Thursday, July 21, 2022

अनुकंपा तत्वावरील नियुक्तीसाठी

181 पात्र उमेदवारांची सुधारीत यादी प्रसिद्ध 

नांदेड (जिमाका) दि. 21 :-जिल्हा परिषद सामान्य प्रशासन विभागाने अनुकंपा तत्वावरील नियुक्तीसाठी 181 पात्र उमेदवारांची यादी www.zpnanded.in या संकेतस्थळावर आणि जिल्हा परिषदेच्या सर्व पंचायत समिती कार्यालयातील नोटीस बोर्डावर प्रसिध्द करण्यात आली आहे. याची संबंधित उमेदवारांनी नोंद घ्यावी, असे जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य) सुधीर ठोंबरे यांनी कळविले आहे. 

दिनांक 30 जुन 2022 अखेर पर्यंत प्राप्त झालेल्या कागदपत्रांची पुतर्ता करून यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. घोषित केलेल्या यादीतील ज्या उमेदवारांच्या प्रस्तावात काही त्रुटी किंवा आक्षेप असल्यास संबंधित अनुकंपाधारकांनी शुक्रवार 29 जुलै 2022 पर्यंत आपले म्हणणे लेखी पुराव्यासह जिल्हा परिषद सामान्य प्रशासन विभागास समक्ष अथवा dyceogadzpnanded@gmail.com वर सादर करावे. मुदतीनंतर प्राप्त झालेल्या आक्षेपाचा विचार करण्यात येणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी, असे जिल्हा परिषद सामान्य प्रशासन विभागाने प्रसिद्धी पत्रकाव्दारे कळविले आहे.

0000

 नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा 

नांदेड (जिमाका) दि. 21 :- शंकररावजी चव्हाण विष्णुपुरी प्रकल्प आज 21 जुलै रोजी 70 टक्के क्षमतेने भरला आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चालू असलेल्या सततच्या पावसामुळे प्रकल्पाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. बंधाऱ्यात येणाऱ्या पाण्याची आवक लक्ष्यात घेता विष्णुपुरी बंधाऱ्याचा एक दरवाजा विसर्ग 346 क्यमेक्स (12218 क्युसेस) विसर्ग सकाळी 10 वाजता नदीपात्रात सोडण्यात आला आहे. 

विष्णुपुरी बंधाऱ्याच्या खालच्या बाजूस असणाऱ्या सर्व गावातील नागरिकांच्या मालमत्तेचे, जीवीताचे, पशुधनाचे, वीटभट्टी साहित्य, इतर कोणतीही हानी होणार नाही यासाठी नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्क रहावे, असे आवाहन शंकररावजी चव्हाण विष्णुपुरी प्रकल्प बंधारा असर्जनचे पूर नियंत्रण अधिकारी यांनी केले आहे.

0000

पिक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी

शेतकऱ्यांनी अंतिम मुदतीची वाट पाहू नये

- जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर 

नांदेड (जिमाका) दि. 21 :- प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम सन 2022-23 अंतर्गत पिक विमा भरणे सुरु आहे. विमा कंपनीचा सुधारीत टोल फ्री क्रमांक 18002337414 हा आहे. पिक विमा भरण्याची अंतिम रविवारी 31 जुलै 2022 आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारची मुदतवाढ मिळणार नाही. शेतकऱ्यांनी शेवटच्या दिवसांची वाट न बघता पिक विमा योजनेमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

मागील काही वर्षांचा अनुभव बघता पिक विमा नोंदीच्या शेवटच्या हप्त्यामध्ये शेतकऱ्यांची गर्दी होते. परिणामी पिक विमा पोर्टलवर प्रचंड ताण येऊन पोर्टल हळू होते किंवा पिक विमा भरतांना अडचणी येतात. त्यामुळे सर्व शेतकरी बांधवानी पिक विमा नोंदीच्या अंतिम मुदतीची वाट न बघता आपले जवळचे ग्राहक सेवा केंद्रामध्ये, बॅकेमध्ये किंवा स्वत: शेतकरी यांनी पिक विमा पोर्टलवर पिक विमा उतरवून घ्यावा.

पिक विमा नोंदणी ग्राहक सेवा केंद्रामध्ये विनाशुल्क केल्या जाते. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतकरी विमा हप्त्या व्यतिरिक्त (झेरॉक्स ई. खर्च वगळून) ज्यादा रक्कम शुल्क म्हणून ग्राहक सेवा केंद्र चालकास देऊ नये. तसेच ग्राहक सेवा केंद्रामध्ये सी.एस.सी. लॉग इन मधुन पिक विमा नोंदणी करतांना अडचणी येत असल्यांस शेतकऱ्यांनी पिक विमा पोर्टलवर शेतकरी लॉग इन मधुन पिक विमा नोंदवावा. नांदेड जिल्ह्यामध्ये सन 2022-23 साठी युनायटेड इंडिया जनरल इंन्शुरन्स कंपनीची निवड झाली असुन कंपनीमार्फत जिल्हास्तरावर व तालुकास्तरावर विमा प्रतिनिधीची नियुक्ती करुन कार्यालये स्थापन केले आहे.

युनाइटेड जनरल इन्शुरन्सं कंपनीचे तालुकानिहाय प्रतिनिधीचे नाव, पदनाम, संपर्क क्रमांक, कार्यालयाचा पत्ता पुढीलप्रमाणे आहे. नांदेड तालुक्यासाठी जिल्हा प्रतिनिधी म्हणून रवी थोरात यांचा संपर्क क्रमांक 9637549394 हा असून त्यांचे कार्यालयाचा पत्ता पार्डीकर कॉम्प्लेक्स, व्हिआयपी रोड, कृषि उत्पन्न बाजार समिती जवळ, नवा मोंढा नांदेड हा आहे. नांदेड तालुक्यासाठी तालुका प्रतिनिधी म्हणून महेश हिंगोले यांचा संपर्क क्रमांक 9373260081 हा असून त्यांचे कार्यालयाचा पत्ता पार्डीकर कॉम्प्लेक्स, व्हिआयपी रोड, कृषि उत्पन्न बाजार समिती जवळ, नवा मोंढा, नांदेड हा आहे. अर्धापूर तालुक्यासाठी तालुका प्रतिनिधी म्हणून नितीन किन्हाळकर यांचा संपर्क क्रमांक 7385227556 हा असून त्यांचे कार्यालयाचा पत्ता स्वराज कॉम्प्लेक्स, तामसा कॉर्नर, कवठेकर दवाखाना अर्धापूर हा आहे. लोहा तालुक्यासाठी तालुका प्रतिनिधी म्हणून अवधुत पाटील यांचा संपर्क क्रमांक 8999647728 हा असून त्यांचे कार्यालयाचा पत्ता कलावती वे ब्रीज जवळ, मुक्ताई नगर मुख्य रस्ता लोहा हा आहे. कंधार तालुक्यासाठी तालुका प्रतिनिधी म्हणून पदमाकर अवळे यांचा संपर्क क्रमांक 7020835815 हा असून त्यांचे कार्यालयाचा पत्ता विजयगड बसस्टॅड जवळ कंधार हा आहे. मुखेड तालुक्यासाठी तालुका प्रतिनिधी म्हणून ज्ञानेश्वर हराळे यांचा संपर्क क्रमांक 8600408454 हा असून त्यांचे कार्यालयाचा पत्ता श्रीकृष्ण निवास, महाजन पेट्रोल पंपाजवळ, लातुर रोड, मुखेड हा आहे. देगलूर तालुक्यासाठी तालुका प्रतिनिधी म्हणून राजेश चिखलीकर यांचा संपर्क क्रमांक 9421702921 हा असून त्यांचे कार्यालयाचा पत्ता रामपुर रोड, जुन्या बसस्टँड जवळ, देगलूर हा आहे. बिलोली तालुक्यासाठी तालुका प्रतिनिधी म्हणून सुनिल शिंदे यांचा संपर्क क्रमांक 7620837020 हा असून त्यांचे कार्यालयाचा पत्ता बरबडे निवास, सावली रोड बिलोली हा आहे. हदगाव तालुक्यासाठी तालुका प्रतिनिधी म्हणून गोपिनाथ थोरात यांचा संपर्क क्रमांक 9623168961 हा असून त्यांचे कार्यालयाचा पत्ता सारडा कॉम्प्लेक्स, पोलिस स्टेशन जवळ, दत्त बर्डी रोड, हदगाव हा आहे. माहूर तालुक्यासाठी तालुका प्रतिनिधी म्हणून रामदास धोतरे यांचा संपर्क क्रमांक 9579762194 हा असून त्यांचे कार्यालयाचा पत्ता मध्यवर्ती बँकेच्या पाठीमागे, कपिल नगर, माहुर हा आहे.

उमरी तालुक्यासाठी तालुका प्रतिनिधी म्हणून दिपक मस्के यांचा संपर्क क्रमांक 9763237313 हा असून त्यांचे कार्यालयाचा पत्ता यशवंत विद्यालयाच्या पाठीमागे, व्यंकटेशनगर, उमरी हा आहे. धर्माबाद तालुक्यासाठी तालुका प्रतिनिधी म्हणून रामराव रेगें यांचा संपर्क क्रमांक 9890019530 हा असून त्यांचे कार्यालयाचा पत्ता मोंढा रोड, धर्माबाद हा आहे. नायगाव तालुक्यासाठी तालुका प्रतिनिधी म्हणून विशाल बद्रे यांचा संपर्क क्रमांक 8888206070 हा असून त्यांचे कार्यालयाचा पत्ता व्यंकटेश नगर, शेळगाव रोड, नायगाव हा आहे. किनवट तालुक्यासाठी तालुका प्रतिनिधी म्हणून विजय निलगिरवार यांचा संपर्क क्रमांक 9604782844 हा असून त्यांचे कार्यालयाचा पत्ता दुकान नं. 6 कान्हा कॉम्प्लेक्स, जिजामाता चौक, मेन रोड किनवट हा आहे. भोकर तालुक्यासाठी तालुका प्रतिनिधी म्हणून सुरेश दवणे यांचा संपर्क क्रमांक 9423800386 हा असून त्यांचे कार्यालयाचा पत्ता रुद्रा ॲटोमोबाईल्सच्या जवळ, किनवट रोड भोकर हा आहे. हिमायतनगर तालुक्यासाठी तालुका प्रतिनिधी म्हणून सचिन घुले यांचा संपर्क क्रमांक 7875063660 हा असून त्यांचे कार्यालयाचा पत्ता डॉ. कदम हॉस्पीटलच्या जवळ हुतात्मा कॉलेज रोड हिमायतनगर हा आहे. मुदखेड तालुक्यासाठी तालुका प्रतिनिधी म्हणून नितीन शिराढोणकर यांचा संपर्क क्रमांक 8459671706 हा असून त्यांचे कार्यालयाचा पत्ता न्यायालयाच्या जवळ, शिवाजीनगर मुदखेड हा आहे. याबाबत जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी, असेही आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालयाने केले आहे.

00000

Wednesday, July 20, 2022

 जिल्ह्यात गत 24 तासात सरासरी 3.5मि.मी. पाऊस


नांदेड (जिमाका) दि. 20 :- जिल्ह्यात बुधवार 20 जुलै रोजी सकाळी 8.20 वा. संपलेल्या गत 24 तासात सरासरी 3.5मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून जिल्ह्यात एकुण 635.1मिलीमीटर पाऊस झाला आहे.

 
जिल्ह्यात बुधवार 20 जुलै 2022 रोजी सकाळी संपलेल्या गत 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये तालुकानिहाय पुढील प्रमाणेकंसात एकूण पाऊस : नांदेड-0.50 (620.30), बिलोली-5.60(675.40), मुखेड- 3.10 (580.50), कंधार-4.70 (627.60), लोहा-3.70 (584.50), हदगाव-4.70 (588.40), भोकर-2.20 (731.40), देगलूर-3.60 (552.40), किनवट-4.40 (653.80), मुदखेड- 1.20 (809), हिमायतनगर-2.30 (826.10), माहूर- 0.80 (543.50), धर्माबाद- 12.50 (663.10), उमरी- 1(775.60), अर्धापूर- 1.10 (607.60), नायगाव-3.70 (583मिलीमीटर आहे.


0000

 नांदेड जिल्ह्यात 13 व्यक्ती कोरोना बाधित

 

नांदेड (जिमाका) दि. 20 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 124 अहवालापैकी आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 5, नांदेड ग्रामीण 2, तर ॲटीजन तपासणीद्वारे माहूर 6 असे एकूण 13 अहवाल कोरोना बाधित आढळले आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 1 लाख 3 हजार 50 एवढी झाली असून यातील 1 लाख 299 रुग्णांना उपचारानंतर बरे झाल्याने रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 59 रुग्ण उपचार घेत आहेत.

 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 692 एवढी आहे. नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरणात 1  व नांदेड जिल्ह्यातील तालुक्यातर्गंत गृह विलगीकरणातील 1 असे एकूण 2 रुग्णाला उपचारानंतर बरे झाल्याने सुट्टी देण्यात आली. नांदेड जिल्ह्यातील तालुक्याअंतर्गत गृह विलगीकरण 23, नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरणातील 31, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 4, अश्विनी हॉस्पिटल 1 असे एकुण 59 व्यक्ती उपचार घेत आहेत.

 

जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत सहभाग घ्यावा. याचबरोबर मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 9 लाख 11 हजार 310
एकुण निगेटिव्ह स्वॅब-
 7 लाख 90 हजार 900
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती-
 1 लाख 3 हजार 50
एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या-
 1 लाख 299
एकुण मृत्यू संख्या-2
 हजार 692
उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण
 97.33 टक्के
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-4
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- निरंक
आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-59
आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-निरंक.
0000

Tuesday, July 19, 2022

 नांदेड जिल्ह्यात 10 व्यक्ती कोरोना बाधित

 

नांदेड (जिमाका) दि. 19 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 180 अहवालापैकी आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 3, नांदेड ग्रामीण 1, माहूर 2, लातूर 1 तर ॲटीजन तपासणीद्वारे मुखेड 1, देगलूर 2 असे एकूण 10 अहवाल कोरोना बाधित आढळले आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 1 लाख 3 हजार 37 एवढी झाली असून यातील 1 लाख 297 रुग्णांना उपचारानंतर बरे झाल्याने रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 48 रुग्ण उपचार घेत आहेत.

 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 692 एवढी आहे. नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरणात 6  व नांदेड जिल्ह्यातील तालुक्यातर्गंत गृह विलगीकरणातील 7 असे एकूण 13 रुग्णाला उपचारानंतर बरे झाल्याने सुट्टी देण्यात आली. नांदेड जिल्ह्यातील तालुक्याअंतर्गत गृह विलगीकरण 17, नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरणातील 26, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 4, अश्विनी हॉस्पिटल 1 असे एकुण 48 व्यक्ती उपचार घेत आहेत.

 

जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत सहभाग घ्यावा. याचबरोबर मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 9 लाख 11 हजार 186
एकुण निगेटिव्ह स्वॅब-
 7 लाख 90 हजार 793
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती-
 1 लाख 3 हजार 37
एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या-
 1 लाख 297
एकुण मृत्यू संख्या-2
 हजार 692
उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण
 97.33 टक्के
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-2
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- निरंक
आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-48
आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-निरंक.
0000

 जिल्ह्यात गत 24 तासात सरासरी 3.70 मि.मी. पाऊस 

नांदेड (जिमाका) दि. 19 :- जिल्ह्यात मंगळवार 19 जुलै रोजी सकाळी 8.20 वा. संपलेल्या गत 24 तासात सरासरी 3.70 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून जिल्ह्यात एकुण 631.60 मिलीमीटर पाऊस झाला आहे.


जिल्ह्यात मंगळवार 19 जुलै 2022 रोजी सकाळी संपलेल्या गत 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये तालुकानिहाय पुढील प्रमाणे, कंसात एकूण पाऊस : नांदेड-4.60 (619.80), बिलोली-0.80(669.80), मुखेड- 0.40 (577.40), कंधार-1.50 (622.90), लोहा-1.50 (580.80), हदगाव-8.90 (583.70), भोकर-5.30 (729.20), देगलूर-1.20 (548.80), किनवट-5.70 (649.40), मुदखेड- 3.50 (807.80), हिमायतनगर-11.70 (823.80), माहूर- 8.20 (542.70), धर्माबाद- 1.90 (650.60), उमरी- 2(774.60), अर्धापूर- 4.60 (606.50), नायगाव-1.30 (589.30) मिलीमीटर आहे.

0000

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ #शेतकरीकर्जमुक्ती #कर्जमुक्तीयोजना२०२६ #महाराष्ट्रशासन #शेतकरी Maharashtra DGIPR ...