Monday, June 16, 2025
वृत्त क्रमांक 621
विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कार्यातून देशासह शाळेचे, गावाचे नाव उज्ज्वल करावे -पालकमंत्री अतुल सावे
जिल्हा परिषद व सर्व शासकीय शाळांचे बळकटीकरण करणार
पहिलीपासून सीबीएससी पॅटर्नच्या माध्यमातून आता शिक्षण
नांदेड, दि. 16 जून :- आज शाळेचा पहिला दिवस. प्रत्येक विद्यार्थी, पालक, शिक्षक यांच्यामध्ये उत्साह भरलेला असतो. या पहिल्या दिवशी मुलांचा उत्साह वाढावा म्हणून राज्य शासनाच्यावतीने विद्यार्थ्यांना गणवेश, बूट, वह्या तसेच इतर शालेय साहित्यांचे वाटप आज करण्यात आले आहे. यावेळी मुलांचा आनंद द्विगुणित व्हावा यासाठी पालकमंत्री अतुल सावे यांनी पालक, विद्यार्थी, शिक्षकांना शुभेच्छा संदेश दूरदृश्यप्रणालीद्वारे दिला. प्रत्येक विद्यार्थ्यांनी शालेय शिक्षणासोबतच उत्कृष्ट कार्यातून देशाचे, गावाचे, शाळेचे नाव उज्ज्वल करावे, असे आवाहन पालकमंत्री अतुल सावे यांनी केले.
जिल्ह्यातील जिल्हा परिषदेसह सर्व शासकीय शाळा बळकटीकरण करण्यासाठी शासनाकडून जी काही मदत लागेल ती मदत करण्यात येईल, असे पालकमंत्री अतुल सावे यांनी स्पष्ट केले. शाळेच्या पहिल्या दिवशी त्यांनी पालक, शिक्षकांचे आणि शाळेवर प्रेम करणाऱ्या सर्व नागरिकांचे स्वागत केले. पहिल्या दिवशी सर्वजण उत्साहात शाळेच्या कार्यक्रमात उपस्थित आहात. या पहिल्या दिवशी आपण सर्वांनी एक संकल्प करु या. या वर्षभरात आपण सर्वजण शाळेत उपस्थित राहू या. प्रत्येक नागरिक व विद्यार्थी शिकला पाहिजे अशा संकल्प प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केला आहे. आपण सर्वानी मिळून त्यांचा हा संकल्प पूर्ण करु या, असेही आवाहन त्यांनी केले.
आज पासून सर्व शाळांमध्ये सीबीएससी पॅटर्न राबविण्यात येणार आहे. या निर्णयानुसार सर्व जिल्हा परिषद शाळांमधून सीबीएससी पॅटर्न प्रमाणे शिक्षण मिळणार आहे. शासनाच्यावतीने सर्व शाळामध्ये डिजीटलायझेशन करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे असेही पालकमंत्री अतुल सावे यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही लावले जात आहेत. शिक्षकांनी जे विद्यार्थी अभ्यासात मागे आहेत त्यांना इतर विद्यार्थ्यांसोबत आणण्यासाठी पालक आणि विद्यार्थ्यांसोबत चर्चा केली पाहिजे. एखादा विद्यार्थी अभ्यासात मागे असेल तर त्याचे पालकांशी चर्चा करुन शिक्षकांनी संवाद साधला पाहिजे यामुळे त्या विद्यार्थ्यांच्या पुढील काळात चांगले काम होईल. आज विद्यार्थ्यांना गणवेश, बुट, वह्या, शालेय साहित्य वाटप करण्यात आले.
०००००
वृत्त क्रमांक 620
विद्यार्थ्यांनी तात्काळ आधार बायोमेट्रीक अद्ययावत करुन घ्यावे -जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
नांदेड, दि. 16 जून :- राज्य व राष्ट्रीय स्तरावर घेतल्या जाणाऱ्या जेईइ , नीट, एमएचसीईटी, एनडीए तसेच अन्य महत्त्वाच्या शैक्षणिक व प्रवेश परीक्षांमध्ये सहभागासाठी विद्यार्थ्यांना आधार आधारित ओटीपी अथवा प्रमाणीकरण आवश्यक असते. मात्र अनेक विद्यार्थ्यांची आधार माहिती बायोमेट्रीकदृष्ट्या अद्ययावत नसल्यामुळे अशा परीक्षांमध्ये नोंदणी करताना अडचणी येतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी तात्काळ आधार अद्ययावत करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.
दहावी, बारावी पर्यंतच्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी आपले आधारकार्ड अद्ययावत करणे ही काळाची गरज आहे. आधार बायोमेट्रीक अपडेट अनिवार्य असल्याने विद्यार्थ्यांनी बायोमेट्रिक अद्ययावत करणे आवश्यक आहे.
सर्व शाळा व महाविद्यालयांनी त्यांच्या शैक्षणिक संस्थांतील विद्यार्थ्यांची आधार स्थिती तपासावी आणि ज्यांचे आधार बायोमेट्रिक अद्ययावत नाही त्यांना लवकरात लवकर जवळच्या आधार केंद्रावर करून घ्यावे असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले. त्याअनुषंगाने १२ जून 2025 रोजी जिल्ह्यातील सर्व आधार केंद्र चालक यांची बैठक घेऊन सर्व विदयार्थ्यांचे आधार कार्ड प्राधान्याने अपडेट करण्याचे निर्देश दिले.
प्रमुख सूचना:
विद्यार्थ्यांनी युआयडीआय या अधिकृत वेबसाइटवर आधार स्थिती तपासावी.
शाळांनी वर्गनिहाय यादी तयार करून विद्यार्थ्यांना वेळापत्रकानुसार आधार केंद्रावर जाण्यास मदत करावी. आधार बायोमेट्रिक अपडेट साठी विद्यार्थ्यांनी जवळच्या आधार नोंदणी केंद्रात उपस्थित राहावे.
जिल्ह्यातील सर्व आधार नोंदणी केंद्रांनी शाळकरी विद्यार्थ्यांसाठी प्राधान्याने सेवा द्यावी.
बायोमेट्रिक अद्ययावत का आवश्यक आहे?
वय 5 व 15 पूर्ण झाल्यावर बायोमेट्रिक अपडेट बंधनकारक असते. कारण या वयात शरीरातील बायोमेट्रिक बदलतात. आपल्या आधारची बायोमेट्रिक माहिती जुनी असेल तर आधार बेसड ईकेवायसी करतांना अडचण येऊ शकते. ज्यांच्याकडे मोबाइल क्रमांक लिंक नाही किंवा बायोमेट्रिक त्रुटी आहेत, त्यांनी तातडीने आधार अपडेट करून शैक्षणिक संधींचा लाभ घेण्याची दक्षता घ्यावी.
युआयडीआयच्या धोरणानुसार, नियमित अद्ययावत न केल्यास सेवा घेण्यामध्ये अडचण येउ शकते.
आधार बायोमेट्रिकचे महत्त्व
शैक्षणिक प्रवेश व परीक्षा:
जेईइ, नीट, एमएचटी यांसारख्या परीक्षांमध्ये ऑनलाइन अर्ज करताना आधार ओटीपी व प्रमाणीकरण आवश्यक असते.
शिष्यवृत्ती आणि सरकारी योजना:
विद्यार्थ्यांना डीबीटी (Direct Benefit Transfer) द्वारे शिष्यवृत्ती मिळण्यासाठी आधार बायोमेट्रिक प्रमाणीकृत असणे आवश्यक आहे.
बँकिंग व आर्थिक व्यवहार:
आधार-आधारित केवायसीसाठी बायोमेट्रिक प्रमाणीकरण अनिवार्य आहे.
रोजगार योजनांमध्ये नोंदणी:
पीएमकेव्हीवाय, एनसीएस, मनरेगा इत्यादी योजनांमध्ये सहभागासाठी आधार प्रमाणीकरण आवश्यक असते.
आरोग्य सुविधा (आयुष्यमान भारत योजनेसाठी):
रुग्णांची ओळख बायोमेट्रिकवर आधारित असल्याने योग्य अद्ययावत असणे गरजेचे.
00000
15.6.2025
वृत्त क्रमांक 619
धरती आबा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियानास जावरला येथे प्रारंभ
लाभार्थ्यांना विविध प्रमाणपत्रांचे वितरण
नांदेड दि. 15 जून :-आज किनवट तालुक्यातील जावरला येथे प्रधानमंत्री धरती आबा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियानास प्रारंभ झाला. या अभियानाचा शुभारंभ एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी जेनीत चन्द्रा दोन्तुला यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी त्यांच्या हस्ते शेतकऱ्यांना कृषी विभागामार्फत बियाणे व इतर विभागाचे विविध प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. यावेळी त्यांनी शिबिराला उपस्थित असणाऱ्या नागरिकांना मार्गदर्शन केले.
या शिबिरास जावरला परिसरातील आदिवासी नागरिक मोठया प्रमाणात उपस्थित होते. तसेच सहाय्यक प्रकल्प अधिकारी प्रदिप नाईक, नायब तहसिलदार रामेश्वर मुंडे, सरपंच नमिता गेडाम, माधवराव मरसकोल्हे व इतर विभागाचे अधिकारी यांची उपस्थिती होती. या शिबिराच्या ठिकाणी महसूल, आरोग्य, कृषी, आदिवासी विकास, बांधकाम, पंचायत समिती तसेच इतर शासकीय विभागाचे स्टॉल लावण्यात आले होते. या स्टॉलच्या माध्यमातून आदिवासी नागरिकांना एकाच ठिकाणी सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या.
0000
15.6.2025
वृत्त क्रमांक 618
राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांचा दौरा
नांदेड दि. 15 जून :- राज्याच्या सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, पाणीपुरवठा आणि स्वच्छता, ऊर्जा, महिला व बालविकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर 16 जून, 2025 रोजी नांदेड जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील.
सोमवार 16 मे 2025 रोजी सकाळी 8 वा. परभणी येथून श्री. क्षेत्र माहूर जि. नांदेडकडे प्रयाण. सकाळी 11 वा. श्री. क्षेत्र माहूर जि. नांदेड येथे आगमन व दर्शन. सकाळी 11.30 वा. आनंद आश्रम श्री. क्षेत्र माहूर जि. नांदेड येथे भेट. दुपारी 12.30 वा.आनंद दत्त आश्रम श्री. क्षेत्र माहूर जि. नांदेड येथून परभणी कडे प्रयाण करतील.
0000
वृत्त केंद्रीय पथकाकडुन देमनी शिवारात पाहणी छत्रपती संभाजीनगर, दि.९(जिमाका)- मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या क...
-
मुद्रण दिन विशेष मुद्रण कलेमुळे ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या मुद्रण कलेचा जनक जो हानेस गुटेनबर्ग यांच्या जन्मदिवसानिमित्त जगभर...
-
वृत्त क्रमांक 974 प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते “ स्वस्थ नारी , सशक्त परिवार ” राष्ट्रीय अभियानाचा शुभारंभ “ स्वस्थ नारी , ...
-
वृत्त क्रमांक राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या 140 प्रतिबंधात्मक कारवाया; 10 लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त नांदेड, दि. 10 जून : जिल...

.jpeg)

.jpeg)

.jpeg)
.jpeg)



.jpeg)

.jpeg)
.jpeg)

.jpeg)

.jpeg)

.jpeg)


.jpeg)




.jpeg)


.jpeg)

.jpeg)


.jpeg)


.jpeg)

.jpeg)

