Wednesday, November 20, 2024


नांदेडमध्ये ज्येष्ठ व दिव्यांगांनी मोठ्या संख्येने मतदान केंद्रावर येऊन मतदान केले आहे. दिव्यांगांना सुविधा व्हाव्यात यासाठी विशेष उपाययोजना प्रत्येक मतदान केंद्रावर प्रशासनाने केल्या होत्या.


नांदेड लोकसभेसाठी आज दुपारी 1 वाजता 27.25
तर विधानसभेसाठी 28.15 टक्के मतदान

1 वाजेपर्यत हदगावमध्ये सर्वाधिक तर मुखेडमध्ये सर्वात कमी मतदान
                                                                                                                                                                नांदेड , दि.20 नोव्हेंबर :- आज सकाळी 7 वाजेपासून नांदेड जिल्ह्यात उर्त्स्फूतपणे मतदानाला सुरुवात झाली असून अनेक मतदान केंद्रावर मतदाराच्या रांगाच रांगा दिसून आल्या आहेत. नांदेड जिल्ह्यात आज दुपारी 1 वाजेपर्यत लोकसभा पोटनिवडणुकीसाठी 27.25 टक्के तर विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी 28.15 टक्के मतदान झाले आहे.
 
नागरिकांनी जास्तीत जास्त घराबाहेर पडून मतदान करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. नांदेड जिल्ह्यात 9 मतदार संघात 83-किनवट मतदारसंघात 33.47 टक्के, 84-हदगाव मतदारसंघात 32.07 तर 85-भोकर मतदारसंघात 27.54 टक्के , 86-नांदेड उत्तर 27.64, नांदेड दक्षिण 24.70, 88-लोहा मतदारसंघात 25.03, 89-नायगाव मतदारसंघात 31.64  टक्के, 90-देगलूर मतदारसंघात 30.17  टक्के, 91-मुखेड मतदारसंघात 21.73 टक्के मतदान झाले आहे.
00000




 

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...