वृत्त
क्रमांक 583
शिवराज्याभिषेक दिन कार्यक्रम
श्री गुरू गोबिंदसिंघजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत
उत्साहात संपन्न
· नाविन्यता प्रदर्शन व पंचपरीवर्तन व्याख्यानाचे आयोजन
नांदेड दि. 6 जून :- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनाचे औचित्य साधत येथील श्री गुरू गोबिंदसिंघजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिवराज्याभिषेक दिन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. राज्याभिषेक सोहळयास 350 वर्ष पुर्ण झाले असल्याने आज 6 जून रोजी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून राज्यातल्या सर्व ‘आयटीआय’ मध्ये सोहळा साजरा करण्यात आला. या सोहळ्याचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या व्हिडिओ संदेशाद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले.
राज्याभिषेक सोहळयाचे औचित्य साधून श्री गुरूगोबिंदसिंघजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत विद्यार्थी, माजी विद्यार्थी, स्थानिक उद्योजक यांच्या सहभागातून नाविन्यता प्रदर्शन व पंचपरीवर्तन व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
नांदेड येथील या सोहळयास प्रमुख पाहूणे म्हणून अप्पर पोलीस अधिक्षक डॉ. संजय तुंगार उपस्थित होते. अध्यक्षस्थानी आयएमसी सदस्य आयटीआय नांदेडचे हर्षदभाई शहा होते. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रा. डॉ. नागेश कल्याणकर व प्रा. प्रभाकर जाधव उपस्थित होते. आयएमसीचे सदस्य अभिजीत रेणापूरकर, अरुणजी फाजगे, प्रेमानंद शिंदे, धीरज बिडवे, उपअभियंता काकडे, पदमजा मोटर्सचे शशिकांत वाडेवाले यांची प्रमुख उपस्थिती होती.
छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक इ.स. 1674 साली रायगड किल्ल्यावर संपन्न झाला त्यांना छत्रपती म्हणून राज्याभिषेक करण्यात आला. राज्याभिषेकास 350 वर्ष पुर्ण झाले आहेत. त्यांचे प्रेरणादायी जीवन आजही समाजाला प्रेरणा देते. त्यांच्या हूशार निर्णयाने आणि कणखर नेतत्वावाने भारतातील महान राजांपैकी एक महान व्यक्तिमत्व बनवले ज्यांनी धैर्य प्रामाणिकपणा आणि देशभक्ती शिकवली.
व्यक्तीच्या अधिकाराची जपवणूक करणे म्हणजे स्वराज्य ही संकल्पना छत्रपती शिवाजी महाराजांनी राबविली असे अप्पर पोलीस अधिक्षक डॉ. संजय तुंगार यांनी नमूद केले. हरवलेला इतिहास, शिवाजी महाराजांचे प्रशासन आणि आजचा समाज यावर अत्यंक मार्मिक शब्दात आपले विचार हर्षदभाई शहा यांनी व्यक्त केले. समर्थ रामदास यांच्यासारखे थोर पुरुषांच्या उपदेशाची आज गरज असल्याचे त्यांनी नमुद केले.
आजचा युवक कोणाला आदर्श मानतो यावर राष्ट्राचे भविष्य अवलंबून आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना जिजाऊ माँ साहेबांनी महापुरूषांच्या कथा सांगत घडवले. छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा एकतरी गुण आजच्या युवकांनी अंगीकृत करावा. शिवजयंती स्वराज्याची शपथ म्हणून साजरी केली पाहिजे, असे संस्थेचे प्राचार्य सचिन सुर्यवंशी यांनी प्रास्ताविकात नमूद केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस. एम. राका यांनी केले तर आभार राष्ट्रीय सेवा योजनेचे
कार्यक्रमाधिकारी डी. ए. पोतदार यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेतील सर्व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
00000
No comments:
Post a Comment