वृत्त क्रमांक 588
दहावी परीक्षेच्या गुणपत्रिका डिजीलॉकर मध्ये उपलब्ध
नांदेड दि. 7 जून :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता 10 वी परीक्षेचा निकाल मंगळवार 13 मे 2025 रोजी जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेस प्रविष्ट सर्व विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका 2025 डिजीलॉकर Digilocker मध्ये उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.
ज्या विद्यार्थ्यांचे APPAR-ID उपलब्ध आहेत व मंडळाकडे अचुक नोंदविलेले आहेत त्यांच्या गुणपत्रिका APPAR-ID सोबत Link Digilocker Account मध्ये push करण्यात आलेल्या आहेत. ज्या विद्यार्थ्यांचे APPAR-ID उपलब्ध नाहीत अथवा मंडळाकडे नोंदविलेले नाहीत त्यांच्या परीक्षेचे वर्ष व बैठक क्रमांक टाकून गुणपत्रिका Digilocker app मध्ये उपलब्ध करुन घेता येतील. यासंदर्भात विभागीय मंडळ कार्यकक्षेतील सर्व संबंधित मुख्याध्यापक, विद्यार्थी व पालक यांनी नोंद घ्यावी, असे आवाहन राज्य मंडळ सचिव देविदास कुलाळ यांनी केले आहे. पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परिक्षा घेण्यात आल्या होत्या.
00000
No comments:
Post a Comment