Friday, June 6, 2025

वृत्त क्रमांक 579 

मातोश्री शासकीय ईबीसी मुलांचे वसतिगृहात विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया 10 जून पासून सुरू  

नांदेड, 6 जून :- मातोश्री शासकीय ईबीसी मुलांचे वसतिगृह तथागतनगर मालेगाव रोड नांदेड येथे सन 2025-26 या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना वसतिगृहात माध्यमिक, उच्च माध्यमिक, पदवी, पदवीत्तर या विद्यार्थ्याचे पुनर / नूतन प्रवेशासाठी प्रवेश अर्ज मागविण्यात आली आहेत. या वसतिगृहात प्रवेश अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख बुधवार 25 जून 2025 असून मुदतीनंतर आलेल्या अर्जाचा स्विकार केला जाणार नाही. 

या अर्जासोबत शेवटी दिलेल्या वार्षिक परीक्षेतील गुणपत्रक, सन 2024-25 या वर्षाचे उत्पन्न प्रमाणपत्र (तहसीलदार यांनी अदा केलेले आसावे) व चालू वर्षात (2025-26 साठी ) प्रवेश घेतलेले बोनाफाईड प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, यांच्या सत्यप्रति संक्षांकित करुण प्रवेशा अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. प्रवेश अर्ज व नियमावली या कार्यालयात 10 ते 25 जून 2025 या कालावधीत सुट्टीचे दिवस वगळून कार्यालयीन वेळेत मिळतील. तसेच याच कालावधीत संपूर्ण भरलेले अर्ज कागदपत्रासह स्वीकारले जातील. 

विद्यार्थी प्रवेशाची निवड प्रक्रिया पूर्ण झाल्यावर वसतिगृह नियमित सुरु होईल. सदरील वसतिगृहात शासनाकडून निवासाची व भोजनाची संपूर्ण व्यवस्था विनामुल्य सोय करण्यात येणार आहे. विद्यार्थ्याना गुणवत्तेनुसार वसतिगृहात प्रवेश दिला जातो. मागवर्गीय विद्यार्थ्याना 20 टक्के जागा राखीव आहेत. चूक किंवा अपूर्ण माहितीचे आर्ज स्वीकारले जाणार नाहीत तसेच आवश्यक कागदपत्राची पूर्तता न केलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत याची कृपया विद्यार्थ्यानी अथवा पालकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन येथील मातोश्री शासकीय ईबीसी मुलांचे वसतिगृहाचे गृहप्रमुख यांनी केले आहे.

00000

No comments:

Post a Comment

वृत्त क्र. 765   शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या बसेसची तपासणी कारवाईत चालकांकडून 7 लाख 4 हजार रुपया चा दंड वसूल नांदेड दि. ...