Friday, August 30, 2019

यशकथा


प्रशासनाच्या सकारात्मक भूमिकेला गावकऱ्यांचा प्रतिसाद
मुख्यमंत्री सहायता निधीतून गणीपूरचा कायापालट
           
नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यातील मौजे गनीपूर हे गाव.... गनीपूर निसर्गरम्य डोंगराळ भागात वसलेले एक छोटेसे गांव आहे. गनीपूर गावाच्या पश्चिमेकडे असलेल्या मौ. सोमठाना गावाकडून एक नाला, पूर्वेकडे असलेल्या मौ.बिनताळ गावकडून एक नाला , उत्तरेकडून मौ. जिरोना गावाकडून एक नाला वाहत येतो. हे तिन्ही नाले मौ. गनीपूर गावानजीक येवून संगम पावतात. गावाच्या उत्तरेकडून मौ. वघाळाकडे ( दक्षिण उत्तर) वाहत जातो. हा नाला गावाच्या उत्तरेस असलेल्या दोन पर्वतामधून वाहतो. याच नाल्यावर मौ. गनीपूर, जिरोना, हिरडगाव आणि सोमठाणा या गावाकरिता पाणी पुरवठा करणाऱ्या दोन पाणी पुरवठा विहीरी आहेत. अपुऱ्या पर्जन्यामनामुळे विहीरीच्या पाणी पातळीत दिवसें-दिवस खालावली जात होत्या. परिणामी त्या दोन विहीरी जानेवारी ते फेब्रुवारी महिन्यातच कोरड्या पडत होत्या. परिणामी तेथे पाणी टंचाईचा सामना करावा आगत होता.
           
जिल्हा प्रशासन व लोक प्रतिनिधी यांच्या प्रयत्नामुळे मौ. गणीपूर गाव मा. मुख्यमंत्री सहाय्यता निधीतंर्गत सन 2016-2017 मध्ये निवडले गेले होते. जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली या गावाचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी सोडविण्यासाठी जलसंधारण विभागामार्फत एकत्रित संगम झालेल्या नाल्यावर मा. मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून दोन पश्चिमेकडून वाहत येणाऱ्या नाल्यावर जलयुक्त शिवार अभियानातून एक असे तिन सिमेंट नाला बांध मंजूर करण्यात आला . या कामामुळे गावातून वाहून जाणारे पाणी गावातच अडविले . यातून जास्तीत-जास्त पाणीसाठा निर्माण झाला व गावाच्या बाजूच्या बोअर व विहीरीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. तसेच शेतीसाठी सुरक्षित सिंचन उपलब्ध झाले आहे.
            उमरी तालुक्यातील गणीपूर हे तालुक्यापासून 6 ते 8 कि.मी. अंतरावर गाव असून 600 ते 700 लोकसंख्या असलेल्या गावात पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती. उपविभागीय अधिकारी सचिन खल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली गावकऱ्यांनी सहकार्य व श्रमदानातून पाणी प्रश्न सोडवण्यात यश आले. जवळपास 47 मीटर लांबी व साडेतीन मीटर उंचीचा सिमेंट नाला बांध, तसेच दुसरा 29 मीटर लांब व 2 मीटर उंचीचा नाला बंधाऱ्याचे काम पूर्ण झाले. या बंधाऱ्यामुळे गणीपूरसह सात ते आठ जवळपासच्या गावातील जनावरासाठी लागणाऱ्या पाण्याचा प्रश्न सुटला असून हा बंधारा दुष्काळात वरदानच ठरले आहे.                                                                      
-         मीरा ढास,
प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी, नांदेड  
00000

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...