तृतीयपंथी यांनी जिगळा ता.बिलोली जि.नांदेड येथे मतदान केले. जिल्ह्यात १७२ तृतीयपंथी आहेत.
किनवट : 83 किनवट विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र क्रमांक 202 सुसंस्कार मतीमंद विद्यालय, गोकुंदा येथे तृतीयपंथी मतदारांनी मतदानाचा हक्क बजावल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी कावली मेघना (भाप्रसे) यांचे समवेत घेतलेलं छायाचित्र..
पोलीस दलही तैनात : नांदेड जिल्ह्यामध्ये पंधरा हजार कर्मचारी सध्या निवडणूक कर्तव्यावर आहेत. त्यापैकी आठ हजार पोलीस कर्मचारी कार्यरत आहेत.
नांदेड लोकसभेसाठी आज दुपारी 3 वाजता 41.58 तर विधानसभेसाठी 42.87 टक्के मतदान
• 3 वाजेपर्यत किनवटमध्ये सर्वाधिक तर मुखेडमध्ये सर्वात कमी मतदान
नांदेड , दि.20 नोव्हेंबर :- आज सकाळी 7 वाजेपासून नांदेड जिल्ह्यात उर्त्स्फूतपणे मतदानाला सुरुवात झाली असून अनेक मतदान केंद्रावर मतदाराच्या रांगाच रांगा दिसून आल्या आहेत. नांदेड जिल्ह्यात आज दुपारी 3 वाजेपर्यत लोकसभा पोटनिवडणुकीसाठी 41.58 टक्के तर विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी 42.87 टक्के मतदान झाले आहे.
नागरिकांनी जास्तीत जास्त घराबाहेर पडून मतदान करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. नांदेड जिल्ह्यात 9 मतदार संघात 83-किनवट मतदारसंघात 48.94टक्के, 84-हदगाव मतदारसंघात 48.29 तर 85-भोकर मतदारसंघात 44.72टक्के , 86-नांदेड उत्तर 39.40 नांदेड दक्षिण 38.84, 88-लोहा मतदारसंघात 40.10, 89-नायगाव मतदारसंघात 47.65 टक्के, 90-देगलूर मतदारसंघात 42.16 टक्के, 91-मुखेड मतदारसंघात 37.12 टक्के मतदान झाले आहे.
00000
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी
राज्यात दुपारी ३ वाजेपर्यंत ४५.५३ टक्के मतदान
मुंबई, दि. २० : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी आज सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून दुपारी ३ वाजेपर्यंत राज्यात सरासरी ४५.५३ टक्के मतदान झाले आहे.
राज्यातील जिल्हानिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे :
अहमदनगर - ४७.८५ टक्के,
अकोला - ४४.४५ टक्के,
अमरावती -४५.१३ टक्के,
औरंगाबाद- ४७.०५टक्के,
बीड - ४६.१५ टक्के,
भंडारा- ५१.३२ टक्के,
बुलढाणा-४७.४८ टक्के,
चंद्रपूर- ४९.८७ टक्के,
धुळे - ४७.६२ टक्के,
गडचिरोली-६२.९९ टक्के,
गोंदिया -५३.८८ टक्के,
हिंगोली - ४९.६४टक्के,
जळगाव - ४०.६२ टक्के,
जालना- ५०.१४ टक्के,
कोल्हापूर- ५४.०६ टक्के,
लातूर _ ४८.३४ टक्के,
मुंबई शहर- ३९.३४ टक्के,
मुंबई उपनगर-४०.८९ टक्के,
नागपूर - ४४.४५ टक्के,
नांदेड - ४२.८७ टक्के,
नंदुरबार- ५१.१६ टक्के,
नाशिक -४६.८६ टक्के,
उस्मानाबाद- ४५.८१ टक्के,
पालघर- ४६.८२ टक्के,
परभणी- ४८.८४ टक्के,
पुणे - ४१.७० टक्के,
रायगड - ४८.१३ टक्के,
रत्नागिरी- ५०.०४टक्के,
सांगली - ४८.३९ टक्के,
सातारा - ४९.८२टक्के,
सिंधुदुर्ग - ५१.०५ टक्के,
सोलापूर -४३.४९ टक्के,
ठाणे - ३८.९४ टक्के,
वर्धा - ४९.६८ टक्के,
वाशिम -४३.६७ टक्के,
यवतमाळ - ४८.८१ टक्के मतदान झाले आहे.
0000
उत्तर मतदार संघातील पांडुरंग नगर येथील जनता प्राथमिक शाळांमध्ये दिव्यांग महिला मतदान करताना
नवमतदार इशा जैन हिने पहिल्यांदा आपला मतदानाचा हक्क बजावला
फुलविक्रेता महिला सत्यभामा थोरात .
No comments:
Post a Comment