Friday, May 21, 2021

सुधारित वृत्त क्र. 375


दहावीची परीक्षा रद्द

नांदेड (जिमाका) दि. 21 :- कोविड-19 चा ग्रामीण भागासह वाढलेला प्रादुर्भाव व उद्भवलेल्या असामान्य परिस्थितीमुळे एप्रिल-मे 2021 मधील माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता 10) रद्द करण्यात आली आहे. या परीक्षेचे आयोजन 29 एप्रिल ते 20 मे 2021 या कालावधीत करण्यात आले होते. 

इयत्ता 10 वीच्या परीक्षेसाठी प्रविष्ठ सर्व विद्यार्थ्यांचे व परीक्षेशी संबंधित सर्व घटकांचे हित लक्षात घेवून सन 2020-21 या शैक्षणिक वर्षामध्ये आयोजित केलेली ही परीक्षा शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा शासन निर्णय 12 मे 2021 अन्वये रद्द करण्यात आली आहे. याबाबत सर्व मुख्याध्यापक, माध्यमिक शाळा, शिक्षक, विद्यार्थी, पालक व इतर सर्व संबंधित घटकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन लातूर विभागीय शिक्षण मंडळाचे विभागीय सचिव सुधाकर तेलंग यांनी दिनांक 21 मे रोजी दिलेल्या पत्राअन्वये कळवले आहे.

0000


नांदेड जिल्ह्यात 91 व्यक्ती कोरोना बाधित

5 जणाचा मागील दोन दिवसात मृत्यू

153 कोरोना बाधित झाले बरे

नांदेड (जिमाका) दि. 21 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 2 हजार 110 अहवालापैकी 91 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 68 तर अँटिजेन तपासणीद्वारे 23 अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 87 हजार 727 एवढी झाली असून यातील 83 हजार 392 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 1 हजार 773 रुग्ण उपचार घेत असून 76 बाधितांची प्रकृती आज रोजी अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

                                                                                                        

दिनांक 20 मे 2021 रोजी लोट्स कोविड रुग्णालया लोहा येथील 54 वर्षाचा पुरुष, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे सांगवी नांदेड येथील  34 वर्षाचा पुरुष, दिनांक 21 मे रोजी कद्रेकर कोविड रुग्णालय देगलूर येथे विरभद्रनगर देगलूर येथील 31 वर्षाचा पुरुष, क्रिटिकल केअर कोविड रुग्णालय येथे सिडको नांदेड येथील 72 वर्षाचा पुरुष, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे कुदळा ता. उमरी येथील 65 वर्षाच्या पुरुषाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या 1 हजार 838 एवढी आहे.

 

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 19, नांदेड ग्रामीण 1, अर्धापूर 1, बिलोली 6, देगलूर 1, धर्माबाद 4, हदगाव 7, हिमायतनगर 7, कंधार 1, किनवट 6, लोहा 4, माहूर 2, मुदखेड 2, नायगाव 1, उमरी 1, यवतमाळ 2, हिंगोली 2, परभणी 1  तर ॲन्टिजेन तपासणीमध्ये नांदेड मनपा क्षेत्रात 2,  नांदेड ग्रामीण 2, बिलोली 1, देगलूर 1, धर्माबाद 3, कंधार 2, किनवट 4, माहूर 3, नायगाव 1, भोकर 2, परभणी 1, यवतमाळ 1 असे एकूण 91 बाधित आढळले.

 

आज जिल्ह्यातील 153 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे 10, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 5, मनपाअंतर्गत एनआरआय भवन व गृहविलगीकरण व जंम्बो कोविड सेंटर 19, हदगाव कोविड रुग्णालय 3, नायगा तालुक्यांतर्गत 1, देगलूर कोविड रुग्णालय 1, मुखेड कोविड रुग्णालय 20, मुदखेड कोविड केअर सेंटर 15, बारड कोविड केअर सेंटर 8, अर्धापूर तालुक्यांतर्गत 21, माहूर तालुक्यांतर्गत 2, लोहा तालुक्यांतर्गत 3, भोकर तालुक्यांतर्गत 11, उमरी तालुक्यांतर्गत 4, खाजगी रुग्णालय 30 व्यक्तींना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.

 

आज 1 हजार 773 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 58, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 56, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल (नवी इमारत) 57, बारड कोविड केअर सेंटर 10,किनवट कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 44, मुखेड कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 18, देगलूर कोविड रुग्णालय 4, जैनब हॉस्पिटल व कोविड केअर देगलूर 15, भोकर कोविड केअर सेंटर 2, नायगाव कोविड केअर सेंटर 8, उमरी कोविड केअर सेंटर 12, माहूर कोविड केअर सेंटर 11, हदगाव कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 9, लोहा कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 13, धर्माबाद कोविड केअर सेंटर 30, मुदखेड कोविड केअर सेंटर 11, अर्धापूर कोविड केअर सेंटर 5, बिलोली कोविड केअर सेंटर 34, हिमायतनगर कोविड केअर सेंटर 4, एनआरआय कोविड केअर सेंटर 14, मांडवी कोविड केअर सेंटर 2, भक्ती जंम्बो कोविड केअर सेंटर 7, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 40, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यातंर्गत गृहविलगीकरण 963, खाजगी रुग्णालय 346 व्यक्ती उपचार घेत आहेत. 

 

आज रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत उपलब्ध असलेल्या खाटांची संख्या पुढील प्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे 82, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 83, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड येथे 80, भक्ती जम्बो कोविड केअर सेंटर 32 खाटा उपलब्ध आहेत.

 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 5 लाख 9 हजार 49

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 4 लाख 10 हजार 905

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 87 हजार 727

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 83 हजार 692

एकुण मृत्यू संख्या-1 हजार 838

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.40 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-21

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-7

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-228

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 1 हजार 773

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-76

00000


 

       22 मे रोजी सर्व लसीकरण केंद्रावर

कोविड-19 चे लसीकरण  

उपलब्ध डोसप्रमाणे 45 वर्षावरील व्यक्तींना प्राधान्य  

 

नांदेड (जिमाका) दि. 21 :-  जिल्हा आरोग्य विभागातर्फे जिल्ह्यातील सर्व 91 लसीकरण केंद्रांवर कोविड-19 चे लसीकरण व्हावे यादृष्टिने उपलब्ध लस सर्वत्र विभागून पाठविली आहे. दिनांक 22 मे रोजी लसीकरण केंद्रांवर उपलब्ध असलेली डोसची संख्या पुढीलप्रमाणे आहे.

 

मनपा क्षेत्रात मोडणाऱ्या एकुण 10 केंद्रांवर कोविशिल्ड या लसीचे प्रत्येकी 100 डोस उपलब्ध करुन दिले आहेत. या दहा केंद्रात श्री गुरु गोविंदसिंघजी जिल्हा रुग्णालय, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय, शासकिय आयुर्वेदीक महाविद्यालय, शहरी दवाखाना शिवाजीनगर, हैदरबाग,  कौठा, सिडको, जंगमवाडी, श्रावस्तीनगर, दशमेश हॉस्पिटल यांचा समावेश आहे. यातील शासकिय आयुर्वेदिक महाविद्यालय येथे कोव्हॅक्सिनचे 30 डोस दिले आहेत.

 

शहरी भागात मोडणाऱ्या  लसीकरण केंद्रांवर कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन या दोन्ही लसींचा पुरवठा करण्यात आला आहे. यातील रुग्णालय उपलब्ध असलेले डोस पुढीलप्रमाणे आहे. उपजिल्हा रुग्णालय देगलूर, गोकुंदा, मुखेड, हदगाव, ग्रामीण रुग्णालय धर्माबाद, हिमायतनगर, कंधार, मांडवी, लोहा, माहूर, मुदखेड, नायगाव अशा एकुण 12 लसीकरण केंद्रांवर कोविशिल्डचे प्रत्येक केंद्रनिहाय 100 डोस उपलब्ध करुन दिले आहेत. ग्रामीण रुग्णालय बारड येथे 90 डोस, ग्रामीण रुग्णालय बिलोली येथे कोविशिल्डचे 60 डोस व कोव्हॅक्सिनचे 10 डोस, ग्रामीण रुग्णालय मांडवी येथे कोव्हॅक्सीनचे 40 डोस, ग्रामीण रुग्णालय माहूर येथे कोव्हॅक्सीनचे 50 डोस, ग्रामीण रुग्णालय उमरी येथे कोव्हॅक्सीनचे 45 डोस, ग्रामीण रुग्णालय हिमायतनगर येथे कोव्हॅक्सीनचे 10 डोस उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. जिल्ह्यातील सर्व 67 प्राथमिक आरोग्य केंद्रांवर कोविशिल्डचे प्रत्येकी 100 डोस उपलब्ध केले आहेत.

 

हे सर्व डोस 45 वर्षावरील व्यक्तींसाठीच दुसऱ्या लसीकरणाला दिले आहेत. केंद्र शासनाच्या सूचनेनुसार कोविशिल्ड लसीचा पहिला डोस ज्यांनी घेतला आहे त्याच्या 12 ते 16 आठवडे म्हणजेच सुमारे 84 दिवसानंतर दुसरा डोस दिला जाईल. एखाद्या केंद्रांवर 45 वर्षावरील लाभार्थी नसेल तर तो डोस प्रथम लसीकरणासाठी वापरता येईल. कोव्हॅक्सीन ही लस 45 वर्षावरील लाभार्थ्यांच्या दुसऱ्या डोससाठीच दिली जाईल. मनपा कार्यक्षेत्रातील 45 वर्षावरील लाभार्थ्यांना कोव्हॅक्सिन या लसीच्या दुसऱ्या डोसकरीता cowin.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य आहे. तसेच Appointment Session Site Confirm झाल्यानंतरच लाभार्थ्यांचे संबंधित केंद्रावर लसीकरण करण्यात येईल. लसीचा उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभाग याचे नियोजन करेल. नागरिकांनी लसीच्या उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी केले. 

0000

Thursday, May 20, 2021

 

डोसच्या उपलब्धतेनुसार कमी-अधिक प्रमाणात

   जिल्ह्यातील सर्व केंद्रांना लसीचे वाटप 

 

नांदेड (जिमाका) दि. 20 :- वय 45 वर्षांवरील नागरिकांसाठी लसीचा दुसरा डोस जिल्ह्यातील प्रत्येक केंद्रांना त्या-त्या ठिकाणच्या परिस्थितीनुरुप वाटप करण्यात आला असून नागरिकांनी डोसच्या उपलब्धतेप्रमाणे लसीकरण केंद्रावर पोहचावे, असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे. दिनांक 21 मे रोजी पुढीलप्रमाणे केंद्रनिहाय डोसेसची मात्रा उपलब्ध करुन दिली आहे. यात कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन या दोन्ही लसींचा समावेश आहे.

 

मनपा क्षेत्रात मोडणाऱ्या श्री गुरु गोविंदसिंघजी जिल्हा रुग्णालय, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय, शासकिय आयुर्वेदीक महाविद्यालय, शहरी दवाखाना हैदरबाग, शिवाजीनगर, जंगमवाडी, कौठा, सिडको या 8 केंद्रावर कोविशिल्डचे 100 डोस देण्यात आले. श्री गुरु गोविंदसिंघजी जिल्हा रुग्णालय, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय, स्त्री रुग्णालय, शहरी दवाखाना हैदरबाग, शिवाजीनगर, जंगमवाडी, कौठा, सिडको या 8 केंद्रावर कोव्हॅक्सिनचे 100 डोस तर शहरी भागात श्रावस्तीनगर व दशमेश हॉस्पिटल या 2 केंद्रावर कोव्हॅक्सिनचे 50 डोस उपलब्ध करुन देण्यात आले.

 

उपजिल्हा रुग्णालय देगलूर, गोकुंदा, मुखेड, ग्रामीण रुग्णालय धर्माबाद, हिमायतनगर, कंधार, मांडवी, माहूर, उमरी, नायगाव, बारड येथे कोविशिल्डचे प्रत्येकी 100 डोस, उपजिल्हा रुग्णालय देगलूर, हदगाव, गोकुंदा, मुखेड, ग्रामीण रुग्णालय धर्माबाद, कंधार, मांडवी, लोहा, माहूर, उमरी, नायगाव येथे कोव्हॅक्सिनचे 100 डोस तर ग्रामीण रुग्णालय बिलोली येथे कोव्हॅक्सिनचे 90 डोस, भोकर कोव्हॅक्सिनचे 50, मुदखेड कोव्हॅक्सिनचे 40, हिमायतनगर कोव्हॅक्सिनचे 30 डोस तर सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र (एकुण 67) येथे कोविशिल्डचे प्रत्येकी 100 डोस याप्रमाणात लसीची उपलब्धता करुन दिली आहे.

 

जिल्ह्यात 19 मे पर्यंत एकुण 4 लाख 6 हजार 667 लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. जिल्हयात 20 मे पर्यंत कोविशिल्डचे 3 लाख 34 हजार 930 व कोव्हॅक्सिनचे 1 लाख 5 हजार 340 डोस असे एकुण 4 लाख 40 हजार 270 डोस मिळाले आहेत.

 

कोविशिल्ड लसीचा पहिला डोस ज्यांनी घेतला आहे त्याच्या 12 ते 16 आठवडे म्हणजेच सुमारे 84 दिवसानंतर दुसरा डोस घेणे वैज्ञानिकांनी अधिक हितावह असल्याचे स्पष्ट केले आहे. 18 ते 44 वयोगटातील लाभार्थीचे लसीकरण तुर्तास थांबविण्यात आले आहे. उपलब्ध कोव्हॅक्सिन लस 45 वर्षावरील लाभार्थ्यांना फक्त दुसरा डोससाठी वापरण्यात येणार आहे. मनपा क्षेत्रातील 45 वर्षावरील लाभर्थ्यांना कोव्हॅक्सिन या लसीच्या दुसऱ्या डोसाठी cowin.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य आहे. तसेच Appointment Session Site Confirm झाल्यानंतरच लाभार्थ्यांचे संबंधित केंद्रावर लसीकरण करण्यात येईल. लसीचा उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभाग याचे नियोजन करेल. नागरिकांनी लसीच्या उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी केले. 

0000

 

एमआयडीसी परिसरातील मिश्र खत

कारखान्याची पथकामार्फत  तपासणी 

नांदेड (जिमाका) दि. 20 :- नांदेड येथील एमआयडीसी परिसरातील मिश्र खत उत्पादक कारखान्यांची तपासणी जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांच्या निर्देशानुसार नुकतीच करण्यात आली. ही तपासणी कृषी विभाग व महसूल विभाग यांच्या संयुक्त पथकामार्फत करण्यात आली. यावेळी मिश्र खत कारखान्यातील उत्पादन व उपलब्ध साठा तसेच गुणवत्तेसाठी नमुने घेण्यात आले. यापुढेही अशाच प्रकारची अचानक पाहणी करुन खताची गुणवत्ता तपासण्यात येणार आहे. 

या कारवाईत उपविभागीय दंडाधिकारी लतीफ पठाण, तहसीलदार किरण आंबेकर, जिल्हा कृषी विकास अधिकारी संतोष नादरे, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक, नांदेड तालुका कृषी अधिकारी, पंचायत समितीचे कृषी अधिकारी, जिल्हा कृषी अधिकारी सामान्य तंत्र अधिकारी व महसूल विभागातील नायब तहसीलदार तसेच मंडळ अधिकारी यांचा समावेश होता.

0000



 

435 कोरोना बाधित झाले बरे

नांदेड जिल्ह्यात 162 व्यक्ती कोरोना बाधित

तर 3 जणांचा मृत्यू  

नांदेड (जिमाका) दि. 20 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 2 हजार 563 अहवालापैकी 162 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 106 तर अँटिजेन तपासणीद्वारे 56 अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 87 हजार 636 एवढी झाली असून यातील 83 हजार 539 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 1 हजार 848 रुग्ण उपचार घेत असून 85 बाधितांची प्रकृती आज रोजी अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.                                                                                                        

दिनांक 19 मे 2021 रोजी आश्विनी कोविड रुग्णालयात नायगाव तालुक्यातील शेळगाव येथील 88 वर्षाचा पुरुष, शासकिय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे विष्णुपुरी नांदेड येथील 31 वर्षाचा पुरुष व हदगाव येथील 75 वर्षाच्या पुरुषाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या 1 हजार 833 एवढी आहे. 

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 54, बिलोली 4, लोहा 2, परभणी 3, नांदेड ग्रामीण 6, देगलूर 4, मुदखेड 2, यवतमाळ 3, अर्धापूर 2, धर्माबाद 2, मुखेड 6, बीड 2, किनवट 6, हदगाव 4, हिंगोली 5, बोधन 1 बाधित आढळले तर ॲन्टिजेन तपासणीमध्ये नांदेड मनपा क्षेत्रात 7, धर्माबाद 2, लोहा 1, उमरी 4, अर्धापूर 2, हदगाव 1, माहूर 2, परभणी 1, भोकर 3, कंधार 1, मुदखेड 19, दिल्ली 2, देगलूर 4, किनवट 6, मुखेड 1 असे एकूण 162 बाधित आढळले. 

आज जिल्ह्यातील 435 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे 10, मनपाअंतर्गत एनआरआय भवन व गृहविलगीकरण व जंम्बो कोविड सेंटर 236, मुखेड कोविड रुग्णालय 30, धर्माबाद तालुक्यातंर्गत 1, अर्धापूर तालुक्यातंर्गत 14, भोकर तालुक्यांतर्गत 7, मालेगाव टी.सी.यु कोविड रुग्णालय 1,  जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 7,  नायगाव तालुक्यांतर्गत 2, मुदखेड कोविड केअर सेटर 15, माहूर तालुक्यातर्गंत 11, बिलोली तालुक्यांतर्गत 1, उमरी तालुक्यातर्गंत 3, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय 3, देगलूर कोविड रुग्णालय 6, बारड कोविड केअर सेंटर 3, किनवट कोविड रुग्णालय 6, लोहा तालुक्यातर्गंत 3, खाजगी रुग्णालय 76 व्यक्तींना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. 

आज 1 हजार 848 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 58, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 56, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल (नवी इमारत) 55, बारड कोविड केअर सेंटर 11,किनवट कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 43, मुखेड कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 18, देगलूर कोविड रुग्णालय 5, जैनब हॉस्पिटल व कोविड केअर देगलूर 16, भोकर कोविड केअर सेंटर 1, नायगाव कोविड केअर सेंटर 5, उमरी कोविड केअर सेंटर 12, माहूर कोविड केअर सेंटर 15, हदगाव कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 9, लोहा कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 13, धर्माबाद कोविड केअर सेंटर 32, मुदखेड कोविड केअर सेंटर 10, अर्धापूर कोविड केअर सेंटर 5, बिलोली कोविड केअर सेंटर 30, हिमायतनगर कोविड केअर सेंटर 4, एनआरआय कोविड केअर सेंटर 14, मांडवी कोविड केअर सेंटर 2, भक्ती जंम्बो कोविड केअर सेंटर 7, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 88, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यातंर्गत गृहविलगीकरण 1 हजार 10, खाजगी रुग्णालय 329 व्यक्ती उपचार घेत आहेत.  

आज रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत उपलब्ध असलेल्या खाटांची संख्या पुढील प्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे 82, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 80, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड येथे 85, भक्ती जम्बो कोविड केअर सेंटर 32 खाटा उपलब्ध आहेत. 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 5 लाख 6 हजार 932

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 4 लाख 8 हजार 906

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 87 हजार 636

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 83 हजार 539

एकुण मृत्यू संख्या-1 हजार 833

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.32 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-निरंक

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-16

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-232

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 1 हजार 848

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-85

00000

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ #शेतकरीकर्जमुक्ती #कर्जमुक्तीयोजना२०२६ #महाराष्ट्रशासन #शेतकरी Maharashtra DGIPR ...