Monday, October 10, 2016

जिल्हा परिषद , पंचायत समिती निवडणुकीतील
 आरक्षीत जागांचा मसुदा जाहीर ; हरकती मागविल्या  
नांदेड, दि. 10 :- जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत आरक्षीत जागांबाबतचा मसुदा जिल्‍हाधिकारी कार्यालय, जिल्‍हा परिषद नांदेड, सर्व तहसिल कार्यालय,  सर्व पंचायत  समिती  कार्यालय या ठिकाणी प्रसिद्धी करण्यात आला असून त्याबाबत कोणाची हरकत किंवा सूचना असल्यास ती गुरुवार 20 ऑक्टोंबर 2016 पर्यंत सादर करावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.
महाराष्‍ट्र जिल्‍हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961, (1962 चा अधिनियम 5) चे कलम 12 पोटकलम (1) अन्‍वये  नांदेड जिल्‍हा परिषद व पंचायत समितीच्‍या आगामी सार्वत्रिक निवडणूकीसाठी  जिल्‍हा परिषद क्षेत्रातील निवडणूक विभागाची व कलम 58 (1) (अ) अन्‍वये पंचायत समित्‍यामधील निर्वाचक गणांची रचना व एकुण सदस्‍य संख्‍या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गातील स्त्रियांसह राखून ठेवण्‍यात आलेले  जिल्‍हा परिषद निवडणूक विभागाच्‍या प्रभागरचना व आरक्षणाचे परिशिष्‍ट 11 (अ) व पंचायत समिती निर्वाचक गणाची प्रभागरचना व आरक्षणाचे परिशिष्‍ट 12 (अ) ची प्रत दि. 10 ऑक्टोंबर 2016 रोजी जिल्‍हाधिकारी कार्यालय, जिल्‍हा परिषद नांदेड, सर्व तहसिल कार्यालय,  सर्व पंचायत  समिती  कार्यालयातील  नोटीस बोर्डावर प्रसिध्‍द करण्‍यात आलेली आहे.   
या आदेशाच्‍या मसुदयास कुणाची हरकत  किंवा सूचना असल्‍यास त्‍यासंबंधीची जी सकारण लेखी निवेदने उपजिल्‍हाधिकारी (सामान्‍य) दुसरा मजला जिल्‍हाधिकारी कार्यालय नांदेड यांचेकडे गुरुवार 20 ऑक्टोंबर 2016 पर्यंत सादर करावीत. तारखेनंतर जिल्‍हाधिकारी यांच्‍याकडे आलेले निवेदन,  हरकती, सूचना इत्‍यादी विचारात घेतले जाणार नाहीत, असेही कळविण्यात आले आहे.

00000
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेता
धनंजय मुंडे यांचा नांदेड दौरा
   नांदेड, दि. 10 :- राज्य विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेता धनंजय मुंडे हे  नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
सोमवार 10 ऑक्टोंबर 2016 रोजी परळी वै. येथून शासकीय मोटारीने शासकीय विश्रामगृह नांदेड येथे रात्री 11.55 वा. आगमन , राखीव व मुक्काम.
मंगळवार 11 ऑक्टोंबर 2016 रोजी सकाळी 4 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथून माहूरकडे प्रयाण. सकाळी 6.30 वा. शासकीय विश्रामगृह माहूर येथे आगमन व राखीव (रेणुका मातेचे दर्शन). सकाळी 8 वा. नांदेड येथून शासकीय मोटारीने शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण. सकाळी 10 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आगमन व राखीव. सकाळी 11 वा. नांदेड येथून शासकीय मोटारीने परळीकडे प्रयाण करतील.

0000000
जिल्हा उद्योग केंद्राच्या
विविध सभांचे शुक्रवारी आयोजन
नांदेड दि. 10 :-  जिल्हा उद्योग केंद्र कार्यालयाच्या जिल्हा उद्योग मित्र समिती सभा, जिल्हा सल्लागार समिती सभा, स्थानिक लोकांना रोजगारात प्राधान्य जिल्हास्तरीय समिती सभा व आजारी उद्योग पुनरुज्जीवन जिल्हास्तरीय समितीची सभा शुक्रवार 14 ऑक्टोंबर 2016 रोजी दुपारी 4 वा. नांदेड जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे आयोजित करण्यात आली आहे. संबंधितांनी या सभांना उपस्थित रहावे, असे आवाहन नांदेड जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक यांनी केले आहे.  

0000000
राज्य ग्राहक आयोगाकडील
गैरन्यायिक सदस्य पदासाठी अर्ज मागविले
   नांदेड, दि. 10 :- राज्य ग्राहक वाद निवारण आयोग महाराष्ट्र यांच्याकडील गैरन्यायिक सदस्यांची पदे भरण्यात येणार आहेत. ही पदे भरण्याकरीता प्रतीक्षा यादी तयार करण्यासाठी अर्हता प्राप्त उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आल्याची माहिती जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच यांच्यावतीने देण्यात आली आहे.
या गैरन्यायिक सदस्य पदाकरीता ग्राहक संरक्षण अधिनियम 1986 तसेच सुधारीत महाराष्ट्र ग्राहक संरक्षण नियम 2000 च्या संबंधीत तरतुदी लागू आहेत. उमेदवारांची अर्हता, पात्रतेचे निकष यासंबंधीची माहिती व विहित नमुन्यातील अर्ज नांदेड जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच यांच्याकडे आवश्यक शुल्क 100 रुपये भरल्यास उपलब्ध होवू शकतील.
तसेच संपूर्ण तपशिलासह भरलेले अर्ज प्रबंधक राज्य ग्राहक वाद निवारण आयोग महाराष्ट् राज्य मुंबई यांचे कार्यालयात 4 नोव्हेंबर 2016 पर्यंत पोहचणे आवश्यक आहे. याची सर्व संबंधितानी नोंद घ्यावी. अधिक माहिती व तपशीलसाठी इच्छुकांनी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, नांदेड रुक्मिणी कॉम्पलेक्स, व्हीआयपी रोड नांदेड येथे संपर्क साधावा.  

000000
जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू
नांदेड, दि. 10  :- जिल्ह्यात बुधवार 19 ऑक्टोंबर 2016  रोजी मध्यरात्रीपर्यत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू केला आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
आगामी काळातील सण, उत्सव आणि इतर सार्वजनिक कार्यक्रम, विविध प्रकारची संभाव्य आंदोलनांची शक्यता यांच्‍या पार्श्वभुमीवर जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था कायम रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात गुरुवार 6 ऑक्टोंबर ते बुधवार 19 ऑक्टोंबर 2016 रोजीच्‍या मध्यरात्रीपर्यत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू केला आहे. त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमूद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही.

00000

Sunday, October 9, 2016

जिल्ह्यात हंगामात 112.92 टक्के पाऊस
   नांदेड, दि. 10 :- जिल्ह्यात  सोमवार 10 ऑक्टोंबर 2016 रोजी  सकाळी 8 वा. संपलेल्या गत 24 तासात एकूण 20.97 मिलीमीटर पाऊस  झाला असून  जिल्‍ह्यात  दिवसभरात सरासरी 1.31 मिलीमीटर पावसाची  नोंद  झाली  आहे. जिल्ह्यात या हंगामात आतापर्यंत सरासरी 1078.97 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.  जिल्ह्याची यंदाच्या हंगामातील आतापर्यंत पावसाची टक्केवारी  112.92 इतकी झाली आहे. 
जिल्ह्यात या हंगामात आतापर्यंत झालेल्या पावसाची तालुका निहाय टक्केवारी पुढील प्रमाणे. (सर्वाधिक ते उतरत्या क्रमाने ) लोहा-156.85, नांदेड- 133.63, अर्धापूर- 132.97, भोकर-128.46, कंधार-127.01, मुखेड-124.73, बिलोली-113.77, हदगाव-113.36,नायगाव-108.10, मुदखेड-105.99, माहूर-103.69, धर्माबाद-103.36, देगलूर-97.71, उमरी-97.08, हिमायतनगर-95.43, किनवट-85.14.
जिल्ह्यात सोमवार 10 ऑक्टोंबर रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या गत 24 तासात  झालेला  पाऊस मिलीमीटरमध्ये  तालुकानिहाय  पुढीलप्रमाणे  कंसात  एकूण  पाऊस : नांदेड- 3.00 (1218.54), मुदखेड- 1.33 (904.68), अर्धापूर- निरंक (1156.33), भोकर-00.50 (1280.00), उमरी- निरंक (967.27), कंधार-4.50 (1024.47), लोहा- निरंक (1307.00), किनवट- निरंक (1055.75), माहूर- निरंक (1285.75), हदगाव-00.43 (1107.84), हिमायतनगर-1.33 (932.64), देगलूर-2.50 (879.67), बिलोली- निरंक (1101.40), धर्माबाद-4.67 (946.38), नायगाव- निरंक (989.74), मुखेड-2.71 (1106.13) आज  अखेर  पावसाची सरासरी 1078.97 (चालू वर्षाचा एकूण पाऊस 17263.59) मिलीमीटर आहे. 

00000

Saturday, October 8, 2016

जिल्ह्यात हंगामात 112.78 टक्के पाऊस
गत 24 तासात सरासरी 40.90 मि.मी. 
           नांदेड, दि. 9 :- जिल्ह्यात  रविवार 9 ऑक्टोंबर 2016 रोजी  सकाळी 8 वा. संपलेल्या गत 24 तासात एकूण 654.46 मिलीमीटर पाऊस  झाला असून  जिल्‍ह्यात  दिवसभरात सरासरी 40.90 मिलीमीटर पावसाची  नोंद  झाली  आहे. जिल्ह्यात या हंगामात आतापर्यंत सरासरी 1077.66 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.  
जिल्ह्यात या हंगामात आतापर्यंत झालेल्या पावसाची तालुका निहाय टक्केवारी पुढील प्रमाणे. (सर्वाधिक ते उतरत्या क्रमाने ) लोहा-156.85, नांदेड-133.30, अर्धापूर-132.97, भोकर-128.41, कंधार-126.45, मुखेड-124.43, बिलोली-113.77, हदगाव-113.31,नायगाव-108.10, मुदखेड-105.83, माहूर-103.69, धर्माबाद-102.85, देगलूर-97.43, उमरी-97.08, हिमायतनगर-95.29, किनवट-85.14. जिल्ह्याची यंदाच्या हंगामातील आतापर्यंत पावसाची टक्केवारी  112.78 इतकी झाली आहे. 
जिल्ह्यात रविवार 9 ऑक्टोंबर रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या गत 24 तासात  झालेला  पाऊस मिलीमीटरमध्ये  तालुकानिहाय  पुढीलप्रमाणे  कंसात  एकूण  पाऊस : नांदेड- 49.63 (1215.54), मुदखेड- 47.00 (903.35), अर्धापूर-50.33 (1156.33), भोकर-30.50 (1279.50), उमरी-55.67 (967.27), कंधार-45.00 (1019.97), लोहा-58.33 (1307.00), किनवट-22.43 (1055.75), माहूर-46.50 (1285.75), हदगाव-27.00 (1107.41), हिमायतनगर-7.67 (931.31), देगलूर-44.50 (877.17), बिलोली-37.40 (1101.40), धर्माबाद-49.33 (941.71), नायगाव-39.60 (989.74), मुखेड-43.57 (1103.42) आज  अखेर  पावसाची सरासरी 1077.66 (चालू वर्षाचा एकूण पाऊस 17242.62) मिलीमीटर आहे. 
नांदेड जिल्ह्यात 1 जून ते 31 ऑक्टोंबर या कालावधीत पडणारा वार्षिक पाऊस मि.मी. मध्ये पुढील प्रमाणे. (सर्वाधिक ते उतरत्या क्रमाने ) किनवट-1240.00, माहूर-1240.00, भोकर-996.40, उमरी-996.40, हदगाव-977.30, हिमायतनगर-977.30, बिलोली-968.10, धर्माबाद-915.60, नायगाव-915.60, नांदेड-911.90, देगलूर-900.30, मुखेड-886.80, अर्धापूर-869.60, मुदखेड-853.56, लोहा-833.30, कंधार-806.60.

00000

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ #शेतकरीकर्जमुक्ती #कर्जमुक्तीयोजना२०२६ #महाराष्ट्रशासन #शेतकरी Maharashtra DGIPR ...