Sunday, August 24, 2025


वृत्त क्रमांक 898 

नुकसानग्रस्तांच्या सर्व समस्या प्राधान्याने सोडवू - पालकमंत्री अतुल सावे

 

·         पुनर्वसित गावातील नागरिकांना लवकरच पक्की घरे

·         संवेदनशील पालकमंत्री यांच्यातर्फे पूरग्रस्तांना वैयक्तिक मदतीचे धनादेश वाटप

·         हसनाळरावणगावभासवाडीमुक्रमाबाद गावांना भेट देवून केली पाहणी

·         नुकसानग्रस्तांना शासनाच्यावतीने लवकरच मदत मिळवून देणार 

नांदेड दि. 24 ऑगस्ट :- मागील आठवड्यात नांदेड जिल्ह्याच्या मुखेड तालुक्यात मोठया प्रमाणात अतिवृष्टी झाल्यामुळे हसनाळरावणगावभिंगोलीभासवाडीमुक्रमाबाद या गावांमध्ये पूरस्थिती निर्माण होवून मोठया प्रमाणात हानी झाली. अनेक घरांची पडझड झाली तर हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली. या सर्व नुकसानीचे पंचनामे सुरू असून नुकसानग्रस्तांच्या सर्व समस्या प्राधान्याने सोडविण्यात येतीलअशी ग्वाही राज्याचे इतर मागास बहुजन कल्याणदुग्धविकासअपारंपारिक ऊर्जादिव्यांग कल्याण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी दिली. 

पालकमंत्री यांनी आज मुखेड तालुक्यातील हसनाळरावणगावभासवाडीमुक्रमाबाद या पूरग्रस्त गावांना भेट देवून पूराच्या पाण्यामुळे झालेल्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली व नागरिकांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. त्यांच्यासोबत खासदार अशोक चव्हाणआमदार डॉ. तुषार राठोडजिल्हाधिकारी राहुल कर्डिलेजिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावलीपोलीस अधिक्षक अबिनाशकुमारदेगलूरचे उपविभागीय अधिकारी अनुप पाटीलमुखेडचे तहसिलदार राजेश जाधव आदींसह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. 

पूरग्रस्तांच्या सर्व समस्या तातडीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मांडण्यात येवून त्या सर्व समस्या सोडविण्यात येतील. नुकसानग्रस्तांना जास्तीत जास्त मदत देण्यात येईल अशी माहिती  पालकमंत्री श्री. सावे यांनी दिली. यावेळी हसनाळ येथे पालकमंत्री यांनी वैयक्तिकरित्या मृतांच्या वारसांना प्रत्येकी 50 हजार रुपये मदत धनादेशाद्वारे देण्यात आली. 

तसेच नुकसान झालेल्या पुनर्वसित गावातील नागरिकांचे लवकरच पुनर्वसन करण्यात येवून या नागरिकांना पक्की घरे देण्याचा येतील. शासन नुकसानग्रस्तांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी शासनाच्यावतीने मदत करण्यात येईलअसे पालकमंत्री अतुल सावे यांनी स्पष्ट केले. 

पूरग्रस्त भागातील नागरिकांना वाचविण्यासाठी व त्यांना मदत करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कौतुकास्पद काम केले असून मी त्यांच्या सतत संपर्कात राहून माहिती घेत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. तसेच नुकसानग्रस्त भागात पाणी शिरुन जी हानी झाली यास जबाबदार असणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांवर कार्यवाही करण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले. 

पालकमंत्री श्री. सावे यांच्याकडून वैयक्तिकरित्या

मृतांच्या वारसदारांना प्रत्येकी 50 हजार रुपयांची मदत

संवेदनशील पालकमंत्री अतुल सावे यांनी वैयक्तिकरित्या मयत व्यक्तीच्या वारसांना प्रत्येकी 50 हजार रुपयांच्या धनादेशाचे वाटप पालकमंत्री यांच्या हस्ते हसनाळ येथे करण्यात आले. तसेच ज्या नागरिकांच्या घरात पाणी शिरले होते अशा नागरिकांना 10 हजार रुपयांच्या धनादेशाचे वाटप यावेळी करण्यात आले. 

मागील तीन दिवसांपूर्वी पालकमंत्री अतुल सावे यांनी जिल्ह्यातील पूर परिस्थितीची तातडीने दखल घेऊन पूरग्रस्तांसाठी मदत साहित्य उपलब्ध करून दिले होते. हे साहित्य देगलूरचे उपविभागीय अधिकारी व मुखेडचे तहसीलदार यांच्यामार्फत पूरग्रस्तगावांमध्ये वितरण करण्यात आले. या साहित्यात प्रामुख्याने दैनंदिन वापरातील कपडे साडीटीशर्टट्रॅकपँटटॉवेलआणि जीवनावश्यक औषधे पॅरासीटामॉल टॅबलेट स्ट्रिपओआरएस इ. साहित्याचा यामध्ये समावेश होता. 

पालकमंत्री अतुल सावे यांनी घेतला जिल्ह्यातील नुकसानीचा आढावा

आज सकाळी पालकमंत्री अतुल सावे यांनी शासकीय विश्रामगृहात जिल्ह्यात पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा सविस्तर घेतला. यावेळी खासदार अशोक चव्हाणखासदार डॉ. अजित गोपछडेआमदार श्रीजया चव्हाणजिल्हाधिकारी राहुल कर्डीलेजिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावलीपोलीस अधिक्षक अबिनाश कुमारमनपा आयुक्त महेशकुमार डोईफोडेसर्व विभागाचे विभाग प्रमुख आदीची उपस्थिती होती. यावेळी जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी सादरीकरणाद्वारे जिल्ह्यात झालेल्या नुकसानीचा माहिती दिली.

00000


 

वृत्त क्रमांक 898 

नुकसानग्रस्तांच्या सर्व समस्या प्राधान्याने सोडवू - पालकमंत्री अतुल सावे

 

·         पुनर्वसित गावातील नागरिकांना लवकरच पक्की घरे

·         संवेदनशील पालकमंत्री यांच्यातर्फे पूरग्रस्तांना वैयक्तिक मदतीचे धनादेश वाटप

·         हसनाळ, रावणगाव, भासवाडी, मुक्रमाबाद गावांना भेट देवून केली पाहणी

·         नुकसानग्रस्तांना शासनाच्यावतीने लवकरच मदत मिळवून देणार 

नांदेड दि. 24 ऑगस्ट :- मागील आठवड्यात नांदेड जिल्ह्याच्या मुखेड तालुक्यात मोठया प्रमाणात अतिवृष्टी झाल्यामुळे हसनाळ, रावणगाव, भिंगोली, भासवाडी, मुक्रमाबाद या गावांमध्ये पूरस्थिती निर्माण होवून मोठया प्रमाणात हानी झाली. अनेक घरांची पडझड झाली तर हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली. या सर्व नुकसानीचे पंचनामे सुरू असून नुकसानग्रस्तांच्या सर्व समस्या प्राधान्याने सोडविण्यात येतील, अशी ग्वाही राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास, अपारंपारिक ऊर्जा, दिव्यांग कल्याण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी दिली. 

पालकमंत्री यांनी आज मुखेड तालुक्यातील हसनाळ, रावणगाव, भासवाडी, मुक्रमाबाद या पूरग्रस्त गावांना भेट देवून पूराच्या पाण्यामुळे झालेल्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली व नागरिकांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. त्यांच्यासोबत खासदार अशोक चव्हाण, आमदार डॉ. तुषार राठोड, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, देगलूरचे उपविभागीय अधिकारी अनुप पाटील, मुखेडचे तहसिलदार राजेश जाधव आदींसह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. 

पूरग्रस्तांच्या सर्व समस्या तातडीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मांडण्यात येवून त्या सर्व समस्या सोडविण्यात येतील. नुकसानग्रस्तांना जास्तीत जास्त मदत देण्यात येईल अशी माहिती  पालकमंत्री श्री. सावे यांनी दिली. यावेळी हसनाळ येथे पालकमंत्री यांनी वैयक्तिकरित्या मृतांच्या वारसांना प्रत्येकी 50 हजार रुपये मदत धनादेशाद्वारे देण्यात आली. 

तसेच नुकसान झालेल्या पुनर्वसित गावातील नागरिकांचे लवकरच पुनर्वसन करण्यात येवून या नागरिकांना पक्की घरे देण्याचा येतील. शासन नुकसानग्रस्तांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी शासनाच्यावतीने मदत करण्यात येईल, असे पालकमंत्री अतुल सावे यांनी स्पष्ट केले. 

पूरग्रस्त भागातील नागरिकांना वाचविण्यासाठी व त्यांना मदत करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कौतुकास्पद काम केले असून मी त्यांच्या सतत संपर्कात राहून माहिती घेत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. तसेच नुकसानग्रस्त भागात पाणी शिरुन जी हानी झाली यास जबाबदार असणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांवर कार्यवाही करण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले. 

पालकमंत्री श्री. सावे यांच्याकडून वैयक्तिकरित्या

मृतांच्या वारसदारांना प्रत्येकी 50 हजार रुपयांची मदत

संवेदनशील पालकमंत्री अतुल सावे यांनी वैयक्तिकरित्या मयत व्यक्तीच्या वारसांना प्रत्येकी 50 हजार रुपयांच्या धनादेशाचे वाटप पालकमंत्री यांच्या हस्ते हसनाळ येथे करण्यात आले. तसेच ज्या नागरिकांच्या घरात पाणी शिरले होते अशा नागरिकांना 10 हजार रुपयांच्या धनादेशाचे वाटप यावेळी करण्यात आले. 

मागील तीन दिवसांपूर्वी पालकमंत्री अतुल सावे यांनी जिल्ह्यातील पूर परिस्थितीची तातडीने दखल घेऊन पूरग्रस्तांसाठी मदत साहित्य उपलब्ध करून दिले होते. हे साहित्य देगलूरचे उपविभागीय अधिकारी व मुखेडचे तहसीलदार यांच्यामार्फत पूरग्रस्तगावांमध्ये वितरण करण्यात आले. या साहित्यात प्रामुख्याने दैनंदिन वापरातील कपडे साडी, टीशर्ट, ट्रॅकपँट, टॉवेल, आणि जीवनावश्यक औषधे पॅरासीटामॉल टॅबलेट स्ट्रिप, ओआरएस इ. साहित्याचा यामध्ये समावेश होता. 

पालकमंत्री अतुल सावे यांनी घेतला जिल्ह्यातील नुकसानीचा आढावा

आज सकाळी पालकमंत्री अतुल सावे यांनी शासकीय विश्रामगृहात जिल्ह्यात पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा सविस्तर घेतला. यावेळी खासदार अशोक चव्हाण, खासदार डॉ. अजित गोपछडे, आमदार श्रीजया चव्हाण, जिल्हाधिकारी राहुल कर्डीले, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार, मनपा आयुक्त महेशकुमार डोईफोडे, सर्व विभागाचे विभाग प्रमुख आदीची उपस्थिती होती. यावेळी जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी सादरीकरणाद्वारे जिल्ह्यात झालेल्या नुकसानीचा माहिती दिली.

00000













 


Saturday, August 23, 2025

 वृत्त क्रमांक 897

पालकमंत्री अतुल सावे यांचा नांदेड दौरा

नांदेड दि. 23 ऑगस्ट :- राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास, अपारंपारिक ऊर्जा, दिव्यांग कल्याण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील.

रविवार 24 ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी 9 वा. छत्रपती संभाजीनगर येथून वाहनाने शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आगमन व राखीव. सकाळी 10 वा. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या अनुषंगाने बैठक. स्थळ: शासकीय विश्रामगृह, नांदेड. सकाळी 11 वा. शासकीय विश्रामगृह, नांदेड येथून हसनाळ ता. मुखेड जि. नांदेडकडे वाहनाने प्रयाण. दुपारी 12 वा. हसनाळ ता. मुखेड येथे आगमन व अतिवृष्टी झालेल्या भागाची पाहणी. दुपारी 12.45 वा. हसनाळ येथून रावणगाव ता. मुखेडकडे वाहनाने प्रयाण. दुपारी 1.15 वा. रावणगाव ता. मुखेड जि. नांदेड येथे आगमन व अतिवृष्टी झालेल्या भागाची पाहणी. दुपारी 1.45 वा. रावणगाव येथून मुक्रमाबादकडे वाहनाने प्रयाण. दुपारी 2 वा. मुक्रमाबाद ता. मुखेड जि. नांदेड येथे आगमन व अतिवृष्टी झालेल्या भागाची पाहणी. सोईनुसार मुक्रमाबाद ता. मुखेड येथून शासकीय विश्रामगृह, नांदेडकडे वाहनाने प्रयाण. सोईनुसार शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आगमन व राखीव. सोईनुसार शासकीय विश्रामगृह नांदेड येथून छत्रपती संभाजीनगरकडे वाहनाने प्रयाण करतील.
00000

 वृत्त क्रमांक 896

जिल्हाधिकाऱ्यांनी किनवट तालुक्यातील गावांमध्ये भेट देवून पीक नुकसानीची केली पाहणी
नांदेड दि. 23 ऑगस्ट:- मागील आठवडयात नांदेड जिल्ह्यात सतत पाऊस व अतिवृष्टी होवून अनेक हेक्टर शेतीतील पिके पाण्याखाली गेली आहेत. शेतात पाणी साचल्यामुळे व पैनगंगा नदीच्या पुरामुळे किनवट तालुक्यातील अनेक गावांना पुराचा फटका बसला आहे. या पिकांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी आज किनवट तालुक्यातील भंडारवाडी, पिंप्री या गावांना भेट देवून पाहणी केली व शेतकऱ्यांशी संवाद साधला.
यावेळी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी जेनित चन्द्रा दोन्तुला, तालुका कृषी अधिकारी चंद्रकांत निमोड, नायब तहसिलदार फोले, कृषी विभागाचे अधिकारी, परिसरातील शेतकरी आदींची उपस्थिती होती.

किनवट तालुक्यात पैनगंगा नदीच्या पुरामुळे नदीकाठच्या गावात पूरपरिस्थिती निर्माण होवून कापूस, सोयाबिन व इतर पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे सुरु असून ते तात्काळ पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिले. तसेच यावेळी त्यांनी किती टक्के पंचनामे करण्याचे काम पूर्ण झाले आहे यांचा आढावा घेतला. तसेच सहस्त्रकुंड धबधबा येथे पाहणी करुन तेथील परिस्थितीचा आढावा घेतला.
00000


Friday, August 22, 2025

वृत्त क्रमांक 895

रोजगार मेळाव्यात 124 उमेदवारांची प्राथमिक निवड

देगलूर महाविद्यालयात रोजगार मेळावा संपन्न

नांदेड दि. 22 ऑगस्ट :-नांदेड जिल्ह्यातील रोजगार ईच्छूक युवक-युवतींना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी, यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, मार्गदर्शन केंद्र व देगलूर महाविद्यालयाच्यावतीने 21 ऑगस्ट रोजी पंडीत दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन देगलूर महाविद्यालयात करण्यात आले होते. या रोजगार मेळाव्यात 124 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष देगलूर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहन खताळ हे होते तर प्रमुख मार्गदर्शक सहाय्यक आयुक्त डॉ. राजपाल कोल्हे हे होते. या रोजगार मेळाव्यात एकूण 11 कंपन्यांनी 464 रिक्तपदांसाठी सहभाग नोंदविला असून एकूण 281 उमेदवारांनी मुलाखती दिल्या, त्यापैकी 124 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली.

00000

वृत्त क्रमांक 894

सोमवारी किनवट येथे पंडीत दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन

नांदेड दि. 22 ऑगस्ट :- नांदेड जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व हुतात्मा गोंडराजे शंकरशाह रघुनाथशाह शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था किनवट यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार 25 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 10  वा. हुतात्मा गोंडराजे शंकरशाह रघुनाथशाह शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, किनवट येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या रोजगार मेळाव्यामध्ये नामांकित उद्योजक, शाळा व महाविद्यालय तसेच इतर आस्थापनांच्यावतीने मुलाखती घेण्यात येणार आहेत. तरी जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांनी सोमवार 25 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 10  वा. हुतात्मा गोंडराजे शंकरशाह रघुनाथशाह शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था किनवट येथे उपस्थित राहून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त डॉ. रा.म.कोल्हे यांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी कार्यालयाचा ई-मेल nandedrojgar०१@gmail.com वर किंवा दूरध्वनी क्रमांक 02462-251674 व योगेश यडपलवार 9860725448 यांच्याशी संपर्क साधावा, असेही कळविले आहे.

00000

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ #शेतकरीकर्जमुक्ती #कर्जमुक्तीयोजना२०२६ #महाराष्ट्रशासन #शेतकरी Maharashtra DGIPR ...