Friday, June 6, 2025

 वृत्त क्रमांक 580 

जिल्हा पशुसंवर्धन कार्यालयात

 राज्य-जिल्हास्तरीय नाविन्यपूर्ण योजनेतील अर्जाचे रॅडमायजेशन 

नांदेड, 6 जून :- राज्य व जिल्हास्तरीय नाविन्यपूर्ण योजना सन 2025-26 अंतर्गत प्राप्त अर्जाचे रॅडमायजेशन प्रक्रिया शनिवार 7 जून 2025 रोजी करण्यात येणार आहे. ही प्रक्रिया जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी कार्यालय नांदेड येथे सकाळी 11 वा. जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त नांदेड यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली आहे.  

या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना दुधाळगट, शेळीगट व एक हजार मांसल कुक्कुट पक्षी संगोपन करण्यासाठी या योजनेचा लाभ मिळणार आहे, असे जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त तथा निवड समितीचे सदस्य सचिव यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

0000

No comments:

Post a Comment

वृत्त क्र. 765   शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या बसेसची तपासणी कारवाईत चालकांकडून 7 लाख 4 हजार रुपया चा दंड वसूल नांदेड दि. ...