Saturday, February 14, 2026

वृत्त क्र. 209

समस्याग्रस्त व पीडित महिलांसाठी 16 फेब्रुवारी रोजी महिला लोकशाही दिन  

नांदेड, दि. 14 फेब्रुवारी :-  समस्याग्रस्त व पिडीत महिलांसाठी सोमवार 16 फेब्रुवारी 2026 रोजी महिला लोकशाही दिन आयोजित केला आहे. या लोकशाही दिनात समस्याग्रस्त व पिडीत महिलांनी आपले अर्ज विहित नमुन्यात सादर करावे, असे आवाहन जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी नांदेड व सदस्य सचिव तथा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी नांदेड यांनी केले आहे.   

दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन घेण्यात येतो. सोमवार 16 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 11 वा. जिल्हाधिकारी नांदेड यांच्या अध्यक्षतेखाली महसूल प्रबोधनी प्रशिक्षण केंद्र, एसबीआय एटीएमच्या मागे जिल्हाधिकारी कार्यालय परिसर नांदेड येथे महिला लोकशाही दिन होणार आहे. संबंधीत समितीचे सदस्य व शासन निर्णयात नमूद संबंधित विभागाचे अधिकारी यांनी उपस्थित रहावे, असेही आवाहन सदस्य सचिव तथा जिल्हा महिला व बालविकास अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

00000

वृत्त क्र. 208

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नांदेड विमानतळावर आगमन व पोहरादेवी वाशिमकडे प्रस्थान  

नांदेड, 14 फेब्रुवारी :- राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आज नांदेड विमानतळावर आगमन झाले. यावेळी आमदार राजेश पवार, नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले,  जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे आदी मान्यवरांनी त्यांचे स्वागत केले.  

यावेळी आमदार बालाजी कल्याणकर, महापौर कविता मुळे यांची उपस्थिती होती. त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हेलिकॉप्टरने पोहरादेवी जि. वाशिम येथील नियोजित कार्यक्रमासाठी प्रयाण केले.

00000









मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नांदेड विमानतळावरून नागपूर कडे रवाना झाले. यावेळी आमदार राजेश पवार, महापौर कविता मुळे ,विशेष पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, मनपा आयुक्त डॉ महेश कुमार डोईफोडे आदी उपस्थित होते. 






वृत्त क्र. 207

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नांदेड विमानतळावर 

आगमन व परळी वैजनाथकडे प्रस्थान

नांदेड,दि. 14 फेब्रुवारी:-  राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आज मुंबई येथून विमानाने नांदेड येथील श्री गुरु गोबिंद सिंघ जी विमानतळावर आगमन झाले. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आगमन प्रसंगी आमदार राजेश पवार, महापौर कविता मुळे, उपमहापौर दीपकसिंह रावत, नांदेड परिक्षेत्र पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार तसेच महानगरपालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे आदी मान्यवर उपस्थित होते. 

यावेळी उपस्थित मान्यवरांनी पुष्पगुच्छ व पुस्तक देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत केले. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विमानतळावरून हेलिकॉप्टरने परळी वैजनाथ जि. बीडकडे महापशुधन एक्स्पो 2026 या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी रवाना झाले.

00000














Friday, February 13, 2026

वृत्त क्र. 206

इयत्ता १२ वी परीक्षेसाठी 112 केंद्रांवर झूम वेबकाससह 16 फेब्रुवारीपासून ड्रोनद्वारे छायाचित्रण

नांदेड, दि. १३ फेब्रुवारी:- जिल्ह्यात इयत्ता 12 वीच्या परीक्षा 10 फेब्रुवारी 2026 पासून सुरू झाल्या असून इयत्ता 10 वीच्या परीक्षा 20 फेब्रुवारी 2026 पासून सुरू होत आहेत. इयत्ता 12 वीच्या 112 परीक्षा केंद्रांवर 10 फेब्रुवारीपासून झूम वेबकास्टद्वारे परीक्षा काळात थेट प्रक्षेपण केले जात आहे. हे प्रक्षेपण बैठे पथकाच्या माध्यमातून करण्यात येत असून गैरप्रकार टाळण्यासाठी जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी कार्यालय तसेच जिल्हा परिषदेत शिक्षणाधिकारी कार्यालय येथे नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत.

जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या निर्देशानुसार आता परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी 16 फेब्रुवारी 2026 रोजीच्या इयत्ता 12 वीच्या भौतिकशास्त्र विषयाच्या पेपरपासून जिल्ह्यातील परीक्षा केंद्र परिसराचे ड्रोन कॅमेराद्वारे छायाचित्रण करण्यात येणार आहे.

भारतीय न्याय संहिता कलम 163 नुसार जमावबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे परीक्षा काळात परीक्षा केंद्र परिसरात अनधिकृत व्यक्तींनी प्रवेश करू नये किंवा कोणत्याही प्रकारे नकला देण्याचा प्रयत्न करू नये. अन्यथा ड्रोन कॅमेराद्वारे छायाचित्रण करून संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी सर्वांनी सहकार्य करून परीक्षा कॉपीमुक्त व पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासनाला साथ द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

ooooo

वृत्त क्र. 205

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : ई-केवायसी दुरुस्तीसाठी 31 मार्चपर्यंत मुदत

नांदेड, दि. 13 फेब्रुवारी :- महिला व बालविकास विभागाच्या 6 फेब्रुवारी 2026 रोजीच्या शासन निर्णयानुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत ई-केवायसी प्रक्रियेत झालेल्या त्रुटी दुरुस्त करण्यासाठी लाभार्थी महिलांना पुन्हा एकदा संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
31 डिसेंबर 2025 पर्यंत ज्या लाभार्थी महिलांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली आहे, त्यापैकी काहींनी कुटुंबातील सदस्य सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेत नियमित/कायम/कंत्राटी कर्मचारी म्हणून कार्यरत नसल्याबाबत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत नसल्याबाबतचा पर्याय निवडताना नजरचुकीने चुकीचा पर्याय निवडला असल्याचे निदर्शनास आले आहे.
अशा लाभार्थी महिलांसाठीच ऑनलाईन ई-केवायसीमध्ये दुरुस्ती करण्याची सुविधा 31 मार्च 2026 पर्यंत https://ladakibahin.maharashtra.gov.in या अधिकृत पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आली आहे.
शासनाच्या निर्देशानुसार 31 मार्च 2026 नंतर कोणत्याही परिस्थितीत दुरुस्तीची संधी दिली जाणार नाही, याची संबंधित लाभार्थींनी नोंद घ्यावी.
ई-केवायसीमधील चुका दुरुस्त करण्याची ही अंतिम संधी असल्याने पात्र लाभार्थी महिलांनी निर्धारित मुदतीपूर्वी आवश्यक ती कार्यवाही करावी, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, नांदेड यांनी केले आहे.
०००००



वृत्त क्र. 204

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नांदेड दौरा

नांदेड दि. 13 फेब्रुवारी :- राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शनिवार 14 फेब्रुवारी 2026 रोजी नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील.

शनिवार 14 फेब्रुवारी 2026 रोजी मुंबई येथून विमानाने दुपारी 1 वा. नांदेड विमानतळ येथे आगमन व हेलिकॉप्टरने पोहरादेवी जि. वाशिमकडे प्रयाण करतील. पोहरादेवी वाशिम येथून सायं. 4 वा. नांदेड विमानतळ येथे आगमन व शासकीय विमानाने मुंबईकडे प्रयाण करतील.
0000

  "    वृत्तपत्रीय टिप्पणी    "   "   शिवछत्रपती क्रडापीठांतर्गत विविध क्रीडा प्रबोधीनीमध्ये सरळप्रवेश व खेळनिहाय कौशल्य  चाच...