Thursday, August 22, 2019


संकटग्रस्त महिलांसाठी निवारा केंद्राचे कामकाज
हाताळण्यासाठी पात्र संस्थांना प्रस्ताव करण्याचे आवाहन
नांदेड, दि. 22 :- स्वयंसेवी संस्थांकडुन संकटग्रस्त महिलांसाठी निवारा केंद्रचे (One Stop Crises Centre) दैनंदिन कामकाज हाताळण्यासाठी नेमावयाच्या पात्रताधारक संस्थेकडून प्रस्ताव 10 सप्टेंबर 2019 अखेर पर्यंत मागविण्यात येत आहेत.
केंद्र शासनाच्या महिला बाल विकास विभागाकड नांदेड जिल्ह्यासंकटग्रस्त महिलांसाठी निवारा केंद्र मंजुर करण्यात आले आहे. हे केंद्र तात्पुरत्या स्वरुपात, लाल बहादुर शास्त्रीनगर नांदेड येथे श्री नारायण कामाजी गोरे यांची इमारत रविदानिवास घर क्र. 1/12/849 दि. 13 जून 2017 पासुन जिल्ह्यातील संकटग्रस्त महिलांना वैद्यकीय सुविधा, पोलीस मदत, समुपदेशन कायदेश मदत आदी तातडीने उपलब्ध होईल यासाठी कार्यान्वीत करण्यात आले आहे.
            या केंद्राचे दैनंदिन कामकाज प्रभावीपणे चालवण्यासाठी केंद्र शासनाने निर्गमित केलेल्या One Stop Crises Center च्या मार्गदर्शक सुचनेप्रमाणे, पात्रताधारक एजन्सीची निवड करावयाची आहे. योजनेच्या मार्गदर्शक सुचनेमध्ये नमुद केल्यानुसार नांदेड जिल्ह्यातील महिलांविषयक कायदे योजनांवर काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था, महिलांवर होणाऱ्या हिंसाचाराच्या विरोधात कार्यरत असणारी स्वयंसेवी संस्था, अशा स्वयंसेवी संस्थामधुन पात्रताधारक संस्थेची (एजन्सीची) निवड करावयाची आहे. त्यासाठी नांदेड जिल्ह्यातील उपरोक्त नमुद मान्यताप्राप्त स्वयंसेवी संस्थाकडुन (एजन्सीकडुन) 10 सप्टेंबर 2019 अखेर अर्ज मागविण्यात येत आहे.
           इच्छुक नमुद मान्यताप्राप्त स्वयंसेवी संस्थानी (एजन्सींनी) विहीत नमुन्यातील अर्जाचा नमुना 31 ऑगस्ट 2019 पर्यंत जिल्हा महिला बाल विकास अधिकारी कार्यालय, 24 गणेश कृपा शास्त्री नगर (भाग्य नगर) नांदेड 431605 येथे शासकीय सुट्टया वगळता उपलब्ध राहतील. तसेच या कार्यालयाने प्रमाणित केलेल्याचा अर्जाचा नमुना निवड प्रक्रियेदरम्यान विचारात घेतला जाईल, असे आवाहन अध्यक्ष जिल्हा व्यवस्थापन समिती तथा जिल्हाधिकारी नांदेड यांनी केले आहे.
000000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...