Thursday, December 13, 2018


मतदान केंद्रावर रविवारी
बिएलओ उपस्थित राहणार  
नांदेड, दि. 13 :- मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत नांदेड जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रावर मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) रविवार 16 डिसेंबर 2018 रोजी सकाळी 9 ते सायं 5 वाजेपर्यंत उपस्थित राहणार आहेत. यांचेसमवेत सर्व मान्यताप्राप्त राजकीय पक्षांचे मतदान केंद्र सहाय्यक (BLA) यांनी या कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी नांदेड यांनी केले आहे.
भारत निवडणूक आयोगाचे निर्देशानुसार 1 जानेवारी 2019 या अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम घोषित केलेला असून दिनांक 11 जानेवारी 2019 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिध्द करण्यात येणार आहे.
या दिवशी दिनांक 1 सप्टेंबर 2018 रोजी प्रसिध्द करण्यात आलेल्या प्रारुप मतदार यादीचे वाचन होणार आहे. तसेच विशेष पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत प्राप्त झालेल्या फॉर्म नं. 6, 7, 8, 8-अ चे स्वीकारलेले फॉर्म (Accepted) व नाकारलेले फॉर्म (Rejected) ची मतदारांच्या नावाची यादीचे वाचन होणार आहे. त्यावेळी जर मतदान केंद्र सहाय्यक (BLA) आणि उपस्थित मतदार यांचे नवीन दावे, हरकती असल्यास त्याची नोंद घेतली जाणार आहे. तसेच दिव्यांग मतदारांची नोंद मतदार यादीमध्ये चिन्हांकित केली जाणार आहे.
या कार्यक्रमास जास्तीत जास्त नागरिक आणि सर्व मान्यता प्राप्त राजकीय पक्षांचे मतदान केंद्र सहाय्यक (BLA) यांनी संबंधित मतदान केंद्रावर भेट देऊन आपला सक्रिय सहभाग नोंदवावा, असेही आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी नांदेड यांनी केले आहे.
000000

No comments:

Post a Comment

  वृत्त  क्र.  112 राज्यमंत्री मेघना बोर्डीकर साकोरे आज नांदेडमध्ये   जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक   नांदेड दि. 27 जानेवारी :- रा...