Thursday, December 13, 2018


गटई लाभार्थ्यांना लोखंडी पत्र्याचे स्टॅाल वाटप
अर्ज करण्यास 30 डिसेंबरची मुदत  
 नांदेड, दि. 13 :- शासन निर्णय 13 फेब्रुवारी 2008 अन्वये अनुसूचित जातीतील अनु. क्र. 11 या प्रवर्गातील गटई लाभार्थ्यांना लोखंडी पत्र्याचे स्टॉल (100 टक्के अनुदानावर) वाटप योजनेअंतर्गत नांदेड जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांनी (यापुर्वी लाभ देण्यात आलेले लाभार्थी वगळुन) आपले अर्ज सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, अर्धापुर रोड ग्यानमाता हायस्कुल समोर, नांदेड जि. नांदेड या कार्यालयात 30 डिसेंबर 2018 पर्यंत अर्ज स्वत: स्वसाक्षाकींत करुन सादर करावे, असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त तेजस माळवदकर यांनी केले आहे.
अर्जासोबत जोडाव्याची कागदपत्रे पुढील प्रमाणे आहेत. अर्जदाराचा स्वत:चा प्रधिकृत अधिकाऱ्याने दिलेला जातीचा दाखला. चालु आर्थिक वर्षातील उत्पन्नाचा दाखला (तहसिलदाराने निर्गमित केलेला). अर्जदाराचे अथवा कुटूबांचे रेशनकार्ड (सांक्षाकित प्रत). गटई कामाचे प्रमाणपत्र / अस्वच्छ व्यवसाय प्रमाणपत्र (ग्रामसेवक / तहसिलदार / मुख्याधिकारी, नगर परिषद क्षेत्र) यांनी निर्गमित केलेले  प्रमाणपत्र. जागा नाहरकत प्रमाणपत्र (ग्रामसेवक / तहसिलदार / मुख्याधिकारी, नगर परिषद क्षेत्र) यांनी निर्गमित केलेले प्रमाणपत्र. आधार कार्ड, मतदान कार्ड आवश्यक आहे.
00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र. 1129 लोकसभेसाठी 67.81 तर विधानसभेसाठी 69.45 टक्के मतदान  विधानसभेसाठी भोकर येथे सर्वाधिक 76.33 तर नांदेड उत्तरमध्ये 60.6 सर्वात...