Friday, August 30, 2019


अटल महापणन विकास अभियान अंतर्गत विविध
उपक्रमाबाबत जनजागृती लोक संवाद मोहिम प्रारंभ
औरंगाबाद, दि.29, (विमाका) :- अटल महापणन विकास अभियान अंतर्गत विविध उपक्रमाबाबत जनजागृती लोक संवाद मोहिमेचा प्रारंभ झाला, या लोकसंवाद मोहिमे अंतर्गत औरंगाबाद विभागाचा विभागस्तरीय कार्यक्रम विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, औरंगाबाद यांचे कार्यालयामध्ये दि.27 ऑगस्ट रोजी पार पडला.
या कार्यक्रमाचे उद्घाटन माहिती जनसंपर्क महासंचालनालयाच्या, मराठवाडा विभागाचे माहिती संचालक गणेश रामदासी यांचे हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था योगीराज सुर्वे, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था अनिलकुमार मु.दाबशेडे, जिल्हा पणन अधिकारी उपसरव्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ, विभागीय कार्यालय औरंगाबाद जिल्ह्यातील उप/सहायक निबंधक, सहकारी संस्था ता.सर्व जिल्हा व्यवस्थापक, सहकार विकास महामंडळ पुणे उपस्थित होते.
माहिती संचालक गणेश रामदासी यांनी मार्गदर्शन केले की, सदर अभिनव संस्थांचे उत्पादनाचे ब्रँडींग होणे गरजेचे आहे. सदर संस्थांची माहिती ही फेसबुकवर सुध्दा अद्ययावत करावी जेणे करुन लोक संवाद साधण्यास मदत होईल. तसेच आपले कडील प्रसिध्द असलेली धान्ये जसे ज्वारी, बाजरी . हे उत्तर भारतामधील मोठ्या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर मागणी असल्यामुळे संस्थेच्या मालाची विक्री सदर बाजारपेठेमध्ये केली गेली पाहिजे.
यावेळी योगीराज सुर्वे यांनी सांगितले की, महाराष्ट्र सहकारी पणन महासंघ, खरेदी विक्री संघ विविध कार्यकारी सहकारी सोसायटी यांचे बळकटीकरण करण्यासाठी दिनांक 25 डिसेंबर 2016 पासून राज्यात अटल महापणन विकास अभियान राबविण्यात येत आहे. खरेदी विक्री संघ विविध कार्यकारी सहकारी संस्थांना नाविण्यपूर्ण उपक्रम/व्यवसाय सुरू केले आहेत. ही कामे विविध प्रसारमाध्यमांतून सहकारी संस्था शेतकरी उत्पादक कंपन्या, महिला बचत गट, शेतकरी सर्वसामान्य लोकांपर्यत पोहोचविणे गरजेचे आहे, जेणेकरुन सहकारी संस्थांनी सुरू केलेल्या नाविण्यपूर्ण उपक्रमांचा लाभ लोकांना मिळणे त्यासोबतच, आर्थिकदृष्ट्या सहकारी संस्थांच्या बळकटीकरणासाठी मदत होईल. राज्यात 5000 विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांचे सक्षमीकरणाचे उद्दिष्ट आहे.
औरंगाबाद विभागामध्ये औरंगाबाद, जालना, परभणी हिंगोली हे चार जिल्हे आहे. जानेवारी 2019 पर्यंत सदर उपक्रमांतून केलेल्या कामांची माहिती पुढील प्रमाणे आहे. औरंगाबाद विभागात एकूण 31 तालुके असून प्रत्येक तालुक्यात पणन व्यवस्थेतील 15 संस्था असे एकूण 465 संस्थांची निवड करण्यात आली आहे. त्यापैकी VSTF मधील 1000 गावांपैकी संस्था याप्रमाणे निवडलेल्या संस्था संख्या 19 आहे. विभागातील Business Development Plan (व्यवसाय विकास आराखडा) तयार केलेल्या संस्थांची संख्या 84 आहे. औरंगाबाद विभागातील पणन व्यवस्थेतील निवड केलेल्या संस्थांपैकी Royal Agro पार्टनर संस्थांची सामंजस्य करार (MOU) केलेल्या संस्था 369 आहे. औरंगाबाद विभागातील नवीन व्यवसाय केलेल्या 84 संस्थांनी एकूण व्यवसायात झालेली गुंतवणूक रुपये 204.96 लाख इतकी झालेली आहे. नवीन व्यवसायात आजपर्यंत झालेली उलाढाल रुपये 83.42 लाख इतकी झालेली आहे. नवीन व्यवसायापासून संस्थेला मिळालेला एकूण उत्पन्न रुपये 41.44 लाख इतके झाले आहे. नवीन व्यवसायातील संस्थेला मिळालेला निव्वळ नफा रुपये 29.33 लाख इतका झालेला आहे. या माध्यमातून 145 रोजगार निर्मिती झालेली आहे. अटल महापणन विकास अभियानाच्या प्रथ्ज्ञम द्वितीय वर्षात उत्कृष्ट काम करणाऱ्या संस्थांना अटल अटल महापणन पुरस्कार देण्यासाठी विभाग समितीने खरेदी विक्री संघ जिल्हा समितीने विविध कार्यकारी सेवा सहकार संस्थांची प्रथम, द्वितीय तृतीय अशी संस्थांची निवड करुन पात्र संस्थांना प्रथम वर्ष सन 2016-17 द्वितीय वर्ष सन 2017-18 मध्ये अटल महापणन पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. उपरोक्त उपक्रमातून पणन व्यवस्थेतील सहकारी संस्थांसाठी महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ पुणे (MCDC) यांचे मार्फत अटल अर्थसहाय्य योजना राबविण्यात आली असून या माध्यमातून औरंगाबाद विभागातील जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था औरंगाबाद,जालना, परभणी, हिंगोली यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील सहकारी संस्थांकडून प्राप्त झालेले अर्थसहाय्याचे प्रस्ताव महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ पुणे यांना सादर केले आहे. कॉप शॉप-शहरी सहकारी हौसिंग सोसायटी, मार्केटिंग फेडरेशन, ग्रामीण सहकारी संस्था, इतरचे कॉप शॉपची माहिती प्रपत्र- प्रपत्र- मध्ये देण्याचे सूचना सर्व जिल्हा उपनिबंधक यांना देण्यात आल्या आहेत.
******

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...