वृत्त क्र. 1128
वेबकास्टिंगच्या माध्यामातून दिवसभर करडी नजर
नांदेड दि. २० नोव्हेंबर : जिल्ह्यात लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा सार्वत्रिक निवडणुकिची प्रक्रिया आज सकाळपासून सुरू झाली. या दरम्यान संपूर्ण मतदान प्रक्रियेवर वेबकास्टिंगच्या माध्यमातून दिवसभर देखरेख ठेवण्यात आली. नांदेड जिल्हयातील एकूण ३०८८ केंद्रापैकी १७८१ केंद्रावर वेब कॅमेराव्दारे (प्रत्येक केंद्रावर दोन कॅमेरे) निगराणी ठेवली जात होती.
नांदेड जिल्ह्यात नऊ विधानसभा मतदारसंघासाठी ३०८८ हजारापेक्षा अधिक मतदान केंद्र होते. दरम्यान सकाळी ७ वाजेपासून मतदान सुरू झाल्यानंतर मतदान केंद्रावर वेबकास्टिंगच्या माध्यमातून जिल्हा नियंत्रण कक्षात जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, अप्प३रजिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, निवडणूक उपजिल्हाधिकारी राजकुमार माने, प्रशांत शेळके, जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर आडे व अन्य अधिका-यांनी मतदान प्रक्रियेवर देखरेख ठेवली. जिल्हाभरात मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली.
००००
No comments:
Post a Comment