Friday, June 6, 2025

 वृत्त क्रमांक 587 

स्मार्ट प्रकल्पांतर्गत राज्याबाहेरील प्रशिक्षणासह अभ्यास दौरा  

 

नांदेड दि. 6 जून :- मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पांतर्गत मुल्यसाखळी विकासशाळा अंतर्गत राज्याबाहेरील प्रशिक्षणासह अभ्यास दौरा जिल्हा अंमलबजावणी कक्ष तथा प्रकल्प संचालक (आत्मा) स्मार्ट प्रकल्पाच्यावतीने स्मार्ट प्रकल्पचे नोडल अधिकारी अनिल शिरफुले यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले आहे. या राज्याबाहेरील दौऱ्या 31 मे रोजी श्री. शिरफुले यांनी हिरवा झेंडा दाखवुन दौऱ्यास मान्यता दिली. यावेळी समुदाय आधारीत संस्थेचे संचालक व प्रशिक्षणार्थी, इतर कर्मचारी उपस्थित होते.

 

या अभ्यास दौरा हा कृषि विज्ञान केंद्र भरमपूर, IIPR (Under ICAR) Research Center Phanda, sihore भोपाळ मध्यप्रदेश, कृषि विज्ञान केंद्र उज्जैन मध्यप्रदेश राज्य येथे रवाना करण्यात आला आहे. स्मार्ट प्रकल्पांतर्गत मंजुर उपप्रकल्प समुदाय आधारित संस्था बिलोली तालुक्यातील चंद्रगुप्त मौर्य फार्मर प्रो. कं. लि. गागलेगाव व शिवलिंग बादशाह फा. प्रो. कं. लि. डोणगाव (बु.) या कंपनी मधील प्रत्येकी 5 प्रशिक्षणार्थींना या अभ्यास दौऱ्यामध्ये पाठविण्यात आले. सदरचे प्रशिक्षणार्थी IIPR (Under ICAR) Research Center Phanda, sihore भोपाळ मध्यप्रदेश येथील हरभरा संशोधन केंद्र येथे भेट देवुन तेथील उपक्रम व प्रक्रिया केंद्र पाहून प्रशिक्षत होणार आहेत.

00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र. 720   डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय रुग्णालयात हिमालया बेबी फि डिंग सेंटर चा लोकाअर्पण सोहळा       नांदेड दि. 11 ...