Thursday, August 22, 2019


वनमंत्र्यांचा आज ग्रामपंचायतींशी "महा ई संवाद"
हरित महाराष्ट्रासाठी योगदान देण्याचे आवाहन
मुंबई, दि. 22 : हरित महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार उद्या दिनांक २३ ऑगस्ट २०१९ रोजी दुपारी ३ वाजता राज्यातील सर्व ग्रामपंचायतींशी लाईव्ह "महा ई संवाद" साधणार आहेत.  राज्यातील सर्व सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच सर्व गट विकास अधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी श्री. मुनगंटीवार थेट चर्चा करतील. या सर्वांना मोबाईल, लॅपटॉप, संगणक किंवा टॅबद्वारे  www.parthlive.com  या लिंकवर क्लिक करून कार्यक्रमात सहभागी होता येईल.
हरित महाराष्ट्राच्या निर्धाराने वनमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी लोकसहभागातून तीन वर्षात ५० कोटी वृक्षलागवडीचा संकल्प केला. या वृक्षलागवडीच्या पहिल्या टप्प्यात २०१७ साली  ४ कोटी वृक्षलागवडीच्या बदल्यात ५ कोटी ४३ लाख वृक्ष राज्यात लागले. यात १६ लाख लोकांनी सहभाग नोंदवला. या वृक्षलागवडीची लिम्का बूक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद झाली.  २०१८ साली १३ कोटी वृक्षलागवडीचा संकल्प १५ कोटी ८८ लाख वृक्ष लागून पूर्णत्वाला गेला. या वृक्षलागवडीत राज्यातील ३६ लाख लोक सहभागी झाले आणि वृक्षलागवड हा केवळ शासनाचा उपक्रम न राहाता ती खऱ्या अर्थाने लोकचळवळ झाल्याचे दृष्टिपथात आले.
००००
दुष्काळ निवारणासाठीमराठवाडा वॉटरग्रीड : बबनराव लोणीकर
            मुंबई, दि. 22 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित जय महाराष्ट्रकार्यक्रमात पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांची दुष्काळ निवारणासाठीमराठवाडा वॉटरग्रीडया विषयावर विशेष मुलाखत घेण्यात आली आहे. ही मुलाखत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून शुक्रवार दि. 23 ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसात वाजता प्रक्षेपित होणार आहे.
            मराठवाड्यातील पाणीपुरवठ्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजना,शासनाचा मराठवाडा वॉटर ग्रीड हा अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्प, मराठवाडा वॉटरग्रीडमध्ये अंतर्भूत बाबी, राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमाची वॉटर ग्रीडसाठी मदत,वॉटरग्रीडसाठी जलशुध्दीकरण केंद्र, जलसंपत्तीनियम प्राधिकरणाची वॉटर ग्रीड उभारणी व नियमावलीमध्ये असलेली भूमिका, मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमाची राज्यातील अंमलबजावणी आदी विषयांची माहिती श्री. लोणीकर  यांनी जय महाराष्ट्रया कार्यक्रमातून दिली आहे.
००००

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...