Saturday, March 28, 2026

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे 150 दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा तसेच सेवाकर्मी कार्यक्रमांतर्गत सर्वोत्तम पोलीस परिक्षेत्र महानिरीक्षक / उपमहानिरीक्षक यांना प्रशस्तिपत्रांचे वितरण केले.

सर्वोत्तम पोलीस परिक्षेत्र महानिरीक्षक / उपमहानिरीक्षक :-
✅ शहाजी उमाप - नांदेड
✅ संदीप पाटील - नागपूर

वृत्त क्रमांक  

जिल्हाधिकारी कार्यालयात गॅस एजन्सीधारक व सेल्स ऑफिसर्स यांच्यासोबत बैठक संपन्न

गॅस वितरकांना महत्वाचे निर्देश ; प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन

नांदेड दि. 28 मार्च:- जिल्ह्यातील गॅस पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आणि ग्राहकांची गैरसोय टाळण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली सर्व गॅस कंपन्यांचे सेल्स ऑफिसर्स आणि गॅस एजन्सी धारकांची महत्त्वाची बैठक संपन्न झाली. या बैठकीत गॅस वितरकांना अत्यंत महत्त्वाचे निर्देश देण्यात आले आहे.

बैठकीतील महत्त्वाचे निर्णय आणि सूचना:

होम डिलिव्हरी बंधनकारक: सर्व गॅस एजन्सी धारकांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत की, त्यांनी कोणत्याही परिस्थितीत

ग्राहकांना एजन्सीवर बोलावून गॅस देऊ नये. ग्राहकांना त्यांच्या नोंदणीकृत पत्त्यावर 'होम डिलिव्हरी' देणे बंधनकारक आहे.तसेच ग्राहकांना त्यांच्या नोंदणीकृत पत्त्यावर 'होम डिलिव्हरी' साठी काही अडचण आल्यास त्यांनी त्यांच्या तालुक्यातील खालील प्रमाणे निरीक्षण अधिकारी ( नायब तहसीलदार पुरवठा ) यांचेशी संपर्क करावा.

संपर्क मो.क्रं.:- नांदेड-७०३०७७३०४०, अर्धापूर-८८०५०६८९५४, मुखेड- ९३५६८०६४०५, धर्माबाद-९४२१८४१४४७,मुदखेड- ९४४५११२७८२,उमरी- ८८०५४४७८३७,बिलोली- ७६२०७७९७०६,लोहा-९६५७२२४०४२,हिमायतनगर- ८३०८०७३०८९, हदगांव-८८०५०६८९५४, कंधार-९८२३७५७३४५, माहूर-९४०३१८४४७३, किनवट-९८५०२९६०९६, भोकर- ९४२११८३६०२, देगलूर-९४२३८०५०६४,नायगांव- ७०५७००२८६५

एजन्सीवर गर्दी टाळा: ग्राहकांनी गॅस सिलिंडर घेण्यासाठी एजन्सीवर गर्दी करू नये. बुकिंग केल्यानंतर लवकरात लवकर सिलिंडर घरपोच मिळेल, अशी चोख व्यवस्था करण्याचे आदेश वितरकांना देण्यात आले आहेत.

ग्राहकांना आवाहन: जिल्ह्यातील सर्व गॅस ग्राहकांना आणि लाभार्थ्यांना आवाहन करण्यात येते की, त्यांनी गॅस एजन्सीवर गोंधळ न घालता संयम राखावा. आपण गॅस बुक केल्यानंतर तो आपल्या दारात पोहोचवण्याची जबाबदारी संबंधित एजन्सीची आहे. प्रशासनाच्या या नियोजनाला नागरिकांनी सहकार्य करावे.

घरबसल्या करा e-KYC:ज्या ग्राहकांची बायोमेट्रिक आधार प्रमाणीकरण (e-KYC) प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही, त्यांनी गॅस एजन्सीवर जाण्याची आवश्यकता नाही. ग्राहक आपल्या मोबाईलवरून खालील पद्धतीने ही प्रक्रिया पूर्ण करू शकतात:

मोबाईल ॲपद्वारे: १. सर्वप्रथम प्ले-स्टोअरवरून 'Aadhaar Face RD (Early Access)' हे ॲप डाऊनलोड करा.

२. त्यानंतर तुमच्या गॅस कंपनीचे अधिकृत ॲप डाऊनलोड करा:

* Indane: IndianOil ONE

* Bharat Gas: Hello BPCL

* HP Gas: HP Pay

या ॲपमधील 'Aadhaar e-KYC' पर्यायावर जाऊन आपला चेहरा स्कॅन करून पडताळणी पूर्ण करा.

थेटलिंक: ग्राहक https://www.pmuy.gov.in/e-kyc.htmlया लिंकवर जाऊनही माहिती घेऊ शकतात.

तसेच बायोमेट्रिक आधार प्रमाणीकरण (e-KYC) प्रक्रिया पूर्ण करतांना काही अडचण आल्यास आपण खालील  कंपनीच्या सेल्स ऑफिसर यांचे संपर्क साधावा.

मनोजकुमार राणा, सेल्स ऑफिसर BPCL, मो.क्रं. 9130084746

जय सिंघ, सेल्स ऑफिसर IOCL, मो.क्रं. 9561366893

सचिनकुमार, सेल्स ऑफिसर HPCL, मो.क्रं. 9594820665

तरी जिल्ह्यातील गॅस पुरवठा साखळी पूर्णपणे कार्यान्वित असून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.

00000



वृत्त क्रमांक  

विविध कृषि पुरस्कारांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन 

अर्ज करण्यासाठी ३१ मार्च अंतिम मुदत

नांदेड दि.२८ मार्च :- महाराष्ट्र राज्य हे कृषी उत्पादन व कृषी उद्योग क्षेत्रात अग्रेसर राज्य म्हणून ओळखले जाते. राज्य शासनातर्फे दरवर्षी कृषी क्षेत्रात संघटनात्मक कार्य करणाऱ्या व्यक्ती, गट/संस्थेला पुरस्कार देण्यात येतो. उल्लेखनिय, अतिउल्लेखनिय कार्य करणारे तसेच राज्य, जिल्ह्याला दिशादर्शक ठरणारे शेतकरी,व्यक्ती,संस्था, गटांना पुरस्कार प्रदान करण्यात येतो. राज्यात दरवर्षी शेती, फलोत्पादन व पुरकक्षेत्रात अतिउल्लेखनिय कार्य करणाऱ्या महिला शेतकरी तसेच पुरुष शेतकरी अथवा संस्थेस कृषी विभागामार्फत डॉ. पंजाबराव देशमुख कृषीरत्न पुरस्कार, वसंतराव नाईक कृषीभुषण पुरस्कार, जिजामाता कृषीभुषण पुरस्कार, कृषीभुषण (सेंद्रिय शेती) पुरस्कार, वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार, उद्यानपंडीत पुरस्कार, युवा शेतकरी पुरस्कार व वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार इत्यादी पुरस्कार राज्यपाल महोदय महाराष्ट्र राज्य यांचे हस्ते प्रदान करुन सन्मानित करण्यात येते.

यापूर्वी विविध कृषी पुरस्कारांचे प्रस्ताव चार प्रतींमध्ये ऑफलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येत होते. प्रस्ताव बनविण्यासाठी खर्च येत असल्याने सर्व इच्छुक शेतकरी अर्ज करू शकत नव्हते. या पारंपारिक पद्धतीमुळे प्रस्ताव सादरीकरण, पडताळणी व संकलनासाठी अधिक कालावधी लागत होता. या पार्श्वभूमीवर पुरस्कार प्रस्तावांची प्रक्रिया अधिक सुलभ, पारदर्शक व प्रभावी करण्याच्या दृष्टीने कृषी विभागामार्फत पुरस्कार प्रस्ताव ऑनलाईन स्वरूपात स्वीकारण्यासाठी स्वतंत्र संगणकीय प्रणाली विकसित करण्यात आलेली आहे. सदर प्रणाली कृषी विभागाच्या संकेतस्थळावर (https://krishi.maharashtra.gov.in) कृषी पुरस्कार टॅब मध्ये उपलब्ध आहे.

सदर संगणकीय प्रणालीच्या माध्यमातून पुरस्कार प्रस्ताव सादरीकरण, तपासणी, मूल्यांकन तसेच अहवाल निर्मिती ही संपूर्ण प्रक्रिया डिजिटल स्वरूपात राबविणे शक्य होणार आहे.यामुळे मानवी हस्तक्षेप कमी होऊन पारदर्शकता वाढणार असून पुरस्कार प्रक्रियेची कार्यक्षमता, विश्वासार्हता व परिणामकारकता अधिक बळकट होणार आहे. तसेच शेतकऱ्यांनी खालीलप्रमाणे विहित कालावधीत अर्ज करावा.

शेतकऱ्यांना पुरस्कारासाठी आवश्यक असलेला जिल्हा पोलीस अधिक्षक यांचेकडील चारित्र्य पडताळणी दाखला प्राप्त करून घेण्यास १५-२० दिवसांचा कालावधी आवश्यक आहे, त्याबरोबर Network issue, तांत्रिक अडचण यांमुळे शेतकऱ्यांना विहित मुदतीत अर्ज सादर करण्यास अडचण येत आहे. तसेच मार्च महिन्यात आर्थिक वर्षाच्या अनुषंगाने कामकाज असल्यामुळे क्षेत्रीय यंत्रणाना प्रत्यक्ष पडताळणीसाठी देखील कालावधी आवश्यक आहे. यामुळे शेतकरी स्तरावरून व क्षेत्रीय स्तरावरून दूरध्वनीद्वारे सदरची मुदत वाढवून मिळणेबाबत होत असलेल्या विनंतीच्या अनुषंगाने केवळ सन २०२५ करीता विविध कृषी पुरस्कार सादर करणेसाठी सुधारीत नियोजन पुढीलप्रमाणे राहील.

सन 2025 सुधारित कालावधी  

अर्जदाराने ऑनलाईन अर्ज भरणे. सहाय्यक कृषी अधिकारी यांनी अर्जदाराचा ऑनलाईन अर्जाची छाननी करून, समक्ष भेट देऊन अनुषंगिक बाबींची पूर्ततेची कार्यवाही करून तालुका कृषी अधिकारी यांचेकडे अर्ज सादर करणे.तालुका कृषी अधिकारी यांनी अर्जदाराचा ऑनलाईन अर्ज छाननी, समक्ष भेट, सहाय्यक कृषी अधिकारी यांचे अभिप्राय यांची प्रत्यक्ष पडताळणी करून जिल्हास्तर समितीकडे अर्ज सादर करण्याचा सुधारित कालावधी 31 मार्च 2026 अखेर राहील.

जिल्हास्तर समितीने प्राप्त प्रस्तावांची छाननी करून, समक्ष भेट देऊन उल्लेखनीय कार्याबाबतच्या स्वयंस्पष्ट अभिप्रायासह शिफारशीसह अर्ज विभागस्तरीय समितीकडे सादर करण्याचा कालावधी 10 एप्रिल 2026 अखेर असेल.

विभागस्तरीय समितीने प्राप्त प्रस्तावांची छाननी करून, समक्ष भेट देऊन उल्लेखनीय कार्याबाबतच्या स्वयंस्पष्ट अभिप्रायासह शिफारस केलेले परिपूर्ण व निकषाप्रमाणे पात्र प्रस्ताव विभागस्तरीय समितीच्या बैठकीच्या इतिवृत्तासह कृषी आयुक्तालयास सादर करण्यासाठी कालावधीत 25 एप्रिल 2026 अखेर पर्यंत निश्चित करण्यात आला आहे.

आयुक्त कृषी यांनी इच्छुक शेतकरी, व्यक्ती, संस्था, गटांना सन 2025 पासूनचे विविध कृषी पुरस्कार बाबतचे अर्ज ऑनलाईन संगणक प्रणालीद्वारे सादर करण्याबाबत आवाहन केले आहे. इच्छुक शेतकऱ्यांनी तात्काळ आपला अर्ज ऑनलाईन संगणक प्रणालीद्वारे सादर करावा. अधिक माहितीसाठी उपविभागीय कृषि अधिकारी व तालुका कृषि अधिकारी यांचे कार्यालाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे.

00000

Friday, March 27, 2026

वृत्त क्रमांक  

मिशन लक्ष्यवेध जिल्हास्तरावर क्रीडा प्रतिभा विकास केंद्र अंतर्गत

खेळाडू निवड चाचणी आयोजित 

नांदेड दि. 27 मार्च :- क्रीडा व युवक सेवा संचालनालयमार्फत राज्यातील विकासाकरीता मिशन लक्ष्यवेध या महत्त्वाकांक्षी उपक्रमांतर्गत खेळाडू निवड चाचणी आयोजित करण्यात येणार आहे.  या चाचणीमध्ये विविध क्रीडा प्रकारांतील होतकरू व गुणवान खेळाडूंना प्रोत्साहन व पुरस्कार, खेळांडूना करिअर मार्गदर्शन खेळांडूच्या क्षमता विकासासाठी देशी, विदेशी संस्थाचा सहयोग हे सर्व घटक विकसित  करणे अभिप्रेत आहे. उपरोक्त घटक विकसीत करण्याकरीता आवश्यक प्रयत्न हे फक्त राज्यस्तरावरून नव्हे तर जिल्हास्तरावरून देखील होणे अपे‍‍क्षित आहे. त्याकरिता नांदेड जिल्हयास मिशन लक्ष्यवेध या योजनेअंतर्गत जिल्हास्तरावर प्रतिभा विकास केंद्र नांदेड करिता टेबल टेनिस, बॅडमिंटन, आर्चरी, हॉकी, ॲथलेटीक्स या पाच क्रीडाप्रकारांचे खेळांची केंद्र सुरू करावयाची आहेत. 

सदर निवड प्रक्रियेदरम्यान खेळाडूंची शारीरिक क्षमता, तांत्रिक कौशल्य, मानसिक तयारी तसेच खेळातील कामगिरी यांचे मूल्यमापन करण्यात येणार आहे.  अनुभवी प्रशिक्षक व तज्ज्ञांच्या उपस्थितीत ही निवड चाचणी पार पडणार आहे. या उपक्रमाचा उद्देश गुणवंत खेळाडूंची निवड करून त्यांना उच्चस्तरीय प्रशिक्षण देणे व राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी तयार करणे हा आहे.  पुढील प्रमाणे निवड चाचणी ठिकाण व खेळप्रकार नमुद करण्यात आलेले आहेत. 

खेळाचे नाव, निवड चाचणीची तारीख व वेळ, चाचणीचे ठिकाण, संपर्क याप्रमाणे   

टेबल टेनिस :

2 एप्रिल 2026 रोजी सकाळी 10 वा. जिल्हा क्रीडा संकूल इनडोअर हॉल नांदेड        

संपर्क चंद्रप्रकाश होनवडजकर (राज्य क्रीडा मार्गदर्शक) मो. 7972953141,

हानमंत नरवाडे.  मो.9604866253. 

बॅडमिंटन :

2 एप्रिल 2026 सकाळी 10 वा. जिल्हा क्रीडा संकूल इनडोअर हॉल नांदेड

संपर्क चंद्रप्रकाश होनवडजकर (राज्य क्रीडा मार्गदर्शक) मो. 7972953141. 

हॉकी :

3 एप्रिल 2026 सकाळी 10 वा. खालसा हायस्कूल नांदेड

संपर्क चंद्रप्रकाश होनवडजकर (राज्य क्रीडा मार्गदर्शक) मो. 7972953141,

संघटना सचिव हरविंदरसिंघ कपूर श्रीराम तुळसीराम कांबळे. मो. 7020241957. 

आर्चरी :

5 एप्रिल 2026 सकाळी 10 वा. जिल्हा क्रीडा संकूल परिसर नांदेड

संपर्क चंद्रप्रकाश होनवडजकर (राज्य क्रीडा मार्गदर्शक) मो. 7972953141,

वृषाली बालाजी जोगदंड मो. 9404662322. 

मैदानी (ॲथलेटीक्स) :

6 एप्रिल 2026  वेळ सकाळी 8 वा.सायन्स कॉलेज नांदेड

संपर्क श्रीमती शिवकांता देशमुखे मो.9657092794. 

खेळाडू निवड चाचणीचे निकष व पात्रता

वयोमर्यादा 21 वर्षाआतील मुले-मुली त्यावर्षाच्या 31 डिसेंबर रोजी). जन्म दाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, आधारकार्डे, गत दोन वर्षातील क्रीडा विषयक कामगिरीचे प्रमाणपत्र, पासपोर्ट साईज 3 फोटोग्राफ, शाळा महाविद्यालय बोनाफाईड प्रमाणपत्र, पालकाचे संमतीपत्र इ. महाराष्ट्र राज्यातील खेळाडू असला पाहिजे.

 क्रीडा कामगिरी- किमान राज्यस्तरावरील सहभाग किंवा पदक प्राप्त खेळाडू). (शालेय/संघटना अधिकृत स्पर्धा) गत 2 वर्षाच्या क्रीडा कामगिरीचे मुल्यमापन करण्यात येऊन क्रीडा कौशल्य व तंदुस्ती फिटनेस चाचण्यामध्ये पात्र होणे आवश्यक आहे. शासन मान्यताप्राप्त डॉक्टरांकडून दिलेले वैध वैद्यकिय फिटनेस प्रमाणपत्र अनिवार्य आहे.

वरील सर्व कागदपत्रे आवश्यक आहेत. सदर निवड चाचणीत सहभागी होण्यासाठी इच्छुक खेळाडूंनी संबंधित आयोजकांशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांनी सुचविले आहे अधिक माहितीसाठी चद्रंप्रकाश होनवडजकर राज्य क्रीडा मार्गदर्शक मो.7972953141 यांच्याशी संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

00000


 वृत्त क्रमांक  

जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू  

नांदेड दि. 27 मार्च :- नांदेड जिल्ह्यात 28 मार्चच्या सकाळी 6 वाजेपासून ते 11 एप्रिल 2026 च्या मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहणार आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.  

जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात 28 मार्चच्या सकाळी 6 वाजेपासून ते 11 एप्रिल 2026 रोजी मध्यरात्रीपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहिल. त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमुद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश कामावरील पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही.

अशा मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच पाच व पाचपेक्षा जास्त इसम जमण्यासाठी, सभा, मिरवणुका, मोर्चा काढणे, ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना तसेच पोलीस अधीक्षक नांदेड यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांना राहतील.

00000

वृत्त क्रमांक  

नागरिकांनी पेट्रोल-डिझेलचा अतिरिक्त साठा टाळावा – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

पेट्रोलपंपधारकांची बैठक; जिल्ह्यात पुरेसा इंधन साठा उपलब्ध असल्याची माहिती

नांदेड, दि. 27 मार्च :- जिल्ह्यातील नागरिकांनी पेट्रोल व डिझेलची पॅनिक खरेदी करू नये तसेच अतिरिक्त साठा करणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्ह्यातील सर्व पेट्रोलपंपधारकांची बैठक पार पडली.

या बैठकीला अतिरिक्त पोलीस अधीक्षक सुरज गुरव, जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. जगदीश बारदेवाड तसेच विविध पेट्रोलपंप मालक उपस्थित होते. यावेळी पेट्रोलपंपधारकांनी मांडलेल्या अडचणींचे निराकरण करण्यात आले.

जिल्ह्यासाठी आवश्यक असलेला पेट्रोल व डिझेलचा साठा पर्याप्त प्रमाणात राखण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. तसेच कोणत्याही परिस्थितीत साठाबाजी किंवा चढ्या दराने विक्री होणार नाही, याबाबत कडक सूचना देण्यात आल्या.

पेट्रोलपंपधारकांच्या सूचनेनुसार रविवारी तेल डेपो सुरू ठेवणे तसेच मागणीनुसार इंधन उपलब्ध करून देण्याबाबत तेल कंपन्यांना सूचना करण्यात आल्या. पेट्रोलपंपांवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आवश्यकतेनुसार पोलीस बंदोबस्त उपलब्ध करून देण्याच्या सूचना अतिरिक्त पोलीस अधीक्षक सूरज गुरव यांना देण्यात आल्या.

जिल्ह्यातील उपलब्ध साठ्याचा आढावा घेतला असता, दैनंदिन गरजेनुसार पेट्रोल व डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचे स्पष्ट झाले असल्याची माहिती जिल्हाधिकारी श्री. कर्डिले यांनी दिली.

०००००







Thursday, March 26, 2026


नमस्कार नांदेडकर...

मी राहुल कर्डिले जिल्हाधिकारी नांदेड.
आपल्या #नांदेड शहरात खरच #पेट्रोल चा तुटवडा आहे का ? तर मित्रानो असे काहीही नाही. जर तुम्हाला असा मेसेज कुणी पाठवले असतील तर त्या निव्वळ अफवा आहेत.

मग पेट्रोल पंप बंद का होत आहेत ?
पंप बंद होण्याचे कारण म्हणजे जो व्यक्ती नियमित मर्यादित पैशांचे पेट्रोल डिझेल खरेदी करतो तो व्यक्ती टँक फुल करून घेतोय. यालाच पॅनिक पर्चेस म्हणतात. यामुळे पंपावर गर्दी होत आहे जी सांभाळण्यासाठी पंपावर पुरेशी यंत्रणा नाही. पोलिस फक्त संरक्षण करू शकतात पण पंपावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कामाच्या मर्यादा आहेत. पॅनिक पर्चेस मुळे टँकर येईपर्यंत स्टॉक संपतो.

#इंधन पुरवठा नियमात बदल
पेट्रोल पंपाना पेट्रोल/डिझेल पुरवठा करणाऱ्या कंपन्यांनी आता अँडव्हान्स पेमेंट सिस्टिम सुरू केली आहे यामुळे टँकर येण्यासाठी थोडा वेळ लागतोय पूर्वी पेट्रोल/डिझेल टँकर मागवल्यावर 4 दिवसांत पेमेंट केले जायचे सध्या यात बदल झाले आहेत परिणामी टँकर अँडव्हान्स पेमेंट नंतर भरून निघतो.

सध्या जिल्ह्यात पेट्रोल/ #डिझेल उपलब्ध आहे का

तर मित्रानो नांदेड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पेट्रोल/डिझेल उपलब्ध आहे. फक्त पंपावर ग्राहकांनी पॅनिक खरेदी बंद केली आणि अनावश्यक गर्दी कमी केली तर संपूर्ण जिल्ह्याला अडचण येणार नाही.

म्हणून मित्रानो अशा परिस्थितीत आपण आपल्याला साथ देऊया अफवांवर अविश्वास दाखवू या.

धन्यवाद...

 

  "    वृत्तपत्रीय टिप्पणी    "   "   शिवछत्रपती क्रडापीठांतर्गत विविध क्रीडा प्रबोधीनीमध्ये सरळप्रवेश व खेळनिहाय कौशल्य  चाच...