Thursday, June 12, 2025

 वृत्त क्रमांक 609

महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखरजी मुंदडा यांचा दौरा 

नांदेड दि. 12 जून :- महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखरजी मुंदडा हे 14 व 15 जून रोजी दोन दिवसांच्या नांदेड जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील.

शनिवार 14 जून रोजी पुणे येथून विमानाने सायं. 5.45 वा. नांदेड विमानतळ येथे आगमन व पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे प्रयाण. सायं. 6 ते 6.30 वाजेपर्यंत पोलीस अधीक्षक कार्यालय नांदेड येथे राखीव. सायं. 6.30 वा. तख्त सचखंड श्री हजूर साहिब गुरूद्वारा नांदेडकडे प्रयाण. सायं 6.40 ते रात्री 7.40 पर्यंत तख्त सचखंड श्री हजूर साहिब गुरूद्वारा नांदेड येथे राखीव. रात्री 7.40 वा. तख्त सचखंड श्री हजूर साहिब गुरूद्वारा नांदेड येथून शासकीय अतिथीगृहाकडे प्रयाण. रात्री 7.50 वा. शासकीय अतिथीगृह येथे आगमन व मुक्काम. 

रविवार 15 जून रोजी सकाळी 8 वा. शासकीय अतिथीगृह येथून हिंगोली जिल्ह्यातील जरोदा ता. कळमनुरीकडे प्रयाण. हिंगोली जिल्ह्यातून दुपारी 3.10 वा. अर्धापूर तालुक्यातील प पु संतबाबाजी श्री जगदिशजी महाराज गोशाळा ग्राम बाबापूर येथे आगमन व राखीव. दुपारी 3.40 वा. ग्राम बाबापूर येथून नांदेड विमानतळाकडे प्रयाण. दुपारी 4 वा. नांदेड विमानतळ येथे आगमन व राखीव. सायं 6.10 वा. विमानाने पुणेकडे प्रयाण करतील.

00000

No comments:

Post a Comment

वृत्त क्र.  724 देशाचा समृध्दीसाठी विद्यार्थ्यांची बौध्दीक क्षमता वाढवावी – राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे नांदेड, दि. 14 जुलै : जगात शि...