रेशीम
कृषि प्रदर्शनाचे जालना येथे आयोजन
नांदेड, दि. 22 :- रेशीम
संचालनालय सहकार पणन व वस्त्रोद्योग विभाग मंत्रालयाच्यावतीने रेशीम दिन साजरा करण्यात
येत असून हा कार्यक्रम जालना येथे रविवार 1 सप्टेंबर 2019 रोजी आयोजित करण्यात
येणार आहे. या कार्यक्रमाच्या ठिकाणी रेशीम संचालनालयाच्यावतीने 30 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर 2019 रोजी रेशीम कृषि
प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
रेशीम साहित्य निर्मिती करणारे, कृषि कंपन्या, विमा कंपन्या, खादय पदार्थ विक्री करणारे, रेशीम व कृषिसाठी उपयुक्त
साहित्य निर्मिती करणारे उत्पादक व विविध बचतगट आदींनी उत्पादनाची मोठया प्रमाणात प्रसिद्धी व विक्री करण्यासाठी
प्रदर्शनी स्थळी स्टॉल लावता येणार आहे. स्टॉल नोंदणी तसेच अधिक
माहिती व संपर्कासाठी पत्ता पुढील प्रमाणे - रेशीम संचालनालय, महाराष्ट्र
राज्य, 6 वा माळा, नवीन प्रशासकीय इमारत
क्र. 2 विभागीय आयुक्त कार्यालय, परिसर, सिव्हील लाईन्स, नागपुर-
440001 फोन क्र. ०७१२-२५६९९२४/ २५६९९२६. ई-मेल dos.maha@gmail.com. सहायक संचालक, प्रादेशिक रेशीम कार्यालय, प्लॉट
क्र.५४, सदाशिव नगर, धूत हॉस्पिटल समोर,
सिडको एन-२, औरंगाबाद. १०३१००३. फोन क्र.
०२४०- २४७५७४७ मो.क्र. ९४२०१९१०६७ ई-मेल adsilkaurangabad@gmail.com. तर रेशीम विकास अधिकारी श्रेणी-२, जिल्हा रेशीम कार्यालय,कृषी उत्पन्न बाजार समिती परिसर, कापुस प्रयोगशाळा
इमारत, जालना. ४३१२०३ फोन क्र. ०२४८२- २२९०४७ मो.क्र.
९८५०४४७०९६ ई-मेल reshimjalna@gmail.com येथे
संपर्क साधावा, असे आवाहन रेशीम विकास अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
00000
No comments:
Post a Comment