Thursday, August 22, 2019


साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे
यांच्या जीवन चरित्रावर सोमवारी कार्यक्रमाचे आयोजन 
नांदेड, दि. 22 :-  साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जीवन चरिञावर राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक शिवाजी कांबळे यांचे व्याख्यान विद्यार्थ्याना शालेय साहित्याचे वाटपाचा कार्यक्रम सोमवारी 26 ऑगस्ट 2019 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन सभागृह नांदेड येथे दुपारी 4 वा. आयोजित करण्यात आला आहे.
सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाचा शासन निर्णय दि. 31 जुलै 2019 अन्वये राज्य शासनाने विख्यात साहित्यीक संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे अग्रणी नेते साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्ष दि. 1 ऑगस्ट 2019 ते दि. 1 ऑगस्ट 2020 या कालावधीत साजरा करण्यात येत आहे. याअनुषंगाने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ मर्या. जिल्हा कार्यालय नांदेडच्या वतीने सोमवार 26 ऑगस्ट 2019 रोजी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
            साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जीवनचरिञावर राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक शिवाजी कांबळे हे व्याख्यान विद्यार्थ्याना मार्गदर्शन करणार आहेत. तसेच विद्यार्थ्याना शालेय साहित्याचे वाटप होणार आहे हा कार्यक्रम 26 ऑगस्ट 2019 रोजी दुपारी 4 वा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन सभागृह, ज्ञानमाता शाळेसमोर हिंगोली रोड नांदेड येथे आरोग्य सेवा (कृष्ठरोग)चे सहायक संचालक डॉ. विठ्ठ मेकाणे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच प्रमुख पाहूणे म्हणुन नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेचे कार्यकारी अभियंता सुग्रीव अंधारे यांच्यउपस्थितीत आयोजित करण्यात आला आहे.
जिल्हयातील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुरस्कार प्राप्त व्यक्ती संस्था, सर्व सामाजिक, राजकीय प्रतिनिधी, समाजबांधवानी या कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन महामंडाचे जिल्हा व्यवस्थापक जी. जी. येरपवार यांनी केले आहे.
000000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...