिरिक्त जिल्हाधिकारी राजेश काटकर, जालनाचे जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक चंद्रकांत पुलकुंडवार यांची यावेळी उपस्थिती होती. या महामार्गाने नांदेड ते मुंबई हे अंतर सुमारे 6 तासात पूर्ण करता येईल. उपजिल्हाधिकारी हनुमंत आरगुंडे यांनी भूसंपादन व या प्रकल्पाबाबत सविस्तर सादरीकरण करुन महसूल संदर्भातील नियम व कायद्याची माहिती दिली.

00000





नांदेड जिल्ह्यात 4 व्यक्ती कोरोना बाधित तर 3 कोरोना बाधित झाले बरे 

नांदेड (जिमाका) दि. 4 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 1 हजार 269 अहवालापैकी 4 अहवाल कोरोना बाधित आले आहे. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 4 तर अँटिजेन तपासणीद्वारे निरंक अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 90 हजार 496 एवढी झाली असून यातील 87 हजार 820 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 22 रुग्ण उपचार घेत असून 2 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. 

आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 654 एवढी आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 4 असे एकुण 4 बाधित आढळले. आज जिल्ह्यातील 3 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 1 व नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 2 व्यक्तीला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. 

आज 22 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 2, नांदेड मनपा अंतर्गंत गृह विलगीकरण 17 व्यक्ती उपचार घेत आहेत. 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 7 लाख 78 हजार 222

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 6 लाख 74 हजार 249

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 90 हजार 496

एकुण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 87 हजार 820

एकुण मृत्यू संख्या-2 हजार 654

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.4 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-निरंक

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-10

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-22

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-2. 

कोविड विषाणू विरुद्धची लस सुरक्षित असून कोरोनाची लाट पुनः येण्यापासून प्रतिबंध करण्यासाठी कोविड-19 लसीकरण दिर्घकाळ आणि प्रभावी उपाय आहे. मिशन कवच कुंडल अंतर्गत 18 वर्षावरील सर्व व्यक्तींनी कोविड लसीकरण करून घ्यावे आणि इतरांनाही लस घेण्यासाठी प्रोत्साहित करावे. ज्या नागरिकांनी कोविडच्या पहिल्या लसीचा डोस घेतला आहे त्यांनी ठराविक कालावधी नंतर दुसऱ्या लसीचा डोस आवश्य घ्यावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

00000

Friday, December 3, 2021

 अवसायकाचे पॅनलसाठी अर्ज करण्याचे आवाहन 

नांदेड (जिमाका) दि. 3 :- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 102 व कलम 110 (अे) अन्वये जिल्ह्यातील अवसायनातील संस्थांच्या कामकाजासाठी अवसायकाची नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी अर्ज मागविण्यात आली आहेत. अर्जाचे विहित नमुने विभागीय सहनिबंधकसहकारी संस्थालातूर विभाग लातूर मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, 2 मजलाशिवाजी चौक लातूर यांच्या कार्यालयात 10 डिसेंबर 2021 ते 14 जानेवारी 2022 या कालावधीत कार्यालयीन वेळेत मिळू शकतील. अर्ज सादर करण्याची अंतीम मुदत 14 जानेवारी 2022 पर्यंत आहेअसे आवाहन नांदेड जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था डॉ. मुकेश बारहाते यांनी केले आहे.


अर्ज करण्यास पात्र व्यक्ती पुढील प्रमाणे आहेत. न्यायालयातील निवृत्त न्यायाधीश व सेवानिवृत्त विधी अधिकारी. प्रॅक्टीसिंग ॲडव्होकटस. चार्टर्ड अकौन्टटकॉस्ट अकौन्टटकंपनी सेक्रेटरी. राष्ट्रीयकृत बँकाग्रामीण बँकाभूविकास बँकाजिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकाव्यापारी बँकानागरी सहकारी बँकाराज्य सहकारी बँका यांचे सेवेतील व्यवस्थापक दर्जापेक्षा कमी दर्जा नसलेले सेवानिवृत्त अधिकारी. सहकार विभागातील सेवानिवृत्त वर्ग-1, वर्ग-दर्जाचे अधिकारी आणि सहकार अधिकारी प्रथम श्रेणी व द्वितीय श्रेणी दर्जाचे कर्मचारी. महसूल विभागातील सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी दर्जाचे अधिकारी. कंपनी लिक्विडेटर म्हणून कामकाज केलेले अनुभवी व्यक्ती. सहकारी संस्थेचे लेखापरिक्षण केले असल्याचे 5 वर्षाचे अनुभवी प्रमाणित लेखापरिक्षक असावा.

 

अर्जदार व्यक्तीने पुढीलप्रमाणे अर्हता धारण केलेली असावी. अर्जदार व्यक्तीवर कोणत्याही स्वरूपाचे गुन्हे दाखल नसावेत. शासकीय सेवानिवृत्त अधिकारी-कर्मचारी असल्यास त्यांची कोणत्याही प्रकारची खातेनिहाय चौकशी चालू नसावी व सेवेत कोणताही ठपका ठेवलेला नसावा. वयोमर्यादा 70 वर्षापर्यंत असावी. शारीरिक व मानसिक आरोग्याच्यादृष्टीने सक्षम असावा. प्रॅक्टीसिंग ॲडव्होकेटस् व चार्टर्ड अकौन्टटकॉस्ट अकौन्टटकंपनी सेक्रेटरी यांना सहकारी संस्थेचे कामकाजाचा वर्षाचे अनुभव असणे आवश्यक आहे. कोणत्याही सहकारी संस्थेचा थकबाकीदार नसावा किंवा कलम 83 व कलम 88 च्या कार्यवाहीमध्ये जबाबदार धरलेला नसावा (महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 व त्याखालील नियमांतर्गत अपात्र नसावा). सदर व्यक्तीचा सहकार खात्याने काळ्या यादीमध्ये (Black List) समावेश केलेला नसावा. ही व्यक्ती संबंधीत विभागाच्या विभागीय सहनिबंधकसहकारी संस्था कार्यालयाच्या अधिपत्याखाली येणाऱ्या नांदेड, लातूरउस्मानाबाद व बीड जिल्ह्यातील रहिवासी असावा. सदर व्यक्ती एकावेळी एकाच जिल्ह्यातून अर्ज दाखल करु शकतील.

 

प्राप्त अर्जाची छाननी 31 जानेवारी 2022 रोजी पूर्ण करुन 14 फेब्रुवारी 2022 पर्यंत प्रारुप नामिका प्रसिद्ध केली जाईल. त्यावर 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत हरकती मागविल्या जातील. त्यानंतर 14 मार्च 2022 रोजी हरकतीचा निर्णय घेण्यात येईल. हरकतीचा निर्णय करुन 21 मार्च 2022 रोजी अंतीम नामीका प्रसिद्ध करण्यात येईल.


याबाबतची जाहीर सूचना जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था नांदेड या कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था नांदेड या कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही आवाहन डॉ. मुकेश बारहाते जिल्हा उपबिनंधक सहकारी संस्था नांदेड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

000000

 वृत्त

निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या नामतालिकेसाठी अर्ज करण्याचे आवाहन 

लातूर,दि.3 (विमाका):- बहुराज्य सहकारी संस्था अधिनियम 2002 च्या कलम 84 (4) अन्वये 2022-2025 या कालावधी लवाद नामतालिका (Arbitrator Pane) तयार करण्यासाठी पात्र उमेदवारांनी अर्ज करावेत, असे आवाहन लातूर येथील सहकारी संस्थाच्या विभागीय सहनिबंधक सचिन रावल यांनी केले आहे. 

सर्व न्यायालयातील निवृत्त न्यायाधीश आणि सेवानिवृत्त विधी अधिकारी, प्रॅक्टीसिंग ॲडव्होकेटस, चार्टर्ड अकौंन्टंट, कॉस्ट अकौंन्टंट, राष्ट्रीय बँका, ग्रामीण बँका, भू विकास बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, व्यापारी बँका, नागरी सहकारी बँका, राज्य सहकारी बँका यांचे सेवेतील व्यवस्थापक दर्जापेक्षा कमी दर्जा नसलेले सेवानिवृत्त अधिकारी (ज्यांना सेवानिवृत्त होऊन दोन वर्षापेक्षा कमी कालावधी झालेला आहे). 

सहकार विभागातील उपनिबंधक दर्जा पेक्षा वरच्या दर्जाचे सेवानिवृत्त अधिकारी (ज्यांना सेवानिवृत्त होऊन दोन वर्षापेक्षा कमी कालावधी झालेला आहे) तसेच अशा व्यक्तींची नियुक्ती करताना उक्त अधिनियमामध्ये नमूद नसले तरीही पुढीलप्रमाणे जादा अर्हता, पात्रता असाव्यात. त्यांच्यावर कोणत्याही स्वरुपाचे गुन्हे दाखल नसावेत. शासकीय, बँक सेवेतील सेवानिवृत्त अधिकारी यांची कोणत्याही प्रकारची खाते निहाय चैाकशी चालू नसावी आणि सेवेत कोणताही ठपका ठेवलेला नसावा. अशी व्यक्ती कोणत्याही काळ्या यादीत (Black List) मध्ये समाविष्ट नसावी.  

या व्यक्ती संबंधीत विभागाच्या विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था कार्यालयाच्या अधिपत्याखाली येणाऱ्या जिल्ह्यातील रहिवासी असावा. (नांदेड, लातूर, उस्मानाबादबीड जिल्ह्यातील). व्यक्ती एकावेळी एकाच विभागातून अर्ज दाखल करु शकते. अर्जाचे विहीत नमुने विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, लातूर विभाग लातूर, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, दूसरा मजला, शिवाजी चौक लातूर ता.जि.लातूर या कार्यालयात दि. 31 डिसेंबर -2021 पर्यंत कार्यालयीन वेळेत मिळू शकतील. अर्ज सादर करण्याची अंतीम मुदत दिनांक 31 डिसेंबर-2021 राहील. प्राप्त अर्जाची छाननी पूर्ण करुन दि.14 फेब्रुवारी-2022 रोजी प्रारुप लवाद नामतालिका प्रसिध्द होईल. ही प्रारुप नामतालिका यादी संबंधित विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था यांच्या कार्यालयात लावण्यात येईल. प्रारुप नामतालिकावर हरकती असल्यास drcslaw@gmail.com या -मेलवर पुराव्यासह हरकती दि.21 फेब्रुवारी-2022 पर्यंत सादर करता येतील. हरकतीचा निर्णय करुन दि.18 मार्च-2022 रोजी अंतीम लवाद नामतालिका प्रसिध्द करण्यात येईल. याबाबतची जाहिर सूचना कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

00000

 नांदेड जिल्ह्यात 1 कोरोना बाधित 2 कोरोना बाधित झाले बरे

 नांदेड (जिमाका) दि. 3 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 1 हजार 257 अहवालापैकी 1 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 90 हजार 492 एवढी झाली असून यातील 87 हजार 817 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 21 रुग्ण उपचार घेत असून 2 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 654 एवढी आहे. आज जिल्ह्यातील 2 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. यात मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 1, खाजगी रुग्णालय 1 असे एकूण 2 व्यक्तीला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. 

आज 21 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 3, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 15, खाजगी रुग्णालय 3 अशा एकूण 21 व्यक्ती उपचार घेत आहेत. 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 7 लाख 76 हजार 953

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 6 लाख 72 हजार 994

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 90 हजार 492

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 87 हजार 817

एकुण मृत्यू संख्या-2 हजार 654

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.4 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-निरंक

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-04

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-21

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-2

00000

 

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ #शेतकरीकर्जमुक्ती #कर्जमुक्तीयोजना२०२६ #महाराष्ट्रशासन #शेतकरी Maharashtra DGIPR ...