Thursday, December 13, 2018


रब्बी हंगातील पिकांचा विमा
उतरविण्याची 31 डिसेंबर मुदत 
नांदेड, दि. 13 :- राज्यात रब्बी हंगाम 2018-19 मध्ये प्रधानमंत्री पिक विमा योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गहु (बा), ज्वारी (जि), हरभरा या पिकांसाठी कर्जदार बिगरकर्जदार शेतकऱ्यांना पिक विमा उतरवण्याची अंतिम मुदत 31 डिसेंबर 2018 ही आहे. अधिकच्या माहितीसाठी शेतकऱ्यांनी आपल्या तालुका कृषि अधिकारी किंवा जवळच्या बँकेशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी नांदेड यांनी केले आहे. 
प्रधानमंत्री पिक विमा योजना कर्जदार शेतकऱ्यांना अधिसुचीत क्षेत्रातील अधिसुचीत पिकांसाठी बंधनकारक आहे तर बिगर कर्जदार शेतकऱ्यांना च्छिक आहे. या योजनेअंतर्गत वास्तवदर्शी विमा हप्ता आकारण्यात येणार असुन रब्बी हंगामातील पिकांसाठी 1.5 टक्के नगदी पिकासाठी 5 टक्के असा मर्यादीत आहे. या योजनेअंतर्गत जोखीमस्तर सर्व पिकांसाठी 70 टक्के निश्चित करण्यात आला आहे.
पिक पेरणीपासुन काढणी पर्यंतचा कालावधी नैसर्गीक आग, विज कोसळणे, गारपीट, वादळ, चक्रीवादळ, पुर, क्षेत्र जलमय होणे, भुस्खलन, दुष्काळ, पावसातील खंड, किड रोग त्यादी बाबीमुळे पिकांच्या उत्पादनात येणारी घट काढणी पश्चात नुकसान आदी जोखीम यामध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. नांदेड जिल्हयातील गहु (बा), ज्वारी (जि), हरभरा या पिकांसाठी ही योजना लाग आहे.
या योजनेअंतर्गत विमा संरक्षीत रक्कम विमा हप्ता पुढील प्रमाणे राहणार आहे.
पीक
विमा संरक्षीत रक्कम रु./हेक्टर
शेतकऱ्यांनी भरावयाचा पिक विमा हप्ता (रु)
विमा लागु असलेले तालुके
गहु (बा)
34 हजार 600
519/-
नांदेड, अर्धापूर, मुदखेड, बिलेाली, धर्माबाद, नायगाव, कंधार, लोहा, हदगाव, हिमायतनगर, किनवट, भोकर
ज्वारी (जि)
25 हजार 200
378/-
नांदेड, बिलोली, धर्माबाद, नायगाव, मुखेड, देगलूर, किनवट, हदगाव.
हरभरा
23 हजार 100
346.50/-
नांदेड, अर्धापूर, बिलोली, धर्माबाद, हदगाव, देगलूर, मुखेड, किनवट, नायगाव, मुदखेड, हिमायतनगर.
ही योजना फ्युचर जनरल इंन्शुरन्स कंपनी लिमिटेड, इंडिया बुल्स फायनान्स सेंटर, टॉवर-3, सेनापती बापट मार्ग, एलफिस्टन रोड, पश्चिम मुंबई-400013 या कंपनी मार्फत राबविण्यात येणार आहे.
00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...